मी न चाहता उगवतीचा
येईल त्याला जातो सादर
पसरूनि अंगावरती घेतो
अंधाराची काळी चादर
मोहक तिरिपा उजेडाच्या
मृगजळ फसवे तिथेच होई
त्याहूनी प्रिय, मजला घेणे
बरबटून काळोखाची शाई
नवे समर नव्या दिसाचे
तयां सोबत आरवतेची
हलके घाव देते भरूनि
तमात शांती नीरवतेची
जर का आहे प्रकाश जीवन
नवसृजनाची नांदी काळोख
गूढ गहिरे व्योम आणिक
अज्ञाताचा प्रवास काळोख
- संदीप भानुदास चांदणे (११/०५/२०२०)
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
3844
प्रतिक्रिया
10
मिसळपाव
प्रतिक्रिया
व्वा..., शब्दयोजना आवडली.
असेच म्हणतो.
In reply to व्वा..., शब्दयोजना आवडली. by प्रचेतस
छान
मी न चाहता उगवतीचा
मोहक तिरिपा उजेडाच्या
रचना आवडली..
त्याहूनी प्रिय, मजला घेणे
.
In reply to त्याहूनी प्रिय, मजला घेणे by एस
+१
सँडी भाऊ ,, या सुंदर कवितेला सलामी माझ्यातर्फे