प्रेरणा:
https://www.misalpav.com/node/46836
रवा होता खमंग भाजला
तरीही
उप्पीट मात्र बरे झाले
फोडणीत मोहरी तडतडली
तरीही
उप्पीट मात्र बरे झाले
उडीद डाळ त्यातच परतली
तरीही
उप्पीट मात्र बरे झाले
आधणातल्या रव्याला दणकून वाफ आणली
तरीही
उप्पीट मात्र बरे झाले
डिशमधल्या उप्पीटावर खोबरे-कोथिंबीर सजली
तरीही
उप्पीट मात्र बरे झाले
मीठ, साखर, लिंबू सगळी भट्टी पर्फेक्ट जमली
तरीही
उप्पीट मात्र बरे झाले
काय, कॉफी करू का? अर्थातच कर
तरीही
उप्पीट मात्र बरे झाले
बाकी स्वयंपाकात आहे निपुण, स्तुती करणार कशी
उप्पीट मात्र...
वाचने
4378
प्रतिक्रिया
8
मिसळपाव
प्रतिक्रिया
छान
मस्त
छान
सं. क्षी. च्या रसग्रहणाच्या
तुमची फर्माईश !
In reply to सं. क्षी. च्या रसग्रहणाच्या by नावातकायआहे
पोहे मात्र सुरेख झाले
पोहे बियर आणि उप्पीट
सर्व प्रतिसाददात्यांचे अनेक