आई घरी जायला निघते तेव्हा...
आई घरी जायला निघते तेव्हा,
प्रवासासाठी म्हणून केलेले तिचे पराठे थोडे जास्तच होतात, चुकून.
फ्रिजमध्ये केलेली असते माझ्या आवडीची
केळफुलाची भाजी, रसाची आमटी..
बाबांकडून खवून घेतलेलं खोबरं, सोललेला लसूण..
डब्बा भरलेला असतो तिखट पु-या, चकलीनं..
दाण्याचं कूट, जीरेपूड, धणेपूड..
कधी करते कोण जाणे!
आवरून ठेवलेला असतो बेड.
उशांचे अभ्रे, अंथरूण पांघरूण धुवायच्या कपड्यात,
कपाटात असतो पाठदुखीवरचा संपत आलेला स्प्रे,
डायबेटीसच्या गोळ्यांची पाकिटं.
ड्रॉवरमध्ये असतं मी दिलेलं पर्फ्युम, क्रीम वगैरे
"राहू दे इथंच, पुढच्या वेळेला मलाच होईल म्हणून"
नातींची नावं लिहून ठेवलेली पाकिटं
हमखास विसरलेले मी दिलेले पैसे..
मला आठवतात उगाच तिच्याशी घातलेले वाद
तिच्यावर काढलेला सगळ्या जगाचा राग
माझा चढलेला आवाज
अन् तिच्या डोळ्यतलं पाणी.
निघताना सामान ठेवायच्या गडबडीत राहून गेलेला नमस्कार, मिठी..
डोळ्यातलं पाणी अडवत मी फोन करते, कुठे पोचलीस विचारायला.
ते बोलून ती वर म्हणते, "लोणी कढवायचं राहिलंय, आज कर ते . आणि पायात आठवणीनं मोजे घाल, भेगा पडतील नाहीतर...."
आई घरी जायला निघते आणि मी पुन्हा मोठी होते..
हम्म...
सुरेख!! अगदी मनातली कविता!
शब्द न् शब्द आपलासा वाटला.
वा मस्त कविता.. आवडली..
ह्या कविता आठवल्या.. तुमच्या
वाह!
आत डोकवायला लावणारी कविता
छान आहे कविता. आमच्याकडे आईला
करंय, हे आईसाठी जास्त योग्य
खूपच सुरेख
क्या बात है.
पैजारबुवा, रारा , गणेशा, पलाश
आवडली कविता. सुंदर.
सुरेख !
अप्रतिम!!!
सस्नेह, वीणा आणि राघव...
अप्रतिम!
हम्म .... छान फार संवेदनशील .
खरंय. आई म्हणजे आईच.
वाह
छान आहे कविता
मिका, मीअपर्णा धन्यवाद!