मिसळपाव काव्यलेखन स्पर्धा : २०२०

नमस्कार मंडळी,
नुकतीच शासनाने लॉकडाउन आणखी दोन आठवडे वाढवत असल्याची घोषणा केली. म्हणजे आपल्याला आणखी दोन आठवडे घरी थांबायचे आहे. म्हणून मग आपण आणखी एक स्पर्धा आयोजित केली आहे.
सोसुनिया लॉकडाउनचे घाव
पुरता इस्कटलोय, काय सांगू राव
मनी दिसे आता फक्त एकच नाव
मिसळपाव मिसळपाव
काय म्हणतो, बरोबर ना भाव?
प्रत्येकाच्या आतमध्ये एक कवी दडलेला असतो. आणि पुढच्या काही दिवसांत त्याला बाहेर काढायचे आहे. कवितेला विषयाचे कसलेच बंधन नाही. मात्र ही स्पर्धा आहे, तेव्हा आपली कविता इतरांपेक्षा हटके असली पाहिजे याची जरूर काळजी घ्या. कविता लिहिण्यात जो आनंद मिळतो, तो इतर कोणत्याही लिखाणातून मिळत नाही. तेव्हा या आनंदाला मुकू नका..!
तर ह्या स्पर्धेचे नियम खालीलप्रमाणे आहेत -
१) धागा प्रकाशित झाल्यानंतर स्पर्धा लगेचच सुरू होईल आणि २० मे २०२० रोजी २३.५९ भाप्रवे संपेल.
२) स्पर्धकांनी आपली कविता 'साहित्य संपादक' या आयडीला व्यनिने पाठवायची आहे.
साहित्य संपादकांना व्यनि पाठवण्यासाठी क्लिक करा.
कोणत्याही साहित्य संपादकाला वैयक्तिक व्यनिने किंवा मिसळपावच्या अथवा सासंच्या ईमेल आयडीवर किंवा अन्य कोणत्याही दुसऱ्या मार्गाने कविता पाठवू नये.
३) प्रत्येक व्यक्ती जास्तीत जास्त २ (अक्षरी दोन फक्त) कविता पाठवू शकते. मतदान दोन्ही कवितांना होईल, मात्र जर दोन्ही कवितांची मते विजयी क्रमांकाच्या यादीत आली, तर दोन्हींपैकी ज्या कवितेला जास्त मते मिळालेली असतील, ती एकच कविता विजेती धरली जाईल.
४) ०३ मे २०२० ते २० मे २०२० या काळात दर चोवीस तासांतून एकदा साहित्य संपादक आयडी आलेल्या कविता स्वतःच्या नावाने प्रकाशित करेल. मूळ कवीचे नाव जाहीर होणार नाही. ('कविता बघून मत देण्याऐवजी आयडी बघून मत देतात' हा आक्षेप घेतला जाऊ नये, म्हणून हे करण्यात आले आहे.). स्पर्धा संपल्यावर कवींची ओळख जाहीर करायचीच आहे.
५) मूळ कवीने आपली ओळख जाहीर करू नये अशी अपेक्षा आहे. कवितेच्या धाग्यावर, मिपावरच्या सार्वजनिक जागेत (अन्य धाग्यांवर किंवा खरडफळ्यावर), मिपाच्या फेसबुक पानावर किंवा ट्विटर अकाउंटवर आपली ओळख कवी म्हणून जाहीर केल्यास ती कविता रद्दबातल ठरवून स्पर्धेतून बाद केली जाईल.
६) साहित्य संपादक कविता प्रकाशित करताना मुळाबरहुकूम (म्हणजे जशी आली तशी) करतील. मुद्रितशोधन किंवा अन्य कोणतेही संपादकीय संस्कार केले जाणार नाहीत. स्पर्धेमधल्या कवितेमध्ये व्याकरणाचे नियम, शुद्धलेखन, मुद्रितशोधन वगैरेची जबाबदारी संपूर्णपणे स्पर्धकाची असेल.
