अज्ञाताच्या काठावर

लेखक: अनन्त्_यात्री जे न देखे रवी...
लेखनविषय:
काव्यरस
अज्ञाताच्या काठावर शब्द होताना धूसर अर्थ निरर्थाचे द्वैत कल्लोळून झाले शांत अदृष्टाच्या नजरेला दिठी भिडविण्या आलो अज्ञेयाच्या अनुल्लंघ्य उंबर्‍याशी थबकलो अथांगाच्या डोहावर अनाहताचे तरंग नश्वराच्या ओठावर चिरंतनाचे अभंग

खिलजि यांनी 11/06/2019 - 11:45 या दिवशी प्रकाशित केले.

Permalink

सुंदर, नितांत सुंदर कडवं झालेलं आहे "" अथांगाच्या डोहावर अनाहताचे तरंग नश्वराच्या ओठावर चिरंतनाचे अभंग "" सारेच नश्वर इथे ईश्वर शोधू पाहे अस्तिकाला द्वैताचे वेड नास्तिक ते मोडू पाहे

डॉ सुहास म्हात्रे यांनी 11/06/2019 - 16:56 या दिवशी प्रकाशित केले.

Permalink

सुंदर !

हणमंतअण्णा शंक… यांनी 11/06/2019 - 17:27 या दिवशी प्रकाशित केले.

Permalink

या कवीच्या कविता उत्तम आहेत. हा कवी शब्दांशी खूप खेळतो. गरजेचे स्कील. तरीही... (तीन डॉट्स बद्दल जाहीर माफी) या कवितांना अनुभवाचा स्पर्श जाणवत नाही. अशी बौद्धिक कविता वाचणार्‍याच्या मनात खोलवर रुजत नाही कारण - १. त्यातलं बुद्धिगम्य आणि चमत्कृति संपली की शब्दांच्या करामतीचा सांगाडा दिसू लागतो. २. त्यातलं अगम्याला अनुभवाचा पदरच नसतो त्यामुळे ती 'या हृदयीचे त्या हृदयी' होत नाही. अशा कवितेला चंप्र देशपांडे विचार कविता म्हणायचे. तुमची कविता- भावकवितेच्या आणि विचारकवितेच्या मध्येच कुठेतरी रेंगाळत राहते. शब्दनिवडीचं सामर्थ्य इथवरच तुमची कविता मर्यादित राहते.

अनन्त्_यात्री यांनी 15/06/2019 - 19:04 या दिवशी प्रकाशित केले.

Permalink

देणार्‍या सर्व कविता रसिकांना धन्यवाद!

ज्ञानोबाचे पैजार यांनी 19/06/2019 - 11:59 या दिवशी प्रकाशित केले.

Permalink

सुरेख, आवडली पैजारबुवा,