✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

चालू घडामोडी - एप्रिल २०१९

ड
डॉ सुहास म्हात्रे यांनी
Wed, 04/03/2019 - 11:24  ·  लेख
लेख
India gets custody of 2017 CRPF camp attack plotter from UAE परदेशातून, विशेषतः युएईमधून, अतिरेकी व आर्थिक गुन्हेगारांना परत आणण्याची प्रक्रिया जोरात चालू आहे. जेश ए मोहम्मद ता अतिरेकी संघटनेतील, निसार तांत्रे या एका महत्वाच्या अतिरेक्याला भारतात परत आणले गेले आहे. डिसेंबर २०१७ मध्ये जम्मूकाश्मीरमधील लेथपोरा येथील CRPF कँपवर झालेल्या अतिरेकी हल्ल्याचा हा मुख्य सूत्रधार होता. त्या हल्ल्यात पाच जवानांना वीरमरण आले होते आणि तीन अतिरेक्यांचा खातमा झाला होता.
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
88758 वाचन

💬 प्रतिसाद (176)

प्रतिक्रिया

निवडणूक प्रचारात कोणीच मुख्य

विजुभाऊ
Wed, 04/03/2019 - 13:30 नवीन
निवडणूक प्रचारात कोणीच मुख्य मुद्दे मांडत नाहिय्ये. मोदी नी लावलेल्या ट्रॅप मधवोविरोध स्वतःच सापडत आहेत. निवडणूकीत मोदीना जर कोणी परभुत करू शकेल तर ते त्यांचे स्वपक्षीयच. ( उ प्र च्यामुख्यमंत्र्यांनी सेनादलाचा उल्लेख मोदीसेना असा केला) शिवसेना नक्की मुक्ताफळे उधळते त्यांचे त्यानाच समजत नाही. किरीट सोमय्या ना विरोध कशा साठी आहे तेच सेनेला माहित नाहिय्ये. लालु यादवंच्या ओसाड वाडीत बंड झालंय. ( त्याने किती फरक पडेल असे वाटतय) मायवती नी उधळलेली मुक्ताफळे पाहिली तर त्याना त्यांच्याच पुतळ्याच्या मांडीत बसवून कुठेतरी दूर जंगलात सोडून यावे / गंगा नदीत विसर्जन करावे. राहूल गांधीचे २जी स्पेक्ट्र घोटाळ्यात थेट सम्बंध असल्याचे पुरावे दिले जात आहेत.
  • Log in or register to post comments

श्री. किरीट सोमय्यांच्या जागी

सुबोध खरे
Wed, 04/03/2019 - 18:32 नवीन
श्री. किरीट सोमय्यांच्या जागी श्री मनोज कोटक याना उमेदवारी दिली आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ

भाऊ तोरसेकर यांचा राहुल आणि

जानु
Wed, 04/03/2019 - 14:47 नवीन
भाऊ तोरसेकर यांचा राहुल आणि मोदी यांनी आपसी खेळातून इतर पक्षांना नामोहरम करण्याबद्दल लेख वाचला. (एक ओळी धागा नको, वेगळा धागा म्हणून काढणे आणि त्यावर त्या लेखापेक्षा वेगळे जोडणे आवश्यक नाही, असे वाटल्याने येथे लिहले आहे.) यावर मते वाचायला आवडेल.
  • Log in or register to post comments

भाजपचा छुपा प्रचारक.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गुरुवार, 04/04/2019 - 09:56 नवीन
भाऊ तोरसकर एककल्ली आणि विद्यमान सरकारचे प्रचारक असल्यासारखे लिहित असतात, त्यांचं लेखन गंभीरपणे घ्यायचे कारण नाही. मी त्यांच्या फेबू भिंतीवर आपलं लेखन पाहता आपणास नवीन सरकारात किमान एखादे महामंडळ वगैरे मिळेल असे लिहून आलो होतो. :) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जानु

मंत्रिपदाचे दावेदार

lakhu risbud
गुरुवार, 04/04/2019 - 10:35 नवीन
सध्याच्या सरकार चे समर्थन करणे किंवा टीका करणे याचे काही परिमाण असेल ......... तर त्याच न्यायाने "समतोल,निष्पक्ष,सामान्य जनतेचा कळवळा" वगैरे वगैरे असणारे काही बुद्धीमंत लोक हे गठबंधन किंवा काँग्रेस च्या होऊ शकणाऱ्या सरकारात मंत्रिपदाचे दावेदार तर नक्की ठरतात !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

हो ना,

भंकस बाबा
गुरुवार, 04/04/2019 - 12:43 नवीन
उद्या जर मायवती संरक्षणमंत्री व तेजस्वी यादव शिक्षणमंत्री झाले तर आश्चर्य वाटायला नको!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: lakhu risbud

