✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना संयुक्त अरब अमिरातींचा सर्वोच्च मुलकी पुरस्कार

ड
डॉ सुहास म्हात्रे यांनी
Sun, 08/25/2019 - 15:34  ·  लेख
लेख


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना संयुक्त अरब अमिरातींतर्फे (युएई) त्या देशाचा, "ऑर्डर ऑफ झायेद" हा सर्वोच्च मुलकी बहुमान, २४ ऑगस्ट २०१९ रोजी, प्रदान करण्यात आला.





मोदींना त्यांच्या कामगिरीबद्दल अनेक आंतरराष्ट्रिय पुरस्कार मिळालेले आहेत. त्यातील काही महत्वाचे असे आहेत : १. Order of Zayed, २०१९ : संयुक्त अरब अमिरातींचा सर्वोच्च मुलकी पुरस्कार. २, Order of St Andrew the Apostle, २०१९ : रशियाचा सर्वोच्च व १६९८ सालापासून आस्तित्वात असलेला सर्वात जुना सन्मान. ३. Seoul Peace Prize, २०१८ : दक्षिण कोरिया. ४. UN Champions of the Earth Award, २०१८ : संयुक्त राष्ट्रसंघ (युएन). ५. Grand Collar of the State of Palestine, २०१८ : पॅलेस्टाईन. ६. Amir Amanullah Khan Award : अफगाणिस्तान. ७. King Abdullaziz Sash Award, २०१६ : सौदी अरेबियाचा सर्वोच्च मुलकी पुरस्कार. ८. TIME Person of the Year, २०१६. इत्यादी. महत्वाचे म्हणजे वरच्या यादीतील ८ पुरस्कारांपैकी ४ मुस्लीम राष्ट्रांचे आहेत. इतकेच नव्हे तर त्यातील सौदी अरेबिया आणि युएई हे दोन देश इस्लामी देशांचे धुरीण आहेत ! १९६९ साली स्थापन झालेल्या Organisation of Islamic Cooperation या ५७ इस्लामी देशांच्या संघटनेच्या परराष्ट्रमंत्र्यांची काही महिन्यांपूर्वी अबू धाबीत परिषद झाली होती. मुस्लिम लोकसंखेने दुसर्‍या क्रमांकावर असलेल्या भारताला त्या संघटनेत स्थान मिळू नये यासाठी, त्या संघटनेचा संस्थापक सभासद पाकिस्तान, सुरुवातीपासूनच सक्रिय होता आणि त्यात तो २०१८ पर्यंत यशस्वीही झाला होता. मात्र, फेब्रुवारी २०१९ मध्ये त्या संघटनेने पाकिस्तानचा कडवा विरोध मोडून, किंबहुना, संस्थापक सदस्य असलेल्या पाकिस्तानच्या सभेवर बहिष्कार टाकण्याची टाकण्याच्या धमकीची पर्वा न करता, तत्कालीन भारतिय परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांना, केवळ आमंत्रितच केले असे नाही तर, मुख्य भाषण (की नोट अ‍ॅड्रेस) देणार्‍या अतिथीचा सन्मान देऊन आमंत्रित केले होते, हे आठवत असेलच. या वेळीही, काश्मिरसंबंधिची ३७० आणि ३५अ कलमे रद्दबातल केल्यामुळे पाकिस्तान जगभर, युएनमध्ये आणि विशेषतः इस्लामी जगात विषारी आणि विखारी भाषेत आकांडतांडव करत आहे. मात्र, पाकिस्तानच्या या रडगाण्याला ICO आणी चीनसकट कोणत्याही देशाने फारशी भीक घातलेली नाही. मात्र, याच वेळेस, युएईने मोदींना हे पारितोषिक देऊन, पाकिस्तानला सणसणीत चपराक लगावलेली आहे, हे नक्की. एकीकडे मोदींच्या राज्यकारभाराची आणि आंतरराष्ट्रिय मुत्सेद्दीगिरीची (पाकिस्तान आणि चीन सोडून) जगभर प्रशंसा चाललेली असताना, भारतातले विरोधी पक्ष; विशेषतः कॉन्ग्रेस, कम्युनिस्ट आणि कडवे मुस्लिम नेत्यांना आणि त्यांच्या पाठीराख्यांना; त्यांच्यामध्ये एकही गुण दिसत नाही आणि हिटलर, जातियवादी, मुस्लीमविरोधी, इत्यादी अर्थांची नवनवीन विशेषणे शोधून काढण्याचा त्यांचा व्यवसाय जोरात चाललेला आहे ! आणि भारतात वाढत असलेल्या असहिष्णूतेमुळे अनेक "तथाकथित विचारवंत, कलाकार, इत्यादींना देशात राहणे मुश्किल होत आहे !! "पिकते तिथे विकत नाही" ही म्हण सर्वार्थाने सिद्ध करणारा भारत हा सर्व जगात एकमेव विशेष देश असावा !!! :( सुदैवाने, हे फक्त मोदी विरोधकांच्या बाबतीत खरे आहे, जनतेला मोदींबद्दल काय वाटते आहे ते तिने निवडणूकांत दाखवून दिले आहेच. :) या अतिरेकी मोदी विरोधाला कंटाळून, काही वरिष्ठ कॉन्ग्रेसी नेते हल्ली जरासा सकारात्मक सूर लावू राहिले आहेत, हा त्यातल्या त्यात एक आशेचा विवेकी (sane) किरण म्हणावा काय ?
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
राजकारण
लेखनप्रकार (Writing Type)
बातमी

प्रतिक्रिया द्या
56519 वाचन

💬 प्रतिसाद (108)

प्रतिक्रिया

हेच ना ? वा वा वा.

जॉनविक्क
Tue, 08/27/2019 - 00:53 नवीन
हेच ना ? वा वा वा. Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डँबिस००७

टीकेला घाबरणारा नेता कोणालाच आवडात नाही

Rajesh188
Mon, 08/26/2019 - 22:59 नवीन
मीडिया ची विरोधी मते . विरोधी पक्षांची टीका न,वरिष्ठ सरकार किंवा नेत्यांची विरोधी टीका जो शांतपणे ऐकून निर्णय बदलत नाही तोच खरा नेता . फक्त त्याचे निर्णय जनहिताचे असवेत्त . आणि हे गुण मोदी मध्ये आहेत .म्हणून ते लाडके आहेत जनते चे
  • Log in or register to post comments

एका भारतीयाला हे बहुमान मिळत आहेत याचा अभिमान वाटायला काय हरकत आ

चामुंडराय
Tue, 08/27/2019 - 06:43 नवीन
मी काय म्हणतो, ते भारताचे पंतप्रधान आहेत आणि त्यातून ' मोदी ' आहेत हा भाग तूर्तास बाजूला ठेवला तर एका भारतीयाला हे बहुमान मिळत आहेत याचा अभिमान वाटायला काय हरकत आहे?
  • Log in or register to post comments

सुहासजी,

भंकस बाबा
Tue, 08/27/2019 - 10:33 नवीन
खाडी देशातील राजकारणाचे यथार्थ समीकरण मांडले आहे तुम्ही. तरीही मला हेच वाटते की हा सर्व खटाटोप खनिज तेलाचे संभाव्य खरीददार पकडण्यासाठी चालले आहे. मागे एका धाग्यावर या अनुषंगाने आपली चर्चा झाली होती. चीन व भारत हे तेलाचे प्रचंड मोठे आयातदार आहेत. चीन अतिशय वेगाने विद्युत वाहनाच्या बांधणीकडे वाटचाल करत आहे. त्यांनी भविष्याकडे बघून जिथे लिथियमच्या खाणी आहेत तिथे गुंतवणूक केली आहे. त्यामुळे त्यांना विद्युतवाहने भारताच्या तुलनेत पुष्कळ स्वस्त मिळतात. पण आता नवीन संशोधनानुसार सोडियमवर आधारित विद्युतघट चलनात येणार आहेत. त्यामुळे विद्युत गाड्याची किंमत पुष्कळ खाली येईल. नेमका हा बदल खाडी देशांच्या अर्थव्यवस्थेला मारक आहे. त्यामुळे भारतासारख्या देशात प्रचंड गुंतवणूक करून आपले तेल खपवायचे हा खाडी देशांचा अग्रिम कार्यक्रम असेल. सौदी अरमाको देखील भारतात यायला हेच कारण असावे. दूसरे म्हणजे खनिज तेल खपवणे हा धंदा अमेरिका व युरोपला देखील फ़ायदेशीर आहे. जर भारताने आक्रमकरित्या विद्युत वाहने आणण्याचे ठरवले तर खाडी देशांची मोठी कुंचबना होईल. कारण फक्त भारतच नाही तर दक्षिण आशियतील देशदेखील तेलावरचे परालंबित्व कमी करतील. तर हे जे पुरस्कार आहेत ते तुम्ही खुश रहा आणि आमचा पिछवाडा सांभाळा असाच संदेश देतात. वेनेजुएला देशाने देखील भारताला स्वस्तात खनिज तेल देण्याची ऑफर दिली होती , पण त्यांना चलन वेनेजुएलाचे आभासी चलन आहे ते पाहिजे होते. मोदीनी निःसन्देह भारतासाठी भरीव कामगिरी केली आहे. पण खाडी देशासाठी अशी कोणती कामगिरी त्यांनी केली आहे की ज्याबद्दल त्यांना त्या देशाचा सर्वोच्च पुरस्कार मिळावा?
  • Log in or register to post comments

