सूचना

वारंवार सूचना देऊनही काही सदस्य वैयक्तिक आणि खालच्या पातळीवरील प्रतिसाद देत आहेत. तसेच समाजात धार्मिक वा जातीय तेढ निर्माण करणारं लिखाण आढळल्यास विना सूचना कडक कारवाई करण्यात येईल.

(चहा पिऊन आलो..)

Primary tabs

ज्ञानोबाचे पैजार's picture
ज्ञानोबाचे पैजार in जे न देखे रवी...
29 Jun 2019 - 3:46 pm

पेरणा
अर्थात प्राची ताईंची मनातल्या मनात क्षमा मागून

भेटायला गेलो,
गप्पा मारून आलो?
माझ्याच घरुन मी
चहा पिऊन आलो..

ना थेंब दिलास पाण्याचा
पण बोध फुकट दिलास.
आपापल्या घरून आपण
चहा पिऊन आलो..

मित्र होते वर्‍हाडी,
पुण्यामध्ये नवखे ?
त्यांना कसे पटावे मी
चहा पिऊन आलो..?

कप जरी धुतले तरी
थोडे पिवळे झाले ..
कुणास समजू न देता मी
(गुपचुप) चहा पिऊन आलो.

पैजारबुवा,

आरोग्यदायी पाककृतीकाणकोणकोडाईकनालगरम पाण्याचे कुंडव्याकरणउपहाराचे पदार्थवन डिश मीलकृष्णमुर्ती

प्रतिक्रिया

खिलजि's picture

29 Jun 2019 - 3:54 pm | खिलजि

पैंबू काका ,,, आता कुणी " मंदिर पिऊन आलो " असे केले तर .. तुमचे तर झ्याक झालेय , पुढे बघू आता काय होतंय ते ...

खिलजि's picture

29 Jun 2019 - 3:55 pm | खिलजि

मदिरा मदिरा मदिरा

बोलायचे होते

नाखु's picture

29 Jun 2019 - 5:32 pm | नाखु

असं आहे का??
ब्रिटानिया मारी ते पतंजली मारी याच मारामारी त गुंतलेला नाखु पांढरपेशा

आलं, गवती चहाची पात होती की नाही?

जॉनविक्क's picture

29 Jun 2019 - 8:54 pm | जॉनविक्क

पण पुरेसा नाही.

जालिम लोशन's picture

29 Jun 2019 - 9:23 pm | जालिम लोशन

-):

डॉ सुहास म्हात्रे's picture

29 Jun 2019 - 9:46 pm | डॉ सुहास म्हात्रे

=)) =))

टर्मीनेटर's picture

1 Jul 2019 - 11:08 am | टर्मीनेटर

विडंबन आवडले :)

प्राची अश्विनी's picture

3 Jul 2019 - 11:05 am | प्राची अश्विनी

+१