पूर्वसंचित आणि कर्मसिद्धांत : भारतीय मानसिकतेतला फंडामेंटल घोळ !
लेखनविषय (Tags)
लेखनप्रकार (Writing Type)
पूर्वसंचित आणि कर्मसिद्धांत या दोन्ही एकमेकात गुंफलेल्या, फंडामेंटली चुकीच्या मानसिक धारणा आहेत.
कर्मसिद्धांत मानणं म्हणजे आलेल्या आपत्तीचं वस्तुनिष्ठ विश्लेषण करुन योग्य निर्णय घेण्याऐवजी,
ते आपल्या पूर्वसंचिताचं फळ समजून गप्प बसणं, किंवा
(आता इलाजच नाही म्हटल्यावर), दुसर्याला माफ करणं, किंवा
प्रसंग निस्तरण्याशिवाय पर्यायच नसेल तर,
अत्यंत पडेल मनोवृत्तीनं, जमेल तसा प्रसंग रेटणं !
शिवाय ही थिअरी मानणार्याला,
पूर्वसंचितात आपली नक्की किती लफडी आहेत याचा पत्ता नसतो,
त्यामुळे आला बिकट प्रसंग की लाव थिअरी असं करत;
तो स्वतःचा सारासार विचार कायमचा गमावून बसतो.
त्रासदायक आठवणींपासुन सुटका कशी करुन घ्यावी? या लेखावरचे प्रतिसाद,
जनमानसात ही भावना किती डीप गेलीये ते दर्शवतात.
त्यामुळे, पूर्वसंचित आणि कर्मसिद्धांत या दोन्ही धारणांच निस्सरण झाल्याखेरिज, आलेल्या आपत्तीचं वस्तुनिष्ठ विश्लेषण करुन योग्य निर्णय घेता येणार नाही.
यास्तव ही पोस्ट.
_____________________________________
या धरणा अनेक ग्रंथात आणि अनेक अध्यात्मिक दिग्गजांनी दिमाखात मांडल्या आहेत,
त्या ग्रंथांच्या किंवा दिग्गजांच्या अवमानाचा कोणताही हेतू नाही.
तस्मात, सदस्यांनी त्यांच्या श्रद्धा वगैरे मधे न आणता फक्त विषयाला धरुन प्रतिसाद दिल्यास विधायक चर्चा होईल.
तर्कशास्त्रानुसार : An Asserter Has to Prove His Claim
थोडक्यात `पूर्वसंचित किंवा कर्मसिद्धांत आहे' असा दावा करणार्यांनी तो सिद्ध करायचा आहे.
_______________________________
या सिद्धांतांप्रमाणे व्यक्ती आता जे काय भोगते आहे ते त्याच्या पूर्वकर्माचं फळ आहे :
मना त्वांची रे पूर्वसंचित केले ।
तया सारखे भोगणे प्राप्त झाले ॥
१. हा सिद्धांत मांडणार्यांचा मानसशास्त्राचा अभ्यास फारसा नव्हता. स्मृती ही केवळ त्या व्यक्तीच्या मेंदूत असते आणि अस्तित्वात इतरत्र तो डेटा साठवण्याची कोणतीही सोय नाही याची त्यांना कल्पना नव्हती.
२. शिवाय मृत्यूत, देहासमेत मेंदूही विघटीत होऊन, एका व्यक्तीची संपूर्ण जीवन कहाणी तिथेच संपते. त्यामुळे मेंदूतली स्मृती पुढे सरकायची कोणतीही शक्यताच उरत नाही, इतकी उघड गोष्ट संतांच्या लक्षात आली नाही.
३. कर्मफलाच्या अंमलबजावणीला प्रत्येक व्यक्तीचा अनेक जन्मांचा डेटा स्टोअर करुन तो प्रत्येक व्यक्तीचं ‘कर्मफल रिअल टाईम बेसिसवर’, मॅनेज करु शकेल अशी प्रणाली अस्तित्वात हवी.
अर्थात, संतमंडळींच्या वेळी अशा काही सिस्टम्सच नसल्यामुळे त्यांना आपल्या कल्पनेतला फोलपणा लक्षात आला नाही.
४. शिवाय डेटा नीती-अनीती किंवा पाप-पुण्याच्या कल्पनांवर सॉर्ट करण्यासाठी लिहावा लागणारा अल्गरिदम कुणाही देवाच्या देवाला सुद्धा, लिहिता येणं अशक्य आहे. कारण त्या कल्पनाच मुळात मानवी आहेत. समाज व्यवस्थेसाठी त्या उपयोगी असल्या तरी अस्तित्वात असा कोणताही मॉरल कोड नाही.
५. मुळात अस्तित्वात वेळ नाही त्यामुळे पूर्वसंचित ही कल्पना जे कालविभाजन गृहित धरते ते निराधार आणि कपोलकल्पित आहे. व्यक्तीच्या दृष्टीनं काल ही उपयोगीता आहे पण ती प्रक्रिया मापनासाठी माणसानं शोधलेली कल्पना आहे. अस्तित्वात फक्त एकच काळ कायम चालू आहे, तो म्हणजे वर्तमान काळ !
अशाप्रकारे पूर्वसंचित आणि कर्मसिद्धांत या बोगस कल्पना आहेत.
______________________________
तस्मात, आपण कुणाचा गैरफायदा न घेणं आणि कुणाला आपला गैरफायदा न घेऊ देणं इतक्या साध्या तत्वानी व्यक्ती मुक्त, स्वच्छंद आणि अपराध शून्य जीवन जगू शकते.
कोणतंही पूर्वसंचित नाही आणि अत्यंत पारदर्शक वागणुकीमुळे कोणताही कर्मविपाक नाही; ही खरी आणि वास्तविक मुक्त चित्तदशा आहे.
ह्या धाग्यावर पुरेशी चर्चा झाली असून आता केवळ व्यक्तिगत टीका चालू असल्याने हा धागा वाचनमात्र करत आहोत.
--मिपा व्यवस्थापन.
प्रतिक्रिया
पूर्वसंचिताची कल्पना ही कायमच
सोत्री
ती कल्पना सांगाल तर बरे होईल.
एक उदाहरण घेऊ या.
सोत्रींनी सगळ्यासाठी
जिथे मुदलात जन्म मृत्युच नाही तिथे पुनर्जन्म कसला आलाय.
https://www.misalpav.com
इथले डावे,पुरोगामी
(No subject)
खतरनाक =))))
मिपाकरांचे पाप?
देव आहे की नाही ??
अवांतर : स्मृतीसाठा
@गामा पैलवान - तुमचं म्हणणं योग्य आहे
@ गामा पैलवान : अवयव प्रत्यारोपण झालेल्या ग्राहकात
एक व्यावहारिक प्रश्न
@ गामा पैलवान : कुठल्या कुठे चाललात !
स्मृतीभ्रंश नव्हे ....
गा.पै.
एक लेख सापडला
@ गामा पैलवान : मुद्दा हुकतोयं !
ह्याला काय म्हणणार
संक्षी सरांच्या या व इतर
@ मामाजी : हा ओपन फोरम आहे
संक्षी सर,या
लॉल
@ मामाजी : accounts मधे opening balance घेउनच
दुतोंडी स्मृती स्ट्रींगवाले विज्ञाननिष्ठ बाबा
#१, २, ३ सारखी बालिश विधाने
@ कोहंसोहं१० : जगी जीवनाचे सार
प्रतिवाद करून काय होणार आहे?
हिंदू धर्म हा श्रेष्ठ धर्म आहे
तस्मात, आपण कुणाचा गैरफायदा न
@ कानडाऊ योगेशु : पुन्हा अगदी थेऑरिटिकल विधान ?
संक्षी सर,
तस्मात, आपण कुणाचा गैरफायदा न घेणं आणि कुणाला आपला गैरफायदा न घेऊ देणं इतक्या साध्या तत्वानी व्यक्ती मुक्त, स्वच्छंद आणि अपराध शून्य जीवन जगू शकते.हे अगदी बाळबोध विधान नाही वाटत तुम्हाला. कमीत कमी महाराष्ट्रीयन संस्कृतीत तरी लहानपणापासुनच असे संस्कार केले जातात. उदा. शत्रुबुध्दी विनाशाय.. सुसंगती सदा घडो. सुजनवाक्य कानी पडो वगैरे.. तुम्ही जे वर सांगता आहात समर्थांनी ते आधीच सांगितले आहे. मना सज्जना भक्तिपंथेचि जावे तरी श्रीहरी पाविजेतो स्वभावे. जनी निंद्य ते सर्व सोडुनि द्यावे जनी वंद्य ते सर्व भावे करावे. प्रभाते मनी राम चिंतीत जावा पुढे वैखरी राम आधी वदावा सदाचार हा थोर सांडु नये तो जगी तोचि तो मानवी धन्य होतो मना वासना दुष्ट कामा न येरे मना सर्वथा पापबुध्दी नको रे.. मना सर्वथा नीती सोडू नको हो.. मना अंतरी सार विचार राहो.. नको रे मना क्रोध हा अंगिकारु नको रे मना मत्सरु दंभ भारू. मना त्वांचि रे पूर्व संचित केले तयासारखे भोगणे प्राप्त झाले. देवादिकांचे उल्लेख तूर्तास राहु द्या पण सुमारे ४००-४५० वर्षांपूर्वी समर्थ हे लिहुन गेलेत. लोकांना जर इतक्या सहजगत्या वळले असते तर इथे एव्हाना स्वर्ग अवतरायला हवा होता. तुमच्याकडे हे कसे साध्य करायचे ह्याचे उपाय नसतील तर तुमचे विधान शब्द बापुडे केवळ वारा ठरते. हे म्हणजे तरंगता येणे अगदी सोपे आहे फक्त बुडता कामा नये असे म्हटल्यागत झाले. बुडायचे कसे नाही हे तुम्हाला सांगता आले तर तो सल्ला काहीतरी विधायक ठरेल. केवळ देव नाही पूर्वसंचित नाही असे म्हणुन तुम्ही बुडत्याला मिळालेला काडीचा(तुमच्या मते) आधारही नाकारत आहात.@ कानडाऊ योगेशु : तुमच्याकडे हे कसे साध्य करायचे..
पर्फेक्ट
कार्य व रचना साम्य
कर्मफळ विदागार व्यवस्थापन प्रणाली ( karmik detabase management )
@ गामा पैलवान : तोच तर मुद्दा आहे !
एकीकडे म्हणायचं, " मानवी
असल्या कॉण्ट्रॅडिइक्शन्स नाहि दाखवायच्या.
विकेंद्रित प्रक्रियन
गामाजी,
शरीर विघटीत झालं तरी स्मृती
@ गामा पैलवान : डिस्ट्रीब्युटेड प्रोसेसिंग आणि डेटा
हे इतरत्र ठिकाण कुठे आहे ?
कर्म दिसंत नसतं
@ गामा पैलवान : सगळाच कल्पनाविलास !
कल्पना आणि कल्पनाविलास
Pagination