भंकस बाबाजी,

डॉ सुहास म्हात्रे
Tue, 08/27/2019 - 12:40 नवीन
भंकस बाबाजी, तुमचे म्हणणे बरोबर आहे पण परिपूर्ण नाही. हितसंबंधी सामरिक व व्यापारी समिकरणे आंतरराष्ट्रिय राजकारणात फार महत्वाची असतात, यात वाद नाही. पण, त्याचबरोबर व्यवहारात संतुलित, निष्पक्ष व न्याय्य विचार असणे आणि त्या विचारांचा कोणाला निष्कारण न दुखावता पण ठामपणे व सातत्याने पाठपुरावा करणे, हे फार कमी वेळा दिसते. हे जो करू शकतो इतरांच्या आदराचा धनी होतो. भारताची गेल्या सहाएक वर्षांची मुत्सद्देगिरी याच तत्वांवर चालू आहे आणि त्याची फळे वारंवार दिसत आहेत. खालील घटना पाहिल्या तर हे समजायला मदत होईल : युएनः १. युएनमधले गेल्या काही वर्षांचे निर्णय पाहिले तर, केवळ खाडी देशच नाही तर चीन आणि पाकिस्तान सोडून जगातले देश एक/बहुमताने भारताच्या बाजूने उभे राहताना दिसतात असेच दिसते. यापैकी, अनेक देशांचे भारताशी फारसे व्यापारी किंवा सांस्कृतिक संबंध नाहीत. २. यामुळे, पाकिस्तानचा "ऑल वेदर फ्रेंड" असलेल्या चीनलाही अनेकदा त्याची पाठराखण करणे कठीण होत आहे. उदा : अ) युएनमध्ये चीनने दीड-दोन वर्षे घातलेला खोडा सोडवून, अझर मसूदला अतिरेकी घोषित करणे. आ) पाकिस्तानची ३७० कलम रद्दबातल केले त्याबद्दलची तक्रार युएनच्या सुरक्षा समितीने १४-१ ने फेटाळणे. तो एक विरोधी देश चीन होता, हेवेसांन. इतकेच नव्हे तर, त्या बैठकीत युकेनेही विरोधी शेरा मारला अशी वावडी उठली होती, तेव्हा ब्रिटनने "आम्ही भारताविरुद्ध काहीही बोललो नाही" असे निवेदन केले. सुरक्षा समितीचा कायम सदस्य असलेल्या युकेने असे काही करणे काही वर्षांपूर्वी स्वप्नातही शक्य नव्हते ! किंबहुना, खाडी देश आणि चीनसकट सर्व राष्ट्रांनी ३७० आणि ३५अ रद्दबातल केल्याबद्दल भारताच्या विरुद्ध विधानही केलेले नाही. युके : युएनने स्थापन केलेल्या हेग मधील आंतरराष्ट्रिय न्यायालयात (International Court of Justice) काही महिन्यांपूर्वी दलविर भंडारी या भारतिय न्यायाधिशाची नोव्हेंबर २०१७ मध्ये पुनर्नेमणूक न करता, त्यांच्या जागी Christopher Greenwood या ब्रिटिश न्यायाधिशाची नेमणूक करावी, यासाठी ब्रिटनने जोराचे प्रयत्न केले होते. पूर्वी, ब्रिटनने प्रयत्न करणे सोडाच, पण त्याने जाहीर केलेल्या उमेदवाराविरुद्ध कोणी उभे राहणेही अशक्य गोष्ट होती. निवडणूकीचा आग्रह घरला तर भारताचा उमेदवार मोठ्या बहुमताने विजयी होईल अशी खात्री झाल्याने, युकेने त्यांच्या उमेदवाराचे नाव मागे घेतले. युएसए : अमेरिकन प्रेसिडेंट ट्रंपचा काश्मिर प्रकरणात हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न कसा उलटवला गेला, आणि त्याला भर पत्रकारपरिषदेत, "काश्मिर आमची द्विराष्ट्रिय समस्या आणि त्यासाठी आम्ही इतर कोणाला कष्ट देऊ इच्छित नाही (उर्फ, कीप युवर ब्लडी नोझ आउट ऑफ काश्मिर)" असे सांगितले. तरिही त्याच पत्रकारपरिषदेत ट्रंपचे विधान अश्या अर्थाचे होते, "मी मोदींचा चांगला मित्र आहे. त्यांनी काश्मिरमधील परिस्थिती ताब्यात आहे असे मला सांगितले आहे. भारत-पाकिस्तानने सहकार्याने त्यांच्या समस्या सोडवाव्या" ! वर दिलेल्या फक्त काही प्रातिनिधीक घटना आहेत. जालावर थोडेसे उत्खनन केले तर अशी अनेक उदाहरणे मिळतिल. अश्या घटनांतून जगभरचे देश बोध घेत असतात. जगातले आपले स्थान, पोकळ बोलबच्चनगिरी करून नाही तर, अश्या कृतींनी ठरते. अगदी बाळबोध शब्दांत सांगायचे झाले तर असे म्हणता येईल की... १. जेव्हा एखादा देश आपल्या तत्वांवर ठाम राहतो आणि आपल्या बळावर सबळ देशांना त्यांचे मत बदलायला भाग पाडतो, तेव्हा सहाजिकच इतर देश त्याच्याकडे आदराने पाहतात. २. इतरांच्या दबावाला घाबरून आपली साथ सोडणार नाही आणि सबळ असला तरी आपला विश्वासघात करणार नाही, अश्या देशाशी संबंध ठेवायला इतरांना सुर्क्षित वाटते. अनेक दशके भारताची, "ताकदवान पण अत्यंत घाबरट आणि केवळ नितीमत्तेच्या पोकळ गप्पा मारणारा देश" अशी भारताची परगेशातली प्रतिमा होती, ती गेल्या काही वर्षांत, "ताकदवान आणि आपल्या नितिमान तत्वांवर खंबीरपणे उभा राहणारा विश्वासू देश" अशी झाली आहे. हे मी माझ्या २१+ वर्षांच्या आणि २४ देशांतल्या स्वानुभवांवरून आणि जगभरच्या मित्रांच्या बोलण्यावरून खात्रीने सांगू शकतो. ३. त्याविरुद्ध, पाकिस्तानने स्वत:ची छबी इतकी बिघडवून घेतली आहे की इतर मुस्लिम देशांना तो "अतिरेकी, अविश्वासू, अत्यंत धोकादायक आणि सुधारण्यापलिकडे गेलेला धर्मबंधू" वाटत आहे. वेळ आली तर पाकिस्तान आपल्याला विकायला कमी करणार नाही पण भारत आपल्या हक्कांच्या बाजूने उभा राहील, अशी भावना खाडी देशांत निर्माण झाली आहे. ही वस्तूस्थिती पाहता त्या देशांनी भारताच्या बाजूला झुकणे सहाजिक आहे. आता थोडे खनिज तेलाबद्दल... खनिज तेल ही भारताची मोठी गरज असली आणि त्या व्यापारातला हिस्सा काबीज करण्यासाठी अनेक देशांची चढाओढ असली तरीही... १. खाडी देश जवळ असल्याने त्यांच्याकडून तेल विकत घेणेच भारताला सोईचे आणि कमी खर्चाचे आहे. २. भारतिय तेलशुद्धिकरण प्रणाली (रिफायनरी) मुख्यतः खाडी देशातून मिळणार्‍या तेलासाठी तयार केलेल्या आहेत. इतर ठिकाणचे वेगळे तेल घेतल्यास त्यांच्यामध्ये खार्चिक बदल करावे लागतिल. तेव्हा खाडी देशांकडून तेल विकत घेणेच भारताला सोईचे आणि कमी खर्चाचे आहे. तेव्हा, तेलाच्या बाबतीत भारताची खाडी देशांना जितकी गरज आहे तेवढीच भारताला त्यांची गरज आहे. आंतरराष्ट्रिय राजकारणातील मैत्रीसाठी कळीचा नियम : एखाद्या परिस्थितीत, (अ) ज्या देशाशी मैत्रीचे संबंध ठेवण्याने आपल्या देशाचे हितसंबंध राखले जातात, आणि/किंवा (आ) ज्या देशाशी मैत्रीचे संबंध न ठेवल्याने आपल्या देशाचे हितसंबंध धोक्यात येतात; तो प्रत्येक देश, त्या परिस्थितीत, आपला मित्र असतो... आपल्या देशाचे हितसंबंध सर्वतोपरी असतात, परिस्थिती बदलल्यास मित्र बदलू शकतात. पूर्णविराम.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भंकस बाबा

नोव्हेंबर २०१७

रुस्तम
Tue, 08/27/2019 - 21:50 नवीन
भारतिय न्यायाधिशाची नोव्हेंबर २०१७ मध्ये पुनर्नेमणूक
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

नक्की काय म्हणायचे आहे

डॉ सुहास म्हात्रे
Wed, 08/28/2019 - 01:10 नवीन
नक्की काय म्हणायचे आहे तुम्हाला ? जरा इस्काटून सांगतो... १. भारतिय न्यायाधिशाची... दलबिर भंडारी सन १९९१ पासून दिल्ली हाय कोर्टात न्यायाधिश होते, २००४ मध्ये ते बॉम्बे हाय कोर्टाचे सरन्यायाधिश झाले आणि २००५ मध्ये सर्वोच्च न्यायलायात न्यायाधिश झाले. हेगच्या इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिसमधील न्यायाधिश हे, त्यांच्या मायदेशाने सुचवलेले अधिकृत उमेदवार असतात. रिकाम्या जागांपेक्षा जास्त उमेदवार सुचवले गेल्यास, न्यायाधिशांची निवड युएनमधील सर्व देशांच्या मतदानाने होते. २. ...नोव्हेंबर २०१७ मध्ये पुनर्नेमणूक दलबिर भंडारी यांची इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिसमधील प्रथम नेमणूक २०१२ मध्ये झाली. त्यांचा पाच वर्षांचा कार्यकाल संपल्यानंतर, २०१७ मध्ये भारताने त्यांचे नाव परत सुचवले... अर्थातच, २०१७ मध्ये त्यांची पुनर्नेमणूक (पक्षी : परत एकदा नेमणूक) झाली..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रुस्तम

तुम्ही

रुस्तम
Wed, 08/28/2019 - 01:22 नवीन
तुम्ही वर चुकून २०१७ ऐवजी १९१७ लिहिलं आहे... 100 वर्षांचा फरक दुरुस्त करा. एवढंच..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

असे आहे होय ? अनेक धन्यवाद !

डॉ सुहास म्हात्रे
Wed, 08/28/2019 - 01:51 नवीन
असे आहे होय ? अनेक धन्यवाद ! आधीच असे स्पष्ट लिहिले असतेत तर माझा गोंधळ/गैरसमज झाला नसता. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रुस्तम

या पुढे

रुस्तम
Wed, 08/28/2019 - 18:31 नवीन
या पुढे काळजी घेइन... धन्यवाद एक्का काका...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

पण खाडी देशासाठी अशी कोणती

सुबोध खरे
Tue, 08/27/2019 - 11:23 नवीन
पण खाडी देशासाठी अशी कोणती कामगिरी त्यांनी केली आहे की ज्याबद्दल त्यांना त्या देशाचा सर्वोच्च पुरस्कार मिळावा? https://www.business-standard.com/article/economy-policy/aramco-adnoc-interested-in-india-s-rs-110-bn-strategic-oil-reserve-project-118101701126_1.html https://economictimes.indiatimes.com/industry/energy/oil-gas/abu-dhabi-oil-company-hires-indias-strategic-oil-storage/articleshow/66591096.cms https://www.business-standard.com/article/news-ians/india-bullish-on-strategic-oil-reserve-plan-119031500950_1.html खाडी देशांना आपले अतिरिक्त क्रूड ऑइल साठवण्यासाठी स्वतःच्या देशाबाहेर एखादी सुरक्षित जागा हवी होती. कारण देशांतर्गत उलथापालथ झाली/ राजगादी गेली किंवा युद्धमन स्थिती झाली तरी अशी ठेव ठेवणारा देश म्हणून भारत त्यांना सुरक्षित वाटतो त्यातून भारत रशिया अमेरिका चीन सारख्या दुसऱ्यांच्या उठाठेवी करीत नाही म्हणून भारताबरोबर मैत्री हवी असते.
  • Log in or register to post comments

तेलाचे साठे भविष्यात संपणार आहेत.

Rajesh188
Tue, 08/27/2019 - 15:15 नवीन
खनिज तेलाचे साठे भविष्यात संपणार आहेत . पृथ्वी वरील घडामोडी मुळे जे खनिज तेलाचे साठे भूगर्भात निर्माण झाले ती निर्मिती आता थांबली आहे . आखाती देशांमध्ये सुद्धा ह्याची जाणीव आहे आणि त्या नुसार ते पुढे काय करायचे ह्या वर नक्कीच नियोजन करत असतील . दुबई चे उदाहरण घेतले तर लक्षात येईल . दुबई आता तेला च्या उत्पादनावर अवलंबून नाही . आखाती deshani भारताला पाठिंबा देण्या मागे खूप कारण असू शकतात . धार्मिक कट्टरवादी देशात शिरजोर झाले तर कायदा आणि सुव्यवस्था बिघडू शकते आणि अर्थव्यवस्थेचा बोजवारा उडतो ते वेगळं . बाकी देश सुद्धा अशा देशांशी संबंध ठेवायला कचरतात .. त्या मुळेच आखाती देश पाकिस्तान च्या जास्त जवळ जावू इच्छित नाहीत . युरोपियन देशाशी मैत्री आणि भारता सारख्या देशाला न दुखावणे हेच त्यांच्या भवितव्याच्या दृष्टीने योग्य आहे
  • Log in or register to post comments

तुम्ही नक्की डु आयडी नाही ना?

आनन्दा
गुरुवार, 08/29/2019 - 11:00 नवीन
तुम्ही नक्की डु आयडी नाही ना? कधीकधी इतके सखोल बोलता की एखादी वर्षनुवर्षे अभ्यास करत असलेली अनुभवी व्यक्ती बोलते आहे असे वाटते आणि कधी असले बाळबोध प्रश्न विचारता की तुमचा संगणक / मोबाइल फोडुन टाकावासा वाटतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Rajesh188

एकदा तुम्ही डू आयडी, मल्टिपल

प्रकाश घाटपांडे
गुरुवार, 08/29/2019 - 11:26 नवीन
एकदा तुम्ही डू आयडी, मल्टिपल आयडी, बहुटोपणनावे अशा किंदम ऋषीप्रवृत्तीवर लिहा ना!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनन्दा

अभ्यास कमी पडतो. नाहीतर

आनन्दा
गुरुवार, 08/29/2019 - 15:37 नवीन
अभ्यास कमी पडतो. नाहीतर लिहिलेच असते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे

भारताच्या वतीने मोदींकडुनही

माहितगार
Tue, 08/27/2019 - 15:21 नवीन
भारताच्या वतीने मोदींकडुनही इतर राष्ट्र प्रमुखांना दिल्लीत बोलवून पुरस्कार द्यावयास हवेत. त्या त्या नेत्यांचे चहाते प्रसन्न झाले तर परस्पर संबध मजबुत होण्यास हातभार लागतो. मी पण माझ्या घरी कुणाला तरी बोलवून सत्कार करावयास हवा आहे. चला लागतो कामाला सत्काराच्या ( व्यक्ती पुजक नसल्याने असे काही लिहितो म्हणजे व्यक्ति द्वेष करतो असा नव्हे त्यामुळे ह. घ्या. हेवेसानल)
  • Log in or register to post comments

नेमका कशाने सत्कार करणार आहात

आनन्दा
गुरुवार, 08/29/2019 - 10:58 नवीन
नेमका कशाने सत्कार करणार आहात?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार

भारत सुद्धा असे पुरस्कार

सुबोध खरे
Tue, 08/27/2019 - 18:23 नवीन
भारत सुद्धा असे पुरस्कार विविध लोकांना देत असतो त्यावर खोचक टिप्पणी अनावश्यक आहे असे वाटते. एक उदा. https://www.financialexpress.com/india-news/padma-awards-for-16-under-nri-pio-oci-foreign-category/1030586/
  • Log in or register to post comments

श्री नेल्सन मंडेला आणि खान

सुबोध खरे
Tue, 08/27/2019 - 18:28 नवीन
श्री नेल्सन मंडेला आणि खान अब्दुल गफार खान याना भारतरत्न हा पुरस्कार दिल्याचे स्मरते. इस्माईल कमर गिली या जिबूती च्या राष्ट्राध्यक्षांना या वर्षीचा पदमविभूषण हा पुरस्कार दिला गेला आहे. He was awarded with the Padma Vibhushan, India's second highest civilian award on 25 January 2019 for his role in the safe evacuation of Indian citizens from Yemen.
  • Log in or register to post comments

यात नॉर्मन बोरलॉग, होसई

सुबोध खरे
Tue, 08/27/2019 - 18:34 नवीन
यात नॉर्मन बोरलॉग, होसई नोरोटा , जॉन गालब्रेथ, व्हॉल्टर सिसुलु , राजे जिग्मे वांगचुक इ महान लोकांना पण पदमविभूषण दिले गेलेले आहे
  • Log in or register to post comments

खोचक नव्हे शेवटी व्यवहार आहे

माहितगार
Tue, 08/27/2019 - 20:19 नवीन
इस्माईल कमर गिली या जिबूती च्या राष्ट्राध्यक्षांना या वर्षीचा पदमविभूषण हा पुरस्कार दिला गेला आहे.
असे म्हणजे पॉलीटीकली महत्वाचे पुरस्कार अधिक प्रमाणात म्हणजे भारताला डिफेन्स उत्पादने विकली जावीत किंवा इतर निर्यात वाढावी म्हणून किंवा भारतीयांना काम करण्यासाठी व्हिसा दिल्यासाठी म्हणून (खोचक नव्हे शेवटी व्यवहार आहे ) पुरस्कार दिले पहीजेत .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

किमानपक्षी...

डॉ सुहास म्हात्रे
Wed, 08/28/2019 - 01:26 नवीन
किमानपक्षी... (अ) राजकिय-आर्थिक-सामरिकरित्या महत्वाच्या समजल्या जाणार्‍या नेत्याला, व (आ) ज्यांच्याशी आपले संबंध घनिष्ठ व्हावे असे प्रकर्षाने वाटत असलेल्या नेत्याला हे पुरस्कार दिले जातात, (इ) आणि त्याचबरोबर, हे पुरस्कार सहज मजा म्हणून विनाकारण अजिबात कोणालाही दिले जात नाहीत, (पक्षी : ज्या नेत्याशी संबंध उघडपणे घट्ट करण्यात जागतिक आणि/किंवा द्विपक्षिय स्तरावर मोठा फायदा आहे आणि ते संबध उघड केल्याने दुसरा कोणी देश/नेता नाराज होणार असेल तरी त्याची फिकीर करण्याची गरज नाही, याची खात्री करूनच हे पुरस्कार दिले जातात) इतका साधा सोपा "लघुत्तम साधारण भाजक (lowest common denominator) अर्थ" ध्यानात आला तरी, या पुरस्कारांमुळे बनणारी आंतरराष्ट्रिय राजकारणातली समिकरणे उलगडायला मदत होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार

हिंदी चिनी भाई भाई होणार नाही याची दक्षता

माहितगार
Wed, 08/28/2019 - 08:12 नवीन
कौतुक आणि अभिमान (कि हुरळूनजाणे) हिंदी चिनी भाई भाई होणार नाही इतपतच करणे श्रेयस्कर असेल का? बेसिकली कौतुकाच्या भरात बेसावध होणार नाही या बद्दलचि दक्षता सदैव असावी असे माझे व्यक्तिगत मत. दुसरे अजुन असे की व्यक्तीगत पातळीवरील मैत्री प्रदर्शन आणि गळाभेटीनेही बर्‍याच मंडळींना लगेच हुरळून जायला होते आहे असे दिसते, पण आंतरराष्ट्रीय राजकारणात सगळेच दिसते तसे असतेच असे नाही हे चिमुटभर मीठासोबत घेण्याची तयारी असलेले बरे असू शकेल का ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

बापरे, किती ती काकदृष्टी ???!

डॉ सुहास म्हात्रे
Wed, 08/28/2019 - 10:01 नवीन
बापरे, किती ती काकदृष्टी ???! जणू, सगळ्याच सरकारांमधले सगळे अगदीच बुद्धीहीन/भ्रष्ट असतात ! गेल्या काही दशकांच्या अनुभवांवरून तसे वाटत असेल तर ते समजू शकतो... पण, तशी टीप्पणी आताच्या घडीला करण्याअगोदर सद्य स्थितीतील बदललेली समिकरणे ध्यानात घेतली असतीत तर, वेगळा मजकूर लिहिला असतात, आणि मग त्याला वजनही प्राप्त झाले असते. वडाची साल जबरदस्तीने पिंपळाला लावण्यार्‍या लेखकाच्या विश्वासार्हतेवर प्रश्न निर्माण होतात, इतकेच नोंदवू इच्छितो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार

तुर्तास केवळ रुमाल

माहितगार
Wed, 08/28/2019 - 15:57 नवीन
:) अस्मादिकास लगेच खीस पाडण्याची घाई असण्याचे कारण नाही. तुर्तास केवळ रुमाल टाकून ठेवतो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

हि जगाची रीत आहे

जालिम लोशन
Tue, 08/27/2019 - 22:00 नवीन
हेवेसानलगे.
  • Log in or register to post comments

मोदींना पुरस्कार मिळालाय याचं

राघव
Wed, 08/28/2019 - 00:15 नवीन
मोदींना पुरस्कार मिळालाय याचं कौतुक आहेच. पण त्याचा अर्थ लावण्याचा प्रयत्न केल्यास बरंच काही समजून येतं. जसं - - इराण बरोबर चा तेलाचा सौदा अमेरिकेच्या दबावामुळे बंद झालाय. त्यामुळे तेलाची आवक बाकी देशांकडून वाढवावी लागणार. इराण भारता च्या मुख्य पुरवठादारांपैकी एक होता हे विशेष. - इराण आणि सौदी यांच्यात विस्तव जात नाही. इराणचे भारतातले मोठे मार्केट साधायची ही चांगली संधी आहे. किंबहुना या साठीच इराणचा सौदा बंद करण्यासाठी अमेरिकेकडून दबाव बनवल्या गेला असल्यास नवल नाही. - सौदी भारतात तेलाचे reservoirs बनवण्यासाठी खूप मोठी गुंतवणूक करणार होते असं ऐकून होतो. तो भाग आता प्रत्यक्षात येऊ शकतो. - भारताला जर कमी किंमतीत तेल उपलब्ध होणार असेल तर भारत नाही कशाला म्हणणार? -पाकिस्तानला भीक देण्यापेक्षा भारतात गुंतवणूक कधीही फायद्याची. त्यात पाकिस्तानला मदत म्हणजे पर्यायाने चीनला मदत असे असेल तर ते अमेरिकेच्या हितसंबंधांना बाधा पोहोचवते. सौदी बाकी काहीही करेल पण अमेरिकेच्या विरोधात फार काही करेल असे वाटत नाही. - सौदी ला जवळ केल्याने पाकिस्तान ला मुस्लिम राष्ट्रांकडून मिळणारा फायदा चांगलाच कमी होईल, कारण हितसंबंधांचे सुकाणू भारताच्या दिशेनं फिरलंय. पाकिस्तानवर आणि पर्यायाने चीनवर सुद्धा यामुळे दबाव वाढवता येतो. . . . असो. भरपूर आहे लिहिण्यासारखं.
  • Log in or register to post comments

...कारण हितसंबंधांचे सुकाणू

माहितगार
Wed, 08/28/2019 - 16:02 नवीन
...कारण हितसंबंधांचे सुकाणू भारताच्या दिशेनं फिरलंय….
धीर धरलेला बरा - माझे मत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राघव

धीर धरलेला बरा + @ मिपा मालक मालक तांत्रिक समस्या

माहितगार
Wed, 08/28/2019 - 16:06 नवीन
...कारण हितसंबंधांचे सुकाणू …. धीर धरलेला बरा - माझे मत *** @ मिपा मालक वरचा प्रतिसाद प्रतिसादातील उर्वरीत वाक्य गिळून का प्रकाशित झाला ते उमगले नाही काही तांत्रिक समस्या असावी असे दिसते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राघव

आता या सर्व पुरस्कारांमागचा

उपेक्षित
Wed, 08/28/2019 - 20:21 नवीन
आता या सर्व पुरस्कारांमागचा मला उलगडलेला स्पष्ट अर्थ सांगतो, मोदी आणि शहा हि जोडगोळी स्वकेंद्रित आणि स्वप्रेमी आहे त्यामुळे यांना खुश करायचा हा एक सोप्पा मार्ग आहे. त्यामुळे बहुतेक आखाती देशांनी हा सोप्पा मार्ग अवलंबलेला आहे. असो उगाच नसलेले अर्थ शोधात बसत काही काही भक्त मेगाबायटी प्रतिसाद रचत आहेत ते पाहून गम्मत वाटत आहे. अजून एक गोष्ट हे भक्त लोक गेले कित्येक दिवस अर्थव्यवस्थेचा जो बोजवारा उडालाय / देशात असलेले मंदीचे वातावरण यावर सोयीस्कर मौन अल्गुन असतात त्यामुळे हल्ली मिपाववर पूर्वीचे क्लिंटन सारखे निष्पक्ष विवेचन वाचायला मिळताच नाही. हल्ली कस कारण जोहरच्या पिक्चर प्रमाणे देशात सगळ गुडी गुडी चालू आहे असे इथले काही ID अजेंडा असल्यासारखे दर्शवित आहेत.
  • Log in or register to post comments

शाळेत गेले की चांगल्या गोष्टींचे आकलन होते.

जालिम लोशन
Wed, 08/28/2019 - 21:15 नवीन
नाही तर, ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उपेक्षित

Praise Singer

मारवा
Wed, 08/28/2019 - 22:32 नवीन
शब्दकोशात दिलेला या शब्दाचा अर्थ खालील प्रमाणे आहे. Praise Singer = ​(in traditional African society) a person who writes and performs music and poetry in order to praise a chief or other important person Traditionally, a praise singer accompanies the chief on important occasions. या व्याख्येला शब्दशः जागणार्‍या लीव्हींग लीजंड साउथ अफ्रिकेच्या Jessica Mbangeni या स्तुती गायिकेने मोदीजींच जे अभुतपुर्व / दमदार / जोशपुर्ण / जल्लोषपुर्ण /आक्रमक / भावनिक/ उत्कट / चिवट/ स्वागत केलं होतं त्यामुळे मी त्यांचा कायमचा फॅन झालो. हे त्यांच स्वागत स्तुती अनुभवुन क्षणभर मोदीजी स्वतःही स्तिमित झाले होते किंचीत गांगरले की काय अशी शंका देखील उगीचच मनाला चाटुन जाते. आजही तो स्वागताचा व्हिडियो पाहीला की अंगावर रोमांच येतात. वाटतं की बस बस भिरकावुन द्याव सर्व काही हॅट्स ऑफ टु जेसीका !!! फ्रॉम द बॉटम ऑफ माय हार्ट हा घ्या व्हिडीयो https://www.youtube.com/watch?v=GN6d5dg7Ubo
  • Log in or register to post comments

हल्ली तुमचा आवडता नेता

डॉ सुहास म्हात्रे
Wed, 08/28/2019 - 23:04 नवीन
हल्ली तुमचा आवडता नेता त्याच्याच पाठिराख्यांची सतत गोची करत असल्याने, तुमची सततची जळजळ आणि ओढून ताणून केलेला उपरोध, दोन्हीही अगदीच समजून घेण्याजोगे आहेत. आताही त्याने केलेल्या फियास्कोचे डॅमेज कंट्रोल चालू आहेच. त्यानेही एकदा तरी, काहीतरी उत्तम करावे आणि त्याच्यावरही एखादा तरी लेख लिहावा, ही आमची इच्छा पुरी करावी, असे खुद्द त्यालाच वाटत नाही, त्याला आम्ही काय करणार बरे ? त्यामुळे सद्यातरी, आमच्या सद्भावना आणि शुभेच्छा व्यक्त करणेच केवळ आमच्या हाती आहे ! एकंदरीत, आतापर्यंत तुम्ही काही मुद्देसूद वाद-प्रतिवाद लिहिलेला नसला तरी, मिपाकरांचे मनोरंजन मात्र उत्तम चालवले आहे. हाती बरे मुद्दे नसले की असे काहीबाही सुचते. पण, मिपाकरांच्या चेहर्‍यावर हलकेफुलके स्मितहास्य उमलवणे हे सुद्धा उत्तम काम आहे. त्यासाठी धन्यवाद ! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मारवा

डॉक्टर साहेब,

सुबोध खरे
गुरुवार, 08/29/2019 - 09:40 नवीन
डॉक्टर साहेब, कुठे प्रत्येक मुद्द्याचा प्रतिवाद करायला लागलाय? मोदी आवडत नाही पण त्यांना पर्याय शोधायला गेले तर पहिले पर्याय श्री राहुल गांधी ते सतत सेल्फ गोल मारत असल्याने त्यांना स्ट्रायकर म्हणून घेणे अशक्य झाले आहे. दुसरा पर्याय श्री केजरीवाल. हे सध्या १००० रुपयाच्या नोटे सारखे चलनातून बाद झालेले आहेत. तिसरे राहिले ते महाठगबंधन त्यात एक ना धड भाराभर चिंध्या. यामुळे विरोधकांची स्थिती ( यात मिपाधुरीण हि येतात)हि सध्या च्या आय एल एफ एस मध्ये मोठ्याप्रमाणावर पैसे गुंतवलेल्या गुंतवणूकदारांसारखी झाली आहे. दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर पोचलेल्या पक्षांची तळी उचलायची तर जनात हसं होईल हि भीती. आणि आता टोपी फिरवून मोदींची स्तुती केली तरी तीच स्थिती. मग काहीही करून श्री मोदी कसे चूक आणि आम्ही कसे पुरोगामी तटस्थ आणि प्रगतिशील हे दाखवायचा आटा पिटा चालू आहे. बहुसंख्य पुरोगामी डावे तटस्थ घेत असलेले मुद्दे च्युईंग गम सारखे निघतात. निश्चलनीकरण झालं,रफाल झालं, इ व्ही एम झालं, जि एस टी वर तोंडघशी पडून झालं. सध्याचा त्यांचा रवंथ करायचा मुद्दा रिझर्व्ह बँकेकडून मोदी सरकार घेत असलेले पैसे आहेत. ते चावून चोथा झाला कि नवीन काहीतरी घेणार. कितीही चावलं तरी पोट भरत नाही/ पोटात काहीच जात नाही आणि काही वेळाने तोंडात स्वादही राहत नाही. मग नवीन च्यूईंग गम चालू द्या त्यांचं.
  • Log in or register to post comments

अभिनंदन.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गुरुवार, 08/29/2019 - 10:29 नवीन
कसं जुगाड जमवतो हा माणूस खूप आश्चर्य वाटतं. अभिनंदन. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

आश्चर्य काही नाही बिरुटे सर

उपेक्षित
गुरुवार, 08/29/2019 - 13:14 नवीन
आश्चर्य काही नाही बिरुटे सर कारण इथल्याप्रमाणेच बाहेरही त्यांचे भक्तगण आहे म्हटल ;) मी तर ऐकलय इथले काही भक्तगण आता आरती पण रचणार आहेत आपल्या सर्वगुण संपन्न मोदींवर. :P
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

खरं आहे बुवा. आम्ही आरत्या

आनन्दा
गुरुवार, 08/29/2019 - 15:40 नवीन
खरं आहे बुवा. आम्ही आरत्या रचायला पण कमी करत नाही. ममो एक मध्ये जेव्हा अर्थव्यवस्थेने उच्चांकी दर गाठला तेव्हा आम्ही ममोंची आणि रेल्वे फायद्यात आली तेव्हा आम्ही लालूंची आरती रचायला पण कमी केले नव्हते, पण काळाच्या ओघात त्या दोन्ही फसव्या क्लृप्त्या असल्याचे लक्ष्यात आले आणि आम्ही नवीन देव शोधला. सध्या तरी आमचा देव आम्हाला हवा तसा प्रसाद देतोय. प्रसाद यायचा थांबला तर मग बघु.. सध्या कौतुक करण्यात काटकसर कशाला?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उपेक्षित

जिथे चमत्कार तिथे नमस्कार!

जालिम लोशन
गुरुवार, 08/29/2019 - 15:48 नवीन
येवढे साधे कळत नाही? बहुतेक डोळ्यावरची पट्टी काढावी लागेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उपेक्षित

खरं आहे. उगाच परदेशात जाऊन

डॉ सुहास म्हात्रे
गुरुवार, 08/29/2019 - 15:54 नवीन
खरं आहे. उगाच परदेशात जाऊन त्यांना पुरस्कार देण्यासाठी तयार करण्यापेक्षा आजून भारी पण सोपी आयडीया या भाजपेयी लोकांना का बरे सुचत नाही... परक्यांनी आपल्याला पुरस्कार वैग्रे देण्याची गरजच काय. आणि आयडियाची कल्पना पण सुचण्याची गरजच काय... त्या आयडियाची शेकड्यांनी उदाहरणे देशभर विखुरलेली आहेत. तो उच्छाद पाहिला तर, खुद्द अंधभक्तांनाच प्रचंड घेरी येईल. ;) काही निवडक उदाहरणे खाली पहा... संवैधानिक सूचना : खालील मजकूर वाचताना कुठल्यातरी मजबूत वस्तूला घट्ट पकडून बसा. वाचताना घेरी येऊन पडून काही इजा झाल्यास आम्ही जबाबदार नाही.

List of things named after Jawaharlal Nehru

From Wikipedia, the free encyclopedia This is a list of things named after Jawaharlal Nehru, the first Prime Minister of India. A Right to Information query raised in 2013 was answered saying that over 450 schemes, building, projects, institutions, etc. were named after the three family members (Jawaharlal Nehru, Indira Gandhi and Rajiv Gandhi) of Nehru–Gandhi family.[1] Awards • Jawaharlal Nehru Award • Jawaharlal Nehru Fellowship Educational institutions • Jawahar Bal Bhavan Thrissur, Kerala • Jawahar Bharati College, Kavali, Andhra Pradesh • Jawaharlal Nehru Engineering College, Aurangabad, Maharashtra • Jawaharlal Nehru Government Engineering College, Sunder Nagar, Himachal Pradesh • Jawaharlal Nehru Krishi Vishwa Vidyalaya, Jabalpur, Madhya Pradesh • Jawaharlal Nehru Medical College, Ajmer • Jawaharlal Nehru Medical College, Aligarh • Jawaharlal Nehru Medical College, Belgaum • Jawaharlal Nehru Medical College, Bhagalpur • Jawaharlal Nehru National College of Engineering, Shimoga, Karnataka • Jawaharlal Nehru Rajkeeya Mahavidyalaya, Port Blair • Jawaharlal Nehru Technological University, Anantapur, Andhra Pradesh • Jawaharlal Nehru Technological University, Hyderabad, Telangana • Jawaharlal Nehru Technological University, Kakinada, Andhra Pradesh • Jawaharlal Nehru University, New Delhi • Nehru Arts, Science and Commerce College, Hubli, Karnataka • Nehru Memorial College, Puthanampatti, Tiruchirappalli, Tamil Nadu • Nehru Memorial College, Sullia, Karnataka • Pt. Jawahar Lal Nehru Memorial Medical College, Raipur, Chhattisgarh • Pt. Jawaharlal Nehru Institute of Business Management, Ujjain, Madhya Pradesh • Shri Nehru Maha Vidyalaya College of Arts & Sciences, Coimbatore, Tamil Nadu Jawahar Navodaya Vidyalayas • Jawahar Navodaya Vidyalaya, Ahmednagar • Jawahar Navodaya Vidyalaya, Alappuzha • Jawahar Navodaya Vidyalaya, Alipurduar • Jawahar Navodaya Vidyalaya, Amroha • Jawahar Navodaya Vidyalaya, Ashok Nagar • Jawahar Navodaya Vidyalaya, Bagudi • Jawahar Navodaya Vidyalaya Bahraich • Jawahar Navodaya Vidyalaya, Ballia • Jawahar Navodaya Vidyalaya, Bankura • Jawahar Navodaya Vidyalaya, Barabanki • Jawahar Navodaya Vidyalaya, Basdei • Jawahar Navodaya Vidyalaya, Belpada • Jawahar Navodaya Vidyalaya, Bhogaon • Jawahar Navodaya Vidyalaya, Bilaspur • Jawahar Navodaya Vidyalaya, Birbhum • Jawahar Navodaya Vidyalaya, Bohani • Jawahar Navodaya Vidyalaya Canacona • Jawahar Navodaya Vidyalaya, Car Nicobar • Jawahar Navodaya Vidyalaya, Churu • Jawahar Navodaya Vidyalaya, Chamba • Jawahar Navodaya Vidyalaya, Chamoli • Jawahar Navodaya Vidyalaya, Champhai • Jawahar Navodaya Vidyalaya, Chandigarh • Jawahar Navodaya Vidyalaya, Chendayadu • Jawahar Navodaya Vidyalaya, Cooch Behar • Jawahar Navodaya Vidyalaya, Daman • Jawahar Navodaya Vidyalaya, Dakshin Dinajpur • Jawahar Navodaya Vidyalaya, Dhalai Tripura • Jawahar Navodaya Vidyalaya, Deoghar • Jawahar Navodaya Vidyalaya, Diu • Jawahar Navodaya Vidyalaya, Doda • Jawahar Navodaya Vidyalaya, Durgapur • Jawahar Navodaya Vidyalaya, East Sikkim • Jawahar Navodaya Vidyalaya, Ernakulam • Jawahar Navodaya Vidyalaya, Gajanur • Jawahar Navodaya Vidyalaya, Golaghat • Jawahar Navodaya Vidyalaya, Gomati • Jawahar Navodaya Vidyalaya, Hamirpur • Jawahar Navodaya Vidyalaya, Hooghly • Jawahar Navodaya Vidyalaya, Idukki • Jawahar Navodaya Vidyalaya, Indore • Jawahar Navodaya Vidyalaya, Jaffarpur Kalan • Jawahar Navodaya Vidyalaya, Jaswantpura • Jawahar Navodaya Vidyalaya, Jojawar • Jawahar Navodaya Vidyalaya, Jorhat • Jawahar Navodaya Vidyalaya Kanpur • Jawahar Navodaya Vidyalaya Kanpur Dehat • Jawahar Navodaya Vidyalaya, Karaikal • Jawahar Navodaya Vidyalaya, Karauli • Jawahar Navodaya Vidyalaya, Kangra • Jawahar Navodaya Vidyalaya, Kasaragod • Jawahar Navodaya Vidyalaya, Khowai • Jawahar Navodaya Vidyalaya, Khurai • Jawahar Navodaya Vidyalaya, Kinnaur • Jawahar Navodaya Vidyalaya, Kodagu • Jawahar Navodaya Vidyalaya, Kollam • Jawahar Navodaya Vidyalaya, Korba • Jawahar Navodaya Vidyalaya, Korlahalli • Jawahar Navodaya Vidyalaya, Kothali • Jawahar Navodaya Vidyalaya, Kothipura Bilaspur • Jawahar Navodaya Vidyalaya, Kottayam • Jawahar Navodaya Vidyalaya, Kozhikode • Jawahar Navodaya Vidyalaya, Kullu • Jawahar Navodaya Vidyalaya, Lahaul and Spiti • Jawahar Navodaya Vidyalaya, Madhubani • Jawahar Navodaya Vidyalaya, Mahe • Jawahar Navodaya Vidyalaya, Malappuram • Jawahar Navodaya Vidyalaya, Mandaphia • Jawahar Navodaya Vidyalaya, Mandi • Jawahar Navodaya Vidyalaya, Mandya • Jawahar Navodaya Vidyalaya, Megdong • Jawahar Navodaya Vidyalaya, Middle Andaman • Jawahar Navodaya Vidyalaya, Minicoy • Jawahar Navodaya Vidyalaya, Mirzapur • Jawahar Navodaya Vidyalaya, Mokokchung • Jawahar Navodaya Vidyalaya, Mothuka, Faridabad • Jawahar Navodaya Vidyalaya, Mundali • Jawahar Navodaya Vidyalaya, Mungeshpur • Jawahar Navodaya Vidyalaya, Narla • Jawahar Navodaya Vidyalaya Nizamasagar • Jawahar Navodaya Vidyalaya, North 24 Parganas • Jawahar Navodaya Vidyalaya, North Goa • Jawahar Navodaya Vidyalaya, North Sikkim • Jawahar Navodaya Vidyalaya, North Tripura • Jawahar Navodaya Vidyalaya, Pailapool • Jawahar Navodaya Vidyalaya, Palakkad • Jawahar Navodaya Vidyalaya, Paota, Jaipur • Jawahar Navodaya Vidyalaya, Panchavati • Jawahar Navodaya Vidyalaya, Patan • Jawahar Navodaya Vidyalaya, Patiala • Jawahar Navodaya Vidyalaya, Pathanamthitta • Jawahar Navodaya Vidyalaya, Peddapuram • Jawahar Navodaya Vidyalaya, Pfukhro Mao • Jawahar Navodaya Vidyalaya, Porbandar • Jawahar Navodaya Vidyalaya, Prakasam • Jawahar Navodaya Vidyalaya, Puducherry • Jawahar Navodaya Vidyalaya, Raichur • Jawahar Navodaya Vidyalaya, Rampura • Jawahar Navodaya Vidyalaya, Rayagada • Jawahar Navodaya Vidyalaya, Sahibganj • Jawahar Navodaya Vidyalaya, Shyampur • Jawahar Navodaya Vidyalaya, Silvassa • Jawahar Navodaya Vidyalaya, Sirmaur • Jawahar Navodaya Vidyalaya, Sitapur • Jawahar Navodaya Vidyalaya, Solan • Jawahar Navodaya Vidyalaya, South 24 Parganas • Jawahar Navodaya Vidyalaya, South Andaman • Jawahar Navodaya Vidyalaya, South Garo Hills • Jawahar Navodaya Vidyalaya, South Sikkim • Jawahar Navodaya Vidyalaya, Theog • Jawahar Navodaya Vidyalaya, Thiruvananthapuram • Jawahar Navodaya Vidyalaya, Thrissur • Jawahar Navodaya Vidyalaya, Una • Jawahar Navodaya Vidyalaya, Uttar Dinajpur • Jawahar Navodaya Vidyalaya, Valasapalle • Jawahar Navodaya Vidyalaya, Veleru • Jawahar Navodaya Vidyalaya, Wayanad • Jawahar Navodaya Vidyalaya, West Champaran • Jawahar Navodaya Vidyalaya, West Sikkim • Jawahar Navodaya Vidyalaya, Yanam Museums • Jawaharlal Nehru Museum, Itanagar • Nehru Memorial Museum & Library • Nehru Museum of Science and Technology Ports • Jawaharlal Nehru Port Parks and gardens • Jawaharlal Nehru Memorial Botanical Garden • Jawaharlal Nehru Tropical Botanic Garden and Research Institute • Nehru Park, Burnpur • Nehru Park, Delhi • Nehru Park, Thrissur • Nehru Zoological Park Schemes • Jawaharlal Nehru National Urban Renewal Mission Sports • Nehru Cup (cricket) • Nehru Cup (football) • Nehru Trophy Boat Race Stadiums • Jawaharlal Nehru Stadium (Chennai) • Jawaharlal Nehru Stadium (Coimbatore) • Jawaharlal Nehru Stadium (Delhi) • Jawaharlal Nehru Stadium (Kochi) • Jawaharlal Nehru Stadium (Shillong) • Jawaharlal Nehru Stadium, Ghaziabad • Jawaharlal Nehru Stadium, Tiruchirappalli • Nehru Smarak Stadium • Nehru Stadium, Durgapur • Nehru Stadium, Guwahati • Nehru Stadium, Hubli • Nehru Stadium, Indore • Nehru Stadium, Kottayam • Nehru Stadium, Pune • Nehru Stadium, Shimoga • Nehru Stadium, Tumkur Others • Jawahar Chowk • Jawahar Circle • Jawahar Dweep • Jawahar Kala Kendra • Jawahar LPS kurakkodu • Jawahar Planetarium • Jawahar Sagar Dam • Jawahar Setu • Jawahar Tunnel • Jawaharlal Nehru Road, Kolkata (Chowringhee Road) • Jawaharnagar (Gujarat Refinery) • Nehru Brigade • Nehru jacket • Nehru Foundation for Development • Nehru Nagar • Nehru Place • Nehru Planetarium • Nehru Science Centre • Nehru Setu • Pandit Nehru bus station

List of things named after Indira Gandhi

From Wikipedia, the free encyclopedia The following things have been named after Indira Gandhi, who was Prime Minister of India from 1966–1977 and from 1980 until her assassination in 1984. A Right to Information query raised in 2013 was answered saying that over 450 schemes, building, projects, institutions, etc. were named after the three family members (Jawaharlal Nehru, Indira Gandhi and Rajiv Gandhi) of Nehru–Gandhi family.[1] Awards, prizes, and competitions Indira Gandhi Award for Best Debut Film of a Director Indira Gandhi Award for National Integration Indira Gandhi Boat Race Indira Gandhi Paryavaran Puraskar[citation needed] Indira Gandhi Prize Event venues Indira Gandhi Arena Indira Gandhi Athletic Stadium Indira Gandhi National Centre for the Arts Indira Gandhi Stadium, Alwar Indira Gandhi Stadium, Solapur Indira Gandhi Stadium (Una) Indira Gandhi Stadium, Vijayawada Indira Priyadarshini Stadium Hospitals Indira Gandhi Childrens Hospital Indira Gandhi Co-operative Hospital Indira Gandhi Institute of Medical Sciences Indira Gandhi Medical College Indira Gandhi Memorial Hospital North Eastern Indira Gandhi Regional Institute of Health and Medical Sciences Government programmes Indira Gandhi National Old Age Pension Scheme Indira Canteens Museums and parks Indira Gandhi Planetarium Indira Gandhi Rashtriya Manav Sangrahalaya Indira Gandhi Wildlife Sanctuary Indira Gandhi Wildlife Sanctuary and National Park Indira Gandhi Zoological Park Transport infrastructure Indira Gandhi Canal Indira Gandhi International Airport Universities, colleges, and research institutes Indira Gandhi Agricultural University Indira Gandhi Centre for Atomic Research Indira Gandhi Institute of Developmental Research Indira Gandhi Institute of Medical Sciences Indira Gandhi Institute of Technology (Delhi) Indira Gandhi Institute of Technology (Orissa) Indira Gandhi Medical College Indira Gandhi National Forest Academy Indira Gandhi National Open University Indira Gandhi Rashtriya Akademi Indira Gandhi Institute of Physical Education and Sports Sciences (University Of Delhi)[2] North Eastern Indira Gandhi Regional Institute of Health and Medical Sciences Gandhi Memorial International School

List of things named after Rajiv Gandhi

From Wikipedia, the free encyclopedia The following things have been named after Rajiv Gandhi, who was the Prime Minister of India from 1984 to 1989. A Right to Information query raised in 2013 was answered saying that over 450 schemes, building, projects, institutions, etc. were named after the three family members (Jawaharlal Nehru, Indira Gandhi and Rajiv Gandhi) of the Nehru–Gandhi family.[1] Airports • Rajiv Gandhi International Airport at Hyderabad, Telangana.[2] Awards • Rajiv Gandhi National Quality Award • Rajiv Gandhi National Sadbhavana Award Educational Institutions • Assam Rajiv Gandhi University of Cooperative Management, Sivsagar, Assam • Govind Guru Tribal University, (formerly Rajiv Gandhi Tribal University), Banswara, Rajasthan • Indian Institute of Management Shillong, (formerly Rajiv Gandhi Indian Institute of Management) Shillong, Meghalaya • Rajeev Gandhi Memorial Boarding School, Sheopur, Madhya Pradesh • Rajiv Gandhi Academy for Aviation Technology, Trivandrum, Kerala[3] • Rajiv Gandhi Centre for Biotechnology, Thiruvananthapuram, Kerala. • Rajiv Gandhi College of Engineering, Sriperumbudur, Tamil Nadu • Rajiv Gandhi College of Engineering and Technology, Puducherry • Rajiv Gandhi College of Engineering, Research and Technology, Chandrapur, Maharashtra • Rajiv Gandhi College of Veterinary and Animal Sciences, Puducherry • Rajiv Gandhi Degree College, Rajahmundry, Andhra Pradesh • Rajiv Gandhi Education City, Sonipat, Haryana • Rajiv Gandhi Foundation, Delhi • Rajiv Gandhi Government Engineering College Kangra, Himachal Pradesh • Rajiv Gandhi Government Polytechnic, Itanagar, Arunachal Pradesh • Rajiv Gandhi Institute of Medical Sciences, Adilabad, Telengana • Rajiv Gandhi Institute of Medical Sciences, Ongole, Andhra Pradesh • Rajiv Gandhi Institute of Medical Sciences, Srikakulam, Andhra Pradesh • Rajiv Gandhi Institute of Petroleum Technology, Rae Bareli, Uttar Pradesh.[4] • Rajiv Gandhi Institute of Pharmacy, Trikaripur, Kerala • Rajiv Gandhi Institute of Technology, Kottayam, Kerala[5] • Rajiv Gandhi Institute of Technology, Mumbai, Maharashtra • Rajiv Gandhi Medical College, Kalwa, Maharashtra • Rajiv Gandhi National Aviation University, Amethi, Uttar Pradesh • Rajiv Gandhi National Cyber Law Center, Delhi • Rajiv Gandhi National University of Law, Patiala, Punjab[6] • Rajiv Gandhi Polytechnic, Kavalkhed, Udgir, Maharashtra • Rajiv Gandhi Proudyogiki Vishwavidyalaya, Bhopal, Madhya Pradesh • Rajiv Gandhi School of Intellectual Property Law, Kharagpur • Rajiv Gandhi Technical University, at Bhopal, Madhya Pradesh.[7] • Rajiv Gandhi University, Doimukh, Arunachal Pradesh.[8] • Rajiv Gandhi University of Health Sciences, Bangalore, Karnataka. • Rajiv Gandhi University of Knowledge Technologies, Basar, Telangana • Rajiv Gandhi University of Knowledge Technologies, Nuzvid, Andhra Pradesh Hospitals • Rajiv Gandhi Cancer Institute and Research Centre, Delhi • Rajiv Gandhi Government General Hospital, at Chennai, Tamil Nadu.[9][10][11] • Rajiv Gandhi Government Women And Children's Hospital, Pondicherry • Rajiv Gandhi Chest Hospital, Bengaluru Museums and parks • Nagarhole National Park (Rajiv Gandhi National Park), Kodagu and Mysore districts, Karnataka • Rajiv Gandhi Garden, Udaipur, Rajasthan • Rajiv Gandhi Regional Museum of Natural History, Sawai Madhopur, Rajasthan • Rajiv Smruthi Bhavan, Visakhapatnam Schemes • Rajiv Gandhi Equity Savings Scheme • Rajiv Gandhi Jeevandayee Arogya Yojana • Rajiv Gandhi Mahila Vikas Pariyojana • Rajiv Yuva Kiranalu • Rajiv Gandhi Panchayat Sashaktikaran Abhiyan • Rajiv Gandhi Grameen Vidyutikaran Yojana Sports • Rajiv Gandhi Khel Ratna Stadiums • Rajiv Gandhi Government Polytechnic, Kochi, Kerala • Rajiv Gandhi International Cricket Stadium, Dehradun, Uttarakhand. • Rajiv Gandhi International Cricket Stadium, Hyderabad, Telangana.[12] • Rajiv Gandhi Sports Complex, Rohtak, Haryana • Rajiv Gandhi Stadium, Aizawl, Mizoram.[13] Others • Rajiv Chowk metro station, Delhi • Rajiv Gandhi Charitable Trust, Delhi • Rajiv Gandhi Container Terminal, at Kochi, Kerala.[14] • Rajiv Gandhi Bhawan, Delhi • Rajiv Gandhi Combined Cycle Power Project, at Alappuzha district, Kerala.[15] • Rajiv Gandhi Container Terminal, at Kochi, Kerala.[16] • Rajiv Gandhi Infotech Park, Pune, Maharashtra • Rajiv Gandhi National Institute of Youth Development, Delhi • Rajiv Gandhi Memorial, Sriperumbudur, Tamil Nadu • Rajiv Gandhi Salai, Chennai • Rajiv Gandhi Setu, Mumbai • Rajiv Gandhi Thermal Power Station (कोण म्हणतोय रे ही मंदभक्तांनी केलेली चाटूगिरी म्हणून ? पण, आमी अजाबात नाय म्हन्नार तसं बरंका.) यात अजून काही नावे अनावधाने राहिली असतीलच, यात शंका नाही. अंधभक्तांनी भर घालून यादी पूर्ण करावी. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उपेक्षित

अरोरो

भंकस बाबा
गुरुवार, 08/29/2019 - 17:55 नवीन
डायरेक्ट कासोटयाला हात घातलात तुम्ही सुहासजी! निषेध, निषेध, त्रिवार निषेध सुहासजी तुमच्या अशा वागण्याचे! अशाने तुम्ही विरोधक ही जमात नष्ट करत आहात! किती आठवतात ते मोगा खान , तर्राट जोकर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

पण तरी

mayu4u
Fri, 08/30/2019 - 10:34 नवीन
राजमाता, युवराज, राजकन्या आणि जिज्जाजी यान्च्या नावानं काही नाहीये ना? मग? किती मोठा त्याग केलाय!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

त्यांनीही जमीनी व रियल इस्टेट

डॉ सुहास म्हात्रे
Fri, 08/30/2019 - 15:46 नवीन
त्यांनीही जमीनी व रियल इस्टेट प्रॉपर्टी (संदर्भ : नॅशनल हेरॉल्ड, फार्म हाऊस, जमिनीचे व्यवहार, इ) आपल्या नावावर करण्याचे प्रयत्न केलेले आहेत व त्याबद्दल कायदेशीर कारवाया चालू आहेत. तेव्हा, खात्रीशीर यादी, कोर्टाच्या निर्णयानंतरच मिळेल. तोपर्यंत, कोर्टाने त्यांना 'बेल'गाडी दिली आहे. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: mayu4u

अरे हो, दोन फार महत्वाची,

डॉ सुहास म्हात्रे
Fri, 08/30/2019 - 22:07 नवीन
अरे हो, दोन फार महत्वाची, किंबहुना भारताची सर्वोच्च मुलकी पारितोषिके, या याद्यांत अंतर्भूत करायची राहिलीच, क्षमस्व ! ती अशी आहेत... महत्वाची माहिती : भारत रत्न हे पारितोषिक पंतप्रधानांच्या शिफारसीवरून राष्ट्रपतीं प्रदान करतात. १. जवाहरलाल नेहरू : १९५५ : भारतरत्न : या पारितोषिकासाठी पंतप्रधान जवाहरलाल नेहरूंनी, जवाहरलाल नेहरूं यांच्या नावाची राष्ट्रपतींकडे शिफारस केली. २. इंदिरा गांधी : १९७१ : भारतरत्न : या पारितोषिकासाठी पंतप्रधान इंदिरा गांधींनी, इंदिरा गांधी यांच्या नावाची राष्ट्रपतींकडे शिफारस केली. असे केल्यावर मग कशाला उगाच परदेश काही करत आहेत की नाही ते पहायला पाहिजे ?! ;) :) ****** अवांतर : अशी स्वतःला स्वतःच पारितोषिके प्रदान करणे, परदेशात केवळ गद्दाफीसारखे हुच्च नेतेच, करताना दिसतात, तिकडे आपण दुर्लक्ष करूया, कसे ? :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

ऑ

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Fri, 08/30/2019 - 10:43 नवीन
आश्चर्य काही नाही बिरुटे सर कारण इथल्याप्रमाणेच बाहेरही त्यांचे भक्तगण आहे म्हटल ;) मी तर ऐकलय इथले काही भक्तगण आता आरती पण रचणार आहेत आपल्या सर्वगुण संपन्न मोदींवर. :P
आरती फार सोपी असते. ;) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उपेक्षित

हे घ्या अजुन यांच्या देवाचे प्रसाद

जालिम लोशन
गुरुवार, 08/29/2019 - 16:11 नवीन
https://www.nationalheraldindia.com/india/congress-slams-pak-for-using-rahuls-name-in-un-letter
  • Log in or register to post comments

या नाईलाजाने झालेल्या उपरतीला

डॉ सुहास म्हात्रे
गुरुवार, 08/29/2019 - 16:18 नवीन
या नाईलाजाने झालेल्या उपरतीला, काही दिवसांपूर्वी रागांनी काश्मिरसंबंधी केलेल्या, आणि आता जबरदस्त अंगावर उलटलेल्या, (नेहमीसारख्याच) बेजबाबदार विधानाची, पार्श्वभूमी आहे ! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जालिम लोशन

जाऊ द्या ना.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Fri, 08/30/2019 - 10:44 नवीन
बोलले ना ते, काश्मिर हा आमचा अंतर्गत मामला आहे म्हणून विषय संपला. चला, आता देशावर बोलू काही. बेरोजगारी, नोकरकपात, मंदी वगैरे. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

"आपल्या नेत्याने वारंवार माती

डॉ सुहास म्हात्रे
Fri, 08/30/2019 - 13:20 नवीन
"आपल्या नेत्याने वारंवार माती खाल्ली आणि खोटी विधाने केली, तरी दर वेळी लोकांना 'ती गोष्ट जुनी झाली, विसरा आता' असे सांगायचे आणि परत नवनवीन नौटंक्या करायला लागायचे", हा वरून आलेला आदेश आता सगळ्यांना चांगला माहीत झाला आहे. तो इथे परत सांगितला नसता तरी चालले असते. ;) =)) =)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

कोबी ने माती खल्ली तेव्हा कुठे गेला होता तुमचा धर्म ?

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Fri, 08/30/2019 - 14:26 नवीन
आमचा नेता ? हा हा हा. मा.कोबी विरुद्ध बोलल्या गेले म्हणजे बाकीचे सगळे फूलकोबी समर्थक या भक्तांच्या अजब न्यायापुढे अर्धाअधिक देश परेशान आहे. बाय द वे, आदरणीय फे.* पंतप्रधान कुणीही न बोलावता पाकिस्तानात गेले होते, याची आठवण असेलच . पठाणकोट हवाईतळावर चौकशीसाठी पाकिस्तानची 'कुख्यात' गुप्तचर संस्था आयएसआयला का बोलावण्यात आलं, याचं उत्तरही भक्तांनी द्यायला हवं. ता.क. फे.म्हणजे फेमस या अर्थाने लिहिलय कोणीही फेकू असे समजू नये. खुलासा संपला. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

बाय द वे, आदरणीय फे.*

डॉ सुहास म्हात्रे
Fri, 08/30/2019 - 15:09 नवीन
बाय द वे, आदरणीय फे.* पंतप्रधान कुणीही न बोलावता पाकिस्तानात गेले होते, याची आठवण असेलच . पठाणकोट हवाईतळावर चौकशीसाठी पाकिस्तानची 'कुख्यात' गुप्तचर संस्था आयएसआयला का बोलावण्यात आलं, याचं उत्तरही भक्तांनी द्यायला हवं. या गोष्टी करून, "मैत्री स्थापित करण्याकरिता, सर्वसाधारण मुत्सेद्देगिरीला सोडून असलेली अनेक अपारंपारिक पावलेही भारत उचलत आहे, पण तरीही पाकिस्तानकडून त्याला हवा तसा प्रतिसाद मिळत नाही" अशी आंतरराष्ट्रिय स्तरावर खात्री पटवली गेली... इस्लामी देशांसह अनेक देशांना पाकिस्तानविरुद्ध आणि आपल्या बाजूला वळवण्यात, या गोष्टींचा मोठा फायदा मिळाला. इथे तुम्ही प्रत्यक्ष विचारणा केलीत म्हणूनच केवळ, ही वस्तुस्थिती सांगितली आहे. तुमचा टोकाचा मोदीद्वेष माहित असल्यामुळे, हे उत्तर पटेल याची खात्री नाही... नाही पटले तर सरळ सोडून द्या. झोपल्याचे सोंग घेतलेल्याला जागे करण्याचा प्रयत्न व्यर्थ असतो, हे मला पक्के माहित आहे ! आमचा नेता ? हा हा हा. मा.कोबी विरुद्ध बोलल्या गेले म्हणजे बाकीचे सगळे फूलकोबी समर्थक या भक्तांच्या अजब न्यायापुढे अर्धाअधिक देश परेशान आहे. 'तो' तुमचा नेता नसेल तर त्याची तळी उचलायचे काहीच कारण नव्हते... निदान इतकी चिडचिड करायची तरी अजिबात गरज नव्हती :) तसेही, त्याचे बेजबाबदार वागणे असह्य होत असल्यामुळे, हल्ली बरेच जण त्याला सोडून चालले आहेत. त्यात अजून भर पडली तर आश्चर्य वाटायचे काहीच कारण नाही. असो. "लोकांची परेशानी" लोक निवडणुकांत बरोबर दाखवून देत आहेतच. तेव्हा त्याबद्दल मी काही सांगायची गरज नाही. मुद्दे संपून, चिडचिड होऊन, तोल डळमळीत झाला की, "कोबी", इत्यादी तुमचे सिग्नेचर शब्द बाहेर येतात, हे माहित असल्याने आणि वितंडवादात अजिबात रस नसल्यामुळे, तुमच्याकडून 'खरे मुद्दे आणि समतोल भाषा' दिसायला लागेपर्यंत, राम राम !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा