Skip to main content

व्हिटॅमीन बी-१२, काही प्रश्न

लेखक माहितगार यांनी सोमवार, 09/05/2016 19:12 या दिवशी प्रकाशित केले.
व्हिटॅमीनला मराठीत जीवनसत्व म्हणतात. जीवनसत्त्वे हे शरीरातील प्रक्रियांसाठी थोड्याप्रमाणात लागणारे पण अत्यंत महत्त्वाचे -म्हणजे यांची आहारातील/शरीरातील कमतरता आजारांचे कारण होऊ शकते- असे पोषणघटक असतात. यात A,B,C,D,E,K अशा प्रकारच्या नावांची जीवनसत्वे असतात. (इथपर्यंत मराठी विकिपीडिया) यातील B या जीवनसत्वाचे विवीध क्रमांक असतात त्यातीलच शाकाहारी लोकांना अकस्मिक सॉलीड शारीरीक धक्का देऊ शकते ते म्हणजे व्हिटॅमीन बी-१२ ची कमतरता. बी-१२ अंशतः दूध आणि अंडी यातून मिळू शकते - यात अंशतः हा शब्द अत्यंत महत्वाचा असावा- एखादी गोष्ट शक्य असावी आणि ती प्रत्यक्ष सातत्याने व्यवहारात सवयीत असावी यात फरक असावा. मी माझे तज्ञांसाठीचे प्रश्न नंतर विचारतो पण धागाचर्चा चालू ठेवण्यासाठी व्हिटॅमीन बी-१२ हा कंटेंट महत्वाचा भाग आहे अशा मिपा पाककृतींचे व्हेज नॉनव्हेज दोन्ही दुवे अथवा माहिती प्रतिसादातून मिळावी अशी विनंती आहे. दुसरे तुम्ही पाकीट बंद दूध विकत घेता का ? त्यावर बी-१२ चे न्युट्रीशनल व्हॅल्यूची माहिती असते का ? . . . . आता वैद्यकीय आणि आहारशास्त्र व्यवसायातील तसेच जैवरसायन (बायोकेमेस्ट्री) आणि प्राणीशास्त्र जाणकारांसाठीचे माझे प्रश्न * वैद्यकीय आणि आहारशास्त्र १.१) सर्वसाधारणपणे दिवसातून जे लोक केवळ दोन ते तीन वेळा चहातून मिळेल तेवढेच दूध घेतात -अंडी सेवन करत नाहीत- त्यांची व्हिटॅमीन बी-१२ ची गरज पुर्ण होते का होत असेल तर किती प्रमाणात. १.२) ज्यांना अंडी आणि मांसाहार बिलकूल सेवन करावयाचा नाही सोकॉल्ड फोर्टीफाईड पर्याय आणि गोळ्यां-औषधींवर अवलंबून रहावयाचे नाही त्यांनी बी-१२ ची पूर्ण गरज पूर्ण होण्यासाठी नेमक्या किती दूधाचे सेवन करणे आवश्यक आहे. १.२.१) गाईचे दूध घेणार्‍यांनी किती सेवन करावे १.२.२) म्हशीचे दूध घेणार्‍यांनी किती दूध सेवन करावे १.२.३) बकरी आणि शेळीचे दूध घेणार्‍यांनी किती दूध सेवन करावे १.२.४) दही स्वरुपात असेल तर किती सेवन करावे १.२.५) पनीर स्वरुपात बी-१२ मिळते का मिळत असेल तर किती पनीर एकावेळी सेवन करावे १.२.६) रसगुल्ला आणि रसमलाई स्वरुपातून कितपत बी-१२ मिळू शकते, मिळत असेल तर ते किती सेवन करावे १.२.७) खवा आणि पेढ्यांच्या स्वरुपातही बी-१२ मिळू शकते का , मिळत असेल ते किती प्रमाणात सेवन करावे ? १.२.८) खरवसातून बी-१२ मिळू शकते का मिळत असेलतर किती प्रमाणात सेवन करावे ? १.२.९) खजूर आक्रोड अशा सुक्यामेव्यातून बी-१२ मिळते का मिळत असेलतर किती प्रमाणात सेवन करावे. १.२.