७) एकोळी, दोनोळी किंवा चारोळी पाठवू नये. तसेच दीर्घ कविताही स्पर्धेसाठी स्वीकारल्या जाणार नाहीत. याबाबत काही अपवाद असतील तर त्याचा संपूर्ण निर्णय साहित्य संपादक घेतील.
८) तसेच, कवितेत कोणतीही चित्रे, दृक्-श्राव्य दुवे, फॉरमॅटिंग वगैरे असल्यास ते वगळून कविता प्रकाशित केली जाईल.
९) जातिधर्माला दुखावणारे, राजकीय किंवा सामाजिक द्वेष पसरवणारे, वा अश्लील लेखन आल्यास कविता स्पर्धेसाठी न घ्यायचा निर्णय संपादकीय अधिकारात घेतला जाईल. प्रवेशिका नाकारायचा अधिकार साहित्य संपादक राखून ठेवत आहेत. स्पर्धा संपल्यावर कवी नियमबाह्य कविता स्वतःच्या जबाबदारीवर प्रकाशित करू शकतात.
१०) कवितेला आपण देऊ इच्छित असणारे नाव व्यनिच्या विषयामध्ये लिहिलेले असावे.
११) कुठेही पूर्वप्रकाशित कविता स्वीकारली जाणार नाही.
१२) कविता आधारित असल्यास, कवितेच्या शेवटी तसा स्पष्ट उल्लेख करावा.
कविता प्रकाशित झाल्यावर लगेच मतदान सुरू होईल आणि दि. २३ मे २०२०, २३.५९ भाप्रवेपर्यंत करता येईल.
मतदान पद्धत : सदस्यांनी प्रतिसादात +१ असे लिहिलेले एक मत धरले जाईल. +१०, +१११, +७८६, +१००^१०० हे सर्व १ मत धरले जाईल.
सदस्यांनी मतदानाबरोबरंच अभिप्रायाचे दोन शब्दही जरूर लिहावेत, ही विनंती. याचा कवीला जरूर लाभ मिळेल.
निकाल दिनांक २५ मे २०२० रोजी घोषित केला जाईल.
विजेत्यांना मिसळपाव दिवाळी अंक २०१९ची छापील प्रत बक्षीस म्हणून देण्यात येईल (विजेता भारतामध्ये असल्यास).
भारताबाहेरील विजेत्यांची प्रत त्यांच्या जवळच्या व्यक्तीला देता येईल.
लेखन करण्याविषयी / व्यनिविषयी / स्पर्धेविषयी कोणतीही शंका अथवा अडचण असल्यास प्रतिसादांमध्ये विचारू शकता.
एक मार्गदर्शिका -
कविता मराठीमध्ये असावी. एखादे हिंदी-इंग्लिश वाक्य कवितेची गरज म्हणून चालेल, पण कविता मराठीत हवी. प्रमाण मराठी, झाडीबोली, वऱ्हाडी, खान्देशी, सातारी, पुणेरी, आगरी, मालवणी... कोणतीही पण मराठीत हवी..
मिसळपाव
प्रतिक्रिया
हुर्रेर्रेर्रे....
तुमच्या ह्या प्रतिसादाचा
In reply to हुर्रेर्रेर्रे.... by चांदणे संदीप
जिंकायलाच पाहिजे असं काही नाही...
In reply to तुमच्या ह्या प्रतिसादाचा by गणेशा
कुठल्या अमक्या तमक्याला नाही तर खमक्याला हरवून जिंकलोय! ;)
In reply to जिंकायलाच पाहिजे असं काही नाही... by चांदणे संदीप
वा वा!
झकास स्पर्धा...
सहमत.
In reply to झकास स्पर्धा... by मोदक
घ्या.... गारेगार
In reply to सहमत. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
+१
In reply to घ्या.... गारेगार by चांदणे संदीप
काय राव प्राडॉ.. छ्या..
