श्री. अतिश तसीर यांच्या लेखावर प्रतिसाद
लोकहो,
श्री. अतिश तसीर यांनी २० मे २०१९ च्या टाईम नियतकालिकात मोदींना उद्देशून एक प्रदीर्घ लेख लिहिला आहे. भारतीय जनता आजून पाच वर्षं मोदी शासन सहन करेल काय, असं शीर्षक आहे.
मूळ लेख : http://time.com/5586415/india-election-narendra-modi-2019/
मराठी अनुवाद : https://www.aksharnama.com/client/article_detail/3277
अनुवादाबद्दल अक्षरनामा चमूस धन्यवाद.
या लेखावर प्रतिसाद द्यायचं मनात होतं. विचार करण्यात बराच वेळ गेला. पण प्रतिसाद तयार झाला एकदाचा. तो वाचून कृपया आपली मते कळवणे. याचा इंग्रजी तर्जुमा याच लेखाखाली प्रतिक्रियांत लिहिला आहे.
धन्यवाद! :-)
आपला नम्र,
-गामा पैलवान
-------------- प्रतिसाद सुरू -----------------------------
नमस्कार आतिश,
तुमचं नाव चुकीचं लिहिलं असेल तर सर्वप्रथम क्षमा मागतो. तुमचा टाईम मासिकातला मोदी मुख्य भेदजनक असल्याचा इंग्रजी लेख वाचला. जालनिर्देश असा आहे : http://time.com/5586415/india-election-narendra-modi-2019/
तुमच्या लेखावर भाष्य करू इच्छितो.
१.
.... हिंदू राष्ट्रवादी भाजपचे नेते ....भाजप कधीच हिंदू पक्ष नव्हता. हिंदू हा शब्द त्याच्या नावात नाही. २.
.... मोदींचा उदय ही एकाच वेळी भारतासाठी अपरिहार्यता आणि आपत्ती कशी होती हे समजून घेता ....मोदी ही भारतासाठी आपत्ती नाही. ती ल्युटनच्या दिल्लीवर कोसळलेली आपत्ती आहे. ३.
या देशात लोकानुनयी नेत्यांच्या वैधतेची आणि फँटसीची झलक पाहायला मिळते.भारतीय मतदार अतिशय व्यवहारी आहे. त्याला राजकीय कल्पनाविश्वांत रमायला आवडंत नाही. कल्पनासृष्टीचा ( = फँटसी) प्रांत बॉलीवूड साठी राखीव आहे. ४.
यामुळेच भारताबरोबरच इंग्लंड-अमेरिकेसह तुर्कस्तान, ब्राझीलमध्ये या काहीशा दूरवरच्या देशातही लोकानुनयी नेत्यांमुळे बहुसंख्याकांच्या तक्रारींना कसा आवाज मिळाला हे पाहायला मिळतं. हे इतकं पसरलेलं आहे की, त्याकडे दुर्लक्ष करता येत नाही. त्याच वेळी तुम्ही अधिक चांगलं किंवा अधिक आकर्षक नसलेल्या जगात ढकलले जाता.या विधानास काहीही आधार नाही. राष्ट्रीय आविष्काराची मागणी असणे म्हणजे लोकानुनय नव्हे. इंदिरा गांधींची 'गरिबी हटाव' म्हणजे लोकानुयय आहे. त्यांनी बँकांचं राष्ट्रीयीकरण केलं. तो लोकानुनय आहे. मोदींनी कधीच भरमसाट आश्वासनं दिली नाहीत. मोदींनी प्रभावकारी बदल घडवला. त्यास लोकानुनय म्हणंत नाहीत. ५.
.... पं. नेहरूंनी नव्या स्वतंत्र भारतासाठी धर्मनिरपेक्षता स्वीकारली.मात्र हा स्वीकार अधिकृत नाही. आंबेडकरांनी घटना लिहिली/संकलित केली. तिच्यात धर्मनिरपेक्ष वा धर्मनिरपेक्षता हे शब्द कुठेही आढळून येत नाहीत. ६.
.... याचा अर्थ जॉर्ज ऑर्वेलच्या उक्तीप्रमाणे ‘काही लोक अधिक समान असणार’ असा लावत असले ....तुमचं बरोबर आहे. सेक्युलर ही संज्ञा व्याख्याबद्ध नाही. धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली मुस्लिमांचं लांगूलचालन केलं जातं. प्रत्यक्षात मुस्लिमांनी समान पातळीवर हिंदूंशी मिळून मिसळून राहावे असे हिंदूंना अभिप्रेत आहे. ७.