उद्या जर मायवती संरक्षणमंत्री

विजुभाऊ
गुरुवार, 04/04/2019 - 13:33 नवीन
उद्या जर मायवती संरक्षणमंत्री व तेजस्वी यादव शिक्षणमंत्री झाले तर
तर बहुधा भारत पाक सीमेवर त्यांचे उभे केलेले पुतळे पाहून पाक सैन्य माघारी फिरेल , पुतळ्याना अडकून रणगाडे मोडून पडतील. बिहारचे १२वी टॉपर हे एक उदाहरण पुरे ठरेल तळा आणि गाळातील शिक्षण कसे होईल या बाबत सांगायला
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भंकस बाबा

काँग्रेसच्या सरकारात पद्म

डँबिस००७
गुरुवार, 04/04/2019 - 17:07 नवीन
काँग्रेसच्या सरकारात पद्म पुरस्कार कसे दिले जातात त्याच बरोबर महामंडळातल महत्वाच्या जागा कश्या वाटल्या जातात हे ह्यां ना चांगलेच माहीती आहे असे दिसते. कदाचीत त्यावेळेला संधी हुकली आणी आता अशी संधी मिळणे नाही हे पाहुन ईव्हळणे चालु आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: lakhu risbud

बरखा , राजदीप यांचे ग्यान

ट्रम्प
गुरुवार, 04/04/2019 - 18:02 नवीन
बरखा , राजदीप यांचे ग्यान ओसांडून वाहत होते म्हणून त्यांना पद्म डिलेत का ? रोख तुमच्या वर नाही , पण हा प्रश्न मला खूप दिवस त्रास देताय :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

प्रगतिशील शेतकरी चावरे कुत्रे

सुबोध खरे
गुरुवार, 04/04/2019 - 19:31 नवीन
प्रगतिशील शेतकरी चावरे कुत्रे आपल्या बाहेच्या अंगणात पाळून ठेवत असतात म्हणजे मग बाहेरून कोणी त्रास देऊ लागला कि आपण काहीही न करताहि तेच भुंकून आपले काम करत असतात. ता क :- याचा वरील कोणत्याही प्रतिसादाशी संबंध नाही
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ट्रम्प

चानेलवरच्या मुलाखतीत सामान्य

कंजूस
Wed, 04/03/2019 - 15:48 नवीन
चानेलवरच्या मुलाखतीत सामान्य लोक " अम्हाला कुठलाही लाभ नाही झाला" सांगत आहेत.
  • Log in or register to post comments

सामान्य लोक कधीच म्हणणार

बाप्पू
Wed, 04/03/2019 - 16:03 नवीन
सामान्य लोक कधीच म्हणणार नाहीत कि आम्ही समाधानी आहोत. ते 25 वर्ष्यापुर्वी देखील समाधानी नव्हते आणि इथून पुढच्या 25 वर्ष्यानंतर देखील समाधानी नसणार आहेत. कारण त्यांची बुद्धीच सामान्य आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस

खरं म्हणजे राजने निवडणूकीत

कंजूस
Wed, 04/03/2019 - 19:24 नवीन
खरं म्हणजे राजने निवडणूकीत उतरायला पाहिजे. संसदेत बोलायला मिळणाऱ्या माइक्रोफोनची वट वेगळीच आणि चौकातल्या माइकची वेगळी. उर्मिला मातोंडकर काय जोरदार बोलतेय.
  • Log in or register to post comments

माईकची वट दाखवण्यासाठी संसदेत

सोन्या बागलाणकर
गुरुवार, 04/04/2019 - 04:38 नवीन
माईकची वट दाखवण्यासाठी संसदेत जातात? हे मला माहीतच नव्हतं. मी आपला उगाच समजत होतो की लोकांची कामं करायला त्यांना लोक निवडून देतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस

कशाला कीस पाडताय?

आनन्दा
गुरुवार, 04/04/2019 - 07:24 नवीन
कशाला कीस पाडताय? भावार्थ समजून घ्या ना वं
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सोन्या बागलाणकर

उर्मिलाबानो भाजपात आहेत का

तेजस आठवले
Wed, 04/03/2019 - 21:16 नवीन
उर्मिलाबानो भाजपात आहेत का काँग्रेस मध्ये?
  • Log in or register to post comments

उर्मिलाबानो भाजपात आहेत का

बाप्पू
Wed, 04/03/2019 - 22:16 नवीन
उर्मिलाबानो भाजपात आहेत का काँग्रेस मध्ये?
दोन गोष्टी .. 1) उर्मिला मातोंडकर यांनी मोहसीन मिर यांच्याशी काही वर्षांपूर्वी निकाह केला. आणि 2) उर्मिला जी यांनी एका मध्ये प्रवेश केला.. आणि आता निवडणूक लढवत आहेत आता बातमी क्रमांक 1 आणि 2 यांच्यावर विचार केला तर समजेल कि उर्मिला बानो कोणत्या पक्षात जाणार.. उत्तर सोपे आहे.. - आपली तीच.. सेकुलर वादी आणि शांतता धर्मप्रिय खांग्रेस..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तेजस आठवले

लाल दिव्याच्या अम्बेसेडर

कंजूस
गुरुवार, 04/04/2019 - 07:39 नवीन
लाल दिव्याच्या अम्बेसेडर गाडीची गम्मत वेगळीच असते असं म्हणाले होते पंत.
  • Log in or register to post comments

छे छे ,

भंकस बाबा
गुरुवार, 04/04/2019 - 08:43 नवीन
धर्मान्तर केल्यावर साक्षात्कार होतो की आपण इथे एकटे पडतोय, कारण घरात मुक्त वातावरणाला बंदी! मग बोलायचे कशावर घरातील इतराशी? कारण चर्चा करायला गेले तर पवित्र पुस्तकातील दोन तीन श्लोक कानावर पडतील, आणि आपल्या रंगील्या बानो इथे कमी पडतात ना! मग चला बाहेर, आपण या घरात किती सुखी आहोत ते दाखवू, (पक्षी आपला निर्णय चुकला नाही हे पटवून देउ) बाकी कोंग्रेसने जाहिरनामा अगदी थाटात परोसला. काश्मीरला भारतापासुन तोडायची धोरणे आखताना काश्मीरी पण्डिताविषयी चकार शब्द या जाहिरनाम्यात नाही, म्हणजे देशभर तुम्ही टिळा लावून व रुद्राक्षाच्या माळा घालून फिरणार पण जिथे हिंदू धर्माविषयी प्रश्न उभा राहिला की घुमजाव करणार! वाह रे खान्ग्रेसी एक प्रश्न , उर्मिलाबाई आपल्या जुन्या नावाने निवडणूक लढवत आहे, निवडणूक आयोगाकडे तक्रार करून तिला असली नाव प्रचारात वापरायला भाग पाडू शकतो का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस

मोठा गहन प्रश्नच आहे.

कंजूस
गुरुवार, 04/04/2019 - 09:27 नवीन
मोठा गहन प्रश्नच आहे.
  • Log in or register to post comments

किरीट सोमय्याना सेनेचा इतका

विजुभाऊ
गुरुवार, 04/04/2019 - 10:35 नवीन
किरीट सोमय्याना सेनेचा इतका कडाडून विरोध कशासाठी होता? कोणी सांगेल का ज्या पद्धतीने प्रचार चाललेला आहे त्यावरून असे दिसतेय की भारतापुढे आरोग्य सेवा,पाणी , शिक्षण ,रोजगार औद्योगीक प्रगती वगैरे प्रश्नच शिल्लक नाहिय्येत. हिंदी भाषीक पट्ट्यात तर विकास होऊन गेलेला आहे. लालू , तेजस्वी, मुलायम बुवा बबुवा यांचाच काय तो प्रश्न आहे असे वाटतेय. नदीजोड प्रकल्प हा पुर्ण विस्मरणात गेलाय.
  • Log in or register to post comments

निवडणुकांचा प्रचार...

mayu4u
गुरुवार, 04/04/2019 - 10:43 नवीन
निवडणुकांचा प्रचार ही फार मौजेची गोष्ट आहे. कोणताही पक्ष प्रचारात देशाचा विकास याबाबत बोलत नाहीये. तरीही दोन्ही प्रमुख पक्षांच्या शासनाने आपापल्या कार्यकाळात केलेली कामं बघून जनता मत देईल अशी आशा करूया.
  • Log in or register to post comments

विकास

गोंधळी
गुरुवार, 04/04/2019 - 16:50 नवीन
कोणताही पक्ष प्रचारात देशाचा विकास याबाबत बोलत नाहीये. हा विकास कोण आहे? २०१४ ला त्याचा खुपच बोलबाला होता. गुजरात मधिल निवडणुकांच्या वेळी तो वेडा झाला व तो हरवला आहे अस ऐकले होत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: mayu4u

नवीन नोकऱ्या देणे दूर राहिलं,

कंजूस
गुरुवार, 04/04/2019 - 16:11 नवीन
नवीन नोकऱ्या देणे दूर राहिलं, नवीन सरकारला प्रथम BSNL चे पावणे दोन लाख आणि MTNLचे पन्नासेक हजार कर्मचाऱ्यांचं करायचं काय हे सोडवावं लागेल. Bsnl/ mtnl कडे 4G चे वांधे आणि युएस/साउथ कोरिआत 5G सुरु झाले काल. डिसेंबरपर्यंत पन्नासेक शहरांत येणार. ३०० Mbps+ speed.
  • Log in or register to post comments

उर्मिला मातोंडकर हेच तिचे

दुश्यन्त
गुरुवार, 04/04/2019 - 16:29 नवीन
उर्मिला मातोंडकर हेच तिचे असली नाव आहे आणि ती आपल्या असली नावानेच निवडणूक लढत आहे. आपले नाव काय असावे हा प्रत्येकाचा स्वतंत्र अधिकार आहे.नियमानुसार त्यासाठी जे काही कागदपत्रे (ओळखपत्र , ऍफिडेव्हिट वगैरे) तिला आयोगाकडे द्यावेच लागते. माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील, प्रिया दत्त, पूनम महाजन, पंकजा मुंडे हि राजकीय क्षेत्रातली काही नावे. राजकीय, फिल्म आणि एकूण सर्वच क्षेत्रात स्त्रिया आपले माहरेचे नाव वापरतात हे काही नवीन नाही . बाकी दोन भिन्न धर्मीय व्यक्तींनी लग्न केले म्हणजे धर्मांतर केलेच पाहिजे असे काही नाही.
  • Log in or register to post comments

वायनाड मध्ये भारी झेंडे फडकत

स्वलिखित
गुरुवार, 04/04/2019 - 17:12 नवीन
वायनाड मध्ये भारी झेंडे फडकत आहेत म्हणे
  • Log in or register to post comments

वायनाड मध्ये रोड शो

बाप्पू
गुरुवार, 04/04/2019 - 19:13 नवीन
वायनाड मध्ये रोड शो मध्येशांततावादी लोक हिरवे झेंडे घेऊन नाचत होते.. यावरून समजून घ्या कि राहुल यांनी हीच सीट बॅक अप म्हणून का निवडली असेल..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वलिखित

माझा नावावर काही आक्षेप नाही

तेजस आठवले
गुरुवार, 04/04/2019 - 17:28 नवीन
माझा नावावर काही आक्षेप नाही पण लोकसत्तेमध्ये ती भाजपात गेल्याची बातमी आली होती म्हणून म्हटले.
  • Log in or register to post comments

ती बातमी त्यांनी एप्रील फूल

विजुभाऊ
गुरुवार, 04/04/2019 - 17:48 नवीन
ती बातमी त्यांनी एप्रील फूल म्हनून छापली होती. बातमी खाली तसा उल्लेख केलेला आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तेजस आठवले

कुबेरांनी त्यांची नेहमीची

तेजस आठवले
गुरुवार, 04/04/2019 - 18:18 नवीन
कुबेरांनी त्यांची नेहमीची फालतुगिरी चालू ठेवतानाच ही नवी फालतूगिरीपण चालू केली का... चान चान
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ

मोदी म्हणतात "दाराआडचा मुलगा

कंजूस
गुरुवार, 04/04/2019 - 17:35 नवीन
मोदी म्हणतात "दाराआडचा मुलगा कधीही बोलेल."
  • Log in or register to post comments

या निवडणुकीत भाजप ची कसोटी

ट्रम्प
गुरुवार, 04/04/2019 - 18:20 नवीन
या निवडणुकीत भाजप ची कसोटी आहे हे मात्र निश्चित !! तसेच या निवडणुकीत बऱ्याच प्रमाणात मध्यमवर्गीय ( टैक्स बेनिफिट ,देश प्रेम मुळे ) भाजप च्या बाजूने तर गरीब व शेतकरी वर्ग ( ज्यांच्या अपेक्षा कधीच पूर्ण होत नाही ) काँग्रेस व इतर च्या बाजूने होण्याची शक्यता वाटते . मोदी सरकार ने बदल घडवीण्यास ( इंफ्रास्ट्रक्चर ) सुरवात केली पण गरीबांना अपेक्षित आर्थिक ( भरपूर योजना सुरु करून देखील ) बदल झालेला वाटत नाही . अल्पसंख्यक आणि दलित समाज या वेळी रागा च्या एड्याचाळ्यानां पाठीम्बा देण्याची शक्यता वाटते . बाहेर फिरताना बरेच जण मोदींच्या विरोधात बोलताना आढळतात .
  • Log in or register to post comments

मला असे वाटतेय कि निरीक्षण

बाप्पू
गुरुवार, 04/04/2019 - 19:38 नवीन
मला असे वाटतेय कि निरीक्षण चुकतेय आपले. जितक्या लोकांना मी भेटलो त्यांच्यापैकी आर्थिक दृष्ट्या मध्यमवर्ग, आणि उच्च वर्ग हे दोन्ही मोदींच्या बाजूने दिसले. यामध्ये बरेचसे लोक हे नोटबंदी ला फासलेला निर्णय मानत असले तरी त्यामध्ये मोदींच्या हेतूबद्दल शंका उपस्थित करत नाहीत. इतर इन्फ्रा स्ट्रक्चर च्या कामामबत, सरंक्षण, कायदा सुव्यवस्था, आरोग्य आणि स्वछता याबद्दल मोदींची स्तुती आणि पाठराखण करतात. बाकी शेतकर्याबद्दल बोलायचे झाले तर 50-50 आहे. बरेचसे शेतकरी हे मोदींच्या बाजूने दिसतात. याला कारण म्हणजे पाणी आणि वीज याचा वाढलेला आवाका. मला अजूनही आठवतेय कि पुण्यापासून फक्त 20 काम च्या अंतरावर असलेल्या गावी 5 वर्ष्यापुर्वी 18-18 तस लोड शेडींग असायचे. पण आता अगदीच नगण्य प्रमाणात लोड शेडींग आहे. हा आणि असे इतर बरेचसे बदल ज्यांना समजले ते मोदींच्या बाजूने बोलताना दिसतात. जे शेतकरी एका दिवसात कर्जमाफी आणि एका दिवसात जादू होऊन शेतमालाला दुप्पट तिप्पट भाव मिळेल या आशेवर असतात ते मोदींना शिव्या घालतात. आर्थिक दृष्ट्या गरीब, सतत सरकारने काहीतरी फुकट द्यावे अशी अपेक्षा करणारे खूप लोक भारतात आहेत. आणि बरेचसे दलित लोक ज्यांना कितीही केले आणि काहीही झाले तरी आपल्यावर नेहमीच अन्याय होतो असे वाटत राहते. असे लोक यावेळी मोदींच्या विरोधात आहेत. पण ते त्या पक्षाला मतदान करतील जे त्यांच्या ह्या समस्या 65 वर्ष्यात सोडवू शकले नाहीत. या सर्वांना टार्गेट करण्यासाठी तर राहुल गांधी उर्फ खान यांनी महिना 12000 रुपये खैरात देण्याची घोषणा केली आहे. भाजपा च्या थोड्याफार जागा कमी होतील पण पुन्हा एकदा मोदी पंतप्रधान पदाची शपथ घेतील असे वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ट्रम्प

नंबर चा विचार केल्यास

ढब्ब्या
गुरुवार, 04/04/2019 - 20:20 नवीन
नंबर चा विचार केल्यास, ऊप मध्ये भाजपा २५ एक सीट गमवेल पण बंगाल आणि तामिळ्नाडू सारख्या ठिकाणी ह्या भरुन निघतील वाट्टय. गुजरात, महा, राजस्थाह, मप्र ह्या बेल्ट मध्ये भाजपा ला थोडा फटका बसेल पण फार काही नुकसान होइल असे वाटत नाही. त्यामुळे कदाचीत त्यांच्या सीट आहे तेवढ्याच रहतील आसं वाटतय. खांग्रेस मात्र उप्र मध्ये पुर्ण झोपेल अस वाट्टय. पण केरळ आणी बाकी राज्यात स्तिथी बरी असेल. पण एकूण २०-२५ जास्ती सिट मिळ्तील कदचीत. अर्थात हा माझा अंदाज, सद्य स्थिती बघून ... एकूणात भाजपा परत सत्तेत येइल जर खांग्रेस आणी ईतर मध्ये मतविभागणी झाली तर. बाकी खांग्रेस चा मॅनिफेस्टो बघुन कुंपणावरचे काही भाजपा कडे वळले तर बरय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ट्रम्प

भाजपाची कसोटी आहे असं दिसतंय खरं

ट्रेड मार्क
Fri, 04/05/2019 - 02:50 नवीन
विशेषतः काँग्रेसच्या जाहीरनाम्यामधील मुद्दे बघता मतदारांना प्रलोभन दाखवून गळाला लावण्याचा सरळसरळ प्रयत्न दिसून येतो आहे. महिन्याला ६ ते १२ हजार देण्याचे कबूल केलं आहे म्हणजे असे लोक ज्यांना याचा अर्थव्यवस्थेवर किती ताण येईल हे कळत नाही किंवा इतर काही ज्यांना घेणेदेणे नसते अश्या लोकांची मते खिश्यात घालण्याचा प्रयत्न आहे. या प्रकारचा प्रयोग दोन लाख कर्ज माफ करण्याचे वचन देऊन मप्र, राजस्थान मध्ये केला आहे आणि त्याला बळी पडल्यामुळे मतांची टक्केवारी कमी न होऊनसुद्धा भाजपला कमी जागा मिळाल्या. AFSPA , १२४ अ रद्द करणे आणि ३७०, ३५ अ रद्द न करणे हे मुस्लिमांना तसेच तुकडे गॅंगला त्यांचे पुढील आयुष्य त्यांचा अजेंडा राबवत सुखाने जगता येईल याचे आश्वासन आहे. याचे परिणाम ज्यांना फारसे समजत नाहीयेत किंवा समजले तरी काही घेणंदेणं नाहीये असे लोक पण काँग्रेसला मतदान करतील. तसेच NRC रद्द करण्याच्या आश्वासनामुळे ईशान्येकडील राज्यांमध्ये सुद्धा चांगली मते मिळू शकतात. त्यामुळे काँग्रेसला बऱ्यापैकी सीट्स मिळण्याची शक्यता आहे. अर्थात बहुमत मिळणे अशक्य आहे पण याचा परिणाम म्हणजे कडबोळ्याचे सरकार येणार. १९७७ आणि १९८९ चा इतिहास परत गिरवला जाणार का हे लवकरच कळेल. मी तर म्हणतो लोकांनी भाजपाला परत २ जागांवर आणून ठेवावं. भारतीय जनतेला फक्त माझा फायदा काय हेच महत्वाचं आहे, त्यामुळे हे इतर पक्ष त्यांची ही इच्छा पूर्ण करणार आहेत. बाकी देशाचे तुकडे होउदे, दहशतवादी हल्ले होउदे नाहीतर इस्लामिक स्टेट होउदे आपल्याला कर्जमाफी मिळतेय, पेट्रोल स्वस्त मिळतंय वर १२००० रुपये पण मिळत आहेत. अजून काय पाहिजे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ट्रम्प

अगदी बरोबर !!! +1111

ट्रम्प
Fri, 04/05/2019 - 14:38 नवीन
या वेळी खरच भाजप चे सरकार आलेच नाही पाहिजे !! मस्त पैकी सीरिया / येमेन सारखी यादवी , पेट्रोल संपन्न व्हेनझुयेला सारखे खायचे वांदे , पाकिस्तान सारखे अल्पसंख्यक चे धार्मिक उछाद वाढले पाहिजेत . त्याच प्रमाणे जंगला मध्ये हाइना हा प्राणी जसा विचित्र आवाज काढून जीवंत हरिण ला पोटा पासून खायला सुरवात करतो आणि मग थोड्या वेळाने ते हरिण हळू हळू मृत्यु अवस्थे ला पोहोचते तशी अवस्था भारतातील मतदारांची झाली पाहिजे , कारण ग्लानी अवस्थेत वेदना जाणवणार नाही व सुखद मृत्य येईल !! पुढील निवडणुकीत भाजप चा पराभव होणार हे गृहीत धरून आदरणीय बंगाली बानो ,रागा , आदरणीय माया आणि हावेच अंदाज घेवून टोपी फिरवनारे काका यांच्यात पंतप्रधान पदावरुन सूचक इशारे सुरु झाले आहेत . गरीब लोकांचा उद्धार फक्त हीच मंडळी करु शकतील याची गरीबानां खात्री झालेली आहे . त्यामुळे येवूदयाच सर्व पक्षीय सरकार .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ट्रेड मार्क

उपहास म्हणून

ढब्ब्या
Fri, 04/05/2019 - 19:34 नवीन
उपहास म्हणून तुमचे मत ठीकाय, पण भारताची लोकसंख्या आणी लोकसंखेची घनता बघता, एक काडी पण यादवी सद्रुश्य परीस्थिती आणू शकते. कणखर आणी सक्शम नेत्रुत्वचीच (पण हुकुमशाही नाही) गरज आहे. कुठल्याही प्रकारे देश पोखरला जाउ नये हे महत्वाचे, जे तिसरी आघाडी किंवा खांग्रेस च्या राजवटीत घडू शकते असे वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ट्रम्प

महाठगबंधनच्या नेत्यांचे आपसात

सुबोध खरे
Fri, 04/05/2019 - 19:52 नवीन
महाठगबंधनच्या नेत्यांचे आपसात अजिबात पटत नाही. त्यामुळे त्यांचे सरकार आले तरी ते दीड ते दोन वर्ष पेक्षा जास्त चालणार नाही. मोदी साहेबानी मधल्या पातळीवर बरेच ठिकाणी प्रामाणिक अधीकारी आणून बसवलेले आहेत या लोकांना हटवून त्यांच्या जागी आपल्या मर्जीतील लोकांना आणण्यासाठी वेळ लागेल. श्री मोदी यांनी कोणत्याही मोठ्या नेत्याला हात लावलेला नाही कारण "राजकीय सूडाचा" मोठा अपप्रचार करून सहानुभूती मिळवता येते हे श्रीमती इंदिरा गांधी आणि श्रीमती जयललिता यांनी सिद्ध करून दाखवले आहे. त्यामुळे श्री मोदी यांनी मोठ्या नेत्यांना हात न लावता त्यांच्या चेल्या चमच्यांचा विरुद्ध मोहीम चालवली आहे. त्या लोकांना वाचवण्यासाठी या महाठगबंधनच्या नेत्यांना कष्ट करावे लागतील. याना वाचवले नाही तर कार्यकर्ते नाराज होतात आणि वाचवायचे तर जास्त कष्ट पडतात. आपण म्हणताय तेवढे महाठगबंधनच्या लोकांना आता पैसे खाणे सोपे जाणार नाही. एक तर सामान्य माणसांना पेड मीडिया बद्दल खात्री राहिलेली नाही. त्यामुळे त्यांनी किती गुणगान केले तरी महाठगबंधनची लायकी लोकांना माहिती आहे. शिवाय सोशियल मीडिया मुळे आजकाल खाबू माणसांना धाक बसला आहे. त्यातून श्री मोदी यांनी अनेक लष्करी कंत्राटे शेवटच्या दोन वर्षात दिलेली आहेत ती पूर्ण होईपर्यंत नवी कंत्राटे देता येणे सहज शक्य होणार नाही. दरमहा ६ हजार रुपये हे २०% गरिबांना देणे हा अशक्य गोष्ट आहे हे सर्वच नेत्यांना माहिती आहे. त्यामुळे जसे कर्जमाफीच्या मोठ्या घोषणा देऊन मध्य प्रदेशात आणि राजस्थान मध्यें काँग्रेस निवडून आली तिथे आता कर्जमाफी प्रत्यक्षात न आल्याने भाजपला मोठ्या प्रमाणात फायदा होईल असे तळागाळाच्या कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. हीच स्थिती दोन वर्षांनी फेर निवडणूक झाल्यास होईल. त्यातून आता राज्यसभेत भाजपची गणसंख्य जास्त झाल्याने महाठगबंधनला कोणताही कायदा पास करून घेणे( उदा. AFPSA रद्द करणे) सहज शक्य होणारच नाही. मी तर म्हणतो सध्या भाजप पडली आणि महाठग बंधन निवडून आले तर बरंच होईल. कारण २ वर्षात भ्रमनिरास होऊन भाजप प्रचंड बहुमताने निवडून येईल निवडणुकीचा खर्च सामान्य माणसांच्या बोडक्यावर बसेल पण जर आपली लायकी तीच असेल तर तसेच सही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ढब्ब्या

तरी पण

ढब्ब्या
Fri, 04/05/2019 - 21:09 नवीन
तरी पण गुजराल, देवेगौडा सरकारचा ईतिहास पाहता, महाठगबंधन नकोच. नंतर च्या सरकार चा अर्धा वेळ घाण निस्तरण्यातच जाणार.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

पण हे शिवजयंती , अम्बेडकर

ट्रम्प
Fri, 04/05/2019 - 22:37 नवीन
पण हे शिवजयंती , अम्बेडकर जयंती , गणपती विसर्जन मिरवणूक ला क्वार्टर ढोसुन नाचणार्या वर्गाला कळत नाही .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ढब्ब्या

अंशःत सहमत !

डँबिस००७
Fri, 04/05/2019 - 22:33 नवीन
अंशःत सहमत ! ज्या पद्धतशीर प्रमाणे ठरावीक मिडीया , संघटना व पक्ष, हिंदु समाजा विरुद्ध पब्लिकली गरळ ओकत आहेत त्यावरुन त्यांच्या पार्श्वभागावर चटके बसत आहेत हे स्पष्ट आहे !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

हि घ्या राज्यसभेतील

सर टोबी
Sat, 04/06/2019 - 10:53 नवीन
पक्षीय बलाबल बद्दलची माहिती: http://164.100.47.5/Newmembers/partypositionsummary.aspx. मोदींच्या विरोधाला काहीही किंमत देण्याची कुणाला गरज वाटणार नाही. बाकी मोदी कोणत्या लोकांच्या मागे हात धुवून लागले त्याची माहिती जाणून घ्यायला आवडेल. सदा सर्वकाळ परदेश दौरे, निवडणूक प्रचार, संसदेतदेखील प्रचारकी थाटाची भाषणे या व्यतिरिक्त काही त्यांनी केले असेल तर बरेच आहे. लष्कराच्या विशेष अधिकाराबद्दल बाधित होणाऱ्या लोकांच्याच मताचा विचार व्हावा असे मला व्यक्तिशः वाटते. अगदी पुण्यात देखील बोपखेल, घोरपडी गावच्या लोकांच्या भावना लष्कराच्या विशेष अधिकाराबद्दल इतरांच्या भावनांपेक्षा वेगळ्या असतील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

सदा सर्वकाळ परदेश दौरे......

विनोद१८
Wed, 04/10/2019 - 23:13 नवीन
.......सदा सर्वकाळ परदेश दौरे मोदींच्या मनात आले आता बर्याच दिवसात गोट्या खेळलो नाही कि लगेच चालले अमेरिकेला ट्रुम्प बरोबर, इस्राईल मध्ये नेत्यानाहु बरोबर आणि तिकडे जापानमध्ये तो शिन्जो आबे हे सगळे निरोद्योगी लोक्स अगदी वाटच बघत असतात मोदीची, हा मोदी इकडे आमच्याकडे येतोय कधी आणि आपण त्याच्याबरोबर गोट्या खेळतोय कधी. अर्थात ही मोठी माणसे आपसातच खेळ्नार विरंगुळा म्हणुन. माझातर्फे या गोट्यापंडीताचा णिषेद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सर टोबी

पयशे वाटण्याच्या योजनेत किती

कंजूस
गुरुवार, 04/04/2019 - 20:42 नवीन
पयशे वाटण्याच्या योजनेत किती लागतील आणि ते कुठून आणणार हेसुद्धा सांगायला हवे.
  • Log in or register to post comments

फार नाही लागणार हो

ट्रेड मार्क
Fri, 04/05/2019 - 03:16 नवीन
काँग्रेसने दिलेली सगळी आश्वासने पूर्ण करायचं म्हणलं तर साधारणपणे २० लाख कोटी लागतील असा अंदाज आहे भारताचं टोटल बजेट २१.५ ते २२ लाख कोटी आहे. म्हणजे सगळी कर्जमाफी, ७२००० रुपये, सबसिड्या वगैरे देऊन सुद्धा जवळपास २ लाख कोटी उरतातच की, मग अजून काय पाहिजे? होऊ द्या खर्च, भरपूर पैसा आहे आपल्याकडे. त्यातूनही वर लागलेच तर मनमोहन सिंगांसारखे जागतिक दर्जाचे अर्थशास्त्री आहेतच, ते भारी आयड्या काढून बक्कळ पैसे मिळवून देतील. तसा नाईलाजाने का होईना पण इमानेइतबारे आयकर भरणारा मध्यमवर्ग आहेच. एक १०-१५% टॅक्स सहज वाढवता येईल. गांधी घराण्याचे अत्यंत जवळचे आणि विश्वासू सॅम पित्रोदा यांनी सांगितलं आहे की मध्यमवर्गाने स्वार्थी बनू नये. मोठ्या मनाने त्यांच्या आजूबाजूला दिसणाऱ्या गरीब लोकांना वाटण्यासाठी वाढीव कर द्यायला काय हरकत आहे? संपूर्ण चर्चा इथे बघा. जीएसटीची एकच स्लॅब करण्याचे पण रागानी आश्वासन दिले आहे. म्हणजे जर सरसकट सगळ्या वस्तू १२% नी लावल्या तर कितीतरी उत्पन्न वाढेल. आहात कुठे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस

पंत प्रधान नरेंद्र मोदीजींना

डँबिस००७
गुरुवार, 04/04/2019 - 20:57 नवीन
पंत प्रधान नरेंद्र मोदीजींना यु ए ई चा उच्चतम पुरस्कार झायेद मेडल गौरवण्यात आलेल आहे. यु एन ओ, अमेरिका, युरोप मधले देश त्यानंतर मध्य पुर्वेतले देशांवर पंत प्रधान नरेंद्र मोदीजीं नी काय जादु केलेली आहे कोण जाणे की एका पेक्षा एक वरचढ पुरस्कार हे देश मोदीजींना देत सुटलेले आहेत. https://www.khaleejtimes.com/international/india/narendra-modi-responds-after-uae-awards-him-zayed-medal
  • Log in or register to post comments

मोदी ४२०

गामा पैलवान
Fri, 04/05/2019 - 01:42 नवीन
लोकहो, नाहीतरी चौकीदार चोर आहे असं म्हणतोच ना पप्पू, मग मोदी चारसोबीस झाले ना? म्हणजेच मोदींना येत्या निवडणुकीत ४२० जागा मिळणार हे पप्पूच सांगतोय. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments

या कलाकरांच्या टोळक्या तील

ट्रम्प
Fri, 04/05/2019 - 22:33 नवीन
या कलाकरांच्या टोळक्या तील कित्तेकानां कुत्री सुद्धा ओळखत नसतील . नासिररूद्दीन च्या नावा बद्दल अपेक्षा होती पण आश्चर्य वाटले पटवर्धन , देशपांडे , आणि पालेकर चे . सामान्य लोकांना लोकशाहीवरचा धोका आज पर्यन्त दिसला नाही मग यांना कसा क़ाय दिसतो ? vote against bjp: भाजपला मतदान करू नका, ६०० कलाकारांचं आवाहन http://mtonline.in/HmsTyZ?
  • Log in or register to post comments

भारतीय संविधान धोक्यात?

गामा पैलवान
Sat, 04/06/2019 - 14:53 नवीन
ट्रम्प, बातमीबद्दल धन्यवाद! बातमीत म्हटलंय की कलाकारांच्या मते भाजपमुळे भारतीय संविधान धोक्यात आलंय. पण मग हेच कलाकार नक्षलवाद्यांचा निषेध का करंत नाहीत? जो पक्ष ( म्हणजे मोदी) घटनादत्त मार्गाने राजकारण करतोय त्याच्या विरुद्ध विनाकारण बोंबा ठोकायच्या. आणि त्याच वेळी जे नक्षलवादी भारतीय घटना उघडपणे नाकारून हिंसक मार्ग चोखाळतात त्यांना मात्र पाठींबा द्यायचा. याचा अर्थ असा की उपरोक्त कलाकारांना भारतीय संविधान कोलमडायला पाहिजे. कोण घटनाद्रोही आहे ते कळलं ना? आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ट्रम्प

झक मारले हो हे ६०० कलाकार.......

विनोद१८
Wed, 04/10/2019 - 23:35 नवीन
......या फुकट्यांचे विविध पदावर वर्णी लागणे, फुकटचे मिरवणे, दिल्ली दरबारी चापलुसी करुन आपले उखळ पांढरे करुन घेणे फुक्कट सरकारी खर्चाने फुक्कट चरणे, झालेच तर सरकारी महामंडळातर्फे परदेशी प्रवास वगैरे चंगळ आता २०१४ नंतर बंद झाली आहे, तेव्हा ते मोदीसरकारला शिव्याशापच देणार, या सर्व फुकट्खाऊंची खरी पोट्दुखी हीच आहे की मोदी यांच्यासमोर चार उष्टेखरकटे दाणेसुद्धा टाकत नाही. दुर्लक्ष करा, यांचे सिनेमे पाहणे बंद करा. असे वाळीत टाकले तरच सरळ होतील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ट्रम्प
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • ›
  • »

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा