✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

श्यामची आई..

अ
अत्रन्गि पाउस यांनी
Sun, 03/09/2014 - 10:35  ·  लेख
लेख
परवा पुस्तके आवरतांना १९७७ साली वाढदिवसाला मिळालेले श्यामची आई हे पुस्तक समोर आले... ह्या अत्यंत गाजलेल्या पुस्तकाचे पुढे चित्रपट (राष्ट्रपती पदक मिळाले वगैरे) आणि एकूणच मराठी साहित्यात काही विशेष स्थान आहे वगैरे उल्लेख येत असत... माझी आई काही विशेष होती तिने माझ्यावर अत्यंत उच्च संस्कार केले माझ्यासाठी त्याग केला...वगैरे वगैर.... परंतु अत्यंत सर्वसामान्य घरगुती घटनांना विलक्षण तीव्र भावनांची फोडणी देवून सतत वाचकाच्या (ते हि बाल वाचकांच्या)मनाशी अक्षम्य आणि भडक खेळ करणारे पुस्तक असे माझे पहिल्यापासूनच मत झाले होते. अत्यंत कारुण्यपूर्ण नैराश्युक्त वातावरण..सतत मानसिक दबाव /खच्चीकरण/ गरीबीचे विनाकारण अतिरेकी उदात्तीकरण कदाचित तात्कालिक कोकणातील वातावरण तसे असेलही..पण त्याचं वातावरणात वाढून अनेकांनी अतिशय कष्टांनी आपले आयुष्य काही सकारात्मक करून लौकिक यश संपादले आहे/असेल. कालौघात ह्या पुस्तकाचे विस्मरण होते आहे आणि ते कालबाह्य होते आहे आणि त्याबरोबरच काही दशकांचा एक इमोशनल दहशतवाद/अत्याचार संपतो आहे ...हा एक अतिशय मोठा दिलासा आहे इत्यलम
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
41476 वाचन

💬 प्रतिसाद (119)

प्रतिक्रिया

ही बालकथा आहे का?

कवितानागेश
Sun, 03/09/2014 - 12:22 नवीन
ही बालकथा आहे का? ठीकेय. असू दे.
  • Log in or register to post comments

सहमत..

चिगो
Sun, 03/09/2014 - 12:48 नवीन
आपल्या भावनांशी बराच सहमत आहे. लै पिडू पुस्तक.. आमच्या कालिजात एकाने एका पोरीला, जिला तो बहीण मानायचा म्हणे, हे पुस्तक भेट देऊन विनोदाची परमावधी गाठली होती.. ;-) =))
  • Log in or register to post comments

महान

प्रसाद गोडबोले
Mon, 03/24/2014 - 14:21 नवीन
आमच्या कालिजात एकाने एका पोरीला, जिला तो बहीण मानायचा म्हणे, हे पुस्तक भेट देऊन विनोदाची परमावधी गाठली होती.
>>>>> =)) महान आयडीया =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिगो

अवांतर :

भडकमकर मास्तर
Sun, 03/09/2014 - 15:57 नवीन
अवांतर : तौबा तेरा जलवा तौबा तेरा प्यार तेरा इमोशनल अत्याचार
  • Log in or register to post comments

असू द्या हो... नया हय वह!

प्यारे१
Sun, 03/09/2014 - 16:03 नवीन
असू द्या हो... नया हय वह! =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भडकमकर मास्तर

श्यामची आई......

नावातकायआहे
Sun, 03/09/2014 - 16:04 नवीन
श्यामची आई..... :-))
  • Log in or register to post comments

लबाड...!

आत्मशून्य
Mon, 03/10/2014 - 02:14 नवीन
कोल्ह्याला द्राक्षांची जी चव असते त्या प्रकारच्या व वित्र्णास पूर्ण बेकायदेशीर असल्याने त्याकाळी सरवसामान्य पांढरपेशा व्यक्तिला सहजी अनुपलब्ध असलेल्या दृक्श्राव्य फितिला सुधा हेच टोपन नाव होते नाही का ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नावातकायआहे

चोराच्या वाटा...

