हाही भाग छान.
घटस्फोट घेताय?" मग हे पाहीलेच/वाचले पाहीजे असे अनेक पूरक धंदे आता बरकतीत येतील. पण लोक असा धंदा नीट चालेल की नाही बघायला परत ज्योतीषाकडेच जातील ;-) घटस्फोट ही एक सामान्य बाब आहे व तो झाल्यावर संबधितांचे प्रश्न सुटून पुढले आयुष्य बरेच सुकर होउ शकतात असे प्रबोधन तसेच विना कटकट घटस्फोटाची सोय झाली तर लोक पत्रिका-घटस्फोटाचा जादा बाउ करणार नाहीत.
लेख उत्तमच आहे पण प्रबोधनाबरोबर आधुनिक वैद्यकिय विज्ञान व त्याचे दृष्य परिणाम पर्यायाने काळ हेच एक औषध आहे तोवर ही ज्योतिषाची दुकाने काही बंद होणार नाहीत. :-)
घटस्फोट ही एक सामान्य बाब आहे व तो झाल्यावर संबधितांचे प्रश्न सुटून पुढले आयुष्य बरेच सुकर होउ शकतात असे प्रबोधन तसेच विना कटकट घटस्फोटाची सोय झाली तर लोक पत्रिका-घटस्फोटाचा जादा बाउ करणार नाहीत.
आजच 'हिंदोळा' हा परित्यक्ता स्त्रियांच्या प्रश्नावर असलेला लघुपट पाहिला व त्यावरील परिसंवाद ऐकला. त्यात ऍड निशा शिवुरकरांनी हा घटस्फोटाच्या प्रतिष्ठेचा मुद्दा अधोरेखित केला. त्यात त्यांनी वरील प्रतिपादन केले. (पत्रिका या विषयावर नाही)
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
मुलगा १५ दिवसांसाठी अमेरिकेहून आला आहे. तेवढ्यात आईवडिलांनी पाहून ठेवलेल्या आणि मुलाने जिचा फक्त फोटो पाहिला आहे अशा मुलीशी त्या १५ दिवसात लग्न उरकून पुन्हा अमेरिकेस प्रयाण. ही स्थिती सोडली तर 'ऍरेन्ज्ड मॅरेज' ही सुद्धा परिचयोत्तर विवाहात रूपांतरित करता येतील.
म्हणजे विवाह ठरल्यापासून ते तो प्रत्यक्ष घडेपर्यंतचा काळ वधुवरांनी सत्कारणी लावला तर पुढे न पटण्याचा प्रश्न निर्माण होण्यापूर्वीच पाऊल मागे घेता येईल. त्यासाठी दोघांचीही मानसिक स्थिती 'भारावून गेल्याची' असून उपयोग नाही. तर परस्पर भेटीच्या प्रत्येक प्रसंगी संतुलित रित्या भावी जोडीदाराचे मूल्यमापन करणे आवश्यक आहे.
या परस्पर भेटीत भावी जोडीदाराचे विचार नीट जाणून घेणे आवश्यक आहे.
एखाद्या बाबतीत जोडीदाराचे मत/आवड/सवय काय आहे असे जाणून घेणे.
आपले याबाबतीतील मत/आवड/सवय काय आहे?
आणि ती वेगळी असेल तर ती वेगळी असणे मान्य आहे काय?
ती मान्य नसतील तर आपण या तडजोडीस तयार आहोत का?
हे तपासणे महत्त्वाच्याच नव्हे तर क्षुल्लक गोष्टीबाबतही करायला हवे. म्हणजे समजा कुणाला झोपताना पंखा चालत नाही. अशावेळी जोडीदाराला पंखा लागतोच असे असेल तर तडजोड करणार्या जोडीदाराचे सुरुवातीस तरी खूप त्रास होऊ शकतो.
हे वधूच्या बाबतीत जास्तच महत्त्वाचे कारण तडजोडीची अपेक्षा तिच्याच्कडून जास्त असणार.
असो घाटपांड्यांचा लेख पत्रिका पाहणे या विषयावर आहे परंतु घटस्फोट आणि विवाहानंतर एकमेकांचे न पटणे या गोष्टींचा उल्लेख झाला अहे म्हणून हे सर्व लिहिले.
खराटा
(रंग माझा वेगळा)
मी यंदा.. चे सारे भाग वाचले नाहीयेत... त्यामुळे हा विषय येथे चर्चिला गेला आहे की नाही ते ठाउक नाही... पण जसे या लेखात लिहिले आहे अन खरेही आहे म्हणा कि आजकाल बर्याच मुली आणी मुलांची लग्ने लांबणीवर पडताहेत... ३२ वर्षांचा लग्नाळलेला मुलगा वा मुलगी काही नवीन नाही... अशा वेळेस मुलींना मंत्रपठण, स्त्रोत्र, पांढरे शुक्रवार, जप, रूक्मिणीस्वयंवर वाचन (जरी त्यात ती श्रीक्रूष्णासोबत पळून गेली होती.. म्हणजे आईबाबांना मुलीचे लग्न करून द्यायचे आहे.. की तिने पळून जाऊन लग्न करावे अशी अपेक्षा आहे???) असले प्रकार करावयास भाग पाडले जाते... मुलांच्या बाबतीत ही असे घडते का???
अवांतरः हल्ली बर्याच लोकांच्या तर्जनीमध्ये पुष्कराजाची अंगठी दिसते... त्याने काय लाभ होतो नी तो खरेच होतो का? याची जाणकारांनी माहीती द्यावी...
ज्योतिष शास्त्रातील गैर प्रथा, समाजाची कमकुवत मनःस्थिती, सारासार विवेकाला देण्यात येणारी तिलांजली आदी मुद्यांवरील विवेचनातून घाटपांडे साहेबांनी ज्योतिष शास्त्राच्या चिंधड्याच उडविल्या आहेत.
एक विनोद म्हणून मला वाटते लग्न ठरविताना 'गुण' जुळविण्यापेक्षा 'दुर्गुण' जुळतात का हे पाहिले तर जास्त विवाह यशस्वी होतील. जसे:
वराला रविवारी सकाळी ११ पर्यंत लोळायला आवडते. वधूलाही आवडते.
वराला शनिवारी रात्री उशीरा पर्यंत जागून पिक्चर पाहणे, मादक द्रव्यांचे सेवन करणे आवडते, वधूला 'साथ' द्यायला आवडते.
वराला वस्तू जागच्या जागी ठेवणे जमत नाही, वधूला उकिरड्यावर राहणे पसंद आहे.
वराला कपडे मॅचिंग वापरायचे कळत नाही, वधू 'कलर्-ब्लाईंड' आहे.
अशी 'दुर्गुणी' जोडपी यशस्वी संसार करू शकतात. जन्म भर आनंदी राहतात. पण,,,
वराला रविवारी सकाळी ६ वाजता उठायला आवडते. वधू रविवारीही सकाळी ६ वाजता उठते.
इथे सकाळी चहा कोणी करायचा ह्यावरून ६|| ला भांडण होऊ शकते.
वराला शनिवारी रात्रीही लवकर झोपायची सवय असेल आणि वधू ही लवकर झोपते.
पण मग वंश वाढावा कसा? इतर दिवशी दोघांच्याही नोकर्या आणि धावपळीने थकून लवकर झोपावेच लागते.
वराला वस्तू जागच्या जागी ठेवण्याचा शौक आहे, वधूला टापटिपीचि भयंकर आवड आहे.
मुलांनी केलेल्या पसार्यावरून दोघांमध्ये सततचे वाद होत राहतील. मुलांना शिस्त लावयची कोणी? हा कळीचा मुद्दा होऊ शकतो.
वराला मॅचिंग कपडे असल्याशिवाय घराबाहेर पडत नाही. वधू नवर्याच्या कपड्यांना स्वतःचे कपडे मॅच करूनच त्याच्या बरोबर बाहेर पडते.
हे म्हणजे अगदी 'बँड-पथकात' काम केल्यासारखे होऊन जीवन निरस होऊ शकते.
म्हणजेच काय? गुण जुळवू नका, दुर्गुण जुळतात की नाही ते तपासा.
असो.
मॉर्निंग वॉकला उठायचा कंटाळा येत असेल तर ..... झोपेत चालायला शिका.
मार्गदर्शक आहेत सगळेच लेख ! प्रचंड माहिती आहे ही आमच्या सारख्या साठी !! धन्यवाद ..!!
सस्नेह
विशाल
*************************************************************
इतक्या वर्षानंतर तिला पाहिली तेव्हा कशी भासली सांगु....
कल्पनेतला "ताजमहाल" हिणकस ठरला !!! :-) :-)
प्रतिक्रिया
छान
उत्तम
आवडला
हे महत्वाचे
लेख आवडला
परिचयोत्तर विवाह
एक विनंती....
चिंधड्या...
दुर्गुंण जुळवणे
मार्गदर्श