Skip to main content

वणवा

लेखक कौस्तुभ भोसले यांनी शुक्रवार, 08/05/2020 09:37 या दिवशी प्रकाशित केले.
असा पेटतो वणवा उरी घर्षती झाडे, आणि भणानून उठती दु:खाचे धूसर वाडे. रात्र वेशीला अडली अंधारच इथे सजलेला, अग्नीच्या तप्त तमांतून मोगरा कसा भिजलेला? कुणी हाक देऊनी स्वर्गी वणवा असा रोखावा, वनमेघ दाटूनी विवर्त वळीवाचा पाऊस यावा. -कौस्तुभ
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 2759
प्रतिक्रिया 4

प्रतिक्रिया

सुंदर

In reply to by प्रिती-राधा (verified= न पडताळणी केलेला)

धन्यवाद