स्वातंत्र्योत्तर भारतात प्रदीर्घ काळ नेहरूंच्या राजकीय वारसदारांनी लोकशाही तत्त्वं आणि कार्यप्रणाली यांचा दिखावा करत एका वंशपरंपरागत सरंजामशाहीचीच राजवट प्रस्थापित केली.खरंच अगदी बरोबर आहे. ८.
.... पण मोदींच्या निवडीमुळे सांस्कृतिक दरीही अधोरेखित झाली.दरी ? कसली दरी ? माझ्या मते मोदींच्या निवडीने कसलीही दरी पाडली नाहीये. किंबहुना मोदी पार ऐक्यकरी आहेत. ९.
धर्मनिरपेक्षता, उदारमतवाद, माध्यमस्वातंत्र्य यांसारख्या स्वतंत्र भारताच्या कौतुकास्पद कामगिरीकडे व्यापक कटकारस्थानाचा भाग म्हणून पाहिलं जाऊ लागलं. त्याचबरोबर ख्रिश्चन, इस्लाम यांसारख्या अल्पसंख्याकांपासून एकेश्वरवाद्यांशी हिंदू उच्चभ्रूंची असलेली भागीदारी आणि त्यांचं भारतातील बहुसंख्य हिंदूंवरील प्रभुत्व याकडेही.या काही कौतुकास्पद कामगिऱ्या नव्हेत, हे कृपया ध्यानी घेणे. धर्मनिरपेक्षता म्हणजे मुस्लिमांचे लांगूलचालन आहे. उदारमतवाद म्हणजे हिंदूंना झोडपणे आहे. आणि माध्यमस्वातंत्र्य उपभोगणारी माध्यमे मुळातून स्वतंत्र नाहीत. ती त्यांच्या मालकांची गुलाम आहेत. केवळ हिंदू अभिजनच नाही तर सगळेच घाऊक अभिजन मुळं गमावून बसलेले ( = deracinated) आहेत. १०.
त्यांनी अतुलनीय अशा राष्ट्रनिर्मात्यांवर हल्ला केला. नेहरू, नेहरूप्रणीत धर्मनिरपेक्षता, समाजवाद या वंदनीय गोष्टींना त्यांनी लक्ष्य केलं.धर्मनिरपेक्षता कधीच नेहरूंशी निगडीत नव्हती. याची समानार्थी संज्ञा ऐकिवात नाही. मात्र नेहृनिर्मित समाजवाद नामक काहीतरी बाब अस्तित्वात आहे. पण मोदींनी त्यास लक्ष्य केलं नाही. कारण की १९९० सालीच नेहरूंच्या समाजवादाची विल्हेवाट लागली होती. भारताने अर्थव्यवस्था खुली केल्यावर. ११.
त्यांनी ‘काँग्रेस-मुक्त भारता’ची घोषणा केली.ही मोदींची कल्पना नव्हे. ही सर्वप्रथम मो.क.गांधींनी १९४६ साली प्रस्तावित केली. १२.
हिंदू-मुस्लीम यांच्यात बंधुभाव निर्माण होण्याची मात्र इच्छा दाखवली नाही.ठार चूक ! मोदींनी गोसेवेसाठी शब्बीर सय्यद या मुस्लिमास पद्म पुरस्कार दिला. (संदर्भ : https://en.wikipedia.org/wiki/Shabbir_Sayyad ) १३.
सर्वांत महत्त्वाचं म्हणजे उच्चभ्रू ज्या उदार समन्वयवादी संस्कृतीवर विश्वास दाखवत होते, प्रत्यक्षात त्याखाली धार्मिक राष्ट्रवाद, मुस्लिमविरोधी भावना आणि खोलवर रुतलेली जातीय कट्टरता होती, हे मोदींच्या विजयामुळे पाहायला मिळालं.अभिजन मूलोत्पाटित म्हणजे मुळं गमावलेले ( = deracinated ) लोकं आहेत. त्यामुळे त्यांना बहुजनमानस कळंत नाही. मग आपल्या चौकटीत बसंत नाहीत म्हणून ते बहुजनांना बोल लावीत बसतात. ही खरी समस्या आहे, बरोबर किनई ? १४.
