बरेच दिवस झाले हा धागा काढायच्या विचारात होतो पण राहून जात होते, आजच मोदकचा पुस्तकावरचा धागा पाहून परत उचल खाल्ली.
तर मंडळी बर्याचदा आपल्याला एखादे पुस्तक अथवा एखाद्या विषयावरचे पुस्तक पाहिजे असते पण ते कसे/ कुठे मिळेल याची माहिती नसते तर या धाग्याचा उद्देश हाच आहे कि तुम्हाला पाहिजे असलेल्या पुस्तकाची इथे तुम्ही चौकशी करू शकता, ते कुठे मिळेल याचे पण इथे इतर सदस्य मार्गदर्शन करतील.
काही वेळा पुस्तकाचे नाव माहित असेल तर चटकन मिळून पण जाते पण बर्याचदा आपल्याला एखाद्या विशिष्ठ विषयावरचे पुस्तक पाहिजे असते ज्याचे नाव आपल्याला माहित नसते तर त्यासाठी पण कदाचित इथे मदत होऊ शकते.
धागा छोटा आहे पण माझ्या आणि इतर सदस्यांसाठी खूप महत्वाचा आहे.
वाचने
18359
प्रतिक्रिया
79
मिसळपाव
प्रतिक्रिया
मिपावर कोणी japanese शिकत आहे
JALTAP
In reply to मिपावर कोणी japanese शिकत आहे by बाप्पू
Hermann Hesse- 'Wandering :
हेस
In reply to Hermann Hesse- 'Wandering : by सानझरी
हेस चे हे पुस्तक अमेझॉन.de ला used स्थितीत उपलब्ध आहे पण 66 युरो किंमत आहे. भारतात deliver करत नाहीत. कलेक्टीव एडिशन जास्त किंमत आहे.
इंटरनेट अरकाईव्ह साईटवर लॉग इन करून पीडीएफ डाउनलोड करता येते. बहुधा मोफत. Vpn वापरून करता यावी.
सध्या / इतक्यात कोणी काही…
सध्या / इतक्यात कोणी काही नवीन वाचलय का ?
कायम वाचन सुरूच असतं, सध्या…
In reply to सध्या / इतक्यात कोणी काही… by उपेक्षित
कायम वाचन सुरूच असतं, सध्या नेल्सन डेमिलचं ' द लायन्स गेम' वाचतोय.
मितान, "कायाकल्प " हे पुस्तक…
मितान, "कायाकल्प " हे पुस्तक मला माझ्या मित्राकडून वाचावयास ,२०१७