Skip to main content

अंधश्रद्धा निर्मूलन श्री हमीद दाभोलकर ह्यांचे

लेखक साहना यांनी रविवार, 18/09/2016 07:58 या दिवशी प्रकाशित केले.
आमचे एक गुरुजी होते नेहमी सदाचार, शिस्त इत्यादी गोष्टीची शिकवण द्यायचे. गुरुजी म्हणजे साक्षांत गुरु ब्रहस्पती अशी आम्हा मुलांची धारणा होती. एकदा मला तालुक्याच्या ठिकाणी एका स्पर्धेंत ५० रुपयाचे रोख बक्षीस प्राप्त झाले आणि घरी येत असताना गुरुजींनी "बाळ तुझ्या कडून पैसे हरवातील म्हणून मी ठेवतो" असे सांगून लिफाफा आपल्या कडे ठेवला. दुसऱ्या दिवशी शाळेंत "बाळ हे तुझे पैसे" म्हणून सर्वां समक्ष परत सुद्धा दिला. गुरुजींच्या विश्वासामुळे मी पैसे वगैरे मोजायच्या फंदात पडले नाही (त्यांच्या पुढे) मन त्यांच्या मागे मोजून पहिले तर आंत फक्त ५ रुपये होते. घरी सांगितले तर सगळ्यांनी "ग तुझ्याच कडून हरवले असतील, राहू दे" म्हणून विषयावर पांघरून टाकले. खूप वर्षांनी मी कार चा परवाना काढण्यासाठी RTO मध्ये गेले असता गुरुजी सुद्धा टेस्ट द्यायला आले होते आणि फेल सुद्धा झाले. RTO हापिसर मित्र होता. "तिसऱ्यांदा फेल होताहेत" असे त्याने मला मागाहून सांगितले. मी गुरुजींना "काय गुरुजी लायसन भेटले का असे चार चौघां पुढे विचारले" तर गुरुजींनी उत्तर दिले "नाही RTO हापिसर ला आज थोडी घाई होती म्हणून नंतर यायला सांगितले आहे आणि त्यानंतर सरकारी अधिकारी कसे प्रामाणिक पणे काम करत नाहीत ह्यावर भाषण द्यायला सुरु केली. लहानपणांत चारित्र्यवान वाटणारे गुरुजी आज विदूषकाचे पेक्षाही विनोदी वाटत होते. विषयांतर बाजूला ठेवूया. सार्वजनिक जीवनात सुद्धा ह्या गुरुजी सारखे लोक कमी नाहीत. उदाहरण म्हणजे श्री हमीद दाभोलकर. . . . img

वाचने 219375
प्रतिक्रिया 456

प्रतिक्रिया

In reply to by प्रचेतस

प्रचेतस, तुमचा नेम पार चुकलाय. सनातन संस्था अधिकारांपेक्षा कर्तव्यावर अधिक भर देते. त्यामुळे आक्रमण करणाऱ्याचा कोथळा काढणे हे अधिकार नसून कर्तव्य आहे. ते बजावायचं नसेल तर आपली मर्जी. शिवाजीमहाराज आणि अफझलखान यांच्या उदाहरणावरून हेच दिसंत नाही काय? आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

आता स्मृतीविपरीत धर्मशास्त्राधार मिळाला तरी त्यानुसार आचरण करू नये या मताचा मी आहे
आदेश देण्याचं काम स्मृतीचं आहे.
वरील प्रतिसादात आपणच स्मृतीवर भर देत विपरीत धर्मशास्त्राधार मिळाला तरी त्या नुसार आचरण करु नये. शिवाय त्या आदेश देतात हेही तुम्हास मान्य आहे. तर इतकी स्पष्ट भुमिका तुमची स्मृतीचा आदेश पाळण्या संदर्भात आहे. आता वरील उदाहरणात धर्मसुत्रेही सोडुन देऊ " कात्यायनस्मृती"चेच उदाहरण घेउ ही स्मृतीच आहे व हीचा स्पष्ट आदेशच आहे की "आततायिन" व्यक्ती ब्राह्मण असेल तर आणि त्याने हल्ला केला तर स्वतःचा जीव वाचवण्यासाठीदेखील बचावासाठीदेखील त्याच्यावर प्रतिहल्ला करणे योग्य नाही चुक आहे. मात्र शुद्र असेल याच्या जागी तर त्याला अशा शुद्र आततायिन च्या व्याख्येत बसणारा शुद्र असेल तर स्व-बचावासाठी त्याला मारण्यात सर्वच झाडुन सर्वच धर्मसुत्राचे एकमत आहे. तुम्ही म्हणता
जर कोणी ब्राह्मण आततायीपणे वागंत असेल तर तो ब्राह्मणंच नव्हे.
पण असा ब्राह्मण असु शकतो व त्याने असे केले तर त्यावर प्रतिहल्ला करु नये असा नियम जेव्हा कात्यायनस्मृती देते तेव्हा ती अशा ब्राह्मणाचे १- अस्तित्व पुर्णपणे मान्य करते असे समाजात असु शकतात आहेत होते हे ती मान्य करते २- त्यानंतर त्यांचे रक्षण व्हावे या दिशेने क्लीअर प्रोव्हीजनही करते. व त्यांना ब्राह्मणच मानते. मग तुम्ही कात्यायन स्मृती च्या पुर्णपने विरोधी भुमिका घेत आहात असे आपणास वाटत नाही का आपण आदेश भंग करत आहात आपण धर्मादेश झुगारत आहात स्वतःच आग्रहाने प्रतिपादलेला. शिवाय जेव्हा आपण जेव्हा असा आततायिन ब्राह्मण असुच शकत नाही अशी स्वतःची गामा पैलवान यांची व्यक्तीगत मत असलेली व्याख्या आग्रहाने मांडता तेव्हा. आपल्याच वरील एका प्रतिसादातील की शास्त्रात जे आहे तेच पाळावे तंतोतंत पाळावे अन्यथा ती एक कसरत निरर्थक कसरत ठरते असे म्हणता. यात उघड विसंगती आहे असे मी नम्रपणे आपल्या निदर्शनास आणुन देऊ इच्छितो. शेवटी असा इतका टोकाचा कोथळा काढणे अशी भुमिका "अतिरेकी " आहे असे आपणास वाटत नाही का ?

एवढी चर्चा झाली पण श्री हमीद दाभोलकर ह्यांचे अंधश्रद्धा निर्मुलन झाले की नाही अखेरीस ?

जनाब हमीद यांचे वडील पशुहत्या थांबावी म्हणून त्यांच्या अं.नि.स. या संघटनेमार्फत अनेक देवस्थानांजवळ आंदोलने करीत होते. नेमका याचाच विसर हमीद याना पडलेला दिसतो. की हिंदूंच्या देवळाबाहेरील पशुहत्या नापाक आणि ईदीची पशुहत्या पाक असे त्यांना वाटते.

मारवा,
आपल्याच वरील एका प्रतिसादातील की शास्त्रात जे आहे तेच पाळावे तंतोतंत पाळावे अन्यथा ती एक कसरत निरर्थक कसरत ठरते असे म्हणता.
शास्त्राज्ञा तंतोतंत पाळण्याचा आग्रह वैयक्तिक उपासनेसाठी आहे. याव्यतिरिक्त सार्वजनिक प्रसंगी राजाज्ञा पाळणे इष्ट. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

इथे राजाज्ञा म्हणजे राज्यघटना पाळावी असे म्हणायचे आहे ना? बादवे कालच बकर ईद होती.

अनेक मुस्लिम बांधवांनी ईद ही अगदी ’शास्त्रा’ पुरती साजरी करुन गोळा झालेला चंदा हा पूरग्रस्तांसाठी देण्याचे ठरवले आहे. हे सकारात्मक पाउल आहे. मातीची बकरी हा सिंबॉलिक या अर्थाने वापरलेला शब्द आता हळू ह्ळू त्याकडे वाटचाल करीत आहे..रुढींचा मागसलेपणा हा हळू हळूच कमी होत असतो.

In reply to by प्रकाश घाटपांडे

हमीद दाभोळकर आणि इतर फुरोगामी आणि फेक्युलर जमात इस्लाम म्हणाले कि निष्पक्षपणे काम करते ते माहिती पाहिलेय त्यामुळे त्यांच्याबद्दल no कॉमेंट... पण मित्रहो हार्दिक समाज देखील हळू हळू बदलत आहे. बरेच मुस्लिम लोक यंदा ईद साजरी न करता सर्व रक्कम पूरग्रस्तांसाठी देत आहेत. तसेच कालच पेपर मध्ये वाचले कि श्रावण सोमवार आणि ईद दोन्ही एकच दिवशी आल्यामुळे काही मुस्लिम लोकांनी ईदची कुर्बानी सोमवारी न देता दुसऱ्या दिवशी म्हणजे मंगळवारी देण्याचे ठरवले आहे. आता ह्या बदलाला नेमक्या कोणत्या गोष्टी कारणीभूत आहेत ते माहिती नाही पण मुस्लिम समाज कट्टरते कडून सामाजिक सौदार्ह्याकडे पावले टाकत आहे त्यामुळे एरवी विरोधात बोलत असलो तरी त्यांच्या या अटीट्युड ची प्रशंसा करतो आणि माझे 2 शब्द संपवतो.

In reply to by बाप्पू

बाप्पू, तुमच्याशी शंभर टक्के सहमत. हिंदू व मुस्लिम समाजांना एकमेकांच्या सदिच्छा प्राप्त होत असतील तर त्यांचं भरभरून स्वागतंच आहे. आ.न., -गा.पै.

देव तेथेचि जाणावा... हमीद दाभोलकर महाराष्ट्र टाइम्स | Updated: 14 Aug 2019, 09:57 AM महापुराने तडाखा दिलेल्या भागातील मुस्लिम बांधवांनी कुर्बानीचा अर्थ विस्तारून पूरग्रस्तांना मदत हीच कुर्बानी, असे धार्मिकतेला व्यापक रूप दिले... महापुराने तडाखा दिलेल्या भागातील मुस्लिम बांधवांनी कुर्बानीचा अर्थ विस्तारून पूरग्रस्तांना मदत हीच कुर्बानी, असे धार्मिकतेला व्यापक रूप दिले. याचे स्वागत करायला हवे... कोल्हापूर आणि सांगलीला महापुराचा तडाखा बसला. एका बाजूला ह्या आपत्तीच्या मानवनिर्मित अनेक बाजू समोर येत असतानाच स्वत:च्या पलीकडे जावून मदत करण्याची असंख्य उदाहरणे ह्या दोन आठवड्यात दिसली. त्या मधील कोल्हापूरच्या मुसलमान बांधवानी ईदला बकऱ्याची कुर्बानी देण्याऐवजी आर्थिक कुर्बानी देण्याचा निर्णय घेतला आणि सांगली, सातारा भागातील मुसलमान समाजातील लोकांनी त्याला पाठिंबा दिला, ही मोलाची घटना आहे. देव आणि धर्माशी संबंधित कुठल्याही गोष्टीची चिकित्सा करणे त्याला विधायक पर्याय सुचवणे हे केवळ अवघडच नाही तर अनेक प्रसंगी जीवघेणे ठरते आहे. अशा कालखंडात धर्माचे मानवतावादी रूप समोर आणणारी ही घटना आहे. म्हणूनच तिचे विवेचन आवश्यक आहे. जगभर ईदला मोठ्या प्रमाणात बोकडाची कुर्बानी दिली जाते. महाराष्ट्रातील मुसलमानही ही प्रथा पाळतात. कुर्बानीच्या एका बोकडाची किंमत जवळ जवळ वीस हजार असते. ज्यांना ती परवडत नाही, ते यात पाच हजार रुपयाचा वाटा कुर्बानी म्हणून देतात. इस्लामच्या मूळ रुपात बोकडाची कुर्बानी देण्याची प्रथा आहे का नाही, याविषयी तज्ज्ञांमध्ये मतभेद आहेत. इस्लामच्या एका कालखंडात नरबळीला पर्याय म्हणून कुर्बानी देणे चालू झाले असे दाखले दिले जातात. कुर्बानीचा अधिक व्यापक अर्थ सांगणारे काही इस्लामचे तज्ज्ञ आहेत. ह्या प्रवाहाच्या मते, कुर्बानी ह्या गोष्टीचा अर्थ हा आपल्यामधील चांगले काही तरी दुसऱ्याला देणे. मानवी समूहांच्या विकसित होत जाणाऱ्या टप्प्यांच्या मध्ये कोणत्याही धर्मातील त्या काळाला सुसंगत नसलेल्या प्रथा परंपरा बदलून त्या अधिक कालसुसंगत प्रकारे आचरणात आणणे हे मानवी मन विकसित होण्याचे एक लक्षण असते. मानवी सुधारणेचा इतिहास हा प्रामुख्याने धर्म सुधारणेचा इतिहास आहे असे तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांचे एक वाक्य आहे. हिंदू धर्माच्या मध्ये विधायक धर्मचिकित्सा करणाऱ्या संत आणि समाज सुधारकांची पाच हजार वर्षांची परंपरा आहे. पण इस्लाममध्ये मात्र त्या तुलनेत हा प्रवाह खूपच क्षीण राहिलेला आहे. त्यामुळे हिंदू समाजात सती प्रथा निर्मूलनापासून ते अस्पृश्यता निवारण, स्त्री शिक्षण अशा अनेक सुधारणा धर्माच्या आतून झालेल्या दिसतात. त्या तुलनेत इस्लाममध्ये मात्र हे काम अतिशय संथ गतीने होत आलेले आहे. या पार्श्वभूमीवर ईदची कुर्बानी ही आर्थिक स्वरुपात पूरग्रस्तांना देण्याचा निर्णय आपण समजून घेतला पाहिजे. हमीद दलवाई यांनी सुरू केलेले मुस्लिम सत्यशोधक मंडळ आणि अंधश्रद्धा निर्मूलन समिती गेली सहा वर्षे महाराष्ट्रात रक्तदान करून ईद साजरी करते. यामागे आपले रक्त हे गरजू व्यक्तीला कुर्बानी म्हणून देणे, हा उन्नत भाव आहे. त्याला गेल्या सहा वर्षांत वाढता प्रतिसाद असला तरी तीन जिल्ह्यातील बहुतांश समाजाने मोठ्या प्रमाणात कुर्बानीचा अर्थ हा अधिक उन्नत भावनेने घेणे हे महत्त्वाचे ठरते. नोंद करण्यासारखा भाग म्हणजे ज्या कोल्हापूर जिल्ह्यातून डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी विसर्जित गणपतीदान ही पर्यवरण पूरक गणेश उत्सवाची मोहीम सुरू केली त्याच कोल्हापूरमधून आर्थिक कुर्बानी देण्यासाठी पुढाकार घेण्यात आला आहे. शाहू महाराजांच्या विचाराने झालेली कोल्हापूर जिल्ह्याची मशागतदेखील ह्याच्या पार्श्वभूमीला आहे. वीस वर्षांपूर्वी जेव्हा के. डी. खुर्द ह्यांच्या पुढाकाराने विसर्जित गणपती दान मोहीम कोल्हापुरात राबवली गेली, तेव्हा त्याला खूप विरोध झाला होता. पण आज मात्र पर्यावरण पूरक गणपतीला समाजमान्यते बरोबर शासन मान्यताही मिळालेली आहे. एका धर्मातील धर्मांधता दुसऱ्या धर्मातील धर्मांधतेला बळ देते, असा आपल्याकडे सार्वत्रिक अनुभव आहे. हिंदुत्वाचे राजकारण करणारे पक्ष आणि मुस्लिम धर्माचे राजकारण करणारे पक्ष हे बाहेरून एकमेकांचे कट्टर विरोधक दिसत असले तरी प्रत्यक्षात हे पक्ष हे दोन्ही धर्मातील विचार करू इच्छिणाऱ्या लोकांच्या विरोधात असतात, ही आता लपून राहिलेली बाब नाही. पण संविधानाच्या चौकटीत राहून रूढी व परंपरांची कालसुसंगत चिकित्सा करणाऱ्या लोकांमध्ये मात्र अनेकदा अशी परस्परपूरकता दिसत नाही. पर्यावरण पूरक गणपती, फटाकेमुक्त दिवाळी तसेच अनेक ठिकाणी यात्रेतील पशुहत्यादेखील थांबविण्याचे जे यशस्वी प्रयत्न सध्याच्या कालखंडात आपल्या समाजात झाले आहेत, त्यापासून एक मोठा दिलासा आर्थिक कुर्बानीसाठी प्रयत्नशील राहणाऱ्या मोहिमेला मिळू शकतो. अशाच पद्धतीने आर्थिक पातळीवर कुर्बानी देण्याचा कोल्हापूरमधून चालू झालेला हा उपक्रम केवळ आपत्कालीन प्रतिसाद न राहता त्याचे एका विधायक जनचळवळीत रूपांतर होऊ शकते. भारतातच नाही तर जगभरात धार्मिक कट्टरपंथी विचार वाढीला लागलेला असताना धर्माला अधिक मानवी रूप देण्याचे वरील प्रयत्न हे निश्चितच उठून दिसतात. कोल्हापूरच्या घटना ही एक छोटी सुरूवात असली तरी अशी एक छोटी सुरूवात समाजाच्या विचार करण्याच्या प्रक्रियेत किती बदल करू शकते, हे समजून घेण्यासाठी पुण्यातील मानाच्या पाच गणपतींनी यंदा पुणे महापालिकेला केलेले आवाहन समजून घेतले पाहिजे. ज्या पद्धतीने पुराच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूरच्या मुस्लिम बांधवांनी कुर्बानी आर्थिक स्वरुपात देण्याचा निर्णय घेतला, त्याचप्रकारे चार वर्षांपूर्वी पुण्यातील मानाच्या पाच गणपतींनी दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पर्यवरणपूरक विसर्जन करण्याचा निर्णय घेतला होता. ह्या वर्षी ह्याच गणेश उत्सव मंडळानी पुणे महापालिकेला आम्ही पर्यवरण पूरक गणेश उत्सव करून पर्यावरणाची काळजी घेतली, आता तुम्ही पुढाकार घेवून पुण्यातील नदीपात्र स्वच्छ आणि सुशोभित करा, असे आवाहन केले आहे. माणसाचे मन एकदा विधायक कृतिशील चिकित्सा करू लागले की ते केवळ रूढी आणि परंपरांच्या चिकित्सेपाशी थांबत नाही तर ते नागरी प्रश्नांच्या बाजूने आपल्या चिकित्सेचा परीघ वाढवते असा आशावाद यामधून मिळतो. "माझी लढाई हि काही दशकांची नाही तर काही शतकांची आहे, ह्याची नम्र जाणीव मला आहे," असे डॉ. नरेंद्र दाभोलकर म्हणत. २० ऑगस्टला त्यांच्या खुनाला सहा वर्षे पूर्ण होत आहेत. त्यांचे मारेकरी पकडले असले तरी अजून त्यामागचे सूत्रधार पकडले गेलेले नाहीत. असे असले तरी जो विचार समाजमनात रुजावा, यासाठी डॉ. दाभोलकरांचे बलिदान झाले तो ह्या देशातील संत आणि सुधारकांनी सांगितलेला 'विधायक कृतिशील धर्मचिकित्सेचा विचार' हा अतिशय प्रतिकूल सामाजिक परिस्थितीमध्येही एका पातळीवर समाजमन स्वीकारते आहे, हे वास्तव आश्वासक आहे. (लेखक अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते आहेत.)

डॉक्टर नितीन अण्णा,
या पार्श्वभूमीवर ईदची कुर्बानी ही आर्थिक स्वरुपात पूरग्रस्तांना देण्याचा निर्णय आपण समजून घेतला पाहिजे.
प्रागतिक विचार अंमलात आणल्याबद्दल मराठी मुस्लिम समाजाचं अभिनंदन. इस्लाम म्हणजे अरबांच्या चालरीती कॉपीपेस्ट करणे नव्हे. इतका जरी बोध घेतला तरी तूर्तास पुरे. पुढे इस्लाम म्हणजे काय आहे व काय नाही याच्या चिंतनाची जोड देता येईल. आ.न., -गा.पै.

त्यांना कुणीतरी नीट आठवण करून द्यायला हवी की, "बाब्बौ, तुमचे नाव 'केत'कर आहे, 'कट'कर नाही म्हणून.." अर्थात् त्यांच्या नावातच "मार" आहे आता तर ते तरी काय करणार [मार] खाण्याशिवाय म्हणा... बाकी तुमचा लेख वाचून एक प्रश्न पडलाय.. ते ***ची कातडी सोलणे म्हणजे यालाच म्हणतात काय हो? _/\_

गामापै यांचा अन्यत्र असलेला हा विषयावरचा धागा अप्रकाशित झालेला दिसतोय. त्यात या धाग्याचा संदर्भ मी दिला होता.

अंधश्रद्धा विनाशाय अनिस च्या कार्याची माझी पहिली ओळख झाली जेव्हा माझे वडील त्यांच्या कार्याला हात भार म्हणून सोबतच्या इंजिनीरिंग प्राध्यापकांबरोबर काही शिबीर आयोजित कार्याचे त्यात विविध शास्त्रीय प्रयोगातून बुवाबाजी कशी असते ते दाखवून द्यायचे... पुढे "अंधश्रद्धा विनाशाय" हे पुस्तक वाचले आणि भारतीय समाजात अंधश्रद्धा किती आहे ते वाचून थकक झालो... परंतु पुढे पुढे जसा काळ गेला आणि अनिस आणि समविचारी लोकांच्या विविध विधाने ऐकून अनिस बद्दल चा आदर कमीच होत गेला खास करून आता तर मत पक्के बनले आहे कि जरी हे अंधश्रद्धा निर्मूलनाचे कार्य महत्वाचे असले तरी या लोकांना एकाच धर्मात ते का दिसते? त्यांना इतर धर्मातील अंधश्रद्धा दिसत नाही का? ती उघडकीला का आणीत नाही किंवा पुरेश्या जोमाने त्याबद्दल काही पाठपुरावा का करीत नाहीत? आपलं चार्ली हबदू होईल अशी भीती वाटते कि काय अनिस ला? अधिक भर म्हणजे अति डावे आणि ज्यांना अर्बन नक्षल म्हणले जाते यांच्या बरोबर यांनी हात मिळवणी केली आहे का असे वाटते. जीवनात थोडी पापभिरू श्रद्धा असली तर फार काही बिघडत नाही पण अंधश्रद्धा नक्कीच नसावी दुसरे असे कि काही प्रथा ( धार्मिक आणि सामाजिक) या कालबाह्य होऊ शकतात हे जसे श्रधुळु लोकांनी विचारात घेतले पाहिजे तसेच अनिस वाल्यांनी उगाच लोकांना त्रास दिल्यासारखे पण वागू नये अनिस ने हे हि विचारता घयावे कि काळाप्रमाणे बदलण्याची जरुरी काही फक्त एका धर्माची नाहीये ... इत्यादी

In reply to by चौकस२१२

अनिस ने हे हि विचारता घयावे कि काळाप्रमाणे बदलण्याची जरुरी काही फक्त एका धर्माची नाहीये >>>>>> हे सर्वामान्यच आहे. अधिक भर म्हणजे अति डावे आणि ज्यांना अर्बन नक्षल म्हणले जाते यांच्या बरोबर यांनी हात मिळवणी केली आहे का असे वाटते.>>>>>> असे वाटणे याचे कारण अनिस त विद्रोही चळवळीतील कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात येत आहेत हे असावे.

अंनिसच्या कामाच्या उपयुक्ततेबद्दल फारसा कुणाला आक्षेप सहसा दिसत नाही. थोडीशी श्रद्धा असू द्यावी, तिचा फार बाऊ करू नये असे बऱ्याच वेळेला वाचायला मिळते. माझ्या आकलनानुसार अंनिस पण हे जाणून आहे. त्यांचा भर आहे तो फसवणूक टाळणे आणि पर्यावरणपूरक उत्सव असावे यावर. फसवणुकीच्या नावाखाली सहसा अशिक्षित आणि गरीब लोकांची होणारी फसवणूक जसे भानामती, आजार आणि प्राणीदंश यावर होणारे उतारा, मंत्रोपचार, बळी देणे यासारखे उपचार, आणि आपले दणदणाटी उत्सव हे त्यांचे प्रमुख आक्षेप असावेत. याखेरीज, वास्तुशास्त्र, ज्योतिष, आणि सत्यनारायण यावरही त्यांची टिप्पणी असायची पण ती जाहीर व्याख्यानांमधून विचार व्यक्त करणे या पुरतीच मर्यादित होती असे वाटते. आता वळूया आपल्या ठसठसणाऱ्या वेदनेकडे. फक्त प्रबोधन 'आमचेच' का म्हणून? यावर माझी मते खालील प्रमाणे: सर्वप्रथम सुरुवात होते ती बकरीदच्या प्रथेपासून. 'त्यांची' हि प्रथा कशी चालते, त्यावर बरे कोणी बोलत नाही. तर वाचकांनो, या वर्षी, आषाढीच्या दुसऱ्याच दिवशी सकाळचा अंक वाचायला घेतला तर तर जवळपास एक सबंध पानभरून आखाडाचा बेत असणाऱ्या हॉटेलांच्या जाहिराती! भागवत संप्रदाय, वैष्णवांचा मेळावा, सावळा विठ्ठलु वगैरे सर्व आपण एका रात्रीत गुंडाळून ठेवले! वर तर वर, हि सर्व छपाई तर आषाढी एकादशीच्याच दिवशी होत होती! आणि कडी म्हणजे दीपअमावसेला जेवढे बोकड, कोंबड्या आणि समुद्र जीव प्राण सोडतात त्या पुढे बकरीदच्या दिवशी होणाऱ्या कुर्बानी तर काहीच नाही. लक्षात घ्या, इथे आक्षेप प्राणिहत्येला नाहीये. एवढा मोठा विरोधाभास बाळगून वर दुसर्यांकडे बोट दाखवायचे म्हणजे एक तर हिमतीचे काम असावे नाही तर अट्टल निर्लज्जपणा असावा. अजुनहि काही मुद्दे आहेत पण त्यांचा परामर्श नंतर कधी तरी.

In reply to by सर टोबी

हे आत्मपरीक्षण करणारे करुन घेतील पण हमीद दाभोळकर आणि अनिस कधी आत्मपरीक्षण करणार ? म्हणजे समजा जैन समाजातील कुठल्याही एका सर्वसाधारण जैन माणसाने हा प्रश्न हमीद यांना विचारला ( जैन समाज सर्वसाधारणतः जनरली स्ट्रीक्टली शाकाहारीच असतो ) आता हा प्रश्न समजा डॉ. कल्याण गंगवाल यांनी ( हे जैन आहेत बहुधा व शाकाहार प्रचारक आहेत ) हमीद दाभोळकर यांना जैन समाजातर्फे विचारला तर तुम्हाला वरीलप्रमाणे " तुम पहले अपने गिरेबान मे झाक के देखो " हा लोकप्रिय संवाद इथे वापरता येणार नाही कारण सर्वसाधारण जैन माणसाचं गिरेबान यात वरील प्रमाणे अडकत नाही इतके ते शाकाहारी जनरली असतात तर हमीद दाभोळकर किंवा तुम्ही अस समजा की हा प्रश्न हिंदु कडुन नाही जैनांकडुन आलेला आहे तर त्याचे उत्तर तुम्ही किंवा दाभोळकर काय देणार ?

In reply to by मारवा

अशा व्यवस्थित उंची दिलेल्या आणि मंदगती चेंडूवर एक सिक्स तो बनती है. माझे विवेचन थोडे तुकड्या तुकड्यांमध्ये आहे. पहिला मुद्दा हा आहे कि आपण सर्व जण एकमेकांशी संबंधित असतोच. अगदी तिरीमिरीत देखील 'तुझा आणि माझा काय संबंध?' असे विचारले तरी आपण संबंधित असतोच. आता हे बघाना. पुणेकर मनमुराद कचरा करतात आणि तिकडे फुरसुंगीच्या मुलांची लग्न होत नाहीत. आहे कि नाही संबंध? हा संबंध अनेक पातळ्यांवर असतो. काश्मिरात बर्फ पडले कि उर्वरित भारतात थंडीची लाट येते. उजव्यांनी 'सर्व कायदे फक्त हिंदूंनीच पाळायचे का' असे म्हटले कि शहरं गुदमरवून टाकणारे उत्सव सुरु होतात. म्हणजे भौतिक आणि आत्मिक पातळीवर देखील आपण एकमेकांचे संबंधित असतो. आता वळूया नाकाने कांदे सोलणाऱ्या जैनांकडे. यातील काही जैन आपल्या मराठी बांधवांना हिणवतात. साले तुमचे लग्न समारंभ म्हणजे काय असतात रे. एक जिलेबी एवढाच गोडाचा पदार्थ. आमच्याकडे बघा. चार चार मिठाया. तो शुध्ध तुपाने थबथबणारा मूग हलवा, ते शुध्ध तुपात तळलेले गुलाबजाम आणि वरती घट्ट रबडी. आता कल्पना करा कि अशा प्रकारच्या दुधाच्या वापरासाठी कोणीतरी कपिला गायीची व्यापारी पैदास करतो. आणि तितक्याच मोठ्या प्रमाणावर भाकड जनावरांची पण बेगमी करतो. काही ठिकाणी भाजी बाजारात होणारा कचरा भाकड जनावरांकडून जिरवला जातो. पण भाकड जनावरांची निर्मिती आपल्या क्षमतेहूनही जास्त वेगाने होत असते. दोन तीन वर्षांपूर्वी जवाहरलाल दर्डा यांनी संपूर्ण ग्रँड ट्रंक रोडवरून प्रवास केला असता त्यांना शेतकऱ्यांनी सोडून दिलेली भाकड जनावरं संपूर्ण प्रवासभर दिसली. मुद्दा निव्वळ वाहतूक मंदावण्याचा नाहीए. जनावरांना मरणाहूनही अमानुष अशा परिस्थितीत ढकलण्याचा आहे. तेंव्हा शाकाहारी भलेही मांस भक्षण करीत नाही या आनंदात असतील लेकिन गिरबान तो उनकाभी सांफ नाही है मेरे दोस्त!

In reply to by सर टोबी

सरजी तुम्ही मुळ प्रश्नाला न भिडता प्रश्नकर्त्याला भिडु शकता पण त्यातुन मुळ प्रश्न अनुत्तरीतच राहतो. इथे अजुन स्पष्ट करतो हमीद यांना दुर्गापुजेतील पशु बळी ही जर अंधश्रद्धा वाटत असेल आणि बकरी इद मधील पशु बळी ही अंधश्रद्धा वाटत नसेल तर प्रश्नच मिटला विषयच संपला. पण आता मी जे गृहीत धरतो आहे की हमीद यांच्या व अनिस यांच्या मते दोन्ही अंधश्रद्धाच आहेत मी चुकत असेल माझ्या गृहीतकात तर कृपया दुरुस्त करा जर दोन्ही मध्ये अंधश्रद्धा आहेत व दोन्ही ना विधायक पर्याय म्हणुन माती ची बनवुन बळी द्या असा पर्याय अंनिस वा अजुन कोणी सुचवत असेल तर त्यात ही गैर काय ? आता हा विधायक पर्याय जर गणेशमुर्ती मातीच्या वगैरे विसर्जन ( गणेशमुर्ती विसर्जन हा सर्वस्वी वेगळा पर्यावरण वगैरे च्या रीलेटेड मुद्दा आहे पशु बळी चा नाही हे जाणुन आहे ) इथे फक्त पर्यायाची तुलना म्हणून म्हणतोय कोणी हा विधायक पर्याय मुस्लिम समाजाला द्या त्यांच्यात प्रबोधन करायला काय हरकत आहे ? हा प्रश्न हमीद व अनिस ला विचारला तर त्याचे उत्तर जे त्यांनी दिलेले इथे वाचले आहे ते पटले नाही. म्हणजे हमीद म्हणतात खोडसाळपणा व विरोधासाठी विरोध या प्रश्नात आहे हे दोन्ही मुद्दे एकवेळ मान्य करु की हमीद बरोबर आहेत तरी सर्वात मोठा आक्षेप हा त्यांच्य भावार्थ समजुन घ्या या अत्यंत दांभिक टिप्पणी मध्ये आहे उद्या सतीचा ही भावार्थ समजुन घ्या दुर्गापुजेतील बळीचा ही भावार्थ समजुन ग्या अश्वमेघ चा भावार्थ समजुन घ्या आणि गप्प बसा असे चालेल का ? मी जैन उदाहरण तुमचा Ad hominem बंद व्हावा यासाठी दिले पण तुम्ही त्यातच रस घेतलेला दिसतोय. एकदम गावठी उदाहरण गावच्या चावडीवर चोर पकडुन आणला तर रमेश नावाचा चोर म्हणतो अगोदर याला बघा आता पहीला झाला दुसरा झाला तिसरा झाला सर्वांची चौकशी झाली चोर ही झाले सिद्ध ही झाल शिक्षा सुद्धा झाली त्याने ज्या ज्या कडे बोट दाखवलं ते सर्व झाले आता रमेश ची पाळी आहे आता रमेश चा खिसा तपासायचा आहे आता रमेश ला जबाब द्यावा लागेल आता रमेश ला बोट दाखव्ण्यास कोणी उरल नाही हमीद आता कोणाकडे बोट दाखवतील ( हमीद चोर आहे असे म्हणणे नाही हे उदाहरण आहे मला अनिस च्या कार्याविषयी आदर आहे पण वरील हमीद च्या विधानातील दांभिकता बघुन मला धक्का बसलेला आहे म्हणुन हे सर्व म्हणतोय ) याउलट पेटा संघटना मला तुलनेने प्रामाणिक वाटते बकरीद च्या अगोदर च त्यांनी हे प्रयत्न केलेले आहेत त्यांच्यासाठी प्राणी हिंसा च चुकीची आहे धर्म कुठलाही असो तात्विक दृष्य्ट्या पेटा मला भडक जाहीराती करत असली तरी किमान भुमिकेत प्रामाणिक वाटते. https://www.petaindia.com/blog/bakrid-peta-india-asks-prohibiting-anima…

In reply to by सर टोबी

टोबी महाराज लोकांचा आक्षेप प्राण्यांच्या कत्तलीला नसून सार्वजनिक ठिकाणी घाण करण्याला आहे. उगाच सेक्युलर पणाचा आव आणू नका. दिव्याच्या अवसेला कोणीही प्राणी घरात/ घराबाहेर मारून घाण करत नाही. पण अशी स्थिती बक्र ईद ची नाही यामुळेच मुंबई उच्च न्यायालयाला Because home isn't a slaughter house: Bombay HC prohibits slaying of animals in houses for Bakrid असा सज्जड दम द्यावा लागला https://www.dailyo.in/lifestyle/bakri-eid-goat-slaughter-on-bakri-eid-b… हीच स्थिती बहुसंख्य हिंदूंची( यात मी पण आलो) अंनिस बद्दल आहे. उगाच सेक्युलर पणाचा आव आणायचा आणि इतर धर्मातील अंधश्रद्धा बद्दल तोंड बंद ठेवायचे या दुटप्पीपणाबद्दल लोकांना राग आहे. गणपती उत्सवातील ढोल ताशे आवाज प्रदूषण करतात पण मशिदीवरील भोंग्याबद्दल/ मोहर्रमच्या ताजिया बद्दल तोंड बंद ठेवायचे असला दुटप्पीपणा आम्हाला भावत नाही. कोणत्याही धर्माच्या माणसाला सार्वजनिक शांतता भंग करण्यास सक्त मनाई केली पाहिजे यात गणेशोत्सवातील डीजे ढोल ताशे पण आलेच.

दिव्याच्या अवसेला बक्र ईद पेक्षा जास्त प्राण्यांची कत्तल होते हे दाखवणारा एक तरी पुरावा आपल्याला देता येईल का?

अल्पसंख्याक म्हणून बोम्ब मारणारे मुसलमान भारतात १५ % आहेत म्हणजेच २० कोटी याना अल्पसंख्याक म्हणणे हा विरोधाभास आता थांबवला पाहिजे.

In reply to by सुबोध खरे

कोणत्याही धर्माच्या माणसाला सार्वजनिक शांतता भंग करण्यास सक्त मनाई केली पाहिजे यात गणेशोत्सवातील डीजे ढोल ताशे पण आलेच.
अगदी सहमत आहे. 'आमच' बंद करा काही हरकत नाहि पण 'त्यांचही' बंद करा अस म्हणणारे दिसतात. फक्त अस आहे कि हिंदू धर्मात उदंड सण उत्सव आहेत. आन त्याच स्वरुप उन्मादी होत चाललय. इतर धर्मांचही उन्मादी होतच आहे.झुंड आली कि उन्माद आलाच.
उगाच सेक्युलर पणाचा आव आणायचा आणि इतर धर्मातील अंधश्रद्धा बद्दल तोंड बंद ठेवायचे या दुटप्पीपणाबद्दल लोकांना राग आहे.
नक्कीच हो पण अस का आहे यावर वरती एके ठिकाणी थोडस भाष्य केले आहे.

In reply to by सर टोबी

आता वळूया आपल्या ठसठसणाऱ्या वेदनेकडे. फक्त प्रबोधन 'आमचेच' का म्हणून? यावर माझी मते खालील प्रमाणे: प्रबोधन तर सर्वांचेच व्हायला पाहिजे , त्यामुळे "आमचेच का" असे म्हणण्याची पाळी आलीच नसती जर हे प्रबोधन जर सर्व धर्मात झाले असते तर.. हे म्हणजे असे कि मला पिके चित्रपट आवडला, नक्कीच पण पुढे विचार केल्यावर असे हि वाटू लागले कि अरे याने हिंदूइतर धर्माबद्दल पण तेवढेच जास्त प्रसंग दाखवले असते तर? ते का नाही दाखवले तरी त्यामानाने पिके चा दिदर्शक एवढा ढोंगी नाही पण अनिस ज्यांच्याबरोअबर दिस्ततात ते मात्र निश्चितच असे एकांगी ढोंगी दिसतात असो बदल सगळीकडे व्हावा असेच वाटते,

दाभोलकरहे हिंदू द्वेशी आणि डाव्यांचा पॉलिटिक्स अजेंडा राबवत होते चाणाक्ष लोक जाणतात . इथे एवढी चर्चा करायची गरजच नव्हती . त्यांचा अंध श्रद्धा निर्मूलन हा नव्हताच तर ती हिंदू ची विटंबना करणे हा होता . त्या मुळे त्यांच्या आंदोलनाचा काहीच परिणाम समाजावर झाला नाही

In reply to by Rajesh188

त्यांचा अंध श्रद्धा निर्मूलन हा नव्हताच तर ती हिंदू ची विटंबना करणे हा होता .>>> म्हणजे त्यांचा अंधश्रद्धा निर्मूलन हा अजेंडा नव्हताच तर ती हिंदूंची विटंबना करणे हा अजेंडा होता असे तुम्हाला खरोखरच म्हणायचे आहे का? राजेश

In reply to by प्रकाश घाटपांडे

हो दाभोलकर आणि मंडळी नी अंध श्रद्धा निर्मूलन करण्यात बिलकुल स्वारस्य नाही. हिंदू धर्म नष्ट किंवा कमजोर करायचा असेल तर . हिंदू धर्माच्या श्रद्धा स्थानांना सुरुंग लावणे हा मार्ग त्यांनी. निवडला होता. त्यांना खरोखर अंध श्रद्धा मुक्त समाज निर्माण करायचा असता तर सर्व धर्मातील अंध श्रद्धा,श्रद्धा चा विरोध केला असता. माझे स्पष्ट मत आहे. हिंदू च्या श्रद्धा पण लवचिक आहेत आणि अंध श्रद्धा सुद्धा. सर्व हिंदू ना त्या पाळण्याची जबरदस्ती नाही. हिंदू सोडून बाकी धर्मातील श्रद्धा आणि अंध श्रद्धा त्या धर्मातील लोकांनी पाळव्या म्हणून जबरदस्ती केली जाते. पण दाभोलकर कधीच ह्या विषयावर बोलत नाहीत. काय कारण असेल. विदेशातून मिळणारा प्रचंड पैसा?

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती आयोजित ईद उल अजहा निमित्त कुर्बनीचा अर्थ नवा ह्या अभियानाच्या अंतर्गत कुर्बानीचा नवा अर्थ शोधणाऱ्या दोन युवकांशी विशेष ऑनलाईन संवाद आज झाला. जरुर हा कार्यक्रम पहा. विषय - भारतीय मुसलमान आणि अंधश्रद्धा निर्मूलन सहभाग: पैगंबर शेख(समन्वयक, आर्थिक कुर्बानी शिक्षणासाठी उपक्रम, अध्यक्ष, मिडिया फौंडेशन, दुर्गप्रेमी,लेखक आणि सामाजिक कार्यकर्ते) समीर शेख (पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते) संवादक : फारुख गवंडी,तासगांव (मअंनिस राज्य कार्यकारिणी सदस्य) https://www.facebook.com/DrDabholkar/videos/3101651006733504