३) ज्यांना अंडी चालतात त्यांच्या आहारात दूध आणि अंडी मिळून किती सेवन करावे ? सोकॉल्ड फोर्टीफाईड पर्याय आणि गोळ्यां-औषधींवर अवलंबून न राहता सुचवलेल्या केवळ दूध आणि अंडीतून किती गरज पूर्ण होते किती गरज शिल्लक राहते ? २) मासे या प्रकारातील कोणकोणत्या मास्यातून बी-१२ मिळते मास्यांचे किती सेवन करणे अभिप्रेत असते ३) गोमांस सोडून इतर कोणकोणत्या मांसाहारी पदार्थातून बी-१२ ची गरज पूर्ण करता येऊ शकते जसे की चिकन किंवा मटन यांचे किती सेवन करावे. ४) एखाद्या आहार पदार्थात किती बी-१२ आहे हे कोणकोणत्या प्रयोगशाळेतून तपासून मिळू शकते ? ( हा प्रश्न व्यक्तीच्या शरीरात नव्हे तर पदार्थात असा आहे) ५) बी-१२ चे पोषणमुल्य संबंधीत आहार सेवन केल्यानंतर किती कालावधी पर्यंत मानवी शरीर सांभाळून वापरते ही प्रकीया कशी होते ? ६) बर्‍याच कड्डक शाकाहारी व्यक्तींच्या जीवनाचा बराच मोठा कालावधी बी-१२च्या कमतरतेचा फटका बसत नाही तोपर्यंत बर्‍यापैकी चालू दिसतो कमतरतेचा फटका बसण्याच्या आधीच्या काळात बी-१२ च्या सेवना शिवाय शाकाहारी व्यक्ती तग कशा धरतात ? कि हे तग धरणे वरकरणी असते आणि त्या अभावाने आतून पोखरल्या जात असतात ? ७) व्यक्तिंनी बी-१२च्या कमतरते साठी तपासणी केव्हा करावी ? ८) रक्तस्त्राव होणार्‍या/ रक्तदान करणार्‍या शाकाहारी व्यक्तींना बी-१२ विषयी अधिक काळजी घ्यावी लागते का ? ९) बी-१२ आंतर्भूत केलेल्या आहाराने कोलेस्ट्रॉल अथवा वजन वाढीच्या समस्या येऊ शकतात का तसे असेल तर त्यांचे निराकारण करणारा समतोल कसा साधावा १०) या दुसर्‍या मराठी संस्थळावरील धागालेखात काही आक्षेप बी-१२च्या संदर्भात नोंदवले गेलेले दिसतात त्याची शहानिशा करुन हवी आहे. ११) कलाकंद, श्रीखंड आणि आईस्क्रीम या पदार्थातून बी-१२ किती प्रमाणातून मिळू शकते, बी-१२ची गरज पूर्ण होण्यासाठी त्यांचे सेवन किती केले जाणे जरुरी असते? . . . . *जैवरसायन आणि/अथवा प्राणीशास्त्र क्षेत्रातील जाणकारांसाठीचे प्रश्न बी-१२ बाबत आंतरजालावर शोधले असता -जिथपर्यंत मला समजले चुभूदेघे- कोणत्याही वनस्पतीत बी-१२ नसते तर केवळ काही प्राण्यांच्या शरीरात वनस्पती चघळली अथवा जिरवली जाताना वनस्पतीत कोबॉल्ट हा घटक मिनरल स्वरुपात असेल आणि नेमक्या स्वरुपाचे एन्झाईम असलेले बॅक्टेरीआ असतील तर आणि तरच अशाच प्राण्यांच्या शरीरात फर्मेंंटेशनच्या विशीष्ट क्रियेने बी-१२ तयार होते. संदर्भ एवढी माहिती वाचल्या नंतर -कदाचित बाळबोध असतील पण- मला काही प्रश्न पडले ते असे. १) असे बॅक्टेरीआ मिळवून प्राण्यांच्या शरीरात पार पाडली जाणारी फर्मंटेशन प्रक्रीया वनस्पतींवर बाहेर पारपाडणे का शक्य होत नसेल ? २) त्या प्राण्यांच्या शरीरात हि प्रक्रीया चयापचयासोबत एवढ्या वेगाने कशी होत असेल ? आपण दही इडलीचे पीठ आंबवतो यापेक्षा प्राण्यांच्या शरीरात होणारी प्रक्रीया कशा प्रकारे वेगळी असते ? ३) मास्यांमध्ये ही प्रक्रीया नेमकी कशी पार पडते ४) ज्या प्राण्यांमध्ये बी-१२ तयार होत नाही अशा प्राण्यांना त्यांच्या स्वतःसाठी बी-१२ची कमतरता जाणवत नाही का ? ५) एखाद्या आहार पदार्थात किती बी-१२ आहे हे कोणकोणत्या प्रयोगशाळेतून तपासून मिळू शकते ? हा प्रश्न या विभागात रिपीट करत आहे. . . . . . सुचतील तसे अजून प्रश्न अ‍ॅडवेन. इतरकुणाला प्रतिसादातून अजून प्रश्न जोडावयाचे असतील तर स्वागत आहे. . . . अनुषंगीकाव्यतरीक्त अवांतर टाळण्यासाठी, चर्चा सहभाग आणि प्रतिसादांसाठी आभार. * बी १२ इतर मिपा धागे * कोबालामिन (ब-१२) : एक अनोखे व्हिटॅमिन * https://www.misalpav.com/node/18374 *

