व्हिटॅमीन बी-१२, काही प्रश्न
व्हिटॅमीनला मराठीत जीवनसत्व म्हणतात. जीवनसत्त्वे हे शरीरातील प्रक्रियांसाठी थोड्याप्रमाणात लागणारे पण अत्यंत महत्त्वाचे -म्हणजे यांची आहारातील/शरीरातील कमतरता आजारांचे कारण होऊ शकते- असे पोषणघटक असतात. यात A,B,C,D,E,K अशा प्रकारच्या नावांची जीवनसत्वे असतात. (इथपर्यंत मराठी विकिपीडिया)
यातील B या जीवनसत्वाचे विवीध क्रमांक असतात त्यातीलच शाकाहारी लोकांना अकस्मिक सॉलीड शारीरीक धक्का देऊ शकते ते म्हणजे व्हिटॅमीन बी-१२ ची कमतरता. बी-१२ अंशतः दूध आणि अंडी यातून मिळू शकते - यात अंशतः हा शब्द अत्यंत महत्वाचा असावा- एखादी गोष्ट शक्य असावी आणि ती प्रत्यक्ष सातत्याने व्यवहारात सवयीत असावी यात फरक असावा.
मी माझे तज्ञांसाठीचे प्रश्न नंतर विचारतो पण धागाचर्चा चालू ठेवण्यासाठी व्हिटॅमीन बी-१२ हा कंटेंट महत्वाचा भाग आहे अशा मिपा पाककृतींचे व्हेज नॉनव्हेज दोन्ही दुवे अथवा माहिती प्रतिसादातून मिळावी अशी विनंती आहे.
दुसरे तुम्ही पाकीट बंद दूध विकत घेता का ? त्यावर बी-१२ चे न्युट्रीशनल व्हॅल्यूची माहिती असते का ?
.
.
.
.
आता वैद्यकीय आणि आहारशास्त्र व्यवसायातील तसेच जैवरसायन (बायोकेमेस्ट्री) आणि प्राणीशास्त्र जाणकारांसाठीचे माझे प्रश्न
* वैद्यकीय आणि आहारशास्त्र
१.१) सर्वसाधारणपणे दिवसातून जे लोक केवळ दोन ते तीन वेळा चहातून मिळेल तेवढेच दूध घेतात -अंडी सेवन करत नाहीत- त्यांची व्हिटॅमीन बी-१२ ची गरज पुर्ण होते का होत असेल तर किती प्रमाणात.
१.२) ज्यांना अंडी आणि मांसाहार बिलकूल सेवन करावयाचा नाही सोकॉल्ड फोर्टीफाईड पर्याय आणि गोळ्यां-औषधींवर अवलंबून रहावयाचे नाही त्यांनी बी-१२ ची पूर्ण गरज पूर्ण होण्यासाठी नेमक्या किती दूधाचे सेवन करणे आवश्यक आहे.
१.२.१) गाईचे दूध घेणार्यांनी किती सेवन करावे
१.२.२) म्हशीचे दूध घेणार्यांनी किती दूध सेवन करावे
१.२.३) बकरी आणि शेळीचे दूध घेणार्यांनी किती दूध सेवन करावे
१.२.४) दही स्वरुपात असेल तर किती सेवन करावे
१.२.५) पनीर स्वरुपात बी-१२ मिळते का मिळत असेल तर किती पनीर एकावेळी सेवन करावे
१.२.६) रसगुल्ला आणि रसमलाई स्वरुपातून कितपत बी-१२ मिळू शकते, मिळत असेल तर ते किती सेवन करावे
१.२.७) खवा आणि पेढ्यांच्या स्वरुपातही बी-१२ मिळू शकते का , मिळत असेल ते किती प्रमाणात सेवन करावे ?
१.२.८) खरवसातून बी-१२ मिळू शकते का मिळत असेलतर किती प्रमाणात सेवन करावे ?
