Skip to main content

सिनेमे पाहायचेत.

लेखक इनिगोय यांनी गुरुवार, 16/07/2015 07:55 या दिवशी प्रकाशित केले.
सिनेमे पाहायचेत. कोणते पाहावेत, कोणते पाहू नयेत याबद्दल खूप प्रतिसाद येतील यात शंका नाही. पण एक फिल्टर आहे, तो ८ ते १० वर्षे वयाच्या मुलासोबत काय पाहावं हा. लहान मुलांची कार्टुन्स आणि तसे चित्रपट तर पाहिले जातातच. पण त्याखेरीज निव्वळ ढोबळ मनोरंजनाच्या पलीकडे काय काय शोधावं, काय पाहिलं पाहिजे हा प्रश्न पडला आहे. या वयाच्या मुलांना आवर्जून दाखवायलाच हवेत असे कोणते सिनेमे आहेत? या वयाच्या मुलाचे कुटुंबीय कम् दोस्त म्हणूनही कोणते सिनेमे मोठ्यांनी पाहायला हवेतच? भाषेचं, काळाचं बंधन अर्थातच नाही.. फक्त त्यात झोपेत आठवून दचकायला होईल अशी कोणतीही भीतीदायक दृश्यं नसावीत, ही माफक अपेक्षा आहे. थोडक्यात मुलाची स्वतःची अशी दृक् श्राव्य लायब्ररी तयार करायचीय. तर त्यात यापैकी काय काय असायलाच हवं? चित्रपट.. मालिका.. शाॅर्ट फिल्म्स.. इन्स्पिरेशनल व्हिडिओज.. यात एक तांत्रिक उपमदतपण हवीय, हे सिनेमे डाउनलोड कुठून करता येतील त्याचे दुवेपण मिळाल्यास बरे होईल. आणि ते पेनड्राईव्हच्या मदतीने टीव्हीवर प्ले करण्यासाठी कोणता फाॅर्मॅट चालतो? सबटायटल्सपण हवी असतील तर काय डालो करायचं? ती टीव्हीवर कशी पाहता येतील?

वाचने 40723
प्रतिक्रिया 110

प्रतिक्रिया

खरं सांगायच तर मुलांना मोठ्यांचे चित्रपटच बघायचे असतात. त्यांना मुलांसाठी म्हणून विषेश मागणी नको असते म्हणूनच हॅरी पॉटर सुधा अबालव्रुध्दांचा लाडका असतो फक्त मुलांचा न्हवे. तेंवा जमलच तर आज मुलांना बजरंगी भाइजान किंवा किमान बाहुबली अवश्य दाखवाच. म्हटलं तर अवांतरः- ती सिगमा सिरीअल पण मस्त होती, दुरदर्शनने तारा, शक्ती सारखी भारतीय नावे व कलाकार घेउन यशस्वी स्पे-साय्फाय काढ्ली होती हे एक आश्चर्यच. कुठे बघायला मिळेल का ती ? (नंतरच्या फालतु कॅप्टन व्योम मधे मात्र अजिबात मज्या न्ह्वती.)

In reply to by द-बाहुबली

म्हटलं तर अवांतरः- ती सिगमा सिरीअल पण मस्त होती, दुरदर्शनने तारा, शक्ती सारखी भारतीय नावे व कलाकार घेउन यशस्वी स्पे-साय्फाय काढ्ली होती हे एक आश्चर्यच. कुठे बघायला मिळेल का ती ? (नंतरच्या फालतु कॅप्टन व्योम मधे मात्र अजिबात मज्या न्ह्वती.)
लै शोध घेतला भावा, कुठे मिळतच नै ती. यू ट्यूब वर तर नाहीच, एक दोन ठिकाणी सोडलं तर बाकी सुद्धा कुठे काही उल्लेख नाही. मिळाली तर सांग.

In reply to by द-बाहुबली

खरं सांगायच तर मुलांना मोठ्यांचे चित्रपटच बघायचे असतात. त्यांना मुलांसाठी म्हणून विषेश मागणी नको असते.
अगदी बरोबर आहे. मुद्दाम डंब डाऊन केलेले पिच्चर मुलांना फार आवडत नाहीत.

In reply to by बॅटमॅन

मोठ्यांनाच तर बालचित्रपटाची गरज आवर्जुन असते...! ही पोरं सुधा मोठी होउ द्या इनिगोय सर मग बघा (नॉट अनलाइक मी)आपोआप हुडकुन बालचित्रपट स्वतःच बघायला सुरुवात करतील.

अजुन एक सिनेमा. खुप छान कुत्र्याचे काम असलेला म्हणजे "बेनजी द हंटेड" बघा. एकही डायलॉग नाहीये या पिक्चर मध्ये. आपल्याकडे तसा एकही डायलॉग नसलेला पिक्चर म्हणजे कमल हसनचा "पुष्पक " तो ही बघा. खुप छान आहे.

परिचय , किताब , मै फीर आउंगा , जाग्रुती , बुट पॉलिश , सीमा , त्रियात्री , अपुर्व सहदरोगल , गोपाळक्रुष्ण , रामशास्त्री , संत ज्ञानेश्वर , आझादीकी ओर

आम्ही जातो आमच्या गावा , छोटा जवान , हा माझा मार्ग एकला , पेडगावचे शहाणे , जिंगल ऑल द वे

आम्ही जातो आमच्या गावा , छोटा जवान , हा माझा मार्ग एकला , पेडगावचे शहाणे , जिंगल ऑल द वे

In reply to by सिरुसेरि

शोधलं मी , बरंच शोधलं , पण कुठे मिळाला नाही , दुवा वैगेरे असल्यास मिळावा अशी विनंती ... धन्यवाद

"त्रियात्री , अपुर्व सहदरोगल - यांच्याबद्दल कधी ऎकलेलं नाही. थोडक्यात कथा सांगाल का? " - त्रियात्री - शाळेची/१०वी वार्षिक परिक्षा अनुत्तीर्ण झाल्याने निराश झालेले ३ मित्र. त्यातील एकाचे आजोबा त्या तिघांना जरा बदल म्हणुन सायकल वरुन भारताची सफर करायला सांगतात . या ३ मुलांना प्रवासात आलेले वेगवेगळे अनुभव , त्यांचे बदलेले विश्व अशी थीम आहे . अपुर्व सहदरोगल -- हिंदी अप्पु राजा - कमल हासन .

लाईफ इज ब्युटिफूल फ्रोझन ब्लॅक ब्युटी होम चार्ली चॅप्लिनचा दी किड तू-नळीवर लॉरेल अँड हार्डीचे अनेक व्हिडिओज आहेत दी पोलार एक्स्प्रेस वॉल-ई बिग हिरो -सिक्स हाची: हाचिको (अतिशय आवडता) हाचीप्रमाणेच अजून एक सिनेमा आलेला रेड डॉग Tom Sawyer & Huckleberry Finn ह्युगो दी बॉय इन स्ट्राईप्ड पजामास ब्रेव्ह The Adventures of Tintin रँगो Little Fugitive Enchanted Hotel Transylvania Oliver Twist स्पायडरव्हिक क्रॉनिकल्स पुस इन बुट्स माँस्टर हाऊस Night at the Museum अ‍ॅलिस इन वंडरलँड हुक Evan Almighty स्मर्फ्स जॅक फ्रॉस्ट Beverly Hills Chihuahua

अशीच अमुची आई सुजाण असती, आम्हीही स्मार्ट हुशार झालो असतो, वदले कोणतरी....... ;) . . . निदान असे खच्चुन याद्या देणारे मामा अन मावश्या तरी हवे होते हो. गांधी, शिवाजी अन चार्ली चाप्लीन वर आमचे बालपण आटपले. कधीमधी लौरेन हार्डी अन टीव्ही वरचे थोडेफार :(

In reply to by सदस्यनाम

लोल! अहो, आमच्या शाळेतही सिनेमाहाॅल होता. मोठी स्क्रीन आणि भारतीय बैठक. तिथे महिना-पंधरा दिवसातून एखादा अॅनिमेटेड सिनेमा दाखवत असत, खूप छान छान सिनेमे तिथेच पाहून झाले.

The World's Fastest Indian हा एक सत्यकथेवर आधारीत चित्रपट आहे. मला एकदम प्रेरणादायी वाटला. फक्त ८ वर्षाच्या मुलाला तो रटाळ वाटण्याची शक्यता आहे. प्रथम स्वतः पाहून ठरवावे की मुलाला दाखवावा का?

In reply to by श्रीरंग_जोशी

कोणत्याही मुलाला या जगात फक्त म्हातारेच लोक अस्तित्वात आहेत हे पटवुन द्यायचे असेल तर हा चित्रपट अवश्य दाखवावा.... मायला बार-गर्ल पासुन सगळेच जेष्ठ नागरीक घेतलेत राव... संथ अन अशक्य चित्रपट आहे.

In reply to by द-बाहुबली

चित्रपटाच्या कथेचा विषय प्रयत्नवाद आहे हो. तुम्ही ज्या गोष्टी सांगत आहात त्या तर आजवर कधी ध्यानातही आल्या नव्हत्या इतकी ही (सत्य)कथा मला प्रेरणादायी वाटली. कदाचित थोड्या मोठ्या मुलांना नक्कीच आवडेल.

october sky बघा लहान मुलांसाठी मस्त चित्रपट आहे

"आजादी की ओर" (गौरी शंकर माकडांवरचा सिनेमा) लहानपणी पाहिल्याचा आठवतो...छान आहे...

गाड़ी शतकाजवळ आली म्हणून काही भारतीय चित्रपटांचा शोध घेतला जे लहानग्यांसाठी उपयुक्त ठरतील. अंजलि हा तमिळ की तेलुगु डब्ड चित्रपट आहे. फरारी की सवारी हा एक + राहुल बोस बरोबर एक क्रिकेटीयर मुलाचा चित्रपट असे दोन क्रिकेट वेड्या मुलांचे चित्रपट आहेत. दूरदर्शन ची एकच वाहिनी होती तेव्हा एक बाल चित्रपट पाहिला होता ज्यात जयंत नारळीकर चित्रपटाच्या शेवटी पृथ्वीवर धूमकेतू आदळण्याची शक्यता निर्माण झाली असता काय काय करता येईल असं काही सांगतात ते अंधुकसं आठवत आहे. दूरदर्शनला च रविवारी सकाळी 11 ला एक सीरियल लागायची ज्यामध्ये बहिण भावाला एका झाडाच्या ढोलीत एक जादुई मुलगा भेटतो आणि ते एकत्र काय काय मजा करतात वगैरे मालिका होती. पन्नास वर्षांनी म्हातारे झाल्यावर ते त्याला भेटायला पुन्हा येतात एवढंच आठवतंय. छोटा चेतन, जजंत्रम ममन्त्रम वगैरे बहुधा नको असावेत.

Spirit: Stallion of the Cimarron - हा माझा खूप आवडता चित्रपट आहे. हा ८-१० वर्षे वयोगटातल्या मुलांना नक्कीच आवडेल याची खात्री आहे.

In reply to by जेम्स वांड

२०१४ मध्ये २० वर्षे पूर्ण झाल्या निमित्ताने एक तत्कालीन सगळ्या बाल कलाकारांचे रियुनियन आयोजित केले होते, ओरिजिनल पोस्टर सारखेच हे पोस्टर बनवले होते .