वाचने 195137
प्रतिक्रिया 199

प्रतिक्रिया

In reply to by पिलीयन रायडर

पिलीयन रायडर - उत्तम प्रतिसाद. पुर्ण सहमत डॉ. खरे यांचा अनुभव, लेख, प्रतिसाद (वैद्यकीय आणि इतर साधेसुधे प्रतिसाद) वाचुन त्यांच्याबद्दल जे मत तयार झाले आहे ते अशा काही फुटकळ वाकड्या प्रतिसादांमुळे कदापि बदलणार नाही.

In reply to by पिलीयन रायडर

अतिशय सहमत "गोपाळराव हुषार डॉक असतील असं वाटत असुनही ज्या हुशार पण फटकळ डॉक्टरांची मी पायरीही चढणार नाही अशातले एक वाटतात"

In reply to by पिलीयन रायडर

ज्या हुशार पण फटकळ डॉक्टरांची मी पायरीही चढणार नाही अशातले एक......... बाकी प्रतिसद्दाशी बाडिस. हुशार शब्द जरा विचित्र वाटला.

In reply to by अत्रन्गि पाउस

असतात ना हो काही लोकं.. जी बुद्धिमान असतात.. आपल्या क्षेत्रात अगदी निष्णात म्हणावे असे.. पण बोलायला मात्र फटकळ.. म्हणजे ते बोलतात ते चुक नसतं, पण सांगण्याच्या पद्धतीने आणि समोरच्याला निव्वळ बेवकुफच समजण्याच्या वृत्तीने त्यांचे काही पटतही नाही. (हे जनरल लोकांबद्दल आहे.. गोपाळरावांबद्दलच असे नाही.. इथल्या प्रतिसादांचा टोन तसा असतो असे म्हणणे आहे.. बाकी काही नाही..)

बी १२ इंजेक्शनने द्या असे म्हणणार्‍याना गोळीचे मात्र वावडे आहे , हे वाचुन धक्का बसला. व्हिट्यामिन ए देखील आहारातुन मिळू शकते . पण लहान्मुलाना त्याचे डोस डब्ल्यु एच ओ च्याच रिकमांडेशन. णुसार देतात ना ? प्रेग्नन्सीतही अयर्न कॅल्शियम सप्लिमेंट देतात. अ‍ॅनिमिया नसेल तर १०० गोळ्या , असेल तर किमान २०० गोळ्या असा साधा डोस शेड्युल डब्लु एच ओ नेच दिला आहे ना ? ते आhaaraatun मिळत णाही का ?

In reply to by anilchembur

'ठिक आहे' आता पर्यंतच्या चर्चेवरुन एका गटाचे आग्रही मत 'इंजेक्शने आणि गोळ्या घेणे श्रेष्ठ' असे वाचक म्हणून वाचकांनी नोंद घेतली आहे. आता इंजेक्शन गोळ्यांचे दळण संपवून, धागा लेखाचा परिघ मुख्यत्वे इंजेक्शने आणि गोळ्या सोडूनचा आहार असे अभिप्रेत आहे त्या मुख्य विषयावर धागा लेखात बरेच प्रश्न दिले आहेत एखाद दोन प्रश्नांची उत्तरे सोडून बाकी प्रश्न चर्चेसाठी बाकी आहेत त्या आहार मुल्यांच्या चर्चेत सहभागी व्हावे असे आवाहन आहे.

In reply to by माहितगार

मी पण तोच विचार करतोय कि तुम्ही स्पष्टपणे आहारातून ब१२ कसे मिळेल असं लिहीलं असताना मोगा वेड्यासारखा गोळ्या अन् इंजेक्शन च्या मागे का लागलाय. BTW मोगा नवीन आयडी. :) मुग्धा ला कुठे सोडलस.

In reply to by anilchembur

मोगा खान जिथे तिथे अर्धवट अर्थ लावून तिरकस प्रतिसाद दिलाच पाहिजे का? "साधारण पन्नाशी साठी नंतर आपल्या जठराचा थोडा र्हास/झीज झाल्याने जठरातील जीवनसत्व पकडून धरणारा घटक कमी प्रमाणात तयार (intrinsic factor) होतो त्यामुळे आपण खाल्लेले ब १२ जीवनसत्वाचे पूर्ण शोषण होत नाही." हे पहिल्या प्रतिसादात लिहिलं आहे. अशा लोकांनाच मी ब १२ ची चाचणी करण्यात १२०० रुपये खर्च करायला लावण्यापेक्षा इंजेक्शन घ्यावे असे सुचवले आहे. कारण अशा लोकांना गोळी दिली तरीही त्याचे शोषण व्यवस्थित होत नाही "व्हिट्यामिन ए देखील आहारातुन मिळू शकते . पण लहान्मुलाना त्याचे डोस डब्ल्यु एच ओ च्याच रिकमांडेशन. णुसार देतात ना ?" Vitamin A deficiency alone is responsible for almost 6% of child deaths under the age of 5 years in Africa and 8% in South-East Asia Vitamin A supplementation in children 6–59 months of age living in developing countries is associated with a reduced risk of all-cause mortality and a reduced incidence of diarrhoea Hence, the use of a megadose of vitamin A for children aged between 6 and 59 months in areas at risk of vitamin A deficiency is one of the "main short-term interventions" for combating this deficiency in the field of public health. The use of vitamin A supplements in this areas helps to reduce mortality in children aged under five years by 30% and can diminish the severity of diarrheal diseases हे जागतिक आरोग्य संघटनेचे म्हणणे आहे. http://apps.who.int/iris/bitstream/10665/44664/1/9789241501767_eng.pdf?… हे तात्कालिक आणि ताबडतोबीचे कारण आहे. उगाच वड्याचे तेल वांग्यावर काढून आपले म्हणणे कशाही तर्हेने समर्थन करू नका. प्रेग्नन्सीतही अयर्न कॅल्शियम सप्लिमेंट देतात. अ‍ॅनिमिया नसेल तर १०० गोळ्या , असेल तर किमान २०० गोळ्या असा साधा डोस शेड्युल डब्लु एच ओ नेच दिला आहे ना ? ते आhaaraatun मिळत णाही का ? हीच स्थिती गरोदरपणात लोहाच्या गोळ्या देण्याबद्दल आहे. आहारातून लोह मिळवून स्त्रीचे हिमोग्लोबीन वाढेपर्यंत गर्भ काही वाढायचा थांबलेला नसतो आणि गर्भाच्या अवयवांचा विकास पहिल्या तीन महिन्यात पूर्ण होतो. या काळात गर्भाला रक्त पुरवठा व्यवस्थित होण्यासाठी लवकरात लवकर हिमोग्लोबिन वाढणे आवश्यक असते. या सर्व तात्कालिक ( शोर्ट टर्म) उपाययोजना आहेत. आपले म्हणणे केवळ सिद्ध करण्यासाठी तुम्ही बोलणे कसेही फिरवू पाहता याबद्दल तुमचा निषेध. जागतिक आरोग्य संघटना तुमच्या सारख्या धड धाकट "पुरुषांना" लोहाच्या किंवा कॅलशियमच्या गोळ्या द्या किंवा अ जीवनसत्त्व मेगा डोस मध्ये पाजा किंवा ब १२ चे इंजेक्शन ठोका असे का सांगत नाही? याच कारण कळू शकेल का .

