Skip to main content

चालू घडामोडी : जानेवारी २०२०

लेखक वामन देशमुख यांनी बुधवार, 01/01/2020 21:12 या दिवशी प्रकाशित केले.
सर्व मिपाकरांना नववर्षाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! अ. महाराष्ट्रातील नवीन सरकारचा दुसरा शपथविधी नुकताच पार पडला आहे. लवकरच खातेवाटप होऊन कारभार मार्गी लागेल अशी अपेक्षा आहे. तिन्ही पक्षांत, विशेषतः शिवसेनेत अंतर्गत कुरबुरी सुरु आहेत त्यांवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय मार्ग काढतात हे पाहणं रोचक ठरेल. बाकी, हे त्रिघाडीचं सरकार १ जानेवारी २०२१चा सूर्योदय पाहील का? आ. केंद्र सरकारपुढील या वर्षातील उद्दिष्टे / आव्हाने - १. नागरिकत्व (सुधारणा) कायद्याची (२०१९) अंमलबजावणी २. देशातील नागरिकांची नोंदवही (NRC) ३. लोकसंख्या नियंत्रण कायदा ४. पाकव्याप्त काश्मीरवर ताबा इ. यावर्षातील दिल्ली आणि बिहारच्या निवडणूका जिंकणे मोदी-शहांना शक्य होईल का? ई. अमित शहांना पंतप्रधानपदी बसवल्याशिवाय काँग्रेसी, सेक्यूलर, पुरोगामी, डावे इ. लोक स्वस्थ बसणार नाहीत असं त्यांच्या सद्य वर्तनातून दिसतंय. ता. क. - मिपावरील पूर्वीच्या जाणत्या लेखकांनी नवीन वर्षात तरी पुन्हा लिहितं व्हावं ही मनापासून विनंती.

वाचने 61557
प्रतिक्रिया 124

प्रतिक्रिया

अभाविपच्या गुन्डानी जो हिण्साचार केला त्याबद्दल इन्डिया टूडेने स्टीण्ग ऑपरेशन केले.. --- अभाविपचे गुंड! मग सर्वररुम मधे तोडफोड करुन, नविन फॉर्म भरायला आलेल्या विद्यार्थांना मारहाण करणारे मास्कधारी डावे कोण, क्रांतीकारी ? --

In reply to by प्रसाद_१९८२

मास्कधारी अभविपचे होते हे सिद्ध झाले. मास्कधारी डावे असते तर पोलिसानी तुडवुन मारले असते व पुरावेही दाखवले असते टी.व्हिवर. पोलिसानी बघ्याची भुमिका घेणे, कुलगुरूनी काहीही न करता बसणे.. भक्त मंडळीना मूर्ख बनवणे सोपे आहे पण सर्वाना नाही.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

कसल्या जुन्या बातम्या घेऊन बस्ताय !! स्टिंग ऑपरेशन करणाऱ्या इंडिया टी व्ही च्या राहुल कंवल ने सुद्धा चूक मान्य केली की तो कार्यकर्ता abvp चा नाही . ते जाऊ द्या लिब्रेल्स चा आवडता पत्रकार राजदीप सरदेसाई ने पी एस आई त्रिवेदी ची लिखित स्वरूपात कोर्टात माफी मागितली हे वाचले का ? https://zeenews.india.com/hindi/india/sohrabuddin-case-rajdeep-sardesai…

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

माईसाहेब, तुम्ही ज्या लोकांचे समर्थन इथे करत आहात त्याच लोकांनी तुम्हाला तोंडावर पाडले. --------------------- https://www.facebook.com/apkaharkara/videos/816782515450288/

सी.पी.आय. (मार्क्स) पॉलिट ब्युरो चे नेते म्हणत आहेत कि ज.ने.यु. मध्ये सन १९८१ साली होती त्यापेक्षाहि वाईट परिस्थिती सध्या आहे. त्यातच सुब्रह्मण्यम स्वामींच्या मते विद्यापीठाला दोन वर्षे बंद ठेवून नेताजी सुभाषचंद्र बोस यांचं नाव द्यावे. ज.ने.यु. त सन १९८१ मध्ये इंदिरा गांधींनी केल्या प्रमाणे कारवाई केली जाऊ शकते का?

