Skip to main content

सय

लेखक विशाल कुलकर्णी यांनी शुक्रवार, 20/03/2009 11:36 या दिवशी प्रकाशित केले.

जोडली नाती कशी मी
आठवणे आज नाही !

तोडले कां पाश सारे
साठले ते घाव काही !

सोडला तो गाव तुझा
आसवांचा ठाव नाही !

आठवांची राख झाली
दाटलेले भाव काही !

चांदण्यांची याद ओली
शापितांचा चंद्र नाही !

मानसी आकांत चाले
तुंबलेले बांध काही !

विशाल

लेखनविषय:

वाचने 1732
प्रतिक्रिया 7

प्रतिक्रिया

चांदण्यांची याद ओली
शापितांचा चंद्र नाही !

. . भारी रे !


"सोडला तो गाव तुझा
आसवांचा ठाव नाही !

आठवांची राख झाली
दाटलेले भाव काही !"

सुरेख !!! :-)

आंदे और भी ~~~~~!!!

बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..


मानसी आकांत चाले
तुंबलेले बांध काही!
वा! क्या बात है!
मस्त गझल!
क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}