पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना संयुक्त अरब अमिरातींचा सर्वोच्च मुलकी पुरस्कार
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना संयुक्त अरब अमिरातींतर्फे (युएई) त्या देशाचा, "ऑर्डर ऑफ झायेद" हा सर्वोच्च मुलकी बहुमान, २४ ऑगस्ट २०१९ रोजी, प्रदान करण्यात आला.
मोदींना त्यांच्या कामगिरीबद्दल अनेक आंतरराष्ट्रिय पुरस्कार मिळालेले आहेत. त्यातील काही महत्वाचे असे आहेत : १. Order of Zayed, २०१९ : संयुक्त अरब अमिरातींचा सर्वोच्च मुलकी पुरस्कार. २, Order of St Andrew the Apostle, २०१९ : रशियाचा सर्वोच्च व १६९८ सालापासून आस्तित्वात असलेला सर्वात जुना सन्मान. ३. Seoul Peace Prize, २०१८ : दक्षिण कोरिया. ४. UN Champions of the Earth Award, २०१८ : संयुक्त राष्ट्रसंघ (युएन). ५. Grand Collar of the State of Palestine, २०१८ : पॅलेस्टाईन. ६. Amir Amanullah Khan Award : अफगाणिस्तान. ७. King Abdullaziz Sash Award, २०१६ : सौदी अरेबियाचा सर्वोच्च मुलकी पुरस्कार. ८. TIME Person of the Year, २०१६. इत्यादी. महत्वाचे म्हणजे वरच्या यादीतील ८ पुरस्कारांपैकी ४ मुस्लीम राष्ट्रांचे आहेत. इतकेच नव्हे तर त्यातील सौदी अरेबिया आणि युएई हे दोन देश इस्लामी देशांचे धुरीण आहेत ! १९६९ साली स्थापन झालेल्या Organisation of Islamic Cooperation या ५७ इस्लामी देशांच्या संघटनेच्या परराष्ट्रमंत्र्यांची काही महिन्यांपूर्वी अबू धाबीत परिषद झाली होती. मुस्लिम लोकसंखेने दुसर्या क्रमांकावर असलेल्या भारताला त्या संघटनेत स्थान मिळू नये यासाठी, त्या संघटनेचा संस्थापक सभासद पाकिस्तान, सुरुवातीपासूनच सक्रिय होता आणि त्यात तो २०१८ पर्यंत यशस्वीही झाला होता. मात्र, फेब्रुवारी २०१९ मध्ये त्या संघटनेने पाकिस्तानचा कडवा विरोध मोडून, किंबहुना, संस्थापक सदस्य असलेल्या पाकिस्तानच्या सभेवर बहिष्कार टाकण्याची टाकण्याच्या धमकीची पर्वा न करता, तत्कालीन भारतिय परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांना, केवळ आमंत्रितच केले असे नाही तर, मुख्य भाषण (की नोट अॅड्रेस) देणार्या अतिथीचा सन्मान देऊन आमंत्रित केले होते, हे आठवत असेलच. या वेळीही, काश्मिरसंबंधिची ३७० आणि ३५अ कलमे रद्दबातल केल्यामुळे पाकिस्तान जगभर, युएनमध्ये आणि विशेषतः इस्लामी जगात विषारी आणि विखारी भाषेत आकांडतांडव करत आहे. मात्र, पाकिस्तानच्या या रडगाण्याला ICO आणी चीनसकट कोणत्याही देशाने फारशी भीक घातलेली नाही. मात्र, याच वेळेस, युएईने मोदींना हे पारितोषिक देऊन, पाकिस्तानला सणसणीत चपराक लगावलेली आहे, हे नक्की. एकीकडे मोदींच्या राज्यकारभाराची आणि आंतरराष्ट्रिय मुत्सेद्दीगिरीची (पाकिस्तान आणि चीन सोडून) जगभर प्रशंसा चाललेली असताना, भारतातले विरोधी पक्ष; विशेषतः कॉन्ग्रेस, कम्युनिस्ट आणि कडवे मुस्लिम नेत्यांना आणि त्यांच्या पाठीराख्यांना; त्यांच्यामध्ये एकही गुण दिसत नाही आणि हिटलर, जातियवादी, मुस्लीमविरोधी, इत्यादी अर्थांची नवनवीन विशेषणे शोधून काढण्याचा त्यांचा व्यवसाय जोरात चाललेला आहे ! आणि भारतात वाढत असलेल्या असहिष्णूतेमुळे अनेक "तथाकथित विचारवंत, कलाकार, इत्यादींना देशात राहणे मुश्किल होत आहे !! "पिकते तिथे विकत नाही" ही म्हण सर्वार्थाने सिद्ध करणारा भारत हा सर्व जगात एकमेव विशेष देश असावा !!! :( सुदैवाने, हे फक्त मोदी विरोधकांच्या बाबतीत खरे आहे, जनतेला मोदींबद्दल काय वाटते आहे ते तिने निवडणूकांत दाखवून दिले आहेच. :) या अतिरेकी मोदी विरोधाला कंटाळून, काही वरिष्ठ कॉन्ग्रेसी नेते हल्ली जरासा सकारात्मक सूर लावू राहिले आहेत, हा त्यातल्या त्यात एक आशेचा विवेकी (sane) किरण म्हणावा काय ?
वर्गीकरण
प्रतिक्रिया
अहाहा...!
अजून पावणेपाच वर्षे काढायची आहेत.
' जाऊ द्या ना ' ? 'जा म्हणावे पाकीस्तानला' :)
अगदी सहमत...
आता अरुंधती राॅय पण निघाली आहे म्हणे, तिकडे
धाग्यावर आभार मानतो. ;)
तू भक्त आणि
सहमत...!