नावातकायआहे
Mon, 03/10/2014 - 07:34 नवीन
चोराच्या वाटा... 'त' वरुन ताकभात वगैरे वगैरे... :-))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आत्मशून्य

:D

आत्मशून्य
Mon, 03/10/2014 - 08:07 नवीन
.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नावातकायआहे

नाय हो. त्याला 'भक्त प्रल्हाद

आदूबाळ
Mon, 03/10/2014 - 11:05 नवीन
नाय हो. त्याला 'भक्त प्रल्हाद' म्हंत्यात (म्हणायचे). आद्याक्षरांवरून.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आत्मशून्य

क्षमस्व . पूर्ण सहमत होता येत नाही म्हणून.

आत्मशून्य
Mon, 03/10/2014 - 11:50 नवीन
परंतु भक्त प्रल्हाद, बिस्किट पुडा हे शाळ्करि वयोगटाचे शब्द होते. 21 वय पूर्ण आहे म्हणून मतदानाचा अधिकार प्राप्त झालेला वयोगट हा आशा नामोल्लेखाबाब्त विशेष सात्विक असे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ

+ ११११११^ ११११११

नावातकायआहे
Mon, 03/10/2014 - 12:32 नवीन
सहमत... :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आत्मशून्य

अरारा! या गंमती तुम्हाला २१

आदूबाळ
Mon, 03/10/2014 - 15:26 नवीन
अरारा! या गंमती तुम्हाला २१ वर्षे पूर्ण झाल्यानंतर उमगल्या? काय हे मागासलेपण! (ह. घेणे ही विनंती) बादवे - बिस्किट पुडा हा जब्री शब्द आहे! :))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आत्मशून्य

+१

बॅटमॅन
Mon, 03/10/2014 - 15:29 नवीन
बिस्किटपुडा हा बाकी अतिशयच मऊ-अ‍ॅज-कुकुंबर शब्द हां. टोट्टल के एल पी डी (खास लम्हें पे धोका) होईल हा शब्द ऐकून =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ

डेव्हलप्ड टेस्ट

llपुण्याचे पेशवेll
Wed, 03/26/2014 - 10:59 नवीन
नाही हो तसं म्हणायचं नसेल त्यांना. शाळकरीवयात जिथे फारच जोश असतो तिथे काहीही वाचायाला बघायला चालते. जेव्हा टेस्ट डेव्हलप होते तेव्हा (म्हणजे २१+) सात्विकता विषेश सांभाळली जाते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ

ह.मो. मराठेंच 'बालकाण्ड' याच

स्वप्नांची राणी
Sun, 03/09/2014 - 17:36 नवीन
ह.मो. मराठेंच 'बालकाण्ड' याच वातावरणातील पण जास्त प्रत्ययदर्शि आहे. खुप लागतं मनाला... :(
  • Log in or register to post comments

बाकि, अत्रन्गी पाउस तुमच्याशी

स्वप्नांची राणी
Sun, 03/09/2014 - 17:38 नवीन
बाकि, अत्रन्गी पाउस तुमच्याशी पुर्ण सहमत.
  • Log in or register to post comments

असहमत

मंदार कात्रे
Sun, 03/09/2014 - 19:05 नवीन
पूर्णपणे असहमत साने गुरुजींच्या अतिप्रचंड सामाजिक कार्याचा विचार करता आपणास त्यांच्याविषयी असे लिहिण्याच काडीमात्र अधिकार नाही पाश्चात्य संस्कारानी बिघडलेल्या नवीन मराठी(?) पिढीची थेर आहेत ही सगळी ! अत्रंगी पावुस जी पर्सनली घेवू नका , पण असे अकलेचे तारे तोडणार्या नवीन पिढीच्या एक सणसणीत कानाखाली द्यावीशी वाटते . मागे एका कथित "अति-सुधारक" मराठी संकेत्स्थळावर "व्हू इज फकिंग श्याम ?""व्हू इज साने गुरुजी?" असलि भाषा वापरली होती , माझा अक्षरशः तिळपापड झाला होता , अशा हरामखोर लोकाना लाथानी बुकलून काढले पाहिजे . आपल्याच पूर्वजांबद्दल / मागच्या पिढीबद्दल इतकी अनास्था? कोकणातल्या त्या काळातल्या माधुकरी मागून शिक्षण घेणार्या मुलांच्या कहाण्या ऐकल्या की दोळे पाणावतात .... खुद्द माझे दोन चुलते आणि इतर काही नातेवाइक अशा प्रकाराने शिकलेले आहेत,,,,,,,,,,,,,,,, बाळ जातो दूर देशी........... कविता वाचून पहा एकदा ........!
  • Log in or register to post comments

