मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

सय

विशाल कुलकर्णी · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
जोडली नाती कशी मी आठवणे आज नाही ! तोडले कां पाश सारे साठले ते घाव काही ! सोडला तो गाव तुझा आसवांचा ठाव नाही ! आठवांची राख झाली दाटलेले भाव काही ! चांदण्यांची याद ओली शापितांचा चंद्र नाही ! मानसी आकांत चाले तुंबलेले बांध काही ! विशाल

वाचने 1718 वाचनखूण प्रतिक्रिया 7

अनिल हटेला 20/03/2009 - 13:56
"सोडला तो गाव तुझा आसवांचा ठाव नाही ! आठवांची राख झाली दाटलेले भाव काही !" सुरेख !!! :-) आंदे और भी ~~~~~!!! बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

क्रान्ति 20/03/2009 - 19:08
मानसी आकांत चाले तुंबलेले बांध काही! वा! क्या बात है! मस्त गझल! क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}

In reply to by क्रान्ति

प्राजु 20/03/2009 - 19:20
तिथेही दिला आहे.. इथेही लिहिते. मस्तच. हरएक कल्पना सुंदर आहे. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/