Skip to main content

चालू घडामोडी : जानेवारी २०२०

लेखक वामन देशमुख यांनी बुधवार, 01/01/2020 21:12 या दिवशी प्रकाशित केले.
सर्व मिपाकरांना नववर्षाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! अ. महाराष्ट्रातील नवीन सरकारचा दुसरा शपथविधी नुकताच पार पडला आहे. लवकरच खातेवाटप होऊन कारभार मार्गी लागेल अशी अपेक्षा आहे. तिन्ही पक्षांत, विशेषतः शिवसेनेत अंतर्गत कुरबुरी सुरु आहेत त्यांवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय मार्ग काढतात हे पाहणं रोचक ठरेल. बाकी, हे त्रिघाडीचं सरकार १ जानेवारी २०२१चा सूर्योदय पाहील का? आ. केंद्र सरकारपुढील या वर्षातील उद्दिष्टे / आव्हाने - १. नागरिकत्व (सुधारणा) कायद्याची (२०१९) अंमलबजावणी २. देशातील नागरिकांची नोंदवही (NRC) ३. लोकसंख्या नियंत्रण कायदा ४. पाकव्याप्त काश्मीरवर ताबा इ. यावर्षातील दिल्ली आणि बिहारच्या निवडणूका जिंकणे मोदी-शहांना शक्य होईल का? ई. अमित शहांना पंतप्रधानपदी बसवल्याशिवाय काँग्रेसी, सेक्यूलर, पुरोगामी, डावे इ. लोक स्वस्थ बसणार नाहीत असं त्यांच्या सद्य वर्तनातून दिसतंय. ता. क. - मिपावरील पूर्वीच्या जाणत्या लेखकांनी नवीन वर्षात तरी पुन्हा लिहितं व्हावं ही मनापासून विनंती.

वाचने 61557
प्रतिक्रिया 124

प्रतिक्रिया

वाचावा असा लेख. अर्थात शेवटच्या ओळीत लेखक खाल्ल्या मिठाला जागले आहेत. https://www.loksatta.com/agralekh-news/editorial-on-solar-energy-compan… कुठल्याही लेखात जनसंघ/रा.स्व.संघ ह्यांना ओढून ताणून शत्रू म्हणून आणायचे आणि त्यावर तोंडसुख घ्यायचे हा सुमार केतकरी बाणा नेमाने पाळला जातो. दोन वर्षं तरी हे सरकार टिकावे. आपल्या घोडचुका जनतेच्या विस्मरणात जाण्यासाठी भाजपने विद्यमान सरकारला अजून मोठ्या चुका करायला किमान एवढा वेळ तरी दिला पाहिजे. :)

बघितला, IVF ला शरण जाणारे अकॅसिडेंटल सरोगेसी accept करताना चाचपडतात असे काही न उकलणारे कोडं निर्माण करणारा चित्रपट आहे, अत्यन्त उथळ पण सुंदर अभिनय व गाणी असलेला

अमेरीकेने केलेल्या हवाईहल्ल्यात ईराणचे लष्करी अधिकारी सुलेमानी ठार झाले असुन या दोघातील तणाव आण्खी वाढला आहे. ईराण हा तेल उत्पादक देशांमधे ३ क्रमांकाचा देश आहे. त्यामुळे तेलाच्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे. आपली अर्थ्व्यवस्था सध्या संकटात आहे. एकतर डोमेस्टिक कंजप्क्षण कमी झाले आहे वर त्यात महागाई वाढत आहे. त्यात तेलाचे दर वाढले तर अवस्था आणखी बिकट होउ शकते.

जे एन यु मध्ये झालेल्या राड्या मध्ये अभाविप आणि लेफ्टीस्ट एकमेकांवर आरोप करत आहेत शिक्षणावर लक्ष केंद्रित करायचे सोडून CAA , NPR ला विरोध करणे , फक्त काँग्रेस आणि पाकिस्तानला पूरक वक्तव्य करणे , हिंदुच्या देव देवतांचे फोटो जाळणे अश्या प्रकारे फोडाफोडीचे राजकारण करणाऱ्यांना जर अभाविप ने फोडले असेल तर आनंदच आहे !!!!!!

ABVP वाले किमान पाकिस्तान च्या उपयोगी राजकारण करत नाहीत ना ? जेनयू मधील विद्यार्थी नेते , चौकट रागा , खूजलीवाल , ममता व इतर बाकीचे विरोधी नेते पाकिस्तानी मीडिया च्या आवडते असावेत बरं ?

अर्थव्यवस्था गटांगळ्या खायला लागली की लोकांचे लक्ष दुसरीकडे वळवणे सत्ताधार्याना क्रमप्राप्त असते. वाद-विवादात डावे नेहमी उजवे ठरतात व उजवे डावे होतात. त्यामुळे मग जेथे जेथे डावे व त्याण्च्या संघटना आहेत तेथे त्याना 'अर्बन नक्षल' 'तुकडे तुकडे' म्हंटले की काम सोपे होते. आर्थिक बाजुत तर बोंब आहे. अरविन्द पांगारिया सोडुन गेले, उर्जित पटेल सोडुन गेले, विरल आचर्य सोडुन गेले. काल सांख्यिकी विभागाचे चंद्रशेकहरही सोडुन गेले. त्याआधी अर्थतज्ञ सुरजित भल्ला गेल्यावर्षी गेले. सरकारी धोरणाण्वर टीका करणारे नोबेल विजेते अभिजीत बानर्जी 'अर्बन नक्षल व कॉन्ग्रेसी' झाले. "कितीही वेळा समजावुन सांगितले तरी भाजपा नेत्यांच्या डोक्यात प्रकाश पडत नाही. ते आपलेच गुर्हाळ चालु ठेवतात" २००५ साली निव्रुत्त झालेल्या एका अर्थखात्यातील अधिकार्याने सांगितले होते .. टी.व्ही.वर.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

ते अरविंद सुब्रमण्यम राहीले की. हे सगळे पाकीस्तानी व देशद्रोही आहेत आणि आता तुम्ही पण. ५ आणि ५ चे कनेक्षण कळतय का? ५ ट्रिलीयन साठी जी.डी.पी. चा रेट किती हवा तर ५ टक्के.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

अर्थव्यवस्था गटांगळ्या खायला लागली की लोकांचे लक्ष दुसरीकडे वळवणे सत्ताधार्याना क्रमप्राप्त असते. आणि समर्थकही तिकडे लक्ष देत नाही. विकासाला मत दिलेले असल्यामुळे. -दिलीप बिरुटे

नवीन येणाऱ्या छपाक सिनेमात लक्ष्मी अगरवाल वर ऍसिड हल्ला करणाऱ्या नदीम खान चे नाव राजेश असे दर्शवण्यात आले आहे. ज्या निर्भीडपणे दीपिका पदुकोण जे.एन.यु. मध्ये जाऊन तुकडे वाल्यांना भेटते, त्याच निर्भीडपणे चित्रपटात खऱ्या आरोपीचे नाव का नाही दाखवले अथवा बदलावेच लागत असेल तर सलीम, सय्यद, सुलेमान का नाही?