भारताला राजकारणप्रणीत दंगलींचा मोठा इतिहास आहे.पण मोदींनी दंगली थांबवल्या. १५.
मोदींनी मात्र अलीकडच्या अॅट्रोसिटीजविषयीच्या मौनापासून ते एक हजारापेक्षा जास्त मुस्लिमांचं शिरकाण त्यांच्या मातृभूमी गुजरातमधल्या २००२ सालच्या कत्तलीपर्यंत आपण जमावाचे मित्र आहोत हेच दाखवून दिलं.हे पूर्णपणे बिनबुडाचे आरोप आहेत. गुजरात दंगलींत न्यायालयाने मोदींना का निर्दोष घोषित केलं नाही यामागचं कारण तुम्हांस माहितीये का ? याचं कारण आहे की मोदींचं नावच नव्हतं आरोपपत्रात. न्यायालयाचं म्हणणं आहे की मोदींवर आरोप दाखल व्हायलाच नकोत मुळातून. १६.
मोदींनी कुठलेही पर्याय न देता भारताचे जुने आदर्श मोडीत काढले. नैतिक मूल्यमापनला वर्ग आणि संस्कृतीच्या संघर्षयुद्धाची भूमी केली.या तथाकथित मानकांची उदाहरणं मिळतील काय? धन्यवाद! १७.
त्यांच्या सत्ताकाळात जुने आदर्श म्हणजे केवळ सत्ताधारी उच्चभ्रूंचे हटवादी नखरे आहेत, असं मानलं जाऊ लागलं.हे अगदी नेमकं वर्णन आहे. उच्चभ्रूंचे पोकळ नखरे ! १८.
.... त्यांना २०१४चं चैतन्य पुन्हा जागवायचं असतं. क्रांती घडवणारं चैतन्य!हे तथाकथित क्रांतीचैतन्य म्हणजे खरंतर काँग्रेसच्या अपव्यवस्थापन व भ्रष्टाचाराचे पडसाद आहेत. १९.
१८५८मध्ये ब्रिटिशांनी भारतावर कब्जा मिळवण्याआधी भारतावर अनेक शतकं मुस्लिमांचं राज्य होतं.पार चुकीचा दृष्टीकोन ! दिल्लीतल्या इस्लामी राजवटीस उर्वरित भारताने कधीच मान्यता दिली नाही. २०.
.... Ayodhya, a place where Hindu nationalist mobs in 1992 had destroyed a 16th century mosque, ....भारतीय अभिजनांची आजूनेक बनवेगिरी. बाबरी नामे कुठलीही मशीद नव्हती. वादग्रस्त वास्तू जुनं राममंदिर होतं. बाबराने कुठलीही मशीद बांधली नाही. कारण की बिगर-इस्लामी प्रार्थनाक्षेत्री मशीद बंधने हा इस्लामचा घोर अवमान आहे. तुम्ही बाबरी मशिदीच्या घपल्याच्या आरपार पाहू शकाल अशी आशा आहे. २१.
मोदींचा आर्थिक चमत्कार अपयशी ठरला आहे.मोदींनी कसल्याही चमत्कारांचं आश्वासन दिलं नाही. २२.
ते भारतात धार्मिक राष्ट्रवादाच्या विद्वेषाची हवा निर्माण करण्यात सहाय्यभूत झाले आहेत.भारताला इतक्या मोठ्या प्रमाणावर आंतरराष्ट्रीय स्वीकृती ( = recognition) मिळाल्याचं यापूर्वी कधी पाहिलंय का तुम्ही ? ही मोदींनी उपसलेल्या कष्टांमुळेच ना? हिंदूंना अविष्कार हवाय आणि मोदी तो देताहेत. पूर्णविराम. तुम्ही ज्याला विष म्हणता ते हिंदूंसाठी खरंतर अमृत आहे. २३.
.... ‘‘तुम्ही जर मोदींबरोबर असाल तर तुम्ही देशाबरोबर आहात, पण जर तुम्ही मोदींबरोबर नसाल तर तुम्ही देशद्रोही शक्तींचे हात बळकट करत आहात.’’ ....सुदैवाने अथवा दुर्दैवाने सुमारे ५० कोटी भारतीयांचं हेच मत आहे. यामागील मनोभूमिका काय आहे याचा शोध तुम्ही घ्यावा म्हणून सुचवेन. एव्हढ्या लोकांना एकाच वेळी मूर्ख बनवणं अशक्य आहे, नाहीका? २४.
