Skip to main content

सय

लेखक विशाल कुलकर्णी यांनी शुक्रवार, 20/03/2009 11:36 या दिवशी प्रकाशित केले.
जोडली नाती कशी मी आठवणे आज नाही ! तोडले कां पाश सारे साठले ते घाव काही ! सोडला तो गाव तुझा आसवांचा ठाव नाही ! आठवांची राख झाली दाटलेले भाव काही ! चांदण्यांची याद ओली शापितांचा चंद्र नाही ! मानसी आकांत चाले तुंबलेले बांध काही ! विशाल
लेखनविषय:

वाचने 1728
प्रतिक्रिया 7

प्रतिक्रिया

चांदण्यांची याद ओली शापितांचा चंद्र नाही ! . . भारी रे !

"सोडला तो गाव तुझा आसवांचा ठाव नाही ! आठवांची राख झाली दाटलेले भाव काही !" सुरेख !!! :-) आंदे और भी ~~~~~!!! बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

मानसी आकांत चाले तुंबलेले बांध काही! वा! क्या बात है! मस्त गझल! क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}