१.२.९) खजूर आक्रोड अशा सुक्यामेव्यातून बी-१२ मिळते का मिळत असेलतर किती प्रमाणात सेवन करावे.
१.२.३) ज्यांना अंडी चालतात त्यांच्या आहारात दूध आणि अंडी मिळून किती सेवन करावे ? सोकॉल्ड फोर्टीफाईड पर्याय आणि गोळ्यां-औषधींवर अवलंबून न राहता सुचवलेल्या केवळ दूध आणि अंडीतून किती गरज पूर्ण होते किती गरज शिल्लक राहते ?
२) मासे या प्रकारातील कोणकोणत्या मास्यातून बी-१२ मिळते मास्यांचे किती सेवन करणे अभिप्रेत असते
३) गोमांस सोडून इतर कोणकोणत्या मांसाहारी पदार्थातून बी-१२ ची गरज पूर्ण करता येऊ शकते जसे की चिकन किंवा मटन यांचे किती सेवन करावे.
४) एखाद्या आहार पदार्थात किती बी-१२ आहे हे कोणकोणत्या प्रयोगशाळेतून तपासून मिळू शकते ? ( हा प्रश्न व्यक्तीच्या शरीरात नव्हे तर पदार्थात असा आहे)
५) बी-१२ चे पोषणमुल्य संबंधीत आहार सेवन केल्यानंतर किती कालावधी पर्यंत मानवी शरीर सांभाळून वापरते ही प्रकीया कशी होते ?
६) बर्याच कड्डक शाकाहारी व्यक्तींच्या जीवनाचा बराच मोठा कालावधी बी-१२च्या कमतरतेचा फटका बसत नाही तोपर्यंत बर्यापैकी चालू दिसतो कमतरतेचा फटका बसण्याच्या आधीच्या काळात बी-१२ च्या सेवना शिवाय शाकाहारी व्यक्ती तग कशा धरतात ? कि हे तग धरणे वरकरणी असते आणि त्या अभावाने आतून पोखरल्या जात असतात ?
७) व्यक्तिंनी बी-१२च्या कमतरते साठी तपासणी केव्हा करावी ?
८) रक्तस्त्राव होणार्या/ रक्तदान करणार्या शाकाहारी व्यक्तींना बी-१२ विषयी अधिक काळजी घ्यावी लागते का ?
९) बी-१२ आंतर्भूत केलेल्या आहाराने कोलेस्ट्रॉल अथवा वजन वाढीच्या समस्या येऊ शकतात का तसे असेल तर त्यांचे निराकारण करणारा समतोल कसा साधावा
१०) या दुसर्या मराठी संस्थळावरील धागालेखात काही आक्षेप बी-१२च्या संदर्भात नोंदवले गेलेले दिसतात त्याची शहानिशा करुन हवी आहे.
११) कलाकंद, श्रीखंड आणि आईस्क्रीम या पदार्थातून बी-१२ किती प्रमाणातून मिळू शकते, बी-१२ची गरज पूर्ण होण्यासाठी त्यांचे सेवन किती केले जाणे जरुरी असते?
.
.
.
.
*जैवरसायन आणि/अथवा प्राणीशास्त्र क्षेत्रातील जाणकारांसाठीचे प्रश्न
बी-१२ बाबत आंतरजालावर शोधले असता -जिथपर्यंत मला समजले चुभूदेघे- कोणत्याही वनस्पतीत बी-१२ नसते तर केवळ काही प्राण्यांच्या शरीरात वनस्पती चघळली अथवा जिरवली जाताना वनस्पतीत कोबॉल्ट हा घटक मिनरल स्वरुपात असेल आणि नेमक्या स्वरुपाचे एन्झाईम असलेले बॅक्टेरीआ असतील तर आणि तरच अशाच प्राण्यांच्या शरीरात फर्मेंंटेशनच्या विशीष्ट क्रियेने बी-१२ तयार होते. संदर्भ एवढी माहिती वाचल्या नंतर -कदाचित बाळबोध असतील पण- मला काही प्रश्न पडले ते असे.