In reply to by सुबोध खरे

लवकरात लवकर हिमोग्लोबिन वाढायला गोळ्या घेतात. बर्र्र ..... चालु द्या !

In reply to by anilchembur

लहानपणी किंवा गरोदरपणा सोडता सर्वसाधारण माणसाने आहाराच्या ऐवजी गोळ्या खा असं कुणी सांगितलं असेल तर तो ही दुवा द्या. विषय काय..चर्चा काय..

In reply to by anilchembur

गोपाळराव या मोगा खान यांच्या तिरकस प्रतिसादाला आपण उत्तर देणार काय? नाही तर नंतर आपण परत म्हणणार कि माझे प्रतिसाद पुर्वग्रह दुषित आहेत

In reply to by anilchembur

मोगा खान असे सरळ उत्तर देण्याऐवजी तुम्ही तिरकेच प्रतिसाद का देत राहता ते समजत नाही Health Canada advises adults over 50 years to consume foods fortified with vitamin B12 or a supplement containing vitamin B12. याचा सरळ अर्थ काय आहे कि ५० च्या आतल्या माणसाला "गोळी/ इंजेक्शनने" ब १२ देण्याची गरज नाही.

In reply to by सुबोध खरे

डॉक्टर खरें चे लेखन, प्रतिक्रिया नेहमीच उपयुक्त, सकारात्मक असतात. उगाच 'पोलीटीकली करेक्ट' असल्याचा आव आणत नाहीत. त्या मुळे इथे त्यांना आदर मिळतो, कदाचीत काही जणांना मत्सर वाटू शकतो तो त्यांचा प्रश्न आहे. तूम्ही अशांना इग्नोर मारा डॉक्टर.

In reply to by झेन

कृपया इग्नोर करा डाॅ खरे.

In reply to by सस्नेह

बाडीस

In reply to by सुबोध खरे

जर आठ की दहा रुपयाच्या ताकातून बी १२ मिळू शकते , तर बी १२ फोर्टिफाइड फूड बाजारात आणायची गरज का भासते म्हणे ?

In reply to by anilchembur

एखाद्या पदार्थातून उदा. जसे की ताकातून किती बी-१२ मिळते हा प्रयोगशाळेतून आलेल्या माहितीवरील ससंदर्भ कळणे अधिक प्रशस्त असू शकेल आणि त्याच दृष्टीने अशा प्रयोगशाळा भारतात / महाराष्ट्रात कुठे आहेत असा प्रश्न धागा लेखात विचारलेला आहे.
...तर बी १२ फोर्टिफाइड फूड बाजारात आणायची गरज का भासते म्हणे ?
हे तार्कीक उणीवेचे आहे : 'दूधातून पोषण होत असेल तर, दूधाची पावडर अथवा बाजारात आणायची गरज का भासते म्हणे ?' बाकी मनमोकळ्या सहभागाबद्दल आभार.

In reply to by माहितगार

दुधाची पावडर याच्यामागे ' काही परिस्थितीत पावडर वापरणे सोयीचे ' हे कारण आहे. यामागे आहार अन्नघटक यांचे कारण नाही. मिठात आयोडीन घालणे , दुधात व्हिट्यामिन अ घालणे , बी १२ युक्त सिरियल्स हे फोर्टिफाइड फूड आहेत. फोर्टिफिकेशन सोयीचे असते , पण ते तितकेच महागही असते.

In reply to by सुबोध खरे

म्हणजे ताक स्वस्त कि बी १२ फोर्टिफाइड फूड स्वस्त याची तुलना करून रुग्णाला तसा सांगायला बरं.

शाकाहारी लोकांना काही जीवनसत्त्वे मिळणारच नाहीत हे सहावीतन कळलं आणि तो विषय परीक्षेर मार्कापुरताच पाठ केला.

In reply to by कंजूस

कंजूस साहेब शाकाहारी भारतीय व्याख्येत दुध आणी दुग्धजन्य पदार्थ घेणारे आहेत त्यामुळे भारतीय संदर्भात शाकाहारी लोकांना अशी जीवनसत्त्वाची कमतरता येत नाही. अमेरिकेतील "व्हेगन" लोकांचा तो प्रश्न आहे. हा मुद्दा परत परत सांगण्याचा माझा हेतू हा आहे कि अनेक लोक स्वतः मांसाहारी असले तरी बर्याच लोकांचे आई वडील, जवळचे नातेवाईक हे शाकाहारी आहेत. त्यांच्या डोक्यात आपल्या वडिलांना झालेले विस्मरण/ किंवा तत्सम आजार हे वयानुसार आहे कि शाकाहारी असल्याने जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळे आहे याचा गोंधळ होतो. आणी आपल्या आई वडिलांच्या/ वडीलधार्यांच्या प्रकृतीची आपल्या कडून हेळसांड होऊ नये अशीच सर्वांची इच्छा असते यास्तव लोकांचा मानसिक गोंधळ दूर करावा या हेतूने मी एवढा नेटाने प्रतिसाद देतो आहे.

In reply to by सुबोध खरे

बरोबर.आहारात विविधता ठेवणे आणि रोज काही गोष्टी न शिजवलेल्या खाणे हे सर्वोत्तम.खाण्यातला एकसुरीपणा घातक ठरतो.

भेसळ ही अन्नातूनही होऊ शकते, पण तो वेगळ्या सामाजिक आणि कायदे विषयक समस्येचा भाग आहे. एखाद्या विशीष्ट कमतरतेमुळे एकदा का माणूस आजारी पडला की आजारी माणसाला दिली जाणारी इंजेक्शन आणि गोळ्या इत्यादींचा अपेक्षीत परीणाम होतो आहे अथवा नाही -भेसळ युक्त औषधी आजारी व्यक्ती पर्यंत पोहोचणार नाहीत- याचे निरीक्षण करुन सुयोग्य निर्णय करुन पेशंटला सुयोग्य मार्गदर्शन करणे औषधींचा परिणाम अभ्यासण्यासाठी आवश्यकते नुसार टेस्ट करणे अथवा न करणे हा प्रत्यक्ष भेटीत डॉक्टर ने घ्यावयाचे निर्णय असावेत. या बाबत आंतरजालीय चर्चेस मर्यादा येतात कारण प्रत्येक पेशंट वेगळा असतो जो डॉक्टरने प्रत्यक्षात अभ्यासावयाचा असतो. असे वाटून हा विषय या धागा चर्चेसाठी गौण ठरवून "जिवनसत्व बी-१२ साठी आहारातून मिळणारी पोषणमुल्ये हा विषय धागा लेखासाठी मुख्य विषय म्हणून निवडला" यात धागा लेखकाचे काही चुकले काय ? या धागा लेखाच्या नशिबाने सर्व सामान्य वाचक हा विषय जाणून घेण्यास इच्छूक दिसतात, इतर चर्चा धागे भरकटतात ते ठीक इथे आरोग्य विषयक चर्चा विवादात न भरकटता सर्व सामान्य वाचकांना धागा लेखाच्या परिघात राहून मार्गदर्शनावर चर्चेवर भर दिल्यास आभारी राहू.

In reply to by माहितगार

तुमचं इतर प्रतिसादकांनी काय आणि कसे प्रतिसाद द्यावे यावर नियंत्रण नाहीये. हे थोडंसं रस्त्यावर बाईक चालवण्याप्रमाणे आहे. तुम्ही भले नियम पाळून चालवाल पण तुमच्या बाजूने बाईक चालवणारा कसा चालवतोय यावर तुमचं काहीही नियंत्रण नसतं. अशा वेळी संपादकांनी त्यांचे अधिकार वापरावेत अशी अपेक्षा असते.

बरीच अवांतर चर्चा सुरु आहे असे दिसते. @माहितगार शक्य झाल्यास चर्चा संपल्यावर नवीन धागा काढून त्यात प्रश्नांची मिळालेली उत्तरे सांगावीत.

In reply to by अत्रे

चांगली सूचना आहे, खरेतर हे स़ंक्षीप्त आढावा घेणे बर्‍याच धागा चर्चांच्या बाबतीत व्हावयास हवे. धन्यवाद

In reply to by माहितगार

quora dot com वर कोणत्याही मराठी प्रश्नोत्तरांची कोणी लिंक द्याल काय? जीवनसत्त्वे मिळवण्यासाठी शाकाहारींनी काय खावे हा प्रश्न आजच तिकडे मराठीत विचारला आहे परंतू " your question needs editing" हे नोटिफिकेशन आलंय..माझा उद्देश quora वर मराठी सुरू करे आहे.वाचकवर्ग आणखी व्यापक मिळेल असं वाटतं.विकीवर माहितगार कार्यरत आहेतच.क्वोरावरही प्रसार करू.

रोज ग्ळी पाण्याबरोबर घेतो. आजपासून ताकाबरोबर गोळी घेणार. वाद समाप्त.

चर्चेला फार फाटे फुटले आहेत. असो. मी आहारतज्ञ नाही. कशातून किती-काय मिळेल याचा इतका कधी विचार केला नाही. नॉन-व्हेज पण अतिशय कमी खाल्ले जाते. पण ढोबळ असे सांगु शकते. आणि साधारणता खालील फोल्लो करते : २५० ml skimmed मिल्क = १.२ microgm b12 २ boiled eggs = १.६० microgm of b12 १.२ + १.६ = २.८ microgm of b12 whereas daily requiremnet is around २.४ दुध, दही , ताक , केफिर , अंडी यातून ब१२ मिळेल veg लोकांना !