In reply to by समीर स. पावडे

चुकीची माहिती देऊ नका. नदीमचे नाव बदलून बशीर केले आहे. राजेश तिच्या मित्राचे/प्रियकराचे नाव आहे.

In reply to by अप्रतिम

तरी नशीब संगीत "शंकर एहसान लॉय' ह्यांचे आहे नाहीतर रहमान वा साजिद वाजिद असते तर चित्रपट बनवणार्या लोकांवरच शंका घेतली असती.

In reply to by समीर स. पावडे

समीर, मी अजून सिनेमा पहिला नाही, पण बशीर खान का काय नाव आहे असे ऐकण्यात आहे, तुम्ही सिनेमा पाहिला का? गुन्हेगाराचा धर्म बदलला असेल तर सिनेमा बनवणाऱ्याचा निषेध.. पण जर नसेल बदलला, तर असे मेसेज पसरावणाऱ्यांचा ही निषेध...

तुकडे तुकडे गॅगं च प्राबल्य कुठल्याही परिस्थितीत वाढलेच नाही पाहिजे . अभाविप ने त्यांना फटकावून त्यांची जागा दाखवली ते चांगलेच केले . फी वाढीच्या निमित्ताने त्या विषारी पिलावळ ने जे एन यु चा राजकारणात पदार्पण करण्यासाठी उपयोग नक्कीच केला असता . विषेश म्हणजे त्या विषारी पिलावळ गैगं मधील डाव्या कुत्र्यांच्या राज्यांत खास करून हिंदू धर्मीयानां टार्गेट केले जाते , खून पाडले जातात , जाळपोळ केली जाते . चार पाच दिवसांपूर्वी जे एन यु मध्ये आंदोलन करणाऱ्यांनी हिंदू देव देवतांचे फोटो जाळतानाचे व्हिडिओ मीडियाने दाखवले होते . नास्तिक व्यक्ती सुद्धा हेतुपुरस्सर कुठल्याही धर्माचा अवमान करत नाही , मग या पिलावळ ला देवांचे फोटो जाळण्याचा माज येतो कुठून ? आणि किती सहिष्णू लोकांनीं त्यांचा धिक्कार केला ? हेच जर शांतीधर्म बाबत झाले असते तर त्यांचे अनुयायी गप्प बसले असते का ? आपल्या सारखेच सो कॉल्ड सहिष्णू चालता है वृत्ती दाखवत त्यांची ताकत वाढवितात . 57 शांतीधर्म देशा मध्ये काय परिस्थिती आहे हे माहीत असताना शांतीधर्मीय लोकांना डोक्यावर घेऊन नाचण्याची आवड काही हिंदू ( ना इकडचे ना तिकडचे )ना का असते हे न उलगडणारे कोडे आहे . त्यामुळे अर्थव्यवस्थेच्या नावाने आरडाओरडा करणारे तुकडे तुकडे गैगं चे काम अजून सोपे करत आहेत .

In reply to by ट्रम्प

कुठल्याही परिस्थिती मध्ये हिंसेचे समर्थन होऊच शकत नाही.. जर jnu अँटी india आहे, पाकिस्तान झिंदाबाद नारे लावते, vedio दाखवले जातात, देवतांचे फोटो जाळले जातात, तर त्या सर्वाना अटक का करत नाही कोणी? चौकीदारी कशाची केली जाते आहे मग? देशात शांतता नांदावी असे कोणाला वाटतच नाही का? आपण एका व्यक्ती ला समर्थन करता करता.. कुठल्या कुठल्या गोष्टींना सपोर्ट करायला लागलो आहे तेच आपल्याला आता कळत नाहीये का? नकाबपोश लोकांच्या मारझोडीला समर्थन, हेच शासन आपले? तिकडे तो कनैया कुमार म्हणतोय नारे लावले त्याचे पुरावे आहेत म्हणताय ना मग अटक का करत नाही. जो भाजपा चा लडाख चा खासदार 370 बद्दल छान बोलला, त्याची बायको jnu मध्ये असे नारे लावले नव्हते, ती तेंव्हा तेथेच होती म्हणते.. देश नक्की महासत्ते कडे चालला आहे, कि अधोगती कडे हे पण कोणाला पाहिचे नाही.. सर्व धर्म समभाव ही शिकवण आपण आता विसरत चाललो आहे असेच वाटते आहे,

सर्वधर्म समभाव तुकडा गैगं विसरली म्हणून देवतांचे फोटो जाळले . बहुसंख्य हिंदू सहनशील आहेत आणि त्यांनी सर्वधर्मीय शांततेचा ठेका घेतला आहे म्हणूनच भारतात शांतता आहे . हिंदू धर्माचा पावलोपावली अवमान करून जर देश महासत्ता होणार असेल तर न झालेला बरा . जे एन यु च्या डाव्या कुत्र्यांचे भाऊबंद केरळमध्ये आर एस एस च्या कार्यकर्त्यांचे खून करतात ते चालते का ? कन्हैया ने मोदींवर एकेरी भाषेत टीका केल्यामुळेच सगळ्या लेफ्टीस्ट ,शांतीधर्म आणि काँगी च्या गळ्यातील ताईत बनला . अन्यथा त्याला कुठल्याही कुत्र्याने हुंगले नसते . लेफ्टीस्ट नां अटक केल्यानंतर सरकारी संपत्तीची जाळपोळ होणार नाही कशावरून ? पाक बांगला मध्ये हाल अपेष्टा सोसणाऱ्या हिंदूंचा भारतातील हिंदू सोयीस्कर दुर्लक्ष करत आहेतच पण बाहेर च्या शांतीधर्मीय नां इथे यायला भाजप पायबंद करत आहे म्हणून जाळपोळ करणाऱ्या शांतीधर्म लोकांचे समर्थन करणारयांचे दुटप्पी वागणे नाही काय ?