असहमती आणि अधिकार

अत्रन्गि पाउस
Sun, 03/09/2014 - 19:32 नवीन
मंदारपंत... आपण असहमत आहात ... ठीक आहे ..पण मला माझे अधिकार आपण सांगायची अजिबात गरज नही...आपण आपले मुद्दे मांडा ... साने गुरुजींचे सामाजिक कार्य ह्याविषयी एक कणभर लिहिलेले नही..माझे मुद्दे पुन्हा नीट वाचा. बाकी त्या दुसर्या संकेतस्थळावर कुणी काय म्हटलंय त्याचा राग इथे काढण्याचे प्रयोजन समजले नाही ... पुन्हा एकदा ... 'श्यामची आई'ह्या पुस्तकावर आपली मते मांडा'..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मंदार कात्रे

आपल्याच पूर्वजांबद्दल /

मंदार कात्रे
Mon, 03/10/2014 - 08:26 नवीन
आपल्याच पूर्वजांबद्दल / मागच्या पिढीबद्दल इतकी अनास्था? कोकणातल्या त्या काळातल्या माधुकरी मागून शिक्षण घेणार्या मुलांच्या कहाण्या ऐकल्या की दोळे पाणावतात .... खुद्द माझे दोन चुलते आणि इतर काही नातेवाइक अशा प्रकाराने शिकलेले आहेत,,,,,,,,,,,,,,,, बाळ जातो दूर देशी........... कविता वाचून पहा एकदा ........!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रन्गि पाउस

मनोहर जोशी सुद्धा माधुकरी

खटपट्या
Mon, 03/10/2014 - 08:45 नवीन
मनोहर जोशी सुद्धा माधुकरी मागून शिकले
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मंदार कात्रे

पण

प्रसाद गोडबोले
Mon, 03/24/2014 - 14:24 नवीन
पण ते जातीयवादी पक्षासोबत आहेत म्हणुन त्यांचे कौतुक होणार नाही .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या

मंदारराव

तिमा
Sun, 03/09/2014 - 20:29 नवीन
इतके नका रागावू. तरुण पिढीला व्यक्त होऊ द्या. काळाप्रमाणे विचारही बदलतात. आपण जुनी खोडे! म्हणून गदिमांचे हे काव्य कवटाळून बसतो. वाईट तितुके इथे चांगले भलेपणाचे भाग्य नासले पतिव्रतेच्या गळ्यांत धोंडा वेश्येला मणिहार उद्धवा, अजब तुझे सरकार!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मंदार कात्रे

__/\__

अत्रुप्त आत्मा
Sun, 03/09/2014 - 23:04 नवीन
__/\__
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तिमा

तरुण पिढीला व्यक्त होऊ द्या.

अप्पा जोगळेकर
Sun, 03/23/2014 - 14:32 नवीन
तरुण पिढीला व्यक्त होऊ द्या. मला वाटत तरुण आणि म्हातारं असण्याचा याच्याशी फार संबंध नाही. स्वातंत्र्यपूर्व काळात कोकणातल्या खेड्यातले वातावरण आणि एका ममताळू, अशिक्षित आणि पारंपारिक संस्कार झालेल्या स्त्रीचे व्यक्तीचित्र आणखीन काय वेगळे असणार ? विचार करण्याची थोडीशी शक्ती असेल तर अगदी लहान मुलालादेखील हे कळू शकेल. पण किमान विचारीपणाचीच वानवा असेल तर सगळंच मुसळ केरात जाणार.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तिमा

मुद्दा तो नाही...

अत्रन्गि पाउस
Sun, 03/23/2014 - 20:49 नवीन
वातावरण ते असेल मान्य दुसरी अपेक्षा नही हे हि मान्य माझे म्हणणे हे कि त्या संपूर्ण पुस्तकातले वातावरण त्यातील प्रसंग ह्यात काहीही विशेष वेगळे नही...तत्सम वातावरण, प्रसंग, संस्कार हे घरोघरी होत असत पण बहुतांश प्रसंगांमधून हे 'काहीतरी' विशेष आहे असे मांडले जाते आहे..वर कारुण्य रसाचा अतिरेकी अविष्कार झाल्याने लहान मुले अजूनच हळवी झाली/होतील ज्यांना हे आवडते आवडो बापडे ज्यांना ती मुल्ये, संस्कार, धडे बाणवण्यासासाठी 'हे पुस्तक' जरुरी वाटले/वाटते ...वाटो .. सध्याच्या काळात मुलांना वाढवतांना किती जण हे पुस्तक अनिवार्य मानतात /आवश्यक मानतात/ खरोखर वापरतात ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अप्पा जोगळेकर