हिंदू जमाव गोमातेच्या नावाखाली रस्त्यावर उतरून सार्वजनिक हिंसाचार करत आहे. अनेकदा वाटतं की, हे सगळं सरकारच्या छुप्प्या मदतीनंच होत आहे.बहुतांश भारतात गोहत्या हा अपराध आहे. गोहत्या हे कायदा तोडणे आहे. गुन्हेगारीत मुस्लिम प्रमाणाबाहेर अधिक संख्येने आढळून येतात. तुम्ही ज्याला जमावी हत्या म्हणता ती खरंतर कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी लोकांनी केलेली उत्स्फूर्त मदत आहे. २५.
देशातील स्मार्टफोनधारकांनी अशी एखादी घटना चवीनं पाहून महिना उलटतो न उलटतो, तोच आणखी एक खवळलेला हिंदू जमाव दुसऱ्या कुणा असुरक्षित मुस्लिमावर तुटून पडतो.लव्ह जिहाद, जमीन जिहाद, क्षुल्लक कारणावरून मुस्लिमांची हिंदूंना मारहाण याविना एक महिनाही जात नाही. सावन राठोड आठवतोय? अंकित सक्सेना? धृवराज त्यागी? गूगल करून पहा. २६.
जे लोक मुस्लिमांवर हल्ला करायला उतावीळ असतात, तेच मागासवर्गीय हिंदूंवर हल्ला करायलाही तेवढेच उतावीळ असतात.प्रत्येकावर प्रत्येक ठिकाणी हल्ला करणारी लोकं एकंच आहेत हे कशाच्या आधारे म्हंटलं आहे? तसंही पाहता हे हल्ले अपवाद आहेत. हिंदू आपसांत गुण्यागोविंद्याने राहतात. २७.
भाजपला मागासवर्गियांची मतं गमावणं परवडणारं नाही.मित्रवर्य, परत तुमचं चुकतंय. भाजपला दलितांची मतं गमावणं परवडेल. मात्र म्हणून मोदी दलित-विरोधी होत नसतात. २८.
पण मोदींच्या गुजरातमधली जुलै २०१६ची घटना आहे. गायीचे कातडं काढणाऱ्या चार मागासवर्गीयांना उच्चवर्णीयांनी कपडे काढून, लोखंडी सळयांनी मारत त्यांची धिंड काढली होती.गाईगुरांची कातडी कमावणं हा चाम्भारांचा पिढीजात व्यवसाय आहे. नेमके त्यामुळेच ते अस्पृश्य झाले (असं मानण्यात येतं). सवर्ण लोकं सार्वजनिक ठिकाणी कातडी काढू देत नव्हते. एका प्रकारे ते अस्पृश्यतेस प्रतिबंध करीत होते. मात्र त्यांनी हे काम अधिक माणुसकीने करायला हवं याबद्दल दुमत नाही. २९.
स्त्रियांच्या प्रश्नांबाबतही मोदींचा रेकॉर्ड डागाळलेलाच आहे.आजिबात नाही. ३०.
२०१५मध्ये मोदी बांगला देशच्या पंतप्रधान शेख हसीना यांच्याबद्दल असं म्हणाले होते की, ‘स्त्री असूनही दहशतवादाबाबतची त्यांची कामगिरी लक्षणीय आहे.’ तेव्हा ते टीकेचे लक्ष्य झाले होते.भारतीय उपखंडातल्या प्रत्येक पुरुषाला माहितीये भारतीय नारीचा संघर्ष किती कठीण असतो ते. ती काही तिच्या पाश्चात्य सहावर्ती ( = counterpart ) सारखी नाहीये. दिवसभर मरमर काम करून संध्याकाळी परत कुटुंबासाठी राबते. घरकाम कचेरीइतकंच घाम काढणारं ( = demanding ) असतं. मोदींनी शेख हसीनांची केलेली प्रशंसा उत्स्फूर्त आहे. भारतीयांना ती अपमानजनक शेरेबाजी वाटंत नाही. ३१.