In reply to by ट्रम्प

कोणीही कायदा हातात घेतल्यावर त्याला शिक्षा करता येऊ नये काय? का हिंसेला उत्तर हिंसाच आहे काय? बाकी मोदींना एकेरी बोलले नाही पाहिजे हे मी मानतो, नव्हे पंतप्रधान काँग्रेस चा असो वा भाजपा चा कोणत्याच पंतप्रधानास एकेरी बोलले नाही पाहिजे, त्यांची निंदा नाही केली पाहिजे, बांगड्या ही नाहीच पाठवल्या पाहिजे.. बाकी मोदी यांना देशाने 2 दा बहुमताने निवडून दिले आहे ते देशाची प्रगती करण्यासाठीच, त्यामुळे जे देशद्रोही आहेत त्यांना आता टाकावे.. आणि अर्थव्यवस्था, शांतता, रोजगार या गोष्टी मधून त्यांनी देशाचा मार्ग आखावा.. ना कि हिंदू -मुस्लिम, धर्म -भावना, हिंसा - अराजकता.. असो, हिंदुस्थान तेरे तुकडे होंगे हे वाक्य कोणी म्हणाले असेल आणि जर ते अजून पकडले गेले नसतील तर आपला कायदा पण नक्की काय करतोय आणि आपले पोलिस पण हा प्रश्न पडला पाहिजे.. आणि तसे नसेल तर सरकार ने मान्य करावे असे कोणी म्हंटले नाही. एक तर शिक्षा करायची नाही आणि परत हिंसेला समर्थन दाखवाचे हे नक्कीच योग्य नाही.. शिक्षा केली तर जाळपोळ होईल म्हणून शिक्षा करत नाही हे मला पटत नाहीये.. दुसरे, गेल्या निवडणुका आल्यावर वद्रा वर लय जेल मध्ये टाकणार चालले होते, आता 6 वर्ष होत आली दोषी ना शिक्षा झाली पाहिजे.

कोणीही कायदा हातात घेतल्यावर त्याला शिक्षा करता येऊ नये काय? का हिंसेला उत्तर हिंसाच आहे काय? C.A.A. व N.R.C च्या विरोधात देशभर जी आंदोलने सुरु आहेत, ज्यात करोडो रुपयाची सार्वजनिक व शासकिय संपत्ती आगीच्या हवाली केली जात आहे ती आंदोलने तुमच्या मते हिंसक की अहिंसक ? -- ज्या रात्री मारहाणीचा प्रसंग झाला त्या दुपारी जेएनयुच्या सर्वररुम मधे तोंडाला कपडे बांधून, संगणक व इतर सामुग्रीची तोडफोड करणारे व नविन रजिस्ट्रेशन करण्याकरता आलेल्या विद्यार्थांना मारहाण करुन कॅपसबाहेर हाकलून लावणारे महात्मा गांधींचे अनुयायी होते की काय? -- पाकिस्तान प्रेमी, तुकडे गॅंग व अर्बन नक्षली यांनी केलेल्या हिंसेला, हिंसेनेच उत्तर द्यावे लागते तरच त्यांची टाळकी ठिकाणावर येतात. अश्या लोकांपुढे जो दुसरा गाल पुढे करतो त्याला महामुर्ख म्हणावे लागेल. --- या देशातील पुरोगामी, विचारवंत, निधर्मी, बुद्धीवादी, डावे, कॉंग्रेसी व इतर अर्बन नक्षली यांची मानसिकता इतक्या नीच पातळीवर पोहचली आहे, की उद्या सीमापार पाकिस्तानी सैन्याच्या गोळीबाराला, भारतीय जवानांनी प्रतिउत्तर दिले तर हे म्हणतील " हिंसेला उत्तर हिंसाच आहे काय? "

In reply to by प्रसाद_१९८२

C.A.A. व N.R.C च्या विरोधात देशभर जी आंदोलने सुरु आहेत, ज्यात करोडो रुपयाची सार्वजनिक व शासकिय संपत्ती आगीच्या हवाली केली जात आहे ती आंदोलने तुमच्या मते हिंसक की अहिंसक ?
माझ्या मते आता caa आणि nrc विरोधात जी आंदोलने झाली ती हिंसकच होती..आणि त्यातील दोषी लोकांना शिक्षा झालीच पाहिजे, पण याचा अर्थ असा नाही कि त्यांना शिक्षा सामान्य माणसाने कायदा हातात घेऊन केली पाहिजे... --------
या देशातील पुरोगामी, विचारवंत, निधर्मी, बुद्धीवादी, डावे, कॉंग्रेसी व इतर अर्बन नक्षली यांची मानसिकता इतक्या नीच पातळीवर पोहचली आहे, की उद्या सीमापार पाकिस्तानी सैन्याच्या गोळीबाराला, भारतीय जवानांनी प्रतिउत्तर दिले तर हे म्हणतील" हिंसेला उत्तर हिंसाच आहे काय? "
सैन्य, है सुरक्षे साठी असतात, देशाची सुरक्षा महत्त्वाचीच, त्याचा आणि jnu तील हिंसाराचा, caa आणि nrc च्या जाळपोळीचा संबंध आपण फक्त त्या हिंसेला समर्थन करण्यासाठी लावतोय? सैन्य युद्ध करते म्हणून सगळ्या देशात लोकांच्या आपापसात हिंसा मान्य? हे पहा मी येथे काही jnu ची बाजू मांडत नाही... जे दोषी त्यांना कायद्याने पकडणं गरजेचे आहे, हिंसे प्रति हिंसा म्हणजे आपण नक्की कोणत्या मार्गाने चाललो आहे? बाकी इतरांची मानसिकतेला आपण नीच म्हणतो आणि त्याच पातळीवर आपण येतो आहे हे सर्व अवघड आहे...
पाकिस्तान प्रेमी, तुकडे गॅंग व अर्बन नक्षली यांनी केलेल्या हिंसेला, हिंसेनेच उत्तर द्यावे लागते तरच त्यांची टाळकी ठिकाणावर येतात
. चूक, उलट अश्या लोकांना पकडून त्यांना शिक्षा करून उत्तरे द्यावी लागतात, नाहीतर तुमचे कायदे काय कामाचे? तुमचे पोलिस तुमची न्यायव्यवस्था काय कामाची? आज तुम्हाला ते नीच विचारसरणी चे वाटले म्हणून तुम्ही त्यांना मारणार, उद्या तुम्ही त्यांना नीच, धार्मिक भडकावू वाटला म्हणून ते तुम्हाला मारणार हे असेच चालू राहणार असेल तर येणाऱ्या पिढ्या ह्या फक्त एकमेकांप्रती द्वेष मनात ठेवून जगत येतील हे नक्की.. आणि मला चांगले आठवते आधी च्या काळात मी आणि इतर माझे सर्व जातीय मित्र एका दिलाने राहत आलेलो आहे, हे अचानक असे चित्र बदलत आहे हे देशाच्या एकात्मतेला, विविधतेला घातक आहे.. पण आपण सारे चित्र एक तर भाजपा नाही तर काँग्रेस यांच्या नजरेतून का पाहू लागलो आहे? आपण काय या राजकारण्यांचे दलाल आहोत काय? असो.

माफ करा मी छपाक सिनेमा न पाहताच त्यातील ऍसिड फेकणाऱ्याचे नाव राजेश आहे असे लिहिले, यापुढे मी स्वतः खात्री केल्यावरच पुढे पाठवेल. पण, एकंदरीत बॉलिवूड ने बरेचदा गँगस्टर ला नायक दाखवणे, हिंदू धर्मातील विविध चालीरीती - देव देवता यांची खिल्ली उडवणे अन नेहमीच मुसलमान व्यक्ती किंवा धार्मिक रिवजांबद्दल अतिशय - नितांत - मनःपूर्वक आदर व्यक्त करणे, असं खूपदा केलेलं आहे. त्यामुळे ते नईम ला राजेश केलं आहे अश्या संदेशा वर सहज विश्वास बसला.