सहमत

सचिन
Sun, 03/09/2014 - 23:41 नवीन
लेखकाशी पूर्ण सहमत. अत्यंत कालबाह्य पुस्तक. रद्दीवाला तरी घेतो का ? का तो ही म्हणतो की कालबाह्य आहे ?
  • Log in or register to post comments

पुस्तकाचा मी सदैव ऋणी

आयुर्हित
Mon, 03/10/2014 - 00:07 नवीन
कोणत्या सुज्ञ माणसाने आपल्या सारख्या बालकाला दिले बरे हे पुस्तक? मला माझ्या लहानपणी पाण्यात पोहायला जायची खूप भीती वाटत असे, परंतु "श्यामची आई" हे पुस्तक माझ्या आईनेच खुद्द वाचले होते त्यामुळे त्यातील श्यामची कहाणी सांगत आमच्या बाल मनावर जबरदस्तीने चांगले संस्कार केले आहेत, त्यामुळे ह्या पुस्तकाचा मी सदैव ऋणी राहील.
  • Log in or register to post comments

पोहायला...

सचिन
Mon, 03/10/2014 - 00:10 नवीन
पोहायला शिकायला श्यामची आई शिवाय अनेक चांगले उपाय आहेत.
  • Log in or register to post comments

सचिनशेट........

आयुर्हित
Mon, 03/10/2014 - 00:19 नवीन
सचिनशेट........ चांगले उपाय आहेत ना तुमच्या जवळ ठेवा! आपल्या मुलांना त्याचा वापर होईलच की कधीतरी. मी माझ्या लहानपणची आठवण ती सांगितली हो!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सचिन

फारच..

सचिन
Mon, 03/10/2014 - 00:25 नवीन
आयुर्हित साहेब, फारच पर्सनल घेता राव ! मिपा वर असं नाही चालत !!
  • Log in or register to post comments

श्यामची आई कालबाह्य ? छान छान...

बन्या बापु
Mon, 03/10/2014 - 06:41 नवीन
कालौघात ह्या पुस्तकाचे विस्मरण होते आहे आणि ते कालबाह्य होते आहे आणि त्याबरोबरच काही दशकांचा एक इमोशनल दहशतवाद/अत्याचार संपतो आहे ...हा एक अतिशय मोठा दिलासा आहे
रद्दीवाला तरी घेतो का ? का तो ही म्हणतो की कालबाह्य आहे ?
मग आता नवीन धागे उसवतील.. पुल कालबाह्य .. कुसुमाग्रज कालबाह्य ... अजून पुढे जाऊन कालांतराने पाडगावकर, जी ए, सगळ्यांना निकालात काढा.. आणि आपल्या येणाऱ्या पिढीला "हैदोस" ( ते देखील मराठी आहे म्हणून कालबाह्य ).. "पेंटहौस स्टोरीज" असली पुस्तके देऊ वाचायला.. रद्दीवाला जास्त भावात घेतो असली पुस्तके.. त्यांची रिसेल value पण मिळेल हा अतिरिक्त फायदा.. अवांतर : आमच्या घरी हे वाचून " लेखक बरेच विद्वान आहेत, त्यांना आवर्जून हे सांगा" असा सल्ला मिळाला.. :-)
  • Log in or register to post comments

आणि आपल्या येणाऱ्या पिढीला

अत्रन्गि पाउस
Mon, 03/10/2014 - 10:25 नवीन
भावी पिढी साठी आपण श्यामची आई आणि हैदोस/पेंटहौस हे दोनच पर्याय आठवू शकता, हे आपल्या घरी सांगितल्यावर (सांगितले असल्यास)आपल्याला काय सल्ला मिळाला ? आणि कालातीत, अजरामर वगैरे साहित्य जे निर्माण व्हायचे ते होईलच(रामायण/महाभारत झाले होते तसे)... 'पु ल',कुसुमाग्रज, पाडगावकर वगैरे प्रभृतिचे साहित्य निकालात निघेल कि नही हे 'काल' ठरवेल... परंतु समजा उद्या नारायण किंवा रावसाहेब ह्यांच्या तुलनेत 'दोन वस्ताद'/'जनार्दन नारो शिन्ग्नापुरकर' हे किंचित कालसापेक्ष संदर्भहीन झालेतर त्यात रागाव्ण्यासारखे काय आहे ??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बन्या बापु