पण हेही खरं की, मोदींनी एका स्त्रीची संरक्षणमंत्रीपदीही नियुक्ती केली!घोर अज्ञ विधान. मोदींना स्त्रियांच्या क्षमतेवर कधीच शंका नव्हती. ३२.
.... मोदी सत्ताकाळात अल्पसंख्याकांवर (उदारमतवादी, निम्नवर्गीय, मुस्लीम, ख्रिश्चन इ.) सातत्यानं हल्ले होत आहेत.तुम्हांस यावर विश्वास ठेवावासा वाटतोय. पण मोदींनी तिहेरी तलाक संपवला. हा नेमका कोणावर हल्ला आहे असं तुम्हांस वाटतं ? मला मोदींविरुद्ध तक्रार करणारे कोणीही सर्वसामान्य दलित वा ख्रिश्चन आढळले नाहीत. उलट आपल्यावरील लैंगिक अत्याचारांचा पाढा वाचण्यासाठी नन्स आपणहून पुढे येताहेत. यालाच महिलांचं सक्षमीकरण म्हणतात. मोदींनी ते केलंय. ३३.
.... मोदींनी भारत अशा अवस्थेला आणून ठेवला आहे की, भारतीय समाजात आपापसातील भेद दाखवण्याचीच अहमहमिका सुरू झाली आहे.ही समस्या नव्हे. वैविध्यात ऐक्य हे आमचे ब्रीद आहे. तुम्ही ज्याला भेद म्हणता त्यास आम्ही वैविध्य मानतो. ३४.
पण मोदी २०१४ची असंख्य स्वप्नं आणि आकांक्षा यांचे प्रतिनिधी परत होणार नाहीत.त्यांना व्हायचंच नाहीये मुळातून ! ३५.
त्या वेळी ते डोळे दिपून जावेत अशी स्वप्नं दाकवणारे मसिहा होते.परत सांगतो, मसीहा ( काहीजण मोशीयाश म्हणतात) ही पाश्चात्य संकल्पना आहे. भारतीयांच्या दृष्टीने ती कवडीमोल आहे. ३६.
आज ते वचनपूर्ती करू न शकलेल्या एका राजकीय नेत्याच्या भूमिकेतून निवडणुकीला समोरे जात आहेत.चूक. त्यांनी कार्यपूर्ती केली. जरा पायाभूत सुविधांचे प्रकल्प बघा. तसंच तुम्ही 'जनधन' योजनेबद्दल ऐकलेलं दिसंत नाही. आजपावेतो गरिबांच्या नावाने खर्च होत असलेला सरकारी पैसा दलालांच्या घशात जात होता. आता गरिबांच्या थेट खात्यात रक्कम जमा होते. दलाल इल्ले. लोकांना हेच हवंय. कोण्या भुरट्या चोरांनी केलेल्या चोरीबंदीच्या तक्रारी नको आहेत. ३७.
.... मोदींनी आपला मतदारसंघ म्हणून निवडला होता. जेरुसलेम, रोम किंवा मक्का या शहरांसारखाच हिंदू मानसिकतेवर या शहराचा पगडा आहे.प्रचंड घोडचूक, भावा, प्रचंड घोडचूक केलीस ! वाराणसी काही मक्का नव्हे, रोम नव्हे आणि जेरुसलेमही नव्हे. हिंदूंना आपल्या गावाजवळचं तीर्थक्षेत्र स्थानिक काशी म्हणून लोकांना सांगायला आवडतं. म्हणजे काय ते शोधून काढाच ! ३८.
.... मोदी जो भारत घडवू पाहत आहेत, त्यात माझ्यासारख्याला कुठलंही स्थान असणार नाही.पार चूक. तुमच्यासाठी निश्चितंच जागा आहे. त्या ल्युटेनवाल्यांना धुत्कारून लावा आणि नव्या भारताच्या अवलोकनास सज्ज व्हा. तुम्ही मुस्लिम आहात की आंग्लभाषिक याचा काहीच फरक पडंत नाही. ३९.
.... भारत अधिकाधिक भारतच राहिला तर तो कधीच आधुनिक राष्ट्र म्हणून उभा राहू शकणार नाही.चुकीचं विधान. हिंदू आधुनिक आहेत. कारण की आधुनिक विज्ञान वैदिक तत्त्वांच्या विरोधात नाही. नेहरूंचं आकलन पार चुकलंय या बाबतीत. ४०.
भारताला पाश्चिमात्यांची, विज्ञानाची आणि तंत्रज्ञानाची गरज आहे. सर्वांत महत्त्वाचं म्हणजे भारताला वैज्ञानिक दृष्टिकोनाची आवश्यकता आहे. आपल्या संस्कृतीत मुरलेला गूढवाद आणि जादूटोणा यांचा त्याग करण्याची गरज होती.भारताला पश्चिमेची कधीच गरज नव्हती. विज्ञान व तंत्रज्ञान भारतीय जनमानसाचा भाग होतेच आधीपासून. भारतीय पारंपारिक जीवनाच्या अंतरंगात जादूला आजिबात स्थान नाही. ब्रिटीश राज्यात बहुजनवर्ग तंत्रज्ञान व शिक्षणास पारखा झाला. ४१.
.... "आपण गणपतीची पूजा करतो. त्या काळात काही प्लॅस्टिक सर्जन असणार, ज्यांनी हत्तीचं डोक माणसाच्या धडावर लावून प्लॅस्टिक सर्जरीचा पाया घातला!"अगदी नेमक्या शब्दांत भारतीय जनमानस पकडलंत पहा तुम्ही. आपल्या गौरवास्पद वारशासंबंधी कुतूहलयुक्त जिज्ञासा बाळगून अन्वेषण करणं. अन्वेषणात ( = investigation) जादूला स्थान नाही. ४२.
त्यामुळे भारताची बुद्धिवादाच्या मार्गावरून अधोगती होते आहे.तुमच्या मते प्रबुद्धिवाद ( pro-intellectualism ) म्हणजे काय? मला नाही वाटंत अशी एखादी काही चीज अस्तित्वात आहे. मात्र तुम्हांस स्पष्टीकरणाची संधी द्यायला हवी. ४३.
कोलंबिया विद्यापीठाचे विख्यात अर्थशास्त्रज्ञ जगदीश भगवती म्हणतात- ‘जर ते (= स्वामीनाथन गुरुमूर्ती) अर्थशास्त्रज्ञ असतील, तर मी भरतनाट्यम नर्तक आहे’.मनमोहनसिंग एक विख्यात विद्वान आहेत. पण काय दिसतं त्यांच्या कारकिर्दीत ? तेव्हा लाभापेक्षा हानी बरीच जास्त झाली. भारत व भारतीयांना पुस्तकी चमच्यांची गरज नाही. ४४.
.... भाजपने हिंदू राष्ट्रवादाची भगवी वस्त्रं परिधान करणाऱ्या आणि द्वेष पसरवणाऱ्या एका संन्याशाच्या हाती राज्याची सत्ता दिली.योगी आदित्यनाथ विद्वेष फैलावतात यासंबंधी तुमच्याकडे काही पुरावा आहे का ? ४५.
.... मोदींनी गुणवत्तेच्या कल्पनांवरच हल्ला केला.प्रख्यात विद्वान मनमोहनसिंग प्रत्यक्षात एक मुखस्तंभ होते. मग कोणत्या निकषांवर त्यांना पंतप्रधान केलं गेलं? मोदींनी असल्या निकषावर प्रश्न उपस्थित करायची गरज आहे. पण असं करणं म्हणजे निकष मोडीत काढणं नव्हे.तुम्हांस योगी कदाचित आवडंत नसतील, पण त्यांच्यात निकष जुळणारे इतर गुण आहेत. ते फक्त तुमच्या अपेक्षांशी जुळंत नाहीत. तसंही पाहता, उत्तरप्रदेशाचे लोकं योगींवर खूष आहेत. ४६.
.... ज्ञानकेंद्र पोखरली जात आहेत.नेहरू विद्यापीठासारखी ती अगोदरंच पोकळ फोलपटं होती. ४७.
प्रशासक आणि प्राध्यापकांची निवड त्यांच्या मूळ क्षमतेऐवजी राजकीय विचारसरणीच्या आधारे होत आहे.डावे तेच करतात ना? मग मोदींवर दोषारोप कशाला? ४८.
ते म्हणजे मध्ययुगीन अंधश्रद्धा, जादूटोणा टाकून द्यावा लागेल. पण ही गोष्ट मोदी सांगू शकत नाहीत किंवा त्यांची तशी इच्छा नाही.हा अत्यंत अज्ञानमूलक शेरा आहे. माझा खरोखरंच विरस झालाय. हिंदू साहित्यात थियोक्रसीस प्रतिशब्दच नाही. आणि तरीही तुम्ही भारतीयांवर मध्ययुगीन थियोक्रसीचा आरोप करताय ? काय ही नामुष्की ! जाताजाता, जादू आणि अंधश्रद्धा या सेमिटिक रिलीजनात आढळतात. हिंदू परंपरेत नव्हे. ४९.
श्रीलंकेचे विख्यात इतिहासकार ए. के. कुमारास्वामी म्हणतात – “भारत असो की युरोप, प्राचीन संस्कृतीच्या अवशेषांचा त्यागच केला पाहिजे. आपण भूतकाळात घडलो आहोत, पण आपल्याला आपलं घर भविष्यकाळात बांधायचं आहे. हे समजून घेणं, दृढनिश्चयानं मान्य करणं आणि मागे सोडलेल्या गोष्टीवर प्रेम करणं हाच सबळ होण्याचा मार्ग आहे.”खरंच धाडसी विधान आहे. मात्र रक्ताने बरबटलेल्या दोन महायुद्धाचं काय ? एकवेळ समजूया की भारत आपला भूतकाळ विसरला आहे. परिणामी भविष्यात युरोपसारखा रक्तपात होणार नाही याची खात्री काय ? ५०.
भूतकाळाला चिकटून राहणं हेच मोदींच्या भारतात खोलवर दिसणाऱ्या आततायी नैराश्याला कारणीभूत आहे. भारतीयांची आधुनिक जगाचा सामना करण्याची तयारी नाही. प्रखर आत्मविश्वासाऐवजी ते दिखावू देशप्रेम व्यक्त करण्यातच धन्यता मानताना दिसतात!आधुनिक जगासाठी भारतीय व्यवस्थित रीत्या सुसज्ज आहेत. तुम्हांस इसरोचा यशदर ( = सक्सेस रेट ) माहित नाही काय ? कृपया जागे व्हा ! ५१.
आपलं नेमकं काय आणि बाहेरचं काय, याचीच भारतीयांना चिंता लागलेली असते.शेवटी एकतरी बरोबर विधान आलं. यावर तोडगा म्हणजे बाह्य प्रभावांना प्रथम संगयुक्त ( = customise ) करून नंतर आत्मसात ( = adopt) करणे. ५२.
मागच्याच महिन्यात भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी मुस्लिमांना ‘वाळवी’ची उपमा दिली. भाजपच्या अधिकृत ट्विटर हँडलवर ‘बौद्ध, हिंदू आणि शीख वगळता इतरांना देशाबाहेर घालवू’ यासारखी भाषा वापरायला कमी केलं जात नाही.तुम्ही ज्याला स्थलांतरेच्छुक मुस्लिम ( = इमिग्रंट ) म्हणता ते वस्तुत: घुसखोर आहेत. माझ्या मते युरोपने श्री. अमित शहांपासून शिकायला हवं. ५३.
.... भोपाळ या तब्बल २५ टक्के मुस्लीम लोकसंख्या असलेल्या शहरात, ....मी पैज मारून सांगतो की, भोपाळचं संस्थान शिया असल्याचं तुम्हांस माहिती नाही. शियांना सुन्नी घुसखोर आवडंत नाहीत. अमित शहांना आपक काय बोलतोय ते ठाऊक आहे. पण तुमचं मात्रं तसं नाही. जरा डोळे उघडून बघा की ( म्हणजे वस्तुस्थितीचं ग्रहण करा). तुम्हांस सहज शक्य आहे. कारण की तुम्ही बुद्धिवान आहात. मी तुमचा किमान एक लेख वाचलाय, त्यावरनं सांगतोय. ५४.
.... भगव्या कपड्यांतली साध्वी प्रज्ञा सिंग-ठाकूर. एका मशिदीजवळ झालेल्या बॉम्बस्फोटात सहा जणांच्या मृत्युमुखी पडले. त्या कटाची सूत्रधार असल्याचा आरोप या साध्वीवर आहे.ठीक. न्यायालय म्हणतं की साध्वी सद्य संशयितही नाहीत. तिच्यावर खटला घाल्याविषयी काय वदावे ! ५५.
.... (मोदींच्या भारतात) जुनी व्यवस्था मोडीत काढली गेलीय, पण नवी कुठलीही पर्यायी व्यवस्था निर्माण केली गेलेली नाही.येऊ घातलेल्या नव्या व्यवस्थेबद्दल कृपया चिंता करू नये. माझ्यासारखे बुद्धिजीवी भारताची दिशा योग्य आहे हे निश्चित करतील. तुम्ही आमच्यात का सामील होत नाही ? ल्युटेनचा मूर्खपणाचा त्याग करा. बघा, तुमच्याकडे गमावण्यास काहीच नाही आणि मिळवण्यास सर्वकाही आहे. ५६.
प्रियांका गांधी ही बहीण राहुल गांधी या भावाच्या मदतीला देण्यापलीकडे देशातल्या या सर्वांत जुन्या पक्षाकडे दुसरी राजकीय कल्पना नाही.अगदी बरोबर. ५७.
मोदी हे नशिबवान आहेत की, त्यांना कोणताही सामाईक कार्यक्रम नसलेल्या आणि काँग्रेसच्या नेतृत्वाखालील दुबळ्या विरोधी पक्षांची आघाडी लाभली आहे.अगदी बरोबर. ५८.
.... त्यांना जाणीव आहे की, २०१४ मध्ये दिलेली आश्वासनं आपण पूर्ण केलेली नाहीत.त्यांनी वचनपूर्ती केलीये. विरोधी शक्तींपैकी कोणीही भाजपच्या २०१४ च्या जाहीरनाम्याचा उल्लेख करीत नाहीये. त्यांना माहितीये की त्यावर बेतलेल्या आरोपांना मोदी खणखणीत प्रत्युत्तर देतील. ५९.
इतर लोकानुनयी नेत्यासारखंच आपल्या सुरक्षित कोशात बसून ते ‘इतरांच्या’ सुलतानशाहीबद्दलची भडास काढत आहेत.सुलतानशाही हा मोदींनी लावलेला जावईशोध नसून प्रखर वस्तुस्थिती आहे. ६०.
.... तो आपल्या अपयशाचा राग काढण्यासाठी जगाला कोणती शिक्षा देईल, या विचारानं थरकाप उडतो.मी असहमत. मोदी जर अपयशी झाले तर मी थरकांपणार नाही. त्याऐवजी मी मोदींना परत घडी बसवण्यास मदत करेन. तुम्ही आमच्या बाजूस का येत नाही ? मला माहितीये तुम्ही बुद्धिमान आहात. तुमच्या अनुदिनीवरील किमान लेख मी वाचलाय. तुमची मूलोत्पाटित अभिजनांविषयी केलेली निरीक्षणं अतिशय समर्पक आहेत. शैक्षणिक विश्वात संस्कृत भाषेची काळजीपूर्वक पखरण करायला हवी या तुमच्या विचाराशी मी शंभर टक्के सहमत आहे ( https://www.indiatoday.in/magazine/leisure/story/20141215-aatish-taseer-sanskrit-the-way-things-were-806209-2014-12-05). तुमच्याकडे योगदान देण्यासारखं बरंच काही आहे. तुमच्या ज्ञान आणि आंतरिक जाणीवेचा भारताला लाभ झालेला बघायला मला फार आवडेल. -------------- प्रतिसाद समाप्त -----------------------------
वर्गीकरण
प्रतिक्रिया
Response to Aatish Taseer's article in Time magazine on Modi
जबरदस्त !!
झक्कास
मला वाटत
थोडे त्याचे ही दुख: समजुन घ्या!
Can India's Secular's and
प्रोत्साहनानिमित्त धन्यवाद!
मस्त प्रतिसाद, गा पै!
हे भाष्य पाकिस्तानात पोहचवण्याची
कोणतरी पोचवेल
ज्या स्वरूपात आपण प्रतिसाद
हेच म्हणार होतो..
आभार
पुर्व इतिहास पहाता मोदीन्मधे
असे का बर वाटत होते? मला
तशी भिती एका सभेत व्यक्त झाली
गा पै,
अर्रर्र, च्यकच्यक ....!
जाहिर निषेध !
शब्दानुज
पोलिसांची ताकद
कितीही
कोलांट्या उड्या की चौकटबाह्य आकलन
तुम्ही एक विसरता आहात.