मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

स्वामि धागे घेऊन येतात

सोन्या बागलाणकर · · जे न देखे रवी...
Taxonomy upgrade extras
स्वामि धागे घेऊन (का) येतात एकएक हट्टी जिलबी जिद्दीने पाडून ठेवतात, प्रत्येक जिलबीमध्ये अनेक बिनबुडाचे मुद्दे मनोरंजन म्हणून ठेवून जातात... स्वामि धागे घेऊन येतात अलंकारिक वाक्ये भिरकावून केवळ डोकेदुखी देऊन मिपाकरांच्या डोक्यात जातात ट्रोलबाजी करून मजा बघत अज्ञाताच्या अंधारात गुडूप होतात...... (दुसऱ्या दिवशी परत) स्वामि धागे घेऊन येतात.... - हे काव्यपुष्प स्वामिचरणी अर्पण

वाचने 36232 वाचनखूण प्रतिक्रिया 48

In reply to by सोन्या बागलाणकर

अभ्या.. गुरुवार, 05/09/2019 - 10:56
हे घे सोन्या थंडगार. . स्वामिना कोला बिनबुडाचे बोला . स्वामिना फंटा अभ्यासाची घंटा . स्वामिना माझा घाणा ताजा ताजा . स्वामिना पेप्सी चर्चा होई सेक्सी . स्वामिना मिरिंडा राजाभाईचा गंडा . स्वामिना गोल्डस्पॉट प्रतिसादाचा जॅकपॉट . स्वामिना थमसप कापू भैय्ये सपसप . स्वामिना लिम्का मराठीच्या टीमका . स्वामिना रेडबुल लॉजीकची बत्तीगुल . मिपागावात होई गवगवा स्वामिना अक्खा फ्रिज हवा

In reply to by अभ्या..

सोन्या बागलाणकर गुरुवार, 05/09/2019 - 16:30
झक्कास जमलाय अभ्याराव. झालच तर... स्वामिना क्वार्टर परप्रांतीयांची टूरटूर स्वामिना खम्बा युपी बिहारी करा लंबा स्वामिना नारंगी धाग्यांची खेळू सूरपारंबी स्वामिना चखणा भय्यांना पाठवू पाटणा

In reply to by सोन्या बागलाणकर

भंकस बाबा गुरुवार, 05/09/2019 - 17:03
तुम्हाला प्रतिभेचे पंख फुटायला उद्दुक्त करण्यास कारणीभूत ठरलेल्या स्वामींचे आभार तरी माना हो. मिपामधे जान फुंकली हो त्यांनी!

In reply to by भंकस बाबा

चौथा कोनाडा गुरुवार, 05/09/2019 - 17:24
आमची पण जिलेबी : गोड मानून घ्या. स्वामिना चड्डी धागाबाते बड्डीबड्डी स्वामिना बनियन चर्चेला ना-कसला नियम स्वामिना कुरता जिलेब्यांनी दमला पुरता स्वामिना शरट धागा तरट-तरट स्वामिना विजार मिपाकर बेजार स्वामिना पायजमा कॉमनसेन्स इतिहासजमा स्वामिना कोट प्रतिसाद्क अडाणचोट स्वामिना टाय जिलेब्या खायखाय स्वामिना जाकीट राफेलचं उडवलं राकीट स्वामिना मळमळ जिथंतिथं कमळ --

नाखु Wed, 05/08/2019 - 12:38
नकोस (मी) तुझ्यापण पाठीशी आहे !!!! इति सद्य स्वामि मस्त प्रतिसाद

टर्मीनेटर Wed, 05/08/2019 - 12:48
आता ह्या वरून प्रेरणा घेऊन कोणी स्वामि चालीसा, स्वामि चरित्रामृत वगैरे लिहिण्यास घेतले असेल तर ते प्रकाशित होण्याची वाट पाहतोय :) असो... त्या निमित्ताने प्रेरणा पण वाचली, मूळ कविता आणि विडंबन दोन्ही आवडलं!

In reply to by टर्मीनेटर

सोन्या बागलाणकर गुरुवार, 05/09/2019 - 03:14
स्वामिंचे कर्तृत्वच असं महान आहे. =)))

In reply to by जालिम लोशन

जालिम लोशन Fri, 05/10/2019 - 00:13
स्बामि मधला मि र्‍हस्व का? दिर्घ का नाही? शेवटचे अक्षर आहे ना ते. भेजा फाय्र बद्दल काही ऐकल आहे? ऊत्तर भारतीय पदार्थ आहे ना तो महाराष्टात चालतो?

यशोधरा गुरुवार, 05/09/2019 - 17:42
हे तर स्वामि आयडी का हवंय तेच होतंय. " वो हैं नामवाला, वो ही जो बदनाम हैं.." टाईपमध्ये चाललंय सगळं. वैताग. कोणीही, अगदी एकही प्रतिसाद दिला नाही तर उत्तम होईल. कदाचित धागे येणं सुद्धा बंद होईल. इथे मिपाकर समजावायला जातात आणि चेव आल्यासारखं दोन आयडी काहीही लिहीत राहतात.

स्वामि १ गुरुवार, 05/09/2019 - 21:55
शेकडो धागे अजून लिहिले जातील मिपावरती सोन्या का झालास घायाळ एकाच धाग्या वरती संभाजी राजगुरू टिळकांचा वारसा जपतो मनावरील शिवबा चे आशीर्वाद असती आम्हा मर्दा वरती सोन्या तुझ्या सारखे हजार नाचवीन एका बोटावरती

In reply to by स्वामि १

अथांग आकाश गुरुवार, 05/09/2019 - 22:48
खबरदार जर टाच मारुनी याल पुढे चिंधड्या उडवीन राई राई एवढ्या... च्या धर्तीवर चालुदे तुमचे... किती निगरगट्टपणा करावा एखाद्यानी ह्याचे ज्वलंत उदाहरण आहात तुम्ही.... चांगल्या भाषेत काही जणांनी समजावलं.... कोणी सडेतोड सुनवलं....पण ऐकाल तर शपथ... काढा धागे तुम्ही .... चिरफाड करायला बसलेच आहेत प्रतिसादक.... किती फालतूपणा करावा ह्यालाही काही मर्यादा असते हो! फार वर्षांपुर्वी सोनी वाहिनीवर एक मालिका होती ....ये शादी नही हो सकती नावाची....त्यात एक भोंदू स्वामि असतो जो सिनेमातली गाणी पण श्लोक म्हणून भक्तांना ऐकवायचा... तसे तुम्हाला काही करायचे आहे का? चावून चघळून चोथा झालेले विषय घेऊन [आशुद्ध भाषेत] धागे काढायचे आणि विरोधी प्रतिक्रिया आल्या तर त्याबद्दल अजून नवीन धागे काढायचे? जनाची नाही तर मनाची तरी लाज बाळगा....चांगले मुद्दे आणि विषय घेऊन या तुमचे स्वागत होईल....अन्यथा भोगा आपल्या कर्माची फळे ! तुमचे धागे वाचताना असे होते... 1

In reply to by Rajesh188

अथांग आकाश Fri, 05/10/2019 - 00:38
तुम्हीच काढा कि... तुमचाच डूआयडी आहे तो हे चाणाक्ष मिपाकरांनी ओळखलं आहेच कि....

Rajesh188 Fri, 05/10/2019 - 01:44
Mipa कर चाणाक्ष आहेत खरे आहे . मी खूप धागे वाचले ह्या संकेत स्थळावर. अतिशय उत्तम लिखान केलेले आहे खूप जणांनी पण इथे कविता करणाऱ्यांची प्रतिभा ना कोणत्या धाग्यात दिसली ना कोणाला दिलेल्या कंमेंट मध्ये। आणि जे खरीखर प्रतिभावंत असतात ते नवीन लोकांच्या लिखाणावर तुटून पडत नाहीत कोण्ही कोणता धागा काढावा हे बाकी लोक कोण ठरवणारे फक्त धाग्यात कोणा विषयी शिवराळ भाषा नसावी किंवा चारित्र्य वर शिंतोडे उडवणारे धागे नसावेत । स्वामी च्या कोणत्याच धाग्यात ह्या दोन्ही गोष्टी नाहीत पटत नसेल तर वाचू नका टीप। : स्वामी ना ओळखत पण नाही पण पटलं नाही म्हणून कंमेंट लिहली

In reply to by Rajesh188

पटत नसेल तर वाचू नका
याच धर्तीवर म्हणतो - जमत नसेल तर लिहू नका. दर दिवसाला रतीब घातल्याप्रमाणे धागे काढणे काही आवश्यक नाही. मिपा हे दर्जेदार लेखनासाठी प्रसिद्ध आहे, धाग्यांच्या धुळवडीसाठी नाही. तुम्हाला धुळवड करायची असेल तर खुशाल एकमेकांच्या खरडवहीत करा, बाकीच्यांना कशाला त्रास?

In reply to by सोन्या बागलाणकर

स्वामि १ Fri, 05/10/2019 - 08:16
मिसळपाव वर मराठी भाषा, संस्कृती व महाराष्ट्राचा विकस ह्या वर अनेक धागे टाकले जातील, राजेश १८८ म्हणाले ते योग्यच आहे, आपल्याला पटत नसेल तर वाचू नका. आपले वेगळे विचार असतील तर त्या वर लिहू शकता, चर्चा करू शकता. मराठी व महाराष्ट्रा च्या प्रगती साठी आम्ही कुठेच हार मानणारा नाही.

In reply to by स्वामि १

भंकस बाबा Fri, 05/10/2019 - 08:28
जिल्ब्या टाकून महाराष्ट्राची व मराठीची प्रगति कशी होणार हे समजवून द्याल क़ाय? ( नवीन धागा न काढता)

In reply to by स्वामि १

चौथा कोनाडा Fri, 05/10/2019 - 13:37
विकस ? अहो, विक्स असेल ते . हे असले धागे वाचून वाचून डोक्याला विक्स चोळून झोपायची वेळ आणलीत !

In reply to by भंकस बाबा

Rajesh188 Sun, 05/12/2019 - 20:41
जीवन कडे खेळकर पणे बघा जाळपोळ करू नका , मनशांती साठी ध्यानस्थ बसत जा मन विचलित होऊन देऊ नका, काही ही कंमेंट ,पोस्ट करणारे मूर्ख आहेत असे समजून त्यांना मोठया मनानी माफ करा

In reply to by अभ्या..

भंकस बाबा Sun, 05/12/2019 - 21:44
या आताचा अर्थ अजुन धागे येउद्या असा समझायचा का? पण काही म्हणा, तुमच्या धाकाने शुद्धलेखनाच्या चुका कमी झाल्या आहेत. आता फकस्त येकच लक्ष्य ' गिनीज रेकॉर्ड बुक' आ ह्या ते मिपाकरांचे रेकॉर्ड कधीच डब्यात गेले.

In reply to by Rajesh188

भंकस बाबा Sun, 05/12/2019 - 21:50
आम्ही खेळकरपणे बघतो. आमची ही दररोज भाज्या वेगवेगळ्या बनवते पण मसाला तोच बेडेकराचा गरम मसाला वापरते. खेळकरपणाने खावे लागते हो! पण प्रत्येक मिनिटाला खेळकरपणा कुठून आणायचा?

Topi Tue, 05/14/2019 - 13:19
स्वामि जी तुम्हि हार मनू नका, महाराष्ट्र ची वाट लागली आहे ह्या भय्या मुले, पण काही लोक गंभीरपणे विचार करत नाही, ते एनराय आहेत,