✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

मिसळपाववरचं शिफारस करण्यायोग्य साहित्य

इ
इरामयी यांनी
Wed, 07/31/2019 - 21:15  ·  लेख
लेख
गेले काही दिवस मिसळपाव धुंडाळत असताना असं लक्षात आलं की मिसळपाववर केवढं वैविध्यपूर्ण आणि सुंदर लेखन झालेलं आहे! आज २०१९ मध्ये पूर्वीचं चांगलं लेखन हुडकून काढणं हे खूप कठीण आहे. या ट्रायल अँड एरर पद्धतीने शोधताना बरेच उत्तम लेख, काव्य, मालिका निसटून जाण्याचीच शक्यताच जास्त. त्यामुळे हा नवा धागा. मिसळपाववर पूर्वी प्रसिद्ध झालेल्या लोकप्रिय लेखनाची एका ठिकाणी यादी करता येऊ शकेल का? मिसळपाववर असलेल्या जुन्या जाणत्या सदस्यांना एक प्रामाणिक आवाहन. आपल्याला आवडलेल्या आपल्या आठवणीतल्या मिसळपाववर गाजलेल्या उत्तमोत्तम साहित्याचे (लेख, काव्य, चर्चा, कलाकृती, आदी सर्व) आपण आपल्या प्रतिसादांत दुवे द्यावेत ही विनंती. आपल्याला आवडलेले पूर्वी प्रसिद्ध झालेले साहित्य हे केवळ मिसळपाववरचेच असावे आणि ते आपल्या दृष्टीने तरी शिफारस करण्याजोगे असावे ही विनंती आहे. यामुळे मिसळपाववर नवीन सदस्यांसाठी एक अभिजात आणि लोकप्रिय साहित्याचा एक उपयुक्त इन्डेक्स उपलब्ध होईल. धन्यवाद!
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
हे ठिकाण
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन
सद्भावना
आस्वाद
शिफारस

प्रतिक्रिया द्या
19438 वाचन

💬 प्रतिसाद (35)

प्रतिक्रिया

हे वाचलंय का?

यशोधरा
Wed, 07/31/2019 - 21:22 नवीन
मिपा पुस्तकं हा विभाग वाचा, मिपा विशेषांक हा विभाग वाचा. इथून सुरुवात करा. :)
  • Log in or register to post comments

होय. अण्वस्त्रांबाबतची फसवणूक

इरामयी
Wed, 07/31/2019 - 21:26 नवीन
होय. अण्वस्त्रांबाबतची फसवणूक आत्ता वाचत आहे. धन्यवाद!
  • Log in or register to post comments

सगळ्यात सोपा अनोफिअशल उपाय म्हणजे

जॉनविक्क
Wed, 07/31/2019 - 21:34 नवीन
स्थळावर जे जे सदस्य मान्यवर म्हणून गणले जातात त्यांच्या वाचनखुणा उचकायच्या ते नियमीत ज्यांच्या खरडींना उत्तरे देतात त्यांच्या वाचनखुणा उचकायच्या व त्यांनी लिहलेले लेखहि बघायचे (रच्याकने धिस इज हॉ गुगल रँकिंग वर्क्स ऑटोमेटिकली)
  • Log in or register to post comments

http://www.misalpav.com/node

सस्नेह
Wed, 07/31/2019 - 21:50 नवीन
http://www.misalpav.com/node/23847 हे पहा. इथे बरेच काही सापडेल.
  • Log in or register to post comments

सुरवात मिपावरच्या सर्वात

विजुभाऊ
गुरुवार, 08/01/2019 - 06:00 नवीन
सुरवात मिपावरच्या सर्वात हिट्ट धाग्याने करुया http://www.misalpav.com/node/6332
  • Log in or register to post comments

हे नक्की काय आहे ?! !!

इरामयी
गुरुवार, 08/01/2019 - 08:25 नवीन
हे नक्की काय आहे ?! !! अनपेक्षित ! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ

गवि आणि प्रा. डॉ. दिलीप

प्रचेतस
गुरुवार, 08/01/2019 - 08:16 नवीन
गवि आणि प्रा. डॉ. दिलीप बिरुटे ह्यांचे सर्वच साहित्य वाचनीय आहे. गणपाशेठच्या पाककृती तर खासच.
  • Log in or register to post comments

धन्यवाद!

इरामयी
गुरुवार, 08/01/2019 - 08:24 नवीन
धन्यवाद!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

गवि आणि प्रा. डॉ. दिलीप

गवि
गुरुवार, 08/01/2019 - 09:47 नवीन
गवि आणि प्रा. डॉ. दिलीप बिरुटे ह्यांचे सर्वच साहित्य वाचनीय आहे. गणपाशेठच्या पाककृती तर खासच.
यात काही काळेबेरे नसावे ना सर?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

५० टक्के खोडसाळपणा आहेच.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गुरुवार, 08/01/2019 - 11:37 नवीन
माझं नाव वगळून फक्त तुमचंच नाव लिहिलं असतं तर समजू शकलो असतो. पण, माझ्या नाव लिहिण्याबाबत शुद्ध खोडसाळपणा दिसतो. गविसेठ, उत्तम लिहितातच त्यात काही वाद नाही. प्रचेतसचं उत्तम लेखन. वल्ली उर्फ प्रचेतस उत्तम लेखन करायचे. चहा पोह्यांचा व्यग्रतेमुळे ते व्यस्त आहेत असं कळतं. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

धन्यवाद!

इरामयी
गुरुवार, 08/01/2019 - 12:39 नवीन
धन्यवाद!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

गणपाशेठ, दिपककुवेत यांनी झारा

कंजूस
गुरुवार, 08/01/2019 - 09:12 नवीन
गणपाशेठ, दिपककुवेत यांनी झारा केव्हाच टांगलाय.
  • Log in or register to post comments

सोत्रिंच्या कॉकटेल रेसिपी

महासंग्राम
गुरुवार, 08/01/2019 - 10:14 नवीन
सोत्रिंच्या कॉकटेल रेसिपी भारीयेत नुसतं वाचूनच नशा चढते
  • Log in or register to post comments

माझे सादर धागे सुपर हिट होते

हस्तर
गुरुवार, 08/01/2019 - 11:42 नवीन
माझे सादर धागे सुपर हिट होते बाकी सदस्यांनी उडवूं टाकले खेकडा मनोवृत्ती
  • Log in or register to post comments

धन्यवाद!

इरामयी
गुरुवार, 08/01/2019 - 12:39 नवीन
धन्यवाद!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हस्तर

इथे भरपूर धाग्यांच्या लिंक आहेत

महासंग्राम
गुरुवार, 08/01/2019 - 11:53 नवीन
http://www.misalpav.com/node/२३८४७ इथे भरपूर धाग्यांच्या लिंक आहेत, पण सांभाळून उघडा काही जखमेवरच्या खपल्या उडू शकतात
  • Log in or register to post comments

धन्यवाद मंदारराव!

इरामयी
गुरुवार, 08/01/2019 - 12:38 नवीन
धन्यवाद मंदारराव!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: महासंग्राम

ह्म्म!http://www.misalpav.com

इरामयी
गुरुवार, 08/01/2019 - 12:42 नवीन
ह्म्म! http://www.misalpav.com/node/२३८४७ पेज नॉट फाऊंड!
  • Log in or register to post comments

ओके. आकडा रोमन लिपीत लिहिला

इरामयी
गुरुवार, 08/01/2019 - 12:44 नवीन
ओके. आकडा रोमन लिपीत लिहिला की उघडतं.
  • Log in or register to post comments

मी

मिसळलेला काव्यप्रेमी
गुरुवार, 08/01/2019 - 13:09 नवीन
मी नेहमी पाहिलय, बर्‍याच वेळा जेव्हा कोणी नविन मिपाकर चांगल्या धाग्यांविषयी विचारतात, तेव्हा फारच क्वचित कवितांचा उल्लेख होता. (मोकलाया सोडून, तो ही दंगा घालायच्या उद्देशाने, त्याला आक्षेप नाहीच्चे :) ). पण मिपा वर क्रांती तै, प्राजु तै, गणेशा, शरदिनी, रामदास काका, आणि ज्ञानोबांचे पैजार यांची विडंबने, मेवे यांच्या फार सुंदर कविता आहेत मिपावर. त्याही वाचाव्या अशी विनंती मी करतो.
  • Log in or register to post comments

खुद्द तुझ्या कवितांचा मी पंखा

गवि
गुरुवार, 08/01/2019 - 13:23 नवीन
खुद्द तुझ्या कवितांचा मी पंखा आहेच मिका. बेष्ट असतात. कधीकधी फार काळ त्रास देणारीही एखादी लिहितोस. कुठे फेडशील ही पापं? ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळलेला काव्यप्रेमी

हा हा

मिसळलेला काव्यप्रेमी
गुरुवार, 08/01/2019 - 13:27 नवीन
कुठे फेडशील ही पापं?
हे लिहून तुम्ही केलीली पाप जिथे तुम्ही जाऊन फेडणार आहात तिथेच ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

चला, मी, मिकाशेठ, प्रचु,

गवि
गुरुवार, 08/01/2019 - 13:35 नवीन
चला, मी, मिकाशेठ, प्रचु, प्राडॉ आणि गणपा यांनी एकमेकां साह्य करुन परस्परांच्या रिक्षा उत्तम फिरवल्या. प्लॅन यशस्वी. सर्वांचे आभार. ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळलेला काव्यप्रेमी

मेलो.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गुरुवार, 08/01/2019 - 13:44 नवीन
=)) बेक्कार फुटलो. आणि मनातल्या मनात सारखा हस्तर सॉरी हसतोय. कसं सुचतं सर तुम्हाला. फ्रेंड रिक्वेष्ट पाठवू का ?;) -दिलीप बिरुटे (गविसरांच्या लेखनाचा चाहता)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

हा हा हा

मिसळलेला काव्यप्रेमी
गुरुवार, 08/01/2019 - 14:03 नवीन
लैच बक्कार.. :ड :ड
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

क्रांती

मिसळलेला काव्यप्रेमी
गुरुवार, 08/01/2019 - 13:13 नवीन
क्रांती तै च्या कविता: http://www.misalpav.com/user/3804/authored आणी हो, आमचा चाणाक्य राहिलाच, इथे त्याच लिखाणं
  • Log in or register to post comments

प्राजु तै

मिसळलेला काव्यप्रेमी
गुरुवार, 08/01/2019 - 13:17 नवीन
प्राजु तै च्या कविता: http://www.misalpav.com/user/121/authored
  • Log in or register to post comments

भटकंती लेख शोध २०१६

जगप्रवासी
गुरुवार, 08/01/2019 - 16:06 नवीन
कंजूस काकांनी बऱ्याच भटकंती लेखांची एकत्र यादी बनवली आहे जी कोणालाही उपयोगी पडू शकते दुवा - https://misalpav.com/node/37993 एक जुने मिपाकर आहेत चाफा, माझ्या आवडत्या लेखकांपैकी एक. त्यांच्या रहस्यकथा/गूढकथा छान आहेत पण त्यांच्या लेखांचे दुवे सापडत नाहीयेत, सापडले की देतो.
  • Log in or register to post comments

It's a reservoir!

इरामयी
Sat, 08/03/2019 - 05:52 नवीन
It's a reservoir! धन्यवाद! सर्वांना धन्यवाद. ही शिदोरी खूप दिवस पुरेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जगप्रवासी

किल्लेदारांचे फोटू.. https:/

राघव
गुरुवार, 08/01/2019 - 19:07 नवीन
किल्लेदारांचे फोटू.. https://www.misalpav.com/user/10168/authored
  • Log in or register to post comments

मिपाचे 1 नंबर लेखक

अश्फाक
गुरुवार, 08/01/2019 - 20:03 नवीन
रामदास यांचे सर्व लिखान
  • Log in or register to post comments

मिपाचे नंबर 44961 लेखक

अभ्या..
गुरुवार, 08/01/2019 - 20:10 नवीन
मिपाचे नंबर 44961 लेखक यांचेही लिखाण वाचा. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अश्फाक

परा मोजी सगळे विसरले

हस्तर
Fri, 08/02/2019 - 13:29 नवीन
परा मोजी सगळे विसरले
  • Log in or register to post comments

सर्वांना धन्यवाद. ही शिदोरी

इरामयी
Sat, 08/03/2019 - 05:53 नवीन
सर्वांना धन्यवाद. ही शिदोरी खूप दिवस पुरेल.
  • Log in or register to post comments

फारएन्ड यांची सर्व चित्रपट

मृत्युन्जय
Sat, 08/03/2019 - 15:29 नवीन
फारएन्ड यांची सर्व चित्रपट परीक्षणे न चुकता वाचा. फार धम्माल करमणूक आहे ती. शिवाय पराने लिहिलेले सुपरहिट चित्रप्ट देश्द्रोही चे परिक्षण देखील नक्की वाचा. रामदास काकांचे शिंपीणीचे घरटे, काटेकोरांटीची फुले हे तर आविस्मरणीय, अशक्य सुंदर, काही काळापुर्वी असाच एक धागा आला होता. त्यात बरीच माहिती मिळेल. धागा इथे वाचता येइलः https://www.misalpav.com/node/19057
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा