चार दिसांची चहू चिंतने
भ्रमितपणाची बहू लक्षणे
विषासम त्या प्रवासातले
क्षणिक गोडवे अस्त पावले
अनाठाई त्या रूचक चिंता
स्वप् नसुखांच्या रजई विणता
सूर निराळे गवसण्यापरी
तारेवरचा नवा डोंबारी
नको म्हणाया धजते ना मन
धडगत नाही रीते रीते पण
बेधुंदपणाचि सूटली आवड
दिनपणाचि जूडली कावड
क्षिण जाहल्या नियतिच्या वाटा
नको जपाया स्वप्नांच्या लाटा
अधांतरी क्षितिजाच्या मागे
विझून गेले लख्ख पोरगे
काव्यरस
वाचने
2047
प्रतिक्रिया
3
मिसळपाव
प्रतिक्रिया
परत परत 5-6वेळा वाचली तुमची
छान कविता पण..
प्रयत्न हाच होता