उप्पीट मात्र बरे झाले

Primary tabs

मनस्विता's picture
मनस्विता in जे न देखे रवी...
19 May 2020 - 6:15 pm

प्रेरणा:
https://www.misalpav.com/node/46836

रवा होता खमंग भाजला
तरीही
उप्पीट मात्र बरे झाले

फोडणीत मोहरी तडतडली
तरीही
उप्पीट मात्र बरे झाले

उडीद डाळ त्यातच परतली
तरीही
उप्पीट मात्र बरे झाले

आधणातल्या रव्याला दणकून वाफ आणली
तरीही
उप्पीट मात्र बरे झाले

डिशमधल्या उप्पीटावर खोबरे-कोथिंबीर सजली
तरीही
उप्पीट मात्र बरे झाले

मीठ, साखर, लिंबू सगळी भट्टी पर्फेक्ट जमली
तरीही
उप्पीट मात्र बरे झाले

काय, कॉफी करू का? अर्थातच कर
तरीही
उप्पीट मात्र बरे झाले

बाकी स्वयंपाकात आहे निपुण, स्तुती करणार कशी
उप्पीट मात्र...

कविताविडंबन

प्रतिक्रिया

Prajakta२१'s picture

19 May 2020 - 9:45 pm | Prajakta२१

छान

मन्या ऽ's picture

19 May 2020 - 10:13 pm | मन्या ऽ

ना घातला फोडणीत कढीपत्ता अन् हळद
ना घातला कांदा
ना शेंगदाणे
उप्पीट मात्र बरे झाले! ;)

प्रिती-राधा's picture

19 May 2020 - 11:16 pm | प्रिती-राधा

छान

नावातकायआहे's picture

20 May 2020 - 12:18 am | नावातकायआहे

सं. क्षी. च्या रसग्रहणाच्या प्रतिक्षेत...

संजय क्षीरसागर's picture

26 May 2020 - 12:03 am | संजय क्षीरसागर

लाईफ लाँग स्पॉन्सर केली
तरीही
मी होते म्हणून झाले

फिया, ट्रिपा, आजारपणं, सारीसारी उपसून झाली
तरीही
मी होते म्हणून झाले

पार्लरं झाली, पैठण्या झाल्या, कपाटं संपली....
तरीही
मी होते म्हणून झाले

तीन बेडरुम, विथ टेरेस, सगळी ऐश करुन झाली
तरीही
मी होते म्हणून झाले

अ‍ॅब्सची मेंबरशिप घेऊ का ? अर्थात घ्यायची
तरीही
मी होते म्हणून झाले

किचन मॉड्युलर, वॉशिंग ऑटो, चेहेरा नेमका खुलणार कधी
मी होते म्हणून ...

कादंबरी...'s picture

21 May 2020 - 12:43 am | कादंबरी...

पोहे मात्र सुरेख झाले
उपीट मात्र बरे झाले
डोसे मात्र सुरेख झाले
वडे मात्र बरे झाले

पाककृती विभागात फिरल्यासारखं वाटलं :-)

चांदणे संदीप's picture

21 May 2020 - 7:29 am | चांदणे संदीप

या तिन्हींमध्ये, पोहेच सुरेख झाले.
पुलेशु!

सं - दी - प

सर्व प्रतिसाददात्यांचे अनेक आभार.