Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by फारएन्ड on Mon, 08/26/2019 - 04:17
लेखनविषय (Tags)
मौजमजा
चित्रपट
लेखनप्रकार (Writing Type)
आस्वाद
समीक्षा
काय डोक्याला ताप राव! असले झंपट टीशर्ट आणि प्यांट घालून फाईट करायला लावतात. तो मेन व्हिलन राहतो बाजूला पिक्चर भर नुसत्या धमक्या देत आणि हीरो आला की फाईटला आम्ही. तरी बरं ष्टोरीत लौकर मेलो तर लगेच दुसरा पिक्चर शोधून तिथली फाईट करायला जाता येतं. नाहीतर उगाच चार महिने शूटिंग ला रोज वेळेवर तयार राहावं लागतं. त्यात अर्ध्या वेळा शूटिंग कॅन्सल. आता बच्चनकडून, धरमपाजींकडून मार खायला काय वाटायचं नाही. पहिलं म्हणजे ते खरंच मारतायत असं वाटायचं. दुसरं म्हणजे सीन टायमावर शूट होउन बच्चन मोकळा व आपण मोकळे दुसर्‍या स्टुडिओत जायला. नाहीतर एकेकाचे नखरे. "आज मूड नही है". फाईट केलीच, तर अ‍ॅक्शन अशी की आजवर कधी डोक्याच्या वर हात उचलला होता का नाय असं वाटेल. याच्या अ‍ॅक्शनमधे काहीच जोर नाही, म्हणून बॅकग्राउण्डला च्भिश्श! च्भिश्श! सारखे आवाज देतात, आणि आम्ही आडवं व्हायचं. त्यात ग्रूप फाईट असली तर अजून कल्ला. हा हीरो समोरच्याला मारत असला तर मागून मारायचं नाही. थांबायचं. तो त्या समोरच्याला मारणार, आपण इकडं वाट बघायची. किक शॉट असेल तर काही लोकांना एक किक शूट केल्यावर कमरेला बाम लावायला लागतो. मग त्या पहिल्या किकचाच अ‍ॅक्शन रिप्ले २-३ वेळा व्हूप व्हूप आवाज काढत दाखवतात. मग दोन तासानी पुढचा शॉट. मग आम्ही हात उगारून यायचं या बाजूने. तोपर्यंत हा हीरो आराम करून येणार मग फाईट कंटिन्यू. त्यात सीन कंटिन्यूटीवाल्या कोणाचं डोकं चाललं, तर तो आधीचा मारलेला पुन्हा आडवा करतात समोर, नाहीतर कोणाला पत्ता नाही. आता बघा, शूटिंग दोन तासानं झालं तरी पिक्चर मधे हा तोच सीन आहे ना? हीरोने त्याला आडवा करून इकडं वळल्यावर तो पडलेला कुठं गायब झाला? जाउद्या. आपल्याला काय करायचं आहे. कधीकधी तर सेम पिक्चर मधे आधी मेलो असलो तरी नंतरच्या फाईटसीनला परत आणतात. कोणाला कळण्याएवढं आपल्याला कोण लक्षात ठेवतो. दुसरं, एकेक चिपाड हीरो. फाईट मधे सुद्धा आपली झुल्फं ठीक आहेत ना बघत बसणार. इकडून फाईट मार म्हंटलं तर म्हणतो नाही - कॅमेर्‍यापुढं फक्त उजव्या साईडने येणार. मग एक "ढिशूम" आणि आम्ही आडवं पडायचं खाली आणि पडून राहायचं 'कट' होईपर्यंत. आता याच्या फाईट ने जाहिरातीतला कट आउट सुद्धा खाली पडणार नाही. पण ठीक आहे, सीन आहे, पडलो. तर काय पुन्हा उठून बसणार नाही, त्याला पुन्हा मारणार नाही? सीन मधे पाहिलं तर हीरो तसाच पुढं. सीन लिहीणारे पण कायपण लिहीतात. तो सर जॉन, जे के, ठुकराल नायतर असल्याच कोणाच्यातरी अड्ड्यावर आम्ही वॉचमन सारखे उभे सीनमधे. आता पंध्रा वर्षांपूर्वी हीरोच्या कोणालातरी याने मारलं, म्हणून कधीतरी तो हीरो मारायला यील म्हणून आम्ही काय २४ तास दारात उभं राहणार रागीट चेहरे करून? आणि हा जेकेला मारायला आलाय, तर आम्ही कशाला त्याच्यावर एवढे चिडून त्याच्या अंगावर जाणार? डायरेक्टर म्हणतो एकदम फुल रागात दात काढून, हातपाय हलवत जायचं. उगाच कायच्या काय. नाहीतर तो दचकायचा सीन. आता हीरो फुल बाईक घेऊन भिंत फोडून आला तर तेव्हाच सगळे एकदमच दचकतील ना? तर तसं नाय दाखवायचं. हीरो जिकडं जसा बघेल तसा तिकडच्यांनी दचकायचं. कायपण कॉमेडी. फाइटमास्तर पण कायपण फाईट करतो - फुल बँडेज मधला हीरो सलाईन काढतो, हॉस्पिटल मधून पळत येतो आणि आम्हाला एका फाईटमधे आडवा करतो. त्यात परत हेटाई - आपण रिअल मधे फाईट करताना मार खाईल पण पळून नाही जाणार. तर इथं, फाईटच्या शेवटी हीरो नुसता आमच्याकडे रागाने पाहतो तर आम्ही पळून जायचं, नाहीतर हीरॉइनकडून पण फाईट खायची. आपल्याला त्याचे काही नाही. आता तो चिपाड हीरो जर दहा जण आडवे करू शकत असेल तर हीरॉइनने काय घोडं मारलंय. पिक्चर मधल्या सगळ्या फाईटमधे असलो तरी आमचं नाव पिक्चर मधे येतच नाय. मेन व्हिलनने नाव घेतलं तर ते फितूर झालो समजून मारून टाकायला. हीरो तर डायरेक्ट "ये भाडे के टट्टू" म्हणूनच सांगतो. आता मेन व्हिलनचा नोकरच आहे ना? हीरो ज्या ठिकाणी नोकरी करतो तिथला तो पण काय भाडे का तट्टू असतो काय? त्या 'कुली' च्या फाईटमधे बच्चनला लागलं तेव्हा फुल हेडलाईन. सगळे नेते हॉस्पिटलात. ठीक आहे, आम्हाला पण वाईट वाटलं. लै लागलं होतं, त्यात बच्चन फेमस आहे. पण अशा फाईट मधे आमच्यासारखे जेव्हा जखमी होतात तेव्हा बातमीपण येत नाही. प्रोड्यूसर चांगला असेल तर भरपाई चांगली मिळते, नाहीतर काय खरं नाही. जाउ दे. जरा रोल तर नीट लिहा राव. कालिया, सांबा, पीटर, नारंग सारखं काहीतरी. नाहीतर फुल मेन व्हिलनचा रोल कसा मिळेल? सूट घालून जेके म्हणून थेट पोलिस स्टेशन मधे जायचा सीन, नाहीतर मोठ्या हवेलीत हुक्का घेऊन बसायचा सीन करायचा आहे. "बाँध दो इसे" डायलॉग मारायचा आहे. कोणी आमच्यासारखे साईड व्हिलन असेल तर सांगा काय करता येइल.
  • Log in or register to post comments
  • 11947 views

प्रतिक्रिया

Submitted by फारएन्ड on Mon, 08/26/2019 - 04:20

Permalink

पूर्वप्रकाशित

मिपावरच्याच या आवडलेल्या लेखावरून प्रेरणा घेउन एक खूप आधीचा लिहून ठेवलेला हा लेख देत आहे :)
  • Log in or register to post comments
Profile picture for user जॉनविक्क

Submitted by जॉनविक्क on Mon, 08/26/2019 - 21:23

In reply to पूर्वप्रकाशित by फारएन्ड

Permalink

वा. त्या लेखाच्या स्पिन-ऑफ़ चा प्रयत्न एकदम मस्त आहे

पण थोडाफार अजून प्रयत्नच आहे. Yet, lets hope to rock further, for the upcoming stuff. ALL THE BEST.
  • Log in or register to post comments

Submitted by यशोधरा on Mon, 08/26/2019 - 09:42

Permalink

सगळे साईड व्हिलन तुला दुवा

सगळे साईड व्हिलन तुला दुवा देणार, हा लेख वाचून!
  • Log in or register to post comments

Submitted by उपेक्षित on Mon, 08/26/2019 - 13:42

Permalink

थोडा विस्कळीत वाटला आणि

थोडा विस्कळीत वाटला आणि नेहमीचा (फारेंड) टच नाही जाणवला दादा.
  • Log in or register to post comments

Submitted by उगा काहितरीच on Mon, 08/26/2019 - 17:38

In reply to थोडा विस्कळीत वाटला आणि by उपेक्षित

Permalink

+1

+1
  • Log in or register to post comments

Submitted by आजी on Mon, 08/26/2019 - 16:59

Permalink

लेख आवडला. जुने खलनायक आठवून

लेख आवडला. जुने खलनायक आठवून हसू आलं.
  • Log in or register to post comments

Submitted by गवि on Mon, 08/26/2019 - 17:42

Permalink

फारएन्ड टच मिसिंग. पण होतं

फारएन्ड टच मिसिंग. पण होतं कधीकधी. मुद्दे मात्र भारी आहेत.
  • Log in or register to post comments

Submitted by गवि on Mon, 08/26/2019 - 17:44

In reply to फारएन्ड टच मिसिंग. पण होतं by गवि

Permalink

नेमकं काय मिसिंग, तर फारएन्ड

नेमकं काय मिसिंग, तर फारएन्ड यांच्या विनोदी शैलीत एक धारदारपणा असतो, 'ठ्ठो'जनक. तो किंचित बोथट वाटला इतकंच. लेकिन अंदाज तो वही पुराना है. येऊ द्या आणखी.
  • Log in or register to post comments

Submitted by कानडाऊ योगेशु on Mon, 08/26/2019 - 17:52

In reply to नेमकं काय मिसिंग, तर फारएन्ड by गवि

Permalink

+१

हेच म्हणतोय. कदाचित फारएन्ड टच मिळण्यापूर्वीचे लेखन असावे हे. एका फर्मास परिक्षणाच्या प्रतिक्षेत..
  • Log in or register to post comments

Submitted by नाखु on Mon, 08/26/2019 - 18:17

Permalink

आम्ही सनी देओल आणि

आणि अमिताभची खलनायकाच्या डाव्या उजव्या शी होणारी (तर्रीबाज पंच मिसळ) मारामारी पहायला बसावं आणि पडद्यावर विवेक मुश्रन आणि देव आनंदच्या हडती डुलती चलचित्रांची (फुळकावणी मिसळ खायला मिळाली एक दुसरा फरसाण पापडी वगळता) मिसळीचे नाव आणि दर्जा याचा ताळमेळ मिसळलेला पांढरपेशा मध्यमवर्गीय नाखु
  • Log in or register to post comments

Submitted by Namokar on Tue, 08/27/2019 - 19:50

Permalink

लेख आवडला >>+११११

लेख आवडला >>+११११
  • Log in or register to post comments

Submitted by मित्रहो on Wed, 08/28/2019 - 11:16

Permalink

लेख आवडला

कैफियत छान मांडली आहे
  • Log in or register to post comments

Submitted by चौथा कोनाडा on Wed, 08/28/2019 - 21:41

Permalink

लेख आवडला.

लेख आवडला. सुधीर, रुपेशकुमार, जानकीदास, मॅकमोहन पासूनची सर्व नट मंडळी डोळ्यांसमोरुन तरळून गेली.
  • Log in or register to post comments

Submitted by पियुशा on गुरुवार, 08/29/2019 - 14:11

Permalink

"च्भिश्श! च्भिश्श! याचा

"च्भिश्श! च्भिश्श! याचा उच्चार कसा कराय्चा म्हने ?;) लेख आवड्या :)
  • Log in or register to post comments
Profile picture for user जॉनविक्क

Submitted by जॉनविक्क on गुरुवार, 08/29/2019 - 14:54

In reply to "च्भिश्श! च्भिश्श! याचा by पियुशा

Permalink

वा काय देखणा प्रतिसाद लिहला आहे

मिपाकर्स म्हणजे रत्नांची खाण आहे खाण!
  • Log in or register to post comments

Submitted by diggi12 on Wed, 10/13/2021 - 19:28

Permalink

मस्त

मस्त
  • Log in or register to post comments

Submitted by विवेकपटाईत on गुरुवार, 10/14/2021 - 17:32

Permalink

हा ही लेख मस्त. साईड विलेन

हा ही लेख मस्त. साईड विलेन म्हंटले की मला महाराष्ट्रातील एक नेता डोळ्यांसमोर उभा राहिला.
  • Log in or register to post comments

Submitted by रंगीला रतन on गुरुवार, 10/14/2021 - 23:54

Permalink

लै भारी.

लै भारी.
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com