In reply to by सप्तरंगी

अर्थात कॉलेस्त्रोल चा विचार करावा लागेल , रोज २ अंडी खाताना. यावर सुबोध खरे / इतर डॉक्टर्स guide करू शकतील

In reply to by सप्तरंगी

कारण बलकातच पुर्ण ब १२ जीवनसत्व असत अन त्यात कोलेस्टेरॉलही. २ उकडलेल्या अंड्यात गरजेच्या १३०% कोलेस्टेरॉल असते. शक्यतो अंड्यांसोबत हिरव्या भाज्या वाढवल्यात तर फरक पडू शकेल. कोलेस्टेरॉलवाल्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानेच हा कारभार करावा.

दूधा पासूनच्या ऊपपदार्थांतील बी १२ च्या प्रमाणा बद्दल शंका होती. एक कॅनडीयन रिसर्च पेपर मध्ये काही उल्लेख आढळले त्यानुसार ( अशा रिसर्च पेपेअर मधील उल्लेखांवर अवलंबून रहाण्यापुर्वी दुजोरा सुद्धा असावा मगच विसंबावे असे व्यक्तिगत मत आहे म्हणून तज्ञांच्या मतांची प्रतिक्षा असेल. १)दुधाब्वरील प्रक्रीयांचा दुधातील बी १२ च्या प्रमाण कमी अधिक होण्याशी संबंध असू शकतो. २) ७५ डिग्री च्या १६ सेकंदात केलेल्या पाश्चरायजेह्शनला बी १२ व्यवस्थित तोंड देते आणि अशा दुधात घरगुती फ्रईज मध्ये ९ दिवस तग धरू शकते. ३) ९५ डिग्री तपमानावर ५ मिनीट पर्यंत तापवले तरी बी १२ प्रमाण टिकून राहू शकते. ४) पण तेच मयक्रोवेव्हला ५ मिनीट पेक्षा अधिक वेळ गरम केले तर बी १२ ची ३० ते ४० टक्के घट होते (या बाबत अधिक स्पष्टता हवी असे वाटते) ५) किंवा शेगडीवर अर्धा तासाच्या वर उकळले तरी बी १२ त ३० ते ४० टक्क्यांची घट होते (म्हणजे पहिल्यांदा तापवलेले दुध आणि अनेक वेळा तापवलेले दुध यातील बी १२ मध्ये तफावत येते किंवा बासुंदी सारख्या पदार्थात ३० ते ४० टक्के बी १२ कमी होईल हा माझा अंदाज चुभूदेघे) म्हणजे थोडक्यात बी १२ दुधातऊन योग्य प्रमाणात हवे असल्यास ९५ डिग्रीवर ५ मिनीटे गरम केल्यानंतर बी १२ साठी वापरून घ्यावे दूधास उगाच उकळया काढून बी १२ पुरेसे मिळते आहे असे समजू नये कारण आपल्या पैकी फारच कमी जण तसे ही अर्धा लिटर पिऊ शकतील. चहात सुद्धा चहा सोबत दुध उकळण्या पेक्षा गरम दुध वरून टाकणे रास्त म्हणता येईल का ? ६) बी १२ पाण्यात विरघळणारा घटक आहे ज्याज्या प्रक्रीयेत दुधातील पाणी कमी होईल त्या त्यात बी १२ प्रमाण कमी होईल ७) canned evaporated milk (म्हणजे मिल्क पावडर का ?) यात ६५ टक्के पर्यंत बी १२ प्रमाणात घट होते असे म्हटले आहे ( खव्या बद्दल वेगळा उल्लेख आढळला नाही पण तशीच शक्यता प्रथमदर्शनी वाटते.. ८) दिवसाच्या सर्वसाधारण उजेडाचा बी १२ च्या प्रमाणावर परिणाम होत नसला तरी प्रखर प्रकाशाच्या काही प्रकाराचा बि १२ प्रमाण कमी होत असण्याची संभावना असावी. ९) दही बनवले जाताना त्यातील दही लावण्यापुर्वी दूधाला गरम केले जाण्याच्या प्रक्रीयेत बी १२ चे प्रमाण कमी होऊ होतेच शिवाय विरजण आणि विरजण्याच्या प्रक्रीयेत (किंवा इतर आंबवण्याच्या इतर प्रक्रीयेत) २५ ते २६ टक्क्या पर्यंत बी १२ त घट येऊ शकते आणि हि घट प्रक्रीया कमी तापमानावर साठवलेल्या दह्यात सुद्धा होत रहाते ( जे मार्केट मधून विकतचे दही वापरतात त्यांनी या मुद्द्याकडेही लक्ष द्यावे असे वाटते) १०) पाणी निघून गेल्यामुळे चीज मध्येही (पनीर खव्या प्रमाणेच) दूधा पेक्षा बी १२त घट येते (- भारतातिल बहुसंख्य चीज भारतीय व्हेजेटरीयन चीज मध्ये मोडत असावे चुभूदेघे) घट आल्या नंतर भारतेतर युरोपीय स्वीस टाईप चीज मध्ये इतर चीजच्या तुलनेत प्रक्रिया पद्धतीमुळे बी १२ प्रमाण जरा अधिक वाढते - चीज बनवण्यातील काही प्रक्रीयात गाय विषयक काही साधनांबद्दल प्राणि प्रेमींच्या आक्षेपांनतर भारतात अशा 'स्वीस चीजच्या आयातीवर मर्यादा आणल्या गेल्या होत्या असे दिसते. https://academic.oup.com/af/article/4/2/32/4638653 या पेपर मध्ये नैसर्गीक पदार्थातील बी १२ चे ऑबसॉर्ब्शन आणि कृत्रीम बी १२ अशी काही वैज्ञानीक तुलना दिसते आहे जी माझ्या डोक्यावरून गेली . कदाचित इतर तज्ञ मंडळींना कळल्यास उलगडून द्यावी

In reply to by माहितगार

नैसर्गीक पदार्थातील बी १२ चे ऑबसॉर्ब्शन आणि कृत्रीम बी १२ दूध किंवा इतर नैसर्गिक पदार्थातील ब १२ जीवनसत्व हे ऍडेनोसील कोबालमिन (ब १२) या स्वरूपात असते त्यामुळे ते जास्त चांगले शोषले जाते. कृत्रिम ( गोळीत) असलेले बी १२ सायनो कोबालमिन या स्वरूपात असते. शरीरात या "सायनो" गटाचे विघटन होणे आवश्यक आहे आणि ते कमी मात्रेत सायनोकोबालमिन घेतले असताना व्यवस्थित होत नाही. यामुळे गोळी द्वारे कमी प्रमाणात घेतलेले बी १२ (सायनिकोबालमिन) नीट शोषले जात नाही. याउलट दुधात असलेल्या केसीन या प्रथिनामुळे दुधातील बी १२ जास्त चांगल्या प्रमाणात शोषले जाते. यामुळे जर आपण ब १२ जीवनसत्त्वाची गोळी दुधाबरोबर घेतली तर त्यातील जीवनसत्त्व जात चांगले शोषले जाते.

In reply to by सुबोध खरे

असल्यामुळै त्या क्षणाला जेव्हैडे जरुरी असेल तेव्हडेच वापरले जाते बाकीचे शरिराबाहेर टाकले जाते. नैसर्गीक biota त्याच्या ऊपल्ब्धेतेची पुर्ण काळजी घेतो. वयोमानानुसार त्याचे शरीरात शोषण होते. त्यामुळे जो पर्यंत त्याचे रोगात रुपांतर होत नाही तो पर्यंत त्याची काळजी करु नये व वैद्यांचे व औषध कंपन्यानचे खिसे भरु नये.

In reply to by जालिम लोशन

बी १२ हे जीवनसत्त्व जरी पाण्यात विद्राव्य असलं तरीही ते काही प्रथिनांबरोबर संयुग करून आपल्या यकृतात साठवून ठेवलं जातं. बी १२ ची रोजची गरज १ मायक्रो ग्रॅम असते आणि यकृतात असे १००० मायक्रोग्रॅम पर्यंत साठवून ठेवले जाते. त्यामुळे अगदीच दूध न पिणारा शाकाहारी किंवा मांसाहारी असेल तर त्याला या जीवनसत्त्वाची कमतरता भासते. आणि जसे वय होत जाते तास आहार कमी होतो आणि शोषणही कमी होते यामुळे याची कमतरता भासते. यात एक दुसरा घटक म्हणजे दारू पिणे यामुळे आपल्या यकृताची हानी होते आणि त्यातील जीवनसत्त्व नष्ट होते. अशा लोकांना सुद्धा नंतर ब १२ जीवनसत्त्वाची कमतरता भासू लागते. ( यात यकृताची हानी किती आणि एकंदर आहाराचा असमतोल किती हे सांगणे कठीण आहे). हीच स्थिती कावीळ झाल्याने यकृताची हानी झाल्यास होऊ शकते. म्हणून काविळीतून बरे झाल्यावर समतोल चौरस आहार घ्यावा( तो तसाही असावाच) हे जास्त संयुक्तिक आहे.

अमचा डॅाक्टर नेहमी सांगतो की अर्धे केळे आणि अर्धा कप दुध दोनवेळा असे आठदहा दिवस घ्या. गोळ्या दोन दिवसांच्याच देतो. मला तर त्याच्या दवाखान्यात बसल्याबसल्या बरे वाटायला लागते. हे मी त्याला सांगतो. साधारण पस्तिशिचा आहे, मुलुंडहून येतो डोंबिवलीला सकाळसंध्याकाळ. निरसे दूध शहरात सर्वांनाच मिळणार नाही पण प्यायला हवे. वाळक्या गवतातून गाइम्हशी कायकाय सकस बनवतात!!

भाज्या फळे इंजेक्शन देउन पिकवतात, दुधात युरियाआणि शँपु घालुन फेस आणतात, कोंबड्या मानेत ईंजेक्शन मारुन दोन आठवड्यात पिल्लाची मोठी करतात, आणि अंडी नर मादीचे फलन न होताच कृत्रिमपणे तयार होतात. शहरात आपल्याला ऑर्गॅनिक नावाखाली महागाने जे विकतात ते पण भरवशाचे नसते. कोवळ्या उन्हात फिरायला जावे तर सर्वांचे शरीर पाहिजे तेव्ह्ढी व्हिटामिन तयार करेलच असे नाहि. मग कॅप्सुल घेतल्या तर काय बिघडले?

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

कॅप्सूल घेतल्या तर बिघडले काहीच नाही. फायदा तर होईलच. परंतु आता पर्यंत आपल्याला सर्वच जीवनसत्त्वांचा शोध लागला आहे हे गृहीतक १०० % बरोबर म्हणता येणार नाही. म्हणजेच अजूनही अशी अनेक सूक्ष्म द्रव्ये असतील ज्यांचा आपल्याला शोध लागलेला नाही. त्यामुळे कॅप्सूल हा चौरस आहाराचा / अन्नाचा सोपा पर्याय असू नये.

In reply to by सुबोध खरे

चौरस आहाराला पर्याय अशा अर्थाने नाही म्हणालो मी, पण निदान जे पाकिटावर लिहिलेय तेव्ह्ढे तरी कॅप्सुलमध्ये मिळेल अशा अर्थाने म्हणालो आजकाल पैसे घ्या पण निदान चांगली वस्तु तरी द्या अशी विनंती करायचे दिवस आलेत.

. अंडी नर मादीचे फलन न होताच कृत्रिमपणे तयार होतात
रच्याकने, यात कृत्रिम काय आहे?

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

अंडी नर मादीचे फलन न होताच कृत्रिमपणे तयार होतात. अंडी घालणे हा कोंबडीचा नैसर्गिक गुणधर्म आहे. फलन झाले तरच (कोंबड्याबरोबर संबंध आला) त्यातून गर्भ धारणा होते अन्यथा अंडं खराब होऊ जातं. उत्क्रांतीप्रमाणे-- फलनाची हि प्रक्रिया माशां( जलचरां) मध्ये पाण्यात होते. मादी पाण्यात हजारो ते लाखो अंडी देते आणि नर तेथे आपले शुक्राणू सोडतो. आणि फलित अंड्यापासून पिल्लू (मासा) तयार होतो. यात बरीचशीं अंडी खाल्ली जातात/ फुकट जातात. पक्षांमध्ये हि प्रक्रिया मादीच्या शरीरात होते पण अंडं शरीराबाहेर दिलं जातं आणि तेथे उबवून त्यातून पिल्लू बाहेर पडतं. यात तुलनेत कमी अंडी फुकट जातात किंवा परभक्षकाकडून खाल्ली जातात. कोंबडी दर महिन्यास २० ते २५ अंडी देते. बहुतांशी सस्तन प्राण्यात अंडी शरीरातच राहतात तेथेच फलन होते गर्भ मादीच्याच शरीरात राहतो आणि गर्भधारणेच्या काळानंतर संपूर्ण असा जवळ जवळ स्वावलंबी जीव जन्माला येतो या प्रक्रियेत अंडी फुकट जाण्याचे प्रमाण अगदीच नगण्य असते. म्हणूनच मानवी शरीरात एका महिन्यात एकच अंडे तयार होते आणि त्याचे फलन झाल्यास एकच गर्भ राहतो. उत्क्रांतीमध्ये जसे सजीव वरच्या पायरीवर जातात तसे अंडी फुकट जाण्याचे प्रमाण कमी होत जाते पण पालकत्वाचा काळ आणि पालकत्वाची जबाबदारी वाढत जाते.

बाजारात निरनिराळी जीवनसत्त्वे औषधे म्हणून विकली जातात. केवळ शक्तिदायक म्हणून त्यांचा उपयोग करणे अयोग्य आहे. जलविद्राव्य जीवनसत्त्वे मूत्रातून उर्त्सजित होत असल्यामुळे शरीरात साचून राहत नाहीत व म्हणून विषारी ठरत नाहीत. याउलट अ आणि ड जीवनसत्त्वे अतिसेवनामुळे विषारी ठरू शकतात. ध्रुव-संशोधन मोहिमेस गेलेल्या प्रौढ माणसांच्या आहारात प्रत्येकी ३०० ते ५०० ग्रॅ. अस्वलाचे यकृत खाण्यात आल्यामुळे जोराचा आजार उत्पन्न होई (त्या प्राण्यांच्या यकृतात अ जीवनसत्त्व फार मोठ्या प्रमाणात असते). डोकेदुखी, उलट्या, अतिसार, चक्कर येणे ही लक्षणे ताबडतोब सुरू होत. काही दिवसांनंतर मात्र केस गळून पडणे व कातडीवर परिणाम होणे ही लक्षणे दिसू लागत. ड जीवनसत्त्वाच्या अतिसेवनाने उलटी व अतिसार ही लक्षणे प्रथम दिसू लागतात भूक मंदावणे, वजनात फार मोठ्या प्रमाणात घट होणे व वृक्क (मूत्रपिंड) अकार्यक्षम बनणे यांमुळे मृत्यूही ओढवतो

हा धागा काढून आदमासे आठ वर्षे होत आली आहेत. या विषयातील भारतीय गरजांच्या दृश्टीने सखोल संशोधन आणि विश्वासार्ह माहितीची पोकळी, चुकीच्या माहितीची भेसळ अधून मधून जाणवत राहिलेली आहे. असो. बिझ्नेस स्टँडर्ड हे वृत्त व्यावसायिक दृष्टीकोनातून असल्याची मर्यादा लक्षात घेऊनही त्यातील दर ४ पैकी १ भारतीयास ब१२ ची कमतरता असण्याची शक्यता ते ब१२सप्लीमेंट मार्केटची वार्षीक ७ टक्केची वाढ होत ४००० कोटी वार्षीकला पोहोचलेले मार्केट बद्दलचे वृत्ताची दखल घेण्यास हरकत नसावी.