१) असे बॅक्टेरीआ मिळवून प्राण्यांच्या शरीरात पार पाडली जाणारी फर्मंटेशन प्रक्रीया वनस्पतींवर बाहेर पारपाडणे का शक्य होत नसेल ?
२) त्या प्राण्यांच्या शरीरात हि प्रक्रीया चयापचयासोबत एवढ्या वेगाने कशी होत असेल ? आपण दही इडलीचे पीठ आंबवतो यापेक्षा प्राण्यांच्या शरीरात होणारी प्रक्रीया कशा प्रकारे वेगळी असते ?
३) मास्यांमध्ये ही प्रक्रीया नेमकी कशी पार पडते
४) ज्या प्राण्यांमध्ये बी-१२ तयार होत नाही अशा प्राण्यांना त्यांच्या स्वतःसाठी बी-१२ची कमतरता जाणवत नाही का ?
५) एखाद्या आहार पदार्थात किती बी-१२ आहे हे कोणकोणत्या प्रयोगशाळेतून तपासून मिळू शकते ? हा प्रश्न या विभागात रिपीट करत आहे.
.
.
.
.
.
सुचतील तसे अजून प्रश्न अॅडवेन. इतरकुणाला प्रतिसादातून अजून प्रश्न जोडावयाचे असतील तर स्वागत आहे.
.
.
.
अनुषंगीकाव्यतरीक्त अवांतर टाळण्यासाठी, चर्चा सहभाग आणि प्रतिसादांसाठी आभार.
* बी १२ इतर मिपा धागे
* कोबालामिन (ब-१२) : एक अनोखे व्हिटॅमिन
* https://www.misalpav.com/node/18374
*
वाचने
194872
वाचनखूण
प्रतिक्रिया
199
In reply to एक्झॅक्ट डिग्री नव्हे पण आपण by माहितगार
अय्या, हो?
In reply to अय्या, हो? by आनंदी गोपाळ
तुम्हाला जामोप्या यांच्या
In reply to त्यांच्या डिग्रीशी तुम्हाला by आनंदी गोपाळ
सल्ले देणारे काय लायकीचे आहेत ते कळण्यासाठी.
In reply to सल्ले देणारे काय लायकीचे आहेत ते कळण्यासाठी. by रुस्तम
भरपूर प्रॉब्लेम.
In reply to भरपूर प्रॉब्लेम. by आनंदी गोपाळ
नाही ठरवता येत
In reply to त्यांच्या डिग्रीशी तुम्हाला by आनंदी गोपाळ
सल्ले देणारे काय लायकीचे आहेत ते कळण्यासाठी.
In reply to ठीक आहे by सुबोध खरे
डॉक्टर साहेब
In reply to ठीक आहे by सुबोध खरे
+१००
..
@ डॉ. खरे.
In reply to @ डॉ. खरे. by आनंदी गोपाळ
गोपाळ राव
In reply to गोपाळ राव by सुबोध खरे
या माणसाच्या एकंदर
In reply to या माणसाच्या एकंदर by आनंदी गोपाळ
http://www.misalpav.com
In reply to या माणसाच्या एकंदर by आनंदी गोपाळ
माझाच मला प्रतिसाद.
In reply to माझाच मला प्रतिसाद. by आनंदी गोपाळ
गोपाळराव
In reply to गोपाळराव by सुबोध खरे
खरे साहेब,
In reply to खरे साहेब, by आनंदी गोपाळ
Sir, Your MD, does NOT stand
In reply to Sir, Your MD, does NOT stand by सुबोध खरे
गोपाळरावठीक आहे
ठीक आहे माझा समज भारतीय कप बद्दल झाला होता जो १५० मिली होता. चूक झाली. पण २. मायक्रो ग्राम ब १२ साठी ३०० मिली ऐवजी शाकाहारी माणसाला ५०० मिली दुध/ दही / ताक प्यायला लागेल. जे फारसे अवघड नाही. उगाच अर्ध्या भारतीय जनतेला जन्मापासून गोळी घ्या सांगण्यापेक्षा बरे नव्हे का? त्यासाठी एवढे फालतू प्रतिसाद टाकून आपण काय सिद्ध केलेत. एकही चूक मान्य न करता उगाच सारवत बसण्यापेक्षा व्यवस्थित प्रतिसाद देत चला. जिथे तिथे थुकून स्वताचे हसे करण्यापेक्षा हे बरे.चूक झाली हे मी मान्य केलेलंच आहे. आपल्या दर्शनासाठी प्रतिसाद परत अख्खा उद्धृत करीत आहे. चूक झाली तर मला लाज वाटत नाही. बालादपि सुभाषितम ग्राह्यं. ते न पाहता तुम्ही प्रच्छन्न आरोप करता याचेच आश्चर्य वाटते.In reply to Sir, Your MD, does NOT stand by सुबोध खरे
माझे बायस स्पष्ट आहे. ते मेडिसिनसाठी आहे.
In reply to माझे बायस स्पष्ट आहे. ते मेडिसिनसाठी आहे. by आनंदी गोपाळ
गोपाळ राव
In reply to खरे साहेब, by आनंदी गोपाळ
another qualified Doctor :D
In reply to गोपाळराव by सुबोध खरे
डॉ. साहेब , धागा कोणताही
In reply to माझाच मला प्रतिसाद. by आनंदी गोपाळ
गोपाळराव
अमूल ताकाची किंमत वाढली असून
डॉ.खरे
In reply to डॉ.खरे by मार्मिक गोडसे
बॉडी फॅट इंडेक्स प्रमाणेच,
In reply to बॉडी फॅट इंडेक्स प्रमाणेच, by आनंदी गोपाळ
गोपाळराव
In reply to डॉ.खरे by मार्मिक गोडसे
गोडसे साहेब
In reply to गोडसे साहेब by सुबोध खरे
आगाऊ माफी मागून, व्यक्तिगत आकसाने दिलेला प्रतिसाद.
In reply to आगाऊ माफी मागून, व्यक्तिगत आकसाने दिलेला प्रतिसाद. by आनंदी गोपाळ
पाणी शुद्धीकरणाच्या कोणत्या
In reply to गोडसे साहेब by सुबोध खरे
गोडसे साहेब
In reply to गोडसे साहेब by सुबोध खरे
सामान्यतः,
In reply to गोडसे साहेब by सुबोध खरे
Increased hygiene in the food
In reply to Increased hygiene in the food by सुबोध खरे
धन्यवाद डॉ.खरे.
In reply to धन्यवाद डॉ.खरे. by मार्मिक गोडसे
ह्याला जोडून एक प्रश्न
व्हिटॅमीन बी-१२ च्या कमतरतेने
आहारात अजून असे अनेक सूक्ष्म
In reply to आहारात अजून असे अनेक सूक्ष्म by सुबोध खरे
डॉक्टर खरे साहेब,
In reply to डॉक्टर खरे साहेब, by श्रीगुरुजी
श्रीगुरुजींशी बाडिस!
In reply to डॉक्टर खरे साहेब, by श्रीगुरुजी
श्रीगुरुजींशी बाडिस!
In reply to श्रीगुरुजींशी बाडिस! by बोका-ए-आझम
श्रीगुरुजीं + बोका-ए-आझम यांच्याशी बाडिस
mast pakadalay. baakiche
सगळी चर्चा वाचली. अजुनही खरे
In reply to सगळी चर्चा वाचली. अजुनही खरे by पिलीयन रायडर
प्रतिसादाशी सहमत.
In reply to सगळी चर्चा वाचली. अजुनही खरे by पिलीयन रायडर
लाख वेळा सहमत.
In reply to सगळी चर्चा वाचली. अजुनही खरे by पिलीयन रायडर
मी पण सहमत
In reply to सगळी चर्चा वाचली. अजुनही खरे by पिलीयन रायडर
+११
In reply to सगळी चर्चा वाचली. अजुनही खरे by पिलीयन रायडर
सहमत.
In reply to सगळी चर्चा वाचली. अजुनही खरे by पिलीयन रायडर
+50000
In reply to +50000 by सामान्य वाचक
सहमत .
In reply to सगळी चर्चा वाचली. अजुनही खरे by पिलीयन रायडर
पिलीयन रायडर - उत्तम प्रतिसाद
In reply to सगळी चर्चा वाचली. अजुनही खरे by पिलीयन रायडर
+ १११ अतिशय सहमत
In reply to सगळी चर्चा वाचली. अजुनही खरे by पिलीयन रायडर
ज्या हुशार पण फटकळ डॉक्टरांची
In reply to ज्या हुशार पण फटकळ डॉक्टरांची by अप्पा जोगळेकर
तोच शब्द
In reply to तोच शब्द by अत्रन्गि पाउस
असतात ना हो काही लोकं.. जी
...
In reply to ... by anilchembur
'ठिक आहे' आता पर्यंतच्या
In reply to 'ठिक आहे' आता पर्यंतच्या by माहितगार
मी पण तोच विचार करतोय कि
In reply to मी पण तोच विचार करतोय कि by शलभ
...
In reply to ... by anilchembur
मोगा खान
In reply to मोगा खान by सुबोध खरे
..
In reply to ... by anilchembur
मोगा..आम्ही नीट वाचतोय म्हणून
In reply to ... by anilchembur
लहानपणी किंवा गरोदरपणा सोडता
In reply to ... by anilchembur
गोपाळराव
In reply to गोपाळराव by सुबोध खरे
खिक्
.... इथे सगळे सोर्सेस आहेत
In reply to .... इथे सगळे सोर्सेस आहेत by anilchembur
मोगा खान
In reply to मोगा खान by सुबोध खरे
डॉक्टर
In reply to डॉक्टर by झेन
+१
In reply to +१ by सस्नेह
+१
In reply to डॉक्टर by झेन
सहमत
In reply to मोगा खान by सुबोध खरे
....
In reply to .... by anilchembur
तार्कीक उणीव
In reply to तार्कीक उणीव by माहितगार
..
In reply to .... by anilchembur
बी १२ फोर्टिफाइड फूड भारतात
In reply to बी १२ फोर्टिफाइड फूड भारतात by सुबोध खरे
म्हणजे ताक स्वस्त कि बी १२
शाकाहारी लोकांना काही
In reply to शाकाहारी लोकांना काही by कंजूस
कंजूस साहेब
In reply to कंजूस साहेब by सुबोध खरे
बरोबर.आहारात विविधता ठेवणे
रोचक चर्चा!!
धागा लेखकाचे नेमके कुठे चुकले ?
In reply to धागा लेखकाचे नेमके कुठे चुकले ? by माहितगार
तुमचं काहीही चुकलेलं नाही.
In reply to तुमचं काहीही चुकलेलं नाही. by बोका-ए-आझम
सकाळी सकाळी भारी विनोद करता
बरीच अवांतर चर्चा सुरु आहे
In reply to बरीच अवांतर चर्चा सुरु आहे by अत्रे
चांगली सूचना आहे, खरेतर हे
In reply to चांगली सूचना आहे, खरेतर हे by माहितगार
quora dot com वर कोणत्याही
काय ठरले म शेवटी ?
In reply to काय ठरले म शेवटी ? by स्पा
आस कदी ठरतंय का
गोळी की ताक ?
In reply to गोळी की ताक ? by anilchembur
का पन्नाशी झाली वाटतं?