Skip to main content

मास्कमधून

लेखक चांदणे संदीप यांनी रविवार, 22/03/2020 06:41 या दिवशी प्रकाशित केले.
नाहीत तुला पाय तरी देशोदेशी जाशील गावागावा-वस्त्यांमधून द्वाडासारखा फिरशील तुझी असंख्य भावंडे माजवतील हाहाकार पण घे लक्षात, आमच्यात आहे शिल्लक प्रतिकार जितका झपाट्याने तू पोखरत जाशील आत तितकीच उसळून उठेल अशी माणसाची जात माणूस मारणं कदाचित असेल सोपं काम रे पण दाखव जिंकून त्याला म्हणशील मनात 'राम रे!' माहिती नसेलच तुला जगणं-जगवणं कोरोना बघ बापाला, मास्कमधून पापी पोराला देताना संदीप भानुदास चांदणे (२२/०३/२०२०)
काव्यरस

वाचने 3355
प्रतिक्रिया 5

प्रतिक्रिया

सुरेख आणि समयोचित ही लढाई आपण जिंकणारच पैजारबुवा,

वा, खुप सुंदर ! माहिती नसेलच तुला जगणं-जगवणं कोरोना बघ बापाला, मास्कमधून पापी पोराला देताना हे क्लासच !