Skip to main content

आई-बापच लेकरु पंख फुट्ल पाखरु

लेखक पुष्कराज यांनी मंगळवार, 17/03/2009 18:39 या दिवशी प्रकाशित केले.
आई-बापच लेकरु पंख फुट्ल पाखरु दूर उडुनिया गेल संगे काळीजही नेल बाळ होता इवलासा केला जीवाचा हिंदोळा पापणीच्या पंखावर त्यांनी बाळाला ठेवला त्याची गरुडाची झेप जग कवेमध्ये आल कसा विसरला बाळा बळ पंखाना दिलेल घार हिंड्ते आकाशी लक्ष्य तिचे पिलापाशी पिलु उड्ता आकाशी घार एकटी घराशी दिसु लागे पैलतीर पिलु दुरच्या आकाशी वाट पाहते नजर घोर लागला जीवासी कारे उमजेना बाळा वेडी माया माउलीची पिलु तुलाही होउदे ओढ कळेल आईची हाती नक्षत्र धराव मागे परत फिराव माउलीच्या चोचीतल दांण प्रेमाने टिपाव
Taxonomy upgrade extras
लेखनविषय:

वाचने 4231
प्रतिक्रिया 21

प्रतिक्रिया

कविता अत्यंत सुंदर आहे. पुष्कराज, तुम्ही प्रकाशित करत असलेल्या सर्वच कविता भाव आणि शब्द दोन्ही बाबतीत उत्कृष्ट आहेत. या सर्व कविता तुमच्याच आहेत ना? या शंकेबद्दल राग मानू नये. तसे असेल तर अशी शंका यावी हेच या कवीचे यश आहे. बहिणाबाईंच्या कवितांची आठवण करून देण्याची ताकद या कवितांमध्ये आहे.

In reply to by विसुनाना

प्रिय वासुनाना मी मिपावर लिहलेल्या सर्व कविता माझ्याच आहेत्.असच प्रेम राहुदे,म्हण्जे आधिक काही चांगल लिहिन

वा.. कविता छान आहे, आवडली. धराव फिराव चोचीतल टिपाव या सारख्या शब्दांमध्ये अनुस्वार देऊन धरावं, फिरावं, टिपावं असे केले तर वाचताना सोईचे जाईल. शब्दांमध्ये अश्या तर्‍हेने अनुस्वार असणे गरजेचे वाटते कारण मूळ धरावे, टिपावे, चोचितले या शब्दाचा बोलीभाषेतील बदल म्हणून धरावं, टिपावं, चोचितलं असा शब्द बनतो अशी माझी कल्पना. -- लिखाळ.

कविता बॉ. साधी,सरळ सोपी*

हाती नक्षत्र धराव मागे परत फिराव माउलीच्या चोचीतल दाणं प्रेमानं टिपावं खूपच खास! खूप खूप मनापासून आवडली कविता. क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}

चंद्रशेखर गोखलेंची एक चारोळी आठवली.. गरुड होऊन आकाशात जेव्हा भरारी मारत असशील पृथ्वीवर दोन आतुर डोळे जग विसरुन पाहत असतील. आपला मराठमोळा ----------------------------- काले म्रुदुर्यॊ भवति काले भवति दारुण:!! स: साध्नॊति परमश्रॆयम विघ्नांचाप्यधिष्टति!!

चिठ्ठी आयी है.. या गाण्यानं नेहमीच डोळे पाणवतात.. तसंच काहीसं झालं. खूप आवडली कविता. विसुनाना म्हणतात त्याप्रमाणे बहिणाबाईंच्या लेखणीची ताकद काही प्रमाणात आपल्या लेखणीत आहे. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

हाती नक्षत्र धराव मागे परत फिराव माउलीच्या चोचीतल दांण प्रेमाने टिपाव नकळत डोळे पाणावले !! :-) बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

कारे उमजेना बाळा वेडी माया माउलीची पिलु तुलाही होउदे ओढ कळेल आईची मस्तच... मदनबाण..... "If debugging is the process of removing software bugs, then programming must be the process of putting them in." --- Unknown.

कारे उमजेना बाळा वेडी माया माउलीची पिलु तुलाही होउदे ओढ कळेल आईची खरे आहे. खुप छान

खुप छान कविता..भावली

मस्त आवडली... :) --अवलिया

In reply to by अवलिया

हेच म्हणतो खराटा (रंग माझा वेगळा)

कविता चान आहे. अवांतरः टंकन पाहून कवि सुरेश्चन्द्रा जोशि दोम्बिव्ली यांची आठवण झाली (मोकलाया दाहि दिशा) खराटा (रंग माझा वेगळा)

सर्वांना धन्यवाद

इ॑ग्रजीत काय ते 'स्पिचलेस' म्हणतात ना तशी आहे कविता.

खुपचा छान! शब्दभंबाळ केलतं तुम्ही मनाला. श्वास घ्यायलाच सुद्धा विसरलो क्षणभर! तुमच्या इतर कविता वाचायलाच हव्या.