अल्पसंख्यांक विकास मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांचे नगरसेवक बंधू कप्तान मलिक यांनी रस्त्याची कामं करणाऱ्या काही कामगारांना मारहाण आणि शिवीगाळ करतानाचा एक व्हडिओ दोन दिवसांपूर्वी व्हायरल झाला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा याच घटनेचा एक व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये कप्तान मलिक चक्क एका मराठी मुलाला मारहाण आणि आणि शिवीगाळ करताना दिसत आहेत. ही बातमी

श्रीनगर मध्ये डि एस पी देवेंद्र सिंग दोन अतेरिक्या बरोबर प्रवास करताना पकडला गेला , याच देवेंद्र चे पुलावामा हत्याकांड मध्ये हात आहे असे म्हणतात . याला पूर्वी राष्ट्रपती पदक देऊन गौरविण्यात आलेले असून सध्या विमानतळ वर विमान अपहरण विरोधी पथक मध्ये कार्यरत होता . काँग्रेस वाले भाजप वर नारळ फोडत आहेत तर भाजप वाले मिठाची गूळणी धरून गप्प बसले आहेत . आज अशी माहिती बाहेर आली आहे की डि आय जी स्वतः देवेंद्र ला अटक करत ' असताना तुम गेम बिघाड रहे हो ' असे देवेन्द्र ने डि आय जी ला सुनावले . नक्की काय चाललंय कोणास ठाऊक ?

आणी ह्या शीख लोकाण्चे 'देशप्रेमी' मंडळीना भारी कवतिक असते. शीख लोक म्हणजे कमालीचे देशप्रेमी, सच्चे नागरिक असे गैरसमज आपल्या समाजात असतात. ह्याच दविण्दर सिंग ऐवजी कोणी 'दिलेर खान' असता तर देशप्रेमी मंडळीनी "बघा, आम्ही सांगतच होतो.." म्हणत वॉट्स अ‍ॅपवर हजारोवर सुरस कथा पसरवल्या असत्या. व त्याच्या अटकेला "हा अमित शहांचा मास्टर स्ट्रोक" म्हणत डोक्यावर घेतले असते.

शेवटी काय कर्तृत्व , देशावरील प्रेम महत्त्वाचे ! जात पात गौण ठरते . राहिला शांतधर्मीय बद्दल , त्यांनी आपल्याच देशातील काश्मीर पंडितना हकलण्या बद्दल मौन बाळगणे पण CAA ला विरोध करणे या दुटप्पीपणा मुळेच सतत निशाण्यावर राहणारच .

In reply to by ट्रम्प

https://www.indiatoday.in/india/story/i-am-an-indian-will-remain-one-ar… कारगिलमध्ये कामगिरी बजावणार्या निव्रुत्त लष्करी अधिकार्याला Detention camp मध्ये ठेवले जाते.. ह्यचा अर्थ काय ? https://www.youtube.com/watch?v=Kc3h_owvOoM बी एस एफच्या जवानाला व त्याच्या पत्नीला परदेशी ठरवले जाते. कशासाठी हा रिकाम्टेकडा उद्योग ?

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

मला काही कळले नाही. देशासाठी युद्धात लढले तरी जर घुसखोरी केली असेल तर केली आहेच ना! त्यांना सरकारने दुसऱ्या कोणत्यातरी नियमानुसार नागरिकत्व द्यावी अशी मागणी करू शकतो. पण खोटी कागदपत्रे मिळवून देशासाठी लढले म्हणून ते नागरिकच आहेत असे म्हणणे मला मान्य नाही. अजून एक - आसाम NRC मध्ये बरेच बांग्लादेशी हिंदू विस्थापित पण अनधिकृत सिद्ध झाले आहेत असे ऐकून आहे. कारण आसाम NRC हे वेगळ्या कायद्यानुसार होत आहे. त्या लोकांना वेगळ्या कायद्यान्वये नागरिकत्व द्यावे, पण NRC मधून वगळणे म्हणजे लगेच अन्याय म्हणून ओरडण्याची गरज नाही

In reply to by आनन्दा

पण पाकिस्तानातून आलेल्या हिंदूना(हिंदू पाकडे? ) नागरिकत्व मिळणार पण ३० वर्षे भारतिय सैन्यात घालवलेल्या अधिकार्याला मात्र देशाबाहेर जावे लागणार. कोणता न्याय हा ?