रागावण्यासारखे आहे ते हे खोडसाळ विधान

आनन्दा
Mon, 03/10/2014 - 11:32 नवीन
परंतु अत्यंत सर्वसामान्य घरगुती घटनांना विलक्षण तीव्र भावनांची फोडणी देवून सतत वाचकाच्या (ते हि बाल वाचकांच्या)मनाशी अक्षम्य आणि भडक खेळ करणारे पुस्तक असे माझे पहिल्यापासूनच मत झाले होते.
तुम्हाला आवडले नसेल, पण तुम्ही त्या पुस्तकाकडे त्रयस्थपणे पाहु शकत नाही/ किंबहुना अश्या टिप्पण्णीवरून तुमचा वाद पेटवण्यचा विचार स्पष्ट दिसतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रन्गि पाउस

पुस्तकाकडे त्रयस्थ ?

अत्रन्गि पाउस
Mon, 03/10/2014 - 13:50 नवीन
पुस्तक वाचतांना त्रयस्थ होऊन वाचावे कि समरसून हा एक व्यक्तिगत आवडीचा भाग आहे.. श्यामच्या आई मध्ये असा कोणता अविस्मरणीय (प्रसंग + निष्कर्ष) वाटतो कि जो त्याच्या भावनिक ताणाची किंमत देऊन वाचलाच पाहिजे ? बाकी वाद पेटवण्याचा उद्देश ? छे हो ...चर्चा/मंथन हाच उद्देश आहे...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनन्दा

इतिहासाचे अवजड ओझे

सचिन
Tue, 03/11/2014 - 00:02 नवीन
इतिहासाचे अवजड ओझे, डोक्यावर घेउन ना नाचा करा पदस्थल त्याचे आणिक चढुनी त्यावर भविष्य वाचा .... त्यामुळे, श्यामची आई कितीही आदरणीय वगैरे असले तरीही कालबाह्य झाले आहे, हे निश्चित !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बन्या बापु

दारिद्रय, दैना, मुळु-मुळु

कॅप्टन जॅक स्पॅरो
Mon, 03/10/2014 - 08:30 नवीन
दारिद्रय, दैना, मुळु-मुळु रडणं ह्या गोष्टीच फक्त तुम्ही पाहील्या असतील पुस्तकात. त्यांच्यावर झालेले चांगले संस्कार पण पहा ना. वो गरीब हुए तो क्या हुआ संस्कार से तो आमीर है!! हल्ली पोरांना त्या संस्कारांबरोबरच मानसिक आणि शारीरिक पातळीवर कणखर बनवलं पाहीजे एवढाच काय तो काळानुसार असलेला बदल.
मागे एका कथित "अति-सुधारक" मराठी संकेत्स्थळावर "व्हू इज फकिंग श्याम ?""व्हू इज साने गुरुजी?" असलि भाषा वापरली होती , माझा अक्षरशः तिळपापड झाला होता , अशा हरामखोर लोकाना लाथानी बुकलून काढले पाहिजे .
त्या **च्या आईचे संस्कार कमी पडले असतील :).
  • Log in or register to post comments

ह्म्म्म...

योगी९००
Mon, 03/10/2014 - 09:23 नवीन
अत्रन्गि पाउस यांनी आपले म्हणणे थोडे भडकपणे मांडले आहे... माझ्या आईने हे पुस्तक माझ्याकडून निदान चारदा वाचून घेतले होते. मलाही लहानपणी हे पुस्तक तितकेसे आवडले नाही पण मी "मनाशी अक्षम्य आणि भडक खेळ करणारे पुस्तक" असे म्हणणार नाही. कदाचित त्यावेळच्या काळानुसार ते पुस्तक बरोबरच होते. आजच्या पिढीला किंवा आज मी जरी हे पुस्तक परत वाचायला बसलो तर कंटाळवाणेच वाटेल पण त्यातले साहीत्यमुल्य किंवा उच्च संस्कार हे घेण्यासारखेच.. कदाचित या पुस्तकाचा effect म्हणूनच की काय... मी माझे आईवडील जो पर्यंत होते तो पर्यंत त्यांना उलटे कधीच बोललो नाही. तसेच कुठल्याही वडीलधार्‍या माणसाशी (ओळखीचा किंवा अनोळखी) most of the time नम्रच असतो आणि शक्यतो उलटे बोलायचे टाळतो. पण हे मी नंतरच्या पिढीत पाहीले नाही. इतर माझ्यापेक्षा बर्‍याच वयाने लहान असलेले फाडफाड बोलताना पाहून संताप होतो.
  • Log in or register to post comments

उच्च संस्कार

अत्रन्गि पाउस
Mon, 03/10/2014 - 10:35 नवीन
मांडतांना त्यातील घटना किंवा आठवणी ह्या त्याकाळातील बहुतेक समाजात अतिशय कॉमन होत्या(किंवा असाव्यात असे वाटते)... माझा रोख आहे तो त्या घटनांना काहीतरी विशेष म्हणून अधोरेक्खीत करणे आणि त्याच्यावर भारंभार दैन्य कारुण्यरसाची वारंवार पेरणी करणे ह्यावर.. वडीलधार्यांना उलट नं बोलणे हा ह्या पुस्तकाचा effect ?? कदाचित ते पुस्तकाविनही आलेच असते..पहा विचार करून.:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: योगी९००

वडीलधार्यांना उलट नं बोलणे हा ह्या पुस्तकाचा effect ??

तुषार काळभोर
Mon, 03/10/2014 - 13:04 नवीन
मला नाही वाटत... मी हे पुस्तक एकदाच, दहावी नंतर वाचले. तेव्हा ते जाम पकावू वगैरे वाटले होते. पण याचा अर्थ असा नाही, की मी त्याआधी वयाने/मानाने इ. मोठ्या व्यक्तिंशी अतिशय उर्मटपणे वागायचो आणि पुस्तक वाचून मी आमुलाग्र बदललो. शिवाय, लेखक आणि लेखकाशी सहमत असलेले इतर प्रतिसादकसुद्धा त्यांच्या वडीलधार्‍यांशी, गुरुजनांशी, कामाच्या ठिकाणावरील ज्येष्ठांशी नम्रपणे वागत नसतील, असे नाही. या पुस्तकातील सामाजिक, शैक्षणिक, कौटुंबिक वर्णने खरी असतीलही. पण विनाकारण ते काहीतरी एक्स्ट्राऑर्डिनरी दु:ख आहे असा जो स्वर लावला आहे(पुस्तकात), तो चुकीचा आहे. नम्रतेने वागणे, चोरी न करणे अशा संस्कारांसाठी अशा पुस्तकांची काय गरज? गरीबी असेल, तर कष्ट करून, शिक्षण घेऊन मोठे होता येते, हे १९७०-८० नंतरच्या पिढीने स्वतः अनुभवले आहे. गरीबीला गोंजारत तिला अति-करूण भावनेचे आवरण घालायाची (सध्याच्या काळातनाही) आवश्यकता नाही
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रन्गि पाउस

सहमत.

बॅटमॅन
Mon, 03/10/2014 - 13:11 नवीन
सहमत. जणू कै आधी जनावर होतो अन नंतर या पुस्तकामुळे सुधारलो इ.इ. तद्दन वेडेपणा आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुषार काळभोर

+१११

अत्रन्गि पाउस
Mon, 03/10/2014 - 13:53 नवीन
असेच तर म्हणतोय ...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुषार काळभोर

अरे बाबांनो

योगी९००
Mon, 03/10/2014 - 15:40 नवीन
कदाचित या पुस्तकाचा effect म्हणूनच की काय अरे बाबांनो कदाचित असे म्हटले आहे रे... याचा अर्थ असा नाही की मी आधी जनावर होतो आणि या पुस्तकामुळे नंतर माणसाळलो.. पण कोठेतरी शाम मनात बसलाच आहे. बाकी तुम्हा लोकांवर या पुस्तकाचा काहीच परिणाम नाही झाला हे दिसतेच आहे..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रन्गि पाउस

हो... नाही झाला परिणाम!!

