Skip to main content

आमंत्रण

लेखक अनन्त्_यात्री यांनी रविवार, 14/06/2020 20:45 या दिवशी प्रकाशित केले.
ओथंबल्या आभाळाला स्वप्न हिरवं पडलं त्याच्या दिठीत मावेना तेव्हा धरतीला दिलं वीज झेलण्या झुरतो माथा बेलाग कड्याचा कुरणांच्या पटावर आज डाव पावसाचा रिमझिमत्या ढगाच्या पैंजणांची रुणझुण सृजनाच्या सोहळ्याचे ओलेचिंब आमंत्रण
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 5341
प्रतिक्रिया 11

प्रतिक्रिया

वीज झेलण्या झुरतो माथा बेलाग कड्याचा कुरणांच्या पटावर आज डाव पावसाचा
मस्त

सृजनाच्या सोहळ्याचे ओलेचिंब आमंत्रण पाउस कवितांचा शुभारंभ तर मस्त झाला आता पुढचे काहि दिवस वर्षामय होतील. पैजारबुवा,

कविता अतिशय आवडल्या गेली आहे. सं - दी - प

रिमझिमत्या ढगाच्या पैंजणांची रुणझुण सृजनाच्या सोहळ्याचे ओलेचिंब आमंत्रण व्वा !

वाह!! ढगाला पैंजण घातलं ते अजून छान नाहीतर आमच्या कल्पनेत ढग म्हणजे नुसता नगाऱ्याचा गडगडाट :) :)

देणार्‍या सर्व कवितारसिकांना मन:पूर्वक धन्यवाद!