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

कारगिल युद्धात लढले वा बीएसएफमधे शामिल झाले म्हणजे देशद्रोही नाही हे कोण ठरवनार ? पगार नाही घेत का हे देशप्रेमी? असा दावा जर न्यायालयात केला तर पहिल्या सुनावणीला रफादफा करण्यात येईल. स्वांतत्रसैनिक झाले म्हणून एकदोन खून माफ असा पैरामीटर लावत नाही कोर्ट!

In reply to by भंकस बाबा

मग हिंदू/जैन्/बौद्ध पाकड्याना भारतिय नागरिकत्व मिळणार आहे ते लोक कशावरुन देशद्रोही नाहीत ? ते तर खरे पाकिस्तानीच ना ? हिंदू झाले तरी पाकडेच ना ? ह्यात आय एस आय्चे हस्तकही असतील?

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

प्रश्नात दम आहे ! उगीचच अकबरुद्दीन ओवेसी उठसुठ हिंदूना ढोस देत नाही !!! NBT: अकबरुद्दीन ओवैसी के विवादित बोल,'कागज मांगें तो कहो, चारमीनार मेरे बाप ने बनवाया है तेरे बाप ने नहीं' http://nbt.in/eRL6va?baa via आता जरी भाजप राज्य करीत असली तरी भाजप आणि तमाम हिंदूंनी लक्षात ठेवावे ओवेसी म्हणतोय ती आठशे वर्ष भारतात सहिष्णु मुस्लिमांच्या अधिपत्याखाली तमाम हिंदूंनी सुख उपभोगल आहे .

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

तुमच्या बेसिकमधेच काही गडबड आहे. ही भाषा एनआरसी व सीएएला विरोध करणारे शांतिप्रिय समाजाचे लोक करत आहेत, आणि काही सेकुलर कीडे आपला कण्ड शमवण्याकरता करीत आहेत. तुम्ही कायदा वाचला आहे का नक्की? शांतिप्रिय समाजाचे लोक कधी नव्हे तर आता भारतप्रेम दाखवत आहेत, संविधानाचा दाखला देत आहेत. संविधानाला साक्षी मानून दिलेला निकाल शाहबानो खटल्यात फिरवला तेव्हा व सर्वोच्च न्यायालयाचा आदेश असताना देखील अवेळी वाजणारे अजानचे भोंगे याने मात्र संविधान रक्षण केले जाते

In reply to by भंकस बाबा

तिकडच्या हिंदूला आपले म्हणायचे व इकडच्या हिंदू/मुस्लिमाला कागद्पत्रे नाहीत म्हणून देशाबाहेर चालते व्हा म्हणायचे ... हेच पटत नाही.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

माईसाहेब, येडा बडून पेढा खाताय? तुम्ही ज्याला 'तिकडचा' प्रांत म्हणता तो वास्तविक इकडचाच होता. तिथले अत्याचारग्रस्त हिंदूही इकडचेच आहेत. तुम्ही ज्याला इकडचे मुस्लिम म्हणता त्यांना कोणीही बाहेर काढीत नाहीये. हां घुसखोर मुस्लिमांना मात्र बाहेर काढलंच पाहिजे. एखादी गोष्ट पटंत नसेल तर पटवून घ्यायला शिका. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

"तुम्ही ज्याला 'तिकडचा' प्रांत म्हणता तो वास्तविक इकडचाच होता. तिथले अत्याचारग्रस्त हिंदूही इकडचेच आहेत." अरे मग अहमदिया मुस्लिम, ज्याण्च्यावर तिकडे अत्याचार होतात , अशानाही घ्या ना. ते ही एकेकाळचे हिंदुस्तानीच ना ? सेलेकटिव्ह मानवतावादी कशासाठी ? काही महिन्यापुर्वी संबित पात्रा टी.व्ही चॅनेल्वर अहमदिया/खोजा मुस्लिमांवर कसे अत्याचार होतात हे घसा फोडुन सांगत होते. आता तो व्हिडियो गायब झालाय.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

माईसाहेब, तुमचा मुद्दा बिनतोड आहे. म्हणूनंच शीख, ख्रिस्ती वगैरे बिगर हिंदूंनाही नासुका मध्ये समाविष्ट केलं आहे. त्यातूनही खोजांनी जर प्रतिज्ञापत्र भरलं की ते मुस्लिम नाहीत, तर सहानुभूतीने विचार केला जाऊ शकतो. आ.न., -गा.पै.

महेश भट्ट ची बायको आणि ब्रिटिश नागरिकत्व असलेल्या सोनी राजदान या लिबरल्स बाई ने अफझल गुरू बद्दल संवेदना व्यक्त करून अफझल वर अन्याय झाल्याची खंत आज व्यक्त केली . म्हणजे संसद हल्ल्यात संसदेचे रक्षण करताना मृत्युमुखी पडलेले दहा बारा सुरक्षा रक्षक हे विनाकारण मेले !! महेश भट च्या मुलागा राहुल भट निर्दोष आणि त्याचा मित्र डेव्हिड हेडली पण निर्दोष होता !!

In reply to by विजुभाऊ

पुर्वी सामना वाचायचो आम्ही. संजय राउत तेव्हा क्लिंटन्, टोनी ब्लेयर, वाजपेयीना सल्ले द्यायचे 'सामना'मधून. सद्दाम हुसेन ह्याना संपादकीयातून राउत ह्यानी सावध केले होते तेही आठवते. नंतर जपानच्या पंतप्रधानापासुन ते नाशिकचा महापौर.. अशा सर्वाना राउतानी सल्ले दिले आहेत.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

ठ्ठो =))

बकबकुद्दीन औवेश्या बकबकतो की :
हमारे पूर्वजों ने 800 साल तक देश पर राज किया संदर्भ : https://www.misalpav.com/comment/1057080#comment-1057080
च्यायला, चार पिढ्यांपूर्वी हा हिंदू होता. आणि बाता मारतो आठशे वर्षांच्या. अशा वांझोट्या वल्गनांनी आपलं मन कसं प्रसन्न होतं, नाहीका? बके राहो बकबकभाई. -गा.पै.

हि सकाळ मधली बातमी. सकाळ नेहमीच काँग्रेसधार्जिणं राहिलेलं आहे. सकाळ सोडून हि बातमी कुठेही आली नाही. आणि आली जरी तरी सरकारने अजिबात असल्या गोष्टींची काळजी करू नये. हि कॉंग्रेसने पोसलेली परदेशी पिलावळ असलीच ओरड करणार. खरोखर आपल्या देशासाठी हि शरमेची बाब आहे कि विश्व नेतृत्व करण्याची लायक असलेले पंतप्रधान आपल्याला लाभले असूनही आपल्यातील काहींना ते खुपतात.

In reply to by सर टोबी

टोब्या, अरे पण तरूणाना नोकर्या नाहीत, महागाई वाढलेली आहे, जी डी पी का काय म्हणतात तोही चांगलाच घसरलेला,जी.एस.टी.चे संकलन खूप कमी (३ लाख कोटी कमी), अनेक व्यवसायांचे बारा वाजलेले... ह्याविषयी तरी मिडियात कुठे चर्चा आहे? सगळे भाउ,अर्नब पाकिस्तनाच्या आणी मुस्लिमांच्या मागे लागलेले. रविशकुमार सारखा एखादा विरळा.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

सध्याचा काळ हा पुनःनिर्माणाचा आहे. हि परिस्थिती थेट स्वातंत्र्य लढ्यासारखीच आहे. मोदींनी अजून स्पष्ट सांगितले नाही परंतु 'तुम मुझे खून दो, मैं तुम्हे आजादी दूंगा' सारखी घोषणा ते लवकरच करतील. आपल्या सर्वांना त्याग हा करावाच लागणार आहे. देशाची फाळणी ज्या तत्वावर झाली त्याच तत्वाप्रमाणे देशाची उभारणी व्हावयास हवी होती. परंतु काँग्रेसच्या भिकार धोरणांमुळे तेंव्हा ते शक्य झाले नाही. आता इतक्या वर्षांनी भारतभूमीवर मोदींच्या रूपाने क्रांतिसूर्य उगवला आहे. आपल्याला तरी फक्त त्यागच करायचा आहे. मोदी तर अहोरात्र कष्ट घेतात. आपण कोणीही आता माघार घ्यायची नाही असा निश्चय केला पाहिजे. स्वगत: या ठिकाणी श्रीगुरुजी या आयडीची प्रकर्षाने आठवण येत आहे.

In reply to by सर टोबी

ह्या पुनःनिर्माणाबद्दल जरा विस्कटून सांगाल का? हि परिस्थिती थेट स्वातंत्र्य लढ्यासारखीच आहे>> - नक्की कुणाविरुद्ध हा लढा आहे? आपल्या सर्वांना त्याग हा करावाच लागणार आहे.>> - ह्या त्यागाचं फळ नक्की काय असणार आहे? मोदी तर अहोरात्र कष्ट घेतात>> - मोदी जर अहोरात्र कष्ट घेत आहेत तर मग त्याचं फळ जिडीपी, नोकर्‍या, महागाई यात का नाही दिसत? कुठे जात आहेत इतके कष्ट?

In reply to by सर टोबी

श्रीगुरुजी हे संघाचे प्रवक्ते मा.गो.वैद्य आहेत अशी चर्चा एक्केकाळी होती. खरे खोटे माहित नाही.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

त्याचप्रमाणे आपण शाहिनबाग मध्ये caa विरोधात आंदोलन करणाऱ्या मुस्लिम महिलां बरोबर रात्रदिवस आंदोलन करत असता . खरं खोटं माहीत नाही .

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

ब्राझील , ब्रिटन , अमेरिका , चीन , जर्मनी महत्वाच्या या सगळ्या देशाचा जी डी पी सुद्धा गेली १० वर्ष घसरला आहे , याला सुद्धा मोदी कारणीभूत आहेत का ? जागतिक आर्थिक व्यवस्था च कोलमडलेली असताना फक्त भारताची आर्थिक स्थिती सुधारली पाहिजे अशी अपेक्षा ठेवणार्याना नक्की काय म्हणायचे आहे ?

In reply to by ट्रम्प

मग २०१२/२०१३ मध्ये भाजपा नेते अर्थव्यवस्थेवरुन संसदेत थयथयाट करायचे.. मनमोहन सिंगाना अर्थशास्त्र शिकवु पाहायचे.. तो काय प्रकार होता ? बरे, आर्थिक स्थिती सोडा, पण सामाजिक सलोख्याची पुरती वाट लावली ह्या भाजपावाल्यानी हे तर भक्त मंडळीही मान्य करू लागली आहेत. माजी भक्त चेतन भगत पण आता "सरकारने जरा विचार करून कारभार करावा.. सामाजिक सलोख्यचे भान ठेवावे" असे म्हणू लागला आहे.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

मोजून फक्त पाच उदाहरणे भक्त मंडळी ची नावे द्या ( राजकीय इ्छा पूर्ण न झाल्या मुळे बोंबलणारे शौरी , शत्रुघ्न नकोत ) जे मान्य करत आहेत की भाजप ने सामाजिक सलोख्याची वाट लावली . आणि काय शिकवले ममो ला २०१२ मध्ये त्याचे पण उदाहरण द्या , उगीचच रागा सारख्या ढगात गोळ्या मारण्यात काय अर्थ आहे ? चेतन भगत हा पूर्णपणे व्यवसाइक लेखक आहे , ही मंडळी वांग्याच्या प्रकारात मोडतात . गांधी कुटुंबाच्या हुजरेगिरी मुळे ममो भाजप आणि तमाम भारतीयांचा आवडता बकरा होते.

तुमचा "भाषा आणि संस्कृती: एक अवलोकन" हा लेख आणि तुमचे मोदींबद्दलचे मत अगदीच परस्परविरोधी वाटते हो !
पण प्रत्येक कुत्र्याचे दिवस असतात या उक्तीप्रमाणे संस्कृती रक्षकांना देखील सुगीचे दिवस आले. सुधारक या शब्दाची चमक आता सनातन या शब्दाला आली आणि सुधारक मरतुकड्या कुत्र्यासारखे केविलवाणे झाले.
म्हणजे मोदींना मी सस्कृती रक्षक समजायचो, म्हणुन.

खूप तटस्थ भूमिका घेण्याचा आव आणतात इथेही काही लोक ,, असे किती videos दाखवू जे पाहून आणि ऐकून bp पाच पंचवीस ने वर खाली होईल ,, पण प्रेम उतू चाललंय ना ,, काय करणार !! डायरेक्ट दाखवू शकत नाही म्हणून तटस्थ ....

काकांनी काल भिमा कोरेगाव वर आपले मत मांडले, आव्हाड आणि काका यांच्या त वरुन केंद्राने ताकभात ओळखला, भिमाकोरेगाव चा तपास NIA कडे दिला. सरकार अर्बन नक्षल ला सोडणार नाही, हे नक्की. पवार साहेबांबद्दल आता अनादरही वाटत नाही. सरकारने काकांना धक्का दिला असे म्हणावे का?

काही जणांना माझ्या अपेक्षेप्रमाणे अचंबित करून गेलेत. त्या मागची भूमिका निदान त्या लोकांना तरी कळावी म्हणून हा प्रतिसाद. मोदींचा उदय आणि त्यांचे स्थिरावणे हा भारतीय राजकारणातील सत्तरच्या दशकाइतकाच एक वेदनादायी अनुभव आहे. जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा आणि काळाबाजार, सततचे संप आणि आंदोलनं, राजकारणातील एकारलेपण आणि होयबा मंडळींचा संताप यावा इतका लाळघोटेपणा असा अनुभव थोड्या फार फरकाने फिरून परत आला आहे असे वाटते. फक्त त्यावेळेस हे दिवस सरतील कि नाही अशी शंका होती. आता हे दिवस कधी तरी संपतील असा विश्वास आहे. मुद्दा समजावून सांगताना उपरोधाइतके काही प्रभावी साधन नसते असा माझा वैयक्तिक अनुभव आहे. त्याचाच वापर मी त्या दोन प्रतिसादात केला. सध्याच्या परिस्थितीत राजकीय भूमिकांपासून चर्चेपुरते का होईना बाजूलाच व्हावे असे आजकाल प्रकर्षाने वाटते. असाच विचार बऱ्याच जणांचा असावा असे वाटते कारण 'चालू घडामोडी' या धाग्याची घसरत चाललेली लोकप्रियता. माईसाहेब आणि शा वि कु: चांगल्या गोष्टींवरचा तुमचा विश्वास अबाधित राहावा म्हणून हा खास प्रतिसाद तुमच्यासाठी.

जे एन यु विद्यार्थी जरील इमाम चा एक व्हिडिओ व्हायरल झालाय , त्यात तो स्पष्टपणे सांगतोय आम्हाला बगैर मुस्लिमांच्या हमदर्दी ची गरज नाही , आम्ही आमच्या ताकतीवर आसाम भारता पासून वेगळं करू शकतो , काही दिवस किवा कायमचं !!!! पण तरी सुद्धा जे एन यू , शाहीन बाग समर्थक आणि तमाम लेफ्टिष्ट शेजारनीचा नवरा गेला तर स्वतःचाच नवरा गेल्या सारखं विलाप करणे सोडणार नाहीत . https://twitter.com/MilitaryUpdate_/status/1220847574698971138?s=09

In reply to by ट्रम्प

ट्रम्प, ते येडं भारताची कुक्कुटमुंडी पिरगळायच्या बाता मारतंय. जणू काही पाकिस्तान व बांगलादेशास chicken neck नाहीच्चे. आ.न., -गा.पै.

गा. पै , न्यूज चानेल वर तुकडे तुकडे गैग ला सतत निर्दोष साबित करण्यासाठी लेफ्टिस्त आणि पुरोगाम्यांची जी स्पर्धा चालते त्याची अक्षरशः किव वाटत होती . पण आता शाहीन बागचा मुख्य आयोजक जरिल ने ऐका फटक्यात बगैर मुस्लिमांची गोची करून टाकली . जरिल हा व्हाईट कॉलर दहशतवादी निघाला आणि caa ला विरोध करणे म्हणजेच जारील इमाम ला समर्थन ..... उठा , रा काँ चे आव्हाड / पवार , कॉंगी चे आदर्श नेते चव्हाण या सगळ्यांना आणि आपल्या मिपाकरांना नक्कीच प्रश्न पडला असेल आता नक्की काय करायचे ???

In reply to by ट्रम्प

ट्रम्प, मला शाहीनबागेमागे मोदींचा हात दिसतो. मोदी लुच्चा व डांबरट इसम आहे. मनात आणलं तर तासाभरात शाहीनबाग साफ होईल. पण मुद्दामून निदर्शनं चालू ठेवू दिलीयेत. दिल्लीच्या निवडणुका आल्यात ना. कुठलंही धृवीकरण मोदींच्या फायद्याचंच आहे. माझ्या मते निवडणुका संपल्या की शाहीनबाग विसर्जित होईल. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

असू शकत :) :) :) त्या आंदोलनाचा असा ही एक फायदा झाला की शाहीन बाग मुळे बऱ्याच मुस्लिमांनी आयुष्यात पहिल्यांदाच आज तिरंगा फडकवला आसेल.

In reply to by ट्रम्प

नुसता तिरंगा फडकावुन देशप्रेम सिद्ध होत नाही रे ट्रम्पा. त्या विजय मल्ल्याच्या प्रत्येक विमानावर तिरंगा होताच. बाकी देशातले बघुतांशी घोटाळ्यातल्या लोकांची नावे पाहिली की देशप्रेम सिद्ध करण्याची गरज कोणाला आहे ते कळते. मित्तल, बंसल, शहा,पटेल्,पारेख,चोक्सी. जयस्वाल. देशाची वाट लावायला ही मंडळी कारणीभूत आहेत. पुर्वी हीच मंडळी धान्यात भेसळ करून विकायची. शिक्षण क्षेत्रातही ही मंडळी घुसल्याने पार वाट लागली आहे. ह्या मंडळीना देशाबाहेर हाकलले तर देशाची अर्थ्व्यवस्था सुरळीत होईल.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

राष्ट्रगीतला नकार देणारे , तिरंग्या ला अभिवादन न करणारे आणि देवतांचे फोटो जाळणारेची कड घ्यावीशी का वाटली ? त्याच प्रमाणे गांधी फॅमिली , राष्ट्रवादीचे भुरटे , आणि शाहीनबागड्याचां देशाची अर्थव्यवस्था सुरळीत करण्यात काय योगदान आहे ते सांग . त्या नंतर आपण देशप्रेमी आणि देशद्रोही याबद्दल चर्चा करू ....

https://www.ndtv.com/india-news/nirbhaya-rape-case-akshay-singh-files-c… पुन्हा पुढे ढकलली जाणार फाशी. सर्व आरोपींच्या फाशीची एकाच दिवशी एकाच वेळी कार्यवाही झाली पाहिजे अशी काही कायदेशीर आवश्यकता असते का? ज्यांचं अपील सर्व लेव्हल्सवर फेटाळून झालंय त्यांना आता काय वेगळा रिलीफ मिळण्याची शक्यता आहे म्हणून थांबवलं आहे?

In reply to by गवि

आता काय तर म्हणे एका बरोबर बाकीच्यांनी जेल मध्ये अत्याचार केला !! आरोपींची बाजू मांडणाऱ्या सिंग नावाच्या वकिलाला दोन न च्या ठिकाणी गोळ्या घातल्या पाहिजेत . त्या आरोपींच्या पेक्षा शर्मनाक काम हा वकील करतोय . आज पुन्हा फाशी पुढे ढकलण्यात आली , न्यायव्यवस्था सुद्धा इतकी केविलवाणी का झाले आहे तेच समजत नाही . सुप्रीम कोर्टाने अपील स्थगित फेटाळल्या वर खालचे न्यायाधीश सद्सद्विवेक बुद्धीला स्मरून पटकन का निर्णय घेत नाहीत . या मुळेच हैदराबादी पोलिसांनी केलेले शूटा आऊट केंव्हाही योग्यच वाटते .