In reply to +१ by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गप्पू पेक्षा...
In reply to काय राव प्राडॉ.. छ्या.. by मोदक
हा असला पुष्पगुच्छ द्या.. ;)
In reply to सहमत. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
(No subject)
In reply to झकास स्पर्धा... by मोदक
(No subject)
In reply to झकास स्पर्धा... by मोदक
ये बात
जुन्या कविता चालणार नाही हि
वा
वा
येऊ दे एकापेक्षा एक सरस कविता
अरे वा! छान.
जसा आवाहन मधला फोटो बदलला
प्रदर्शित कवितेचं विडंबन
प्रदर्शित कवितेचं विडंबन
तुम्ही मोबाईलवरून टाईप करताना
In reply to प्रदर्शित कवितेचं विडंबन by भीमराव
एक विंनंती.
[शशक' २०२०]
In reply to एक विंनंती. by गणेशा
किंवा इथेही
In reply to [शशक' २०२०] by सुमो
धन्यवाद.. वरती साईट open
In reply to किंवा इथेही by जव्हेरगंज
वरती काळ्यापट्टीवर शतशब्दकथा
In reply to धन्यवाद.. वरती साईट open by गणेशा
शतशब्दकथा २०२०लिहीलेलं आहे. ही सेम तिच लिंक आहे. शशक आणि कवितेसाठी कॉमन.छोटीशी दुरुस्ती...
सर्वांच्या कविता वाचताना,
कवितेशी आताशा आम्ही कसलीच
In reply to सर्वांच्या कविता वाचताना, by गणेशा
कवितेशी आताशा आम्ही कसलीच सलगी ठेवली नव्हती..एखाद्या फर्मास गझलेची सुरुवात आहे ही गणेशा... लिही आणखी...साहित्य संपादक वर व्यनि जात
जातोय की. मी आताच ट्राय केलं.
In reply to साहित्य संपादक वर व्यनि जात by अत्रुप्त आत्मा
पुन्हा तेच!
In reply to जातोय की. मी आताच ट्राय केलं. by जव्हेरगंज
व्यनी केला आहे. पहा.
In reply to पुन्हा तेच! by अत्रुप्त आत्मा
नमस्कार !
नक्की कोणता एरर येतोय खालील
In reply to नमस्कार ! by प्रिती-राधा (verified= न पडताळणी केलेला)
अॅक्सेस डिनाईड
क्लिक केल्यानंतर लॉगिन आहे का
In reply to अॅक्सेस डिनाईड by सचिन
अॅक्सेस डिनाईड
.
.
In reply to . by चांदणे संदीप
संदीप भाऊ..
In reply to . by चांदणे संदीप
आज सकाळी
In reply to . by चांदणे संदीप
हा देखील मस्त उपक्रम
व्यनि केला आहे. पहा.
In reply to हा देखील मस्त उपक्रम by बिपीन सुरेश सांगळे
काव्य/ कविता/ गीत आणि गजल हे दोन स्वतंत्र काव्यप्रकार गणले जावेत
आठवण:
उत्तमोत्तम कवितांचा संग्रह
सहमत
In reply to उत्तमोत्तम कवितांचा संग्रह by पाषाणभेद
.
सहमत आहे!
In reply to . by चांदणे संदीप
मी ही आज सकाळी पुन्हा सगळ्या
In reply to . by चांदणे संदीप
बरोबर
In reply to . by चांदणे संदीप
सर्व कविता आज पुन्हा वाचल्या,
सर्वच कविता वाचल्या . आवडल्या
प्रतिसादाच्या संख्येबाबत सहमत
आवडलेल्या कविता
+१
In reply to आवडलेल्या कविता by स्वच्छंद
आयडिया चांगली आहे..
In reply to आवडलेल्या कविता by स्वच्छंद