In reply to by समीर स. पावडे

चूक माणसांकडून होते, आज तुमच्या कडून झाली उद्या माझ्याकडून किंवा कोणाकडून होऊ शकते.. त्याबद्दल चूक झाली हे मान्य असणे महत्वाचे.. त्यानंतर तुम्ही जे बॉलिवूड बद्दल बोलताय त्यापेक्षा घातक, आजकाल itcell चे दलाल वाटतात मला, कसले ही मेसेज रोज बनवायचे, सोशल मीडियावर पसरवायचे आणि आपले इष्ट साध्य करायचे हेच चालू आहे.. आपण आपल्या विचारांशी पक्के राहायचे, भाजपा असू वा काँग्रेस, उजवे असू वा डावे.. या पेक्षा जे चूक वाटते ते चूक, जे बरोबर वाटते ते बरोबर असे आपण जेंव्हा करू तेंव्हाच अर्थ आहे.. असो.

In reply to by समीर स. पावडे

"एकंदरीत बॉलिवूड ने बरेचदा गँगस्टर ला नायक दाखवणे, हिंदू धर्मातील विविध चालीरीती - देव देवता यांची खिल्ली उडवणे अन नेहमीच मुसलमान व्यक्ती किंवा धार्मिक रिवजांबद्दल अतिशय - नितांत - मनःपूर्वक आदर व्यक्त करणे, असं खूपदा केलेलं आहे" हम्म. मग ह्याबद्दल महानायक अमिताभ बच्चन , अनुपम खेर, अक्षय कुमार सहमत आहेत का ? ज्याना ह्याबद्दल राग येतो त्या लोकानी बॉलिवुडी मंडळींकडे तशी तक्रार केली होती का ? संक्रांत जवळ येतेच आहे. पंतप्रधान पतंग उडवत हे गार्हाणे सलमान खान कडे मांडतील अशी अपेक्षा करूया.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

बॉलिवूड ने असं खूपदा केलेलं आहे हे माझं मत आहे. त्यामुळेच नदीम चा राजेश केला ह्या अफवेवर माझा विश्वास बसला असं मला म्हणायचं आहे. अमिताभ बच्चन , अनुपम खेर, अक्षय कुमार सहमत आहेत का नाहीत ते मला माहित नाही. बॉलिवुडी मंडळींकडे तशी तक्रार म्हणजे सेन्सॉर बोर्ड कडे असे म्हणताय बहुधा - अजून तरी केलेली नाही. सलमान खान हे बॉलीवूड नामक संस्थेच्या एखाद्या घटनात्मक पदावर आहेत असे ऐकण्यात नाही त्यामुळे पंतप्रधान त्यांच्याकडे गार्हाणे मांडतील अशी अपेक्षा ठेवणे कितपत योग्य आहे?

काँगी व इतर पक्षांनी सतत केलेल्या हिंदू लोकांच्या केलेल्या मुस्कटदाबी मूळे असल्या अफवा वर चटकन विश्वास बसतो . मुस्कटदाबी वरून सेनेची आठवण झाली , आता भाजप आणि सेना एकत्र असते तर कदाचित गेट वे ऑफ इंडिया वर सुद्धा स्कार्फ तमाशा दिसला असता .

In reply to by ट्रम्प

मी हिंदू आहे आणि माझी काँग्रेस सह कोणत्याही पक्षाने कधी मुस्कट दाबी केलेली नाही. उलट हे द्वेष आपण पक्षा.नां मध्ये घेऊन का पसरवतो आहे? उलट मी म्हणेन असल्या अफवा पसरवनूच मुस्कट दाबी होते आहे हे सिद्ध केले जातं असावे... जे सरळ सरळ अफवा पसरवतात, त्याला फॉरवर्ड करतात, त्याला स्पष्टीकरण काय तर इतकी मुस्कट दाबी केली म्हणून विश्वास बसतो, हा आपल्याच विश्वासाचा गळा दाबण्यासारखे आहे..

कसली मुस्कटदाबी कॉन्ग्रेसने केली ? नेहरूंवर संघवाल्यानी यथेच्छ शिण्तोडे उडवले.. इण्दिरा गांधीबाबतही अफवा पसरवल्या.. सोनिया गांधींबाबतही वाईट अफवा पसरवल्या पण कोणत्या संघिष्टावर हल्ला झाला ? शरद पवारांवरही तेच केले. पण शरद पवारानी संघवाल्यांवर कधी हल्ले केले का? मात्र आता सरकारवर टीका केली, मोदींवर टीका केली की लगेच तुम्ही 'सुडो सेक्युलर्/पाकिस्तानी?" अफवांवर पुर्वी गरीब्/अनाडी वर्ग विश्वास ठेवायचा आता मध्यम्/उच्च मध्यम्वर्ग पण ठेवतोय. "नेहरू खरे मुस्लिम होते, ताजमहाल खाली "तेजोमहल" होता., नेहरूनी बोस ह्याना मारले ." असल्या भन्नाट कथांवर आता शिकलेला मध्यमवर्गही विश्वास ठेऊ लागला आहे हे दुर्दैव.

1 ) मुंबईत 12 बॉम्बस्फोट झाले असताना , 13 वा बॉम्बस्फोट शांतीधर्मवाले वस्तीत झाला - पवार 2 ) बाटला हाऊस मध्ये चकमीत आतेरिकी मारले गेल्या नंतर ते निष्पाप होते म्हणून सोनिया ला रात्रभर झोप आली नाही - दिग्विजय 3 ) यु पी मध्ये दंगलीत शांतीधर्मी मारला गेला तर त्याच्या घरी प्रियांका , राहुल व समस्त काँगी जातात पण हिंदू मारला गेला तर दुर्लक्ष करतात -- काय कारण असावे ? 4) बंगाल मध्ये हिंदूंची घरे जाळली गेली कत्तली झाल्या त्यांच्या बद्दल काँगी किंवा ममता ने संवेदना व्यक्त करणे दूर पण हिंदूना सुरक्षा पुरविण्यात जाणूनबुजून हलगर्जीपणा केला जातो . 5) बंगाल मध्ये ईद वर कधीच बंदी नसते पण नवरात्र साठी कोर्टा ला दाखल घ्यावी लागली होती . 6) काश्मीर मधून लाखो काश्मिरी पंडित हाकलले गेले त्यावेळी काश्मिरी पंडितच्या स्रियांचें काय झाले असेल ? तिथल्या धर्मांध शांतीवाल्यानी सहज जाऊ दिले असेल ? आपण कल्पना तरी करू शकतो का ? 7) पुण्यात एन आर सि विरोधात केलेल्या आंदोलनात ' ब्राह्मण साला कसाई है ' चे फलक घेऊन दाढी वाले फिरत होते . 8) शांतीधर्म वाले नाराज होतील म्हणून गोध्रा हत्याकांड बद्दल आजपर्यंत एक ही शब्द न काढणारे समस्त काँगी नंतर झालेल्या दंगली साठी टाहो फोडताना सर्वानी पाहिले आहे . या उदाहरणावरून त् वाटत नाही काँग्रेस आणि त्यांच्या मित्रपक्षांनी हिंदूंची मुस्कटदाबी करत आहे ?