तुषार काळभोर
Mon, 03/10/2014 - 17:41 नवीन
मी रोज सकाळी उठल्यावर आई-वडिलांना प्रणाम करीत नाही. रोज झोपायच्या आधी त्यांनी (खरोखर कष्ट घेऊनही)मला वाढवताना घेतलेल्या कष्टाने व्याकूळ वगैरे होत नाही. रोज दुपारच्या जेवणाआधी आई-वडील जेवले असतील का, या विचाराने माझे जेवणावरचे मन उडून जात नाही. पण माझ्या मनात त्यांच्या विषयी प्रेम आहे, त्यांनी घेतलेल्या कष्टाविषयी आदर आहे. आणि तो टिकवण्यासाठी अथवा वाढवण्यासाठी श्यामची आई अथवा इतर कुठल्याही पुस्तकाची वा कोणत्याही माध्यमाची गरज नाही. माझ्या आईवडीलांनी मला वाढवण्यासाठी, मला शिक्षण देण्यासाठी, माझ्यावर संस्कार करण्यासाठी कोणत्याही आऊट ऑफ द वर्ल्ड पद्धतीचा अवलंब केला नाही याचा मला अभिमान आहे. आणि त्यामुळेच मी सामान्य आईवडीलांचा सामान्य मुलगा आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: योगी९००

+१

संचित
Sat, 03/22/2014 - 15:02 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुषार काळभोर

रोज दुपारच्या जेवणाआधी आई

मृत्युन्जय
Mon, 03/24/2014 - 12:47 नवीन
रोज दुपारच्या जेवणाआधी आई-वडील जेवले असतील का, या विचाराने माझे जेवणावरचे मन उडून जात नाही. भावना माझ्याही थोड्याफार तुमच्यासारख्याच आहेत. पण श्याम आणि तुम्ही यांच्या सांपत्तिक स्थितीतला फरक लक्षात घेता तुमच्या मनात असा विचार न येणे यात फार काही अनपेक्षित नाही
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुषार काळभोर

सहमत

योगी९००
गुरुवार, 03/27/2014 - 10:22 नवीन
+१ सहमत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय

'श्यामची आई' मला आवडतं - आजही

आतिवास
Mon, 03/10/2014 - 10:42 नवीन
'श्यामची आई' मला आवडतं - आजही आवडतं; ते माझ्यासाठी कालबाह्य झालेलं नाही. पण तुम्हाला ते कालबाह्य वाटतं - हे मी समजू शकते. तुम्हाला सध्या कोणतं पुस्तक अतिशय आवडतंय, कालातीत वाटतंय तेही सांगा* - तेही वाचेन मी. कदाचित त्या पुस्तकाबाबत आपलं मतैक्य होईलही :-) * उपरोध नाही, तसं वाटल्यास, क्षमस्व.
  • Log in or register to post comments

तुम्हाला ते अतिशय टाकाऊ,

पिशी अबोली
Mon, 03/10/2014 - 11:22 नवीन
तुम्हाला ते अतिशय टाकाऊ, कालबाह्य वाटत असेल. मला त्यातील सगळ्याच गोष्टी पटल्या होत्या असे नाही. पण काही गोष्टी नकळत श्यामची आईची आठवण करुन देतात. उदा. जेवणात गुंतवळ वगैरे आला तर सगळ्यांना दाखवू नये, किळस येते इ., मला सो कॉल्ड कल्चर्ड लोक जेव्हा अशा गोष्टी करतात तेव्हा हमखास आठवतं. इतका बाळबोधपणा वाचायला आता बोर होतं, पण त्या पुस्तकाने लहानपणीच्या काळात अगदी काहीच म्हणजे काहीच दिलं नाही, असं मलातरी वाटत नाही.
  • Log in or register to post comments

हजारटक्के सहमत. त्यामुळे

llपुण्याचे पेशवेll
Mon, 03/10/2014 - 12:42 नवीन
हजारटक्के सहमत. त्यामुळे एखादा पदार्थ मनासारखा लागला नाही चवीला तरी करणार्‍या माणसावर उखडायला कमी होते मग ती व्यक्ती घरची असो अथवा बाहेरची. करणारा परिश्रम घेऊन आपल्यासाठी करतो त्याची चाड ठेवायला शामच्या आईने शिकवले (म्हणजे पुस्तकात बाबांनी).
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिशी अबोली
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा