अज्ञाताच्या काठावर
अज्ञाताच्या काठावर
शब्द होताना धूसर
अर्थ निरर्थाचे द्वैत
कल्लोळून झाले शांत
अदृष्टाच्या नजरेला
दिठी भिडविण्या आलो
अज्ञेयाच्या अनुल्लंघ्य
उंबर्याशी थबकलो
अथांगाच्या डोहावर
अनाहताचे तरंग
नश्वराच्या ओठावर
चिरंतनाचे अभंग
वर्गीकरण
जबराव जबराव जबराव
In reply to जबराव जबराव जबराव by खिलजि
भले भले
नितांत सुंदर कविता!
सुंदर !
उत्तम कविता
प्रतिसाद
मस्त