In reply to by ट्रम्प

7) "मुसलमान हमारा भाई है बामण साला कसाई है" रॅलीत खरच असे बोर्ड होते? नेटवर फोटो आहेत. याची जबाबदारी कुठले नेते, अभिनेते, विचारवंत घेणार?

In reply to by झेन

त्या फोटो मध्ये क्लिअर दिसतंय ' ब्राह्मण साला कसाई है ' फलक असलेली ती रॅली स्वारगेट , टिळक रोड , सदाशिव पेठ वैगरे टिच्चून फिरवली आहे . जातिवादाच्या पुराव्या साठी अजून काय पाहिजे ? जातिवादा वरून मिपावर सतत सर्वधर्म समभाव वैगेरे लेक्चर देणाऱ्या पंडितांचे त्या फलकांबद्दल विचार ऐकण्यासाठी मी आतुर आहे .

In reply to by ट्रम्प

प्रिय ट्रम्प, हे बोर्ड आक्षेपार्य आहेतच, तुम्ही म्हंटल्यावर नेट वर पहिले मी नाहीतर मला टीव्ही वर कोणत्या रिपोर्टर ने हे दाखवलेले दिसले नव्हते(असल्या रिपोर्टींग करनाऱ्या लोकांचा चा आता राग येतो ) माझ्या म्हणण्याने ह्या लोकांवर कायदेशीर कार्यवाही झालीच पाहिजे... आणि असे होत नसेल तर सरकार, पोलिस हे सगळे अश्या जातीय विद्वेष पसरवणाऱ्या लोकांना कुठल्या पद्धतीने पाठीशी घालते आहे हे पाहिले पाहिजेच. हे सर्व चुकीचेच आहे. सर्व धर्म समभाव, अहिंसा हे मला वयक्तिक बरोबर वाटते, याचा अर्थ असा नाही कि दोषी लोकांना शिक्षा होऊच नये. सर्व धर्म समभाव मध्ये ब्राम्हण, मराठा, बौद्ध, मुस्लिम आणि सगळे येतात.. इतकेच नाही मागे 1 जानेवारी 2018(कि 19? दंगल झाली होती तेंव्हा ) ला शौर्य दिनाचे औचित्य साधून, पुण्यात जे ब्राह्मण जातिला टार्गेट करून पेशवे यांच्यावर जे बोर्ड लागले होते त्याचा ही मी निषेध नोंदवतो.. आणि मराठा जातीला ही टार्गेट केले गेले त्याचा ही मी निषेध नोंदवतो. माझे अनेक बौद्ध मित्र आहेत, त्यांच्याशी मी बोललो तेंव्हा त्यांच्या आणि माझ्या संबंधात यामुळे काहीच फरक पडलेला नव्हता आणि नसणार, त्यांची मते ही असली नव्हती, शाळेत, कॉलेजात आणि अजूनही एकत्र जेवलेलो आम्ही आमच्यात असले काही नाहीच. मग हे असले जातीय तेढ निर्माण करणारे कोण आहेत? गांधी, आंबेडकर, सावरकर, टिळक, सुभाष चंद्र बोस या सर्वांचे विचार मला पटतात.. काही नसतील पटत याचा अर्थ ते चुकीचेच हे मला मान्य नाही, वयक्तिक गांधी यांच्या सर्व धर्म समभाव आणि अहिंसा मला जास्त योग्य वाटतात.. पण त्याच वेळेस मी सुभाष चंद्र पण वाचतो, त्यांनी गांधींना म्हणलेले, मोडकळीस आलेले लाकडाचे कपाट या वाक्याबद्दल मला राग येत नाही.. आंबेडकर यांच्या बद्दल चा आदर माझा तसू भर ही कमी होत नाही.. तसेच सावरकर आणि टिळकांचे रोखठोक वागणे ही मला पटतेच. पण त्याच वेळेस नथूराम गोडसे चा उदो उदो मला मान्य नाही तो चुकीचाच. ती हत्याच. मुळ मुद्दा, जातीय तेढ निर्माण करणाऱ्या कुठल्याही माणसाला, ग्रुप ला अनुशासन झाले पाहिजे.. पण याचा अर्थ त्यांनी बोर्ड दाखवले तेंव्हा सर्व धर्म समभाव वाले येथे बघू काय म्हणतात असे का पाहिजे? माझ्या कुठल्या पोस्ट किंवा रिप्लाय मध्ये असे दिसते आहे कि मी कुठल्या जातीला सपोर्ट करतो आहे? मी ब्राह्मण विरोधी आहे? आपल्या मतांच्या विरोधी कोणाचे मत असेल ही पण तो आपला विरोधीच असतो असे आपल्याला का वाटते? तुमचा राग असे जातीय बोर्ड, जातीय दंगली करणाऱ्यांवर आणि त्यांना शिक्षा न करणाऱ्या सरकार वर असणे मी योग्य समजतो पण कुठल्याश्या साईट वर सर्व धर्म समभाव म्हणणाऱ्या लोकांवर तुम्ही का प्रश्न विचारता आहात? त्यांच्या भूमिकेबद्दल शंका का घेता आहात? असो.. त्यांनी बोर्ड दाखवले कि आम्ही ही दाखवणार, त्यांनी मारले कि आम्ही ही मारणार यातून काय साध्य होईल? या पेक्षा जे चुकीचे ते दोषी, आणि त्या विरोधात बोलणे मला योग्य वाटते.. मग तो माझ्या जातीचा असो नाहीतर कोणत्याही जातीचा. मुळ चर्चा आपण jnu हिंसाचाराची करतोय, हा हिंसाचार जर कुठल्याही विद्यार्थ्यांवर झाला असता, तरी त्याची जात, धर्म, पक्ष समर्थन न पाहता मला तो हल्ला निंदनीयच वाटला असता, तो जरी माझ्या धर्माने केला म्हणून मला तो योग्य ही वाटला नसता हे ही आहेच.. भारत माझा देश आहे आणि सारे भारतीय माझे बांधव आहेत.. जयहिंद.

In reply to by गणेशा

"ह्या वेळी निषेध का नाही केला" ही line of discussion पूर्ण चुकीची आहे. त्यामध्ये एखाद्या व्यक्तीच्या पक्षपतीपणा तुम्ही दाखवू शकताच. पण ती नन्तरची गोष्ट झाली. एखादी चूक दाखवून दिल्यावर तू त्याची चूक का नाही दाखवलीस असं म्हणणं हे तटस्थ व्यक्तीने केलं तर शोभून दिसेल. ज्या व्यक्तीची चूक आहे असा व्यक्ती आणि त्या व्यक्तीचा पक्षकार ही गोष्ट आपला बचाव म्हणून वापरतो हे अगदी अतार्किक आहे.

In reply to by शा वि कु

अजिबात नाही. याबाबतीत एक अमेरिकेतील कायदा दाखवू इच्छितो अमेरिकेत जर तुम्ही overspeeding केलेत तर तुम्हाला चांगला सणसणीत दंड लावला जातो. पण जर तुम्ही एखाद्या गाडीला टेलगेट करत असाल तर मात्र तुम्हाला दंड लागत नाही, तुमच्या वाटणीचा दंड तुम्ही ज्याला टेलगेट करत आहात त्याला लागतो. असे का? तर त्याने कायदा मोडला म्हणून तुम्हाला कायदा मोडण्यास प्रोत्साहन मिळाले अशी त्यामागची भूमिका आहे.

In reply to by गणेशा

गणेशराव , वैयक्तिक तुम्हाला दोष देत नव्हतो हो !! उठसुठ फक्त हिंदूंना सर्वधर्म भाव शिकवणाऱ्या मिपाकरांना उद्देशून लिहले होते . रेल्वे , रस्त्यावरील गाड्यांची तोडफोड आणि जाळपोळ करणाऱ्या धर्मांधां कडून कसल्या देशप्रेमाची आणि सर्वधर्म समभाव ची अपेक्षा ठेवणार ? मग त्यांच्या बरोबर चांगले वागण्याचा ठेका फक्त हिंदुनीच घेतला आहे का ? राहिला प्रश्न जे एन यु चा , तर दुपारी सगळ्यात प्रथम आईशी घोश ने लेफ्टीस्ट विद्यार्थ्यांना बरोबर घेऊन सर्व्हर रूम वर दगडफेक केली आणि मास्क लावून साबरमती होस्टेल वरील विद्यार्थ्यांना मारहाण केली ( आश्चर्य म्हणजे लेफ्टीस्ट च्या एन डि टी व्ही , ए बी पी ने सुद्धा ते व्हिडिओ दाखवले ) . त्याची प्रतिक्रिया संध्याकाळी अ भा वि प ने दिली तर त्यात आश्चर्य काय ? प्रतिक्रिया उमटणारच !! नशीब ते पुण्यात फक्त फलक घेऊन फिरले , दंगल घडवली नाही गेली , नाहीतर सर्वधर्मीयांचे बुरखे फाटले असते . सरकार , पोलीस असल्या घटनांमध्ये बोटचेपी भूमिका घेते म्हणूनच उद्रेक होऊन दंगली होतात . सर्वात महत्वाचे राष्ट्रगीत म्हणण्यास नकार देणारे शांतता धर्मिय सि ए ए विरोधी मोर्चात एकसुरात राष्ट्रगीत गात होते :) :) :):)

काँगी उघडपणे ज्या प्रमाणे हिंदू दहशतवाद असा शब्दप्रयोग करतात त्या प्रमाणे त्यांच्या तोंडून मुस्लिम दहशतवाद कधी ऐकला आहे का ? महात्मा गांधींनी देशासाठी महान कार्य केले , सुखसंपत्ती चा त्याग केला हे सर्वसृत आहे , पण सिगरेट आणि दारू पीत इंग्लिश बायकांच्या कमरेत हात घालून नाचणाऱ्या नेहरूनी नक्की काय त्याग केला आणि देशासाठी कुठले महान कार्य केले ? नक्की कशासाठी त्यांचा उदोउदो करून लहानपणापासून शाळेत शिकवला गेला ? बी बी सी हे भाजप आणि संघविरोधी आणि कट्टर काँगी समर्थक आहे त्यामुळे त्या बीबीसी मध्ये एक ही संघी असण्याची शक्यता नाही . तर त्याच बी बी सी वर नेहरू , इंदिरा , राजीव ,सोनिया बद्दल ' यथेच्छ ' माहिती उपलब्ध आहे . सतत काँगी प्रेमाचा गॉगल लावल्या मूळे कदाचित तुम्ही वाचले नसेल .

कलाकाराचे राजकीय मत आणि त्याची अराजकीय कलाकृती वेगवेगळी पहावी, हि अपेक्षा फार जास्त आहे काय ?

In reply to by शा वि कु

अलबत जास्त आहे कारण 1. हल्लीच्या काळात कला म्हणजे कला राहिलेली नाही, प्रत्येकाला आपल्या कलेतून पैसे कमवायचे आहेत. 2. अर्थातच तुम्ही खिशातले पैसे मोजून पिक्चर बघता त्यामुळे त्या पैशांचा विनियोग कुठे होतोय हे जाणून घेण्याचा तुम्हाला कायदेशीर नसला तरी नैतिक अधिकार आहे, आणि त्यामुळे मी एखाद्याला दिलेला पैसा जर माझ्याविरुद्ध वापरला जाणारा असेल, तर मी त्याला पैसे देणे, पक्षी व्यवहार करणे थांबवू शकतो. ही गोष्ट जर मला माझ्या अस्तित्वाच्या (राजकीय, सामाजिक, व्यावसायिक, आर्थिक इत्यादी) दृष्टीने जर महत्वाची वाटत असेल तर मी हे नक्कीच करू शकतो. 3. जगात अराजकीय काहीच नाही. अगदीच ते धमाल वगैरे चित्रपट सोडले तर अश्या संवेदनशील विषयांवर काढलेले चित्रपट बऱ्याच वेळेस प्रोपौगंडा असतातच, मी आत्ता ना बघता तुम्हाला हे सांगू शकतो की छपाकमध्ये डाव्यांचा सॉफ्ट प्रोपौगंडा असणारच आहे, कारण राजेश हे पात्र वास्तवात लेफ्टीस्ट आहे, त्यामुळे डाव्यांच्या वाईट बाजू झाकून चांगली बाजू उजळवण्याचा प्रयत्न या चित्रपटात नक्कीच असणार. उगाच दीपिका जनेयु मध्ये गेलेली नाही. या सगळ्या गोष्टींचा विचार करता, जे चित्रपट बघून माझ्या विरोधी विचारधारेला बाळ मिळेल असे कोणतेही चित्रपट मी बघणार नाही. मला वास्तव किंवा चित्रपट सहन होत नाही म्हणून नव्हे, तर असे चित्रपट बघून मला त्यांना आर्थिक आणि भावनिक प्रोत्साहन द्यायचे नाही. शेवटी तुम्ही चित्रपट बघितलेत तर त्यांना पैसे मिळतात, पैसे मिळाले तर ते पुन्हा असेच चित्रपट काढायला उद्युक्त होतात. राजकीय धुळवड उडवून चित्रपट चांगला चालत असेल तर ते राजकीय सामाजिक वातावरण गढूळ करायला देखील जर मागेपुढे बघत नसतील, तर यावर चाप आपण एक प्रेक्षक म्हणून नक्कीच लावू शकतो. आज जर हा चित्रपट अश्या प्रकारे वाद निर्माण करून चालला तर पुढच्या वेळेस ते अजून एक वाद निर्माण करतील. शेवटी समाज म्हणून हे सगळे आपल्यालाच भोगायचे आहे. ते पैसे घेऊन मोकळे होणारेत.

In reply to by आनन्दा

एखाद्याला दिलेला पैसा जर माझ्याविरुद्ध वापरला जाणारा असेल, तर मी त्याला पैसे देणे, पक्षी व्यवहार करणे थांबवू शकतो.
तुमच्या विरुद्ध वापरला जाईल ?
जगात अराजकीय काहीच नाही. अगदीच ते धमाल वगैरे चित्रपट सोडले तर अश्या संवेदनशील विषयांवर काढलेले चित्रपट बऱ्याच वेळेस प्रोपौगंडा असतातच, मी आत्ता ना बघता तुम्हाला हे सांगू शकतो की छपाकमध्ये डाव्यांचा सॉफ्ट प्रोपौगंडा असणारच आहे, कारण राजेश हे पात्र वास्तवात लेफ्टीस्ट आहे, त्यामुळे डाव्यांच्या वाईट बाजू झाकून चांगली बाजू उजळवण्याचा प्रयत्न या चित्रपटात नक्कीच असणार.
मीही सिनेमा पहिला नाहीये,पण यात लेफ्टीस्ट प्रोपोगंडा असेल असं मला तरी नाही वाटत. मेघना गुलजार चे इतर सिनेमे मी पाहिलेत. आतापर्यंत तरी अगदी संयतपणे तिने सिनेमे बनवले आहेत, राझी,तलवार इ.

In reply to by आनन्दा

सविस्तर परीक्षण लिहितच आहे. राजेश हे शाळकरी मुलाचे पात्र आहे, हे हार्डली 6-7 मिनिटं सिनेमात आहे. लेफ्ट राईट वादाचा काही उल्लेख नाही. प्रोपोगंडा म्हणाल तर केवळ ऍसिड बंदी व्हावी हेतूने केलेला प्रोपोगंडा यात आहे.

ट्रम्प यांनी दिलेल्या ८ उदाहरणांमध्ये जर कोणाला हिंदूंची मुस्कटदाबी दिसत नसेल तर तो पाहणारा नक्कीच तटस्थ नाही (गॉगलधारी आहे) असे म्हणता येईल. खरंतर हि मोजकीच उदाहरणे झाली, ठरवलंच तर हजारोंनि लिहिता येतील. पण एक प्रश्न अनुत्तरीतच आहे - जर जे.एन.यु. मध्ये आणि देशभरात कोठेही देश विरोधी लोक आहेत आणि देशद्रोह्यांचा नायनाट करण्याचा शासनाला पूर्ण अधिकार आहे तरीही तेथील पाळेमुळे खणून दोषींवर कारवाई का होत नाही?

अमित शहांना पंतप्रधानपदी बसवल्याशिवाय काँग्रेसी, सेक्यूलर, पुरोगामी, डावे इ. लोक स्वस्थ बसणार नाहीत असं त्यांच्या सद्य वर्तनातून दिसतंय.
सेक्युलर सोबत ही sneer का बरं ? सेक्युलर म्हणजे सर्व धर्म समान मानणे, तर सेक्युलर असण्याबद्दल नावड का ? अगदीच बेसिक विचारला, प्लिज सांभाळून घ्या :)

In reply to by शा वि कु

राग सेक्युलर वरती नाही, छद्मसेक्युलर वरती आहे. तुम्ही समान नागरी कायद्याचा पुरस्कार करता का? केव्हढा विरोधाभास आहे, स्वतःला हिंदुत्ववादी म्हणवणारे समान नागरी कायद्याचा पुरस्कार करतात आणि निरपेक्ष म्हणवणारे विरोध!!

In reply to by आनन्दा

मी समान नागरी कायद्याचा पुरस्कार करतो. स्वतःला हिंदुत्ववादी म्हणवणारे स.ना. का. चे समर्थन करतात, हा खरच फार मोठा विरोधाभास आहे.

In reply to by आनन्दा

हिंदू तर तुम्ही, मी, राहुल गांधी, कन्हैया कुमार,नरेंद्र मोदी सगळेच आहोत. तर मग हिंदुत्ववादी असणे म्हणजे तुमच्या दृष्टीने काय ? आपल्या डोक्यांमध्ये हिंदुत्ववादाची वेगवेगळी चित्रं दिसतात, म्हणून विचारतो.

In reply to by शा वि कु

आज ज्याला हिंदुत्ववाद म्हणून हिनवले जाते, ते खरे तर अल्पसंख्याकवाद नको असे आहे. हिंदू हे सामान्यपणे सर्वधर्मसमभाव मानणारेच असतात. त्यादृष्टीने भाजपाची राजकीय भूमिका मला अधिक सेक्युलर वाटते, पण प्रत्यक्षात त्यांना बहुसंख्याकवादी म्हणून हिणवले जाते. शिवसेना खरी हिंदुत्ववादी होती, काही प्रमाणात, पण आता ते तर पुरोगामी झालेत. तुम्हाला राजदीप, राजू परुळेकर आणि बरखा सेक्युलर वाटत असतील तर मग तुमची व्याख्या आमच्या व्याख्येपेक्षा वेगळी आहे. मला ते सेक्युलर वाटत नाहीत. दावे स्वतःला सेक्युलर म्हणवतात, मला ते तसे वाटत नाहीत. म्हणजे पोथीनुसार ते आहेत, पण व्यवहारात नाहीत. असो.

In reply to by आनन्दा

तुम्हाला राजदीप, राजू परुळेकर आणि बरखा सेक्युलर वाटत असतील तर मग तुमची व्याख्या आमच्या व्याख्येपेक्षा वेगळी आहे.
मी स्वतःला सेक्युलर का म्हणीन आणि हिंदुत्ववादी का नाही म्हणणार इतकेच सांगू शकतो. बाकी शिवसेना आता पुरोगामी झाली आणि पूर्वी हिंदुत्ववादी होती असं मी मानत नाही. शिवसेना पूर्वी संधिसाधू होती आणि आताही आहे असं मला वाटतं.

In reply to by आनन्दा

राजकीय भूमिका भाजपा, काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी सगळ्यांनीच overnight बदलल्या. त्यामुळे कुठलं हिंदुत्व आणि कुठलं सेक्युलॅरिझम. आपापले नैतिक विश्वास सर्वसमावेशक ठेवणं इतकंच काय आपल्या हातात राहतं.

In reply to by शा वि कु

राजकारणात कुणीच कोणाचा काय्म शत्रु नसतो हे वाक्य अनेक पक्षाच्या पुढार्यानी बोलले आहे. हल्लि तर अडवाणीनादेखील सेक्युलर म्हण्णारे लोक आहेत. सरकार अडचणीत आले की हे नेते ईतिहासात जातात व "मुस्लिम कसे वाईट्ट होते" हे वॉत्स- अ‍ॅप विद्यपीठातून सांगण्याचा प्रयत्न करतात. गेले २/३ दिवस वॉट्स-अ‍ॅपवर अफगाणीस्तान/कझाकिस्तान्/पाकिस्तान येथे कसे 'राष्ट्रिय ओळख पत्र' आहे हे ठसवण्याचा प्रयत्न चालु आहे. काहि महिन्यांपुर्वी संबित पात्रा "पाकिस्तानमध्ये अहमदिया मुस्लिमांवर कसे अत्यचार होत आहे" हे घसा फोडुन एका चॅनेलवर सांगत होते. तो व्हिडियो आता गायब झालेला दिसतोय.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

राजकारण्यांनी जनतेची अगदी नस पकडली आहे. इमोशनच्या नादाखाली अगदी नाचवतायत. आतापर्यंत संयत असलेली जनता अगदी पोलराईझ झालीये.

In reply to by शा वि कु

बरोब्बर बोललास. "मुसलमानाना हाकलून द्या . वाट लागली आहे त्यांच्यामुळे" काही विशिष्ट ठिकाणी ऐकु येणारी ही कुजबुज आता उघडपणे सगळीकडे बोलले जाउ लागले आहे. अमित शहा हे गृहमंत्री की चिथावणीखोर हिंदुत्ववादी नेता? नक्की कोण कळत नाही.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

भाजपाचे गिरीराज सिंह आणि इतर काही नेते पॉप्युलेशन कंट्रोल च्या नावाखाली मुसलमानांच्या लोकसंख्या विस्फोटाची (खोटी) माहिती समोर ठेवतात. हिच माहिती लोकं पोटतिडीकीने फॉरवर्ड करतात. काय खोटं आणि आणि काय खरं यातला फरक समजावून घेण्याची इच्छाच मेल्यासारखी परिस्थिती झालीये. जे आपल्या मताला अनुसरुन तेच खरं.

In reply to by आनन्दा

तुम्ही समान नागरी कायद्याचा पुरस्कार करता का? केव्हढा विरोधाभास आहे, स्वतःला हिंदुत्ववादी म्हणवणारे समान नागरी कायद्याचा पुरस्कार करतात आणि निरपेक्ष म्हणवणारे विरोध
!! हो, मी हिंदू आहे आणि मी सर्वधर्म समभाव आणि अहिंसा मानतो. आणि त्याच बरोबरीने मी समान नागरी कायद्याचा पुरस्कार करतो.. (या एकाच अश्या त्यावेळेस च्या जाहीर नाम्यातील मुद्द्या मुळे मी अटलबिहारी वाजपेयी या साठी भाजपा ला ही त्यावेळेस वोट केले होते ) आता देशात जी हिंसा चालू आहे ते मला आवडत नाही. 370 आणि ट्रिपल तलाख मला मोदींचे निर्णय आवडले आहेत. त्यांची परराष्ट्र नीती ही चांगली आहेच. परंतु नोटबंदी, अर्थकारण, जाहिरात बाजी, कृषी, दिल्लीतील पोलिस हाताशी असतानाही तेथील हिंसा थांबवण्यास असमर्थता.. आणि बऱ्याच गोष्टी आहेत जे मला आवडत नाही.

तमाम सहिष्णू मिपाकरांना सादर प्रणाम !!! आजच शाहीनबाग दिल्ली मधील नवीन विडिओ आला आहे . त्यात देवतांचे फोटो जाळणारे , ला ईलाही इल्लल्ला ( अल्ला शिवाय दुसरा देव नाहीच ) अशा घोषणा देणारे शांतधर्मीय " जय श्रीराम !! बोले सो निहाल की !! " घोषणा देत आहेत . हा बदल निश्चितच स्वागतार्ह आहे . शेवटी काय मोदी है तो सब मुमकीन है : ) : )

शांतधर्मीय ह्या शब्दाचा पायंडा पाडलाय कुणास ठाऊक ,, चुकीचं वाटत असलं तरी खरंय ,

प्रतिसाद संपादित


तुम्ही पाकिस्तान मध्ये इस्लाम वर टिका करू शकत नाही कारण तेथे मुस्लिम बहुसंख्य आहेत , तुम्ही भारता मध्ये इस्लाम वर टिका करू शकत नाही कारण भारतात मुस्लिम अल्पसंख्याक आहेत . पण भारतात हिंदू बहुसंख्य आणि पाकिस्तान मध्ये अल्पसंख्याक असून देखील तुम्ही हिंदू वर टिका करू शकता कारण हिंदू जन्मजात उदारमतवादी आहे !!!!!!!

In reply to by ट्रम्प

नेहमी पाकिस्तानचे उदाहरण डोळ्यासमोर का ?आंबेडकरानी जातीयवादाविरुद्ध टीका केली .. ती चुकीची होती ? सावरकरानी हिण्दू धर्मातील काही प्रथांवर प्रहार केले.. ते पण चुकीचे ?

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

प्रश्न बाबासाहेब आणि सारकरांचा नाही तर सतत हिंदूंना भाषण देणाऱ्या लिब्रू लोकांचा आहे भारतात मुस्लिम धर्मावर टिका केली तर काहीच होत नाही पण पाकिस्तान मध्ये इशनिंदा चा आरोप लावून फासावर लटकवतात आणि भारता मध्ये हिंदू धर्मावर टिका करणार्यांना आंतरराष्ट्रीय अवॉर्डस आणि भिकेरूपी लाखो रुपये भेटतात म्हणून पाकिस्तान चे नाव घेतले . आणि बाबासाहेबांना का मध्ये ओढता ? त्यांनी गोरगरीब दलितांना सन्मान मिळवून दिला पण त्याच्या बदल्यात त्यांनी सर्वात जास्त त्रास काँगी कडूनच भोगला आहे .

अभाविपच्या गुन्डानी जो हिण्साचार केला त्याबद्दल इन्डिया टूडेने स्टीण्ग ऑपरेशन केले.. https://www.youtube.com/watch?v=dnppOnvBz1k दिल्लि पोलिस व गृहमंत्री अमित शहा ह्यांच्या आशीर्वादाशिवाय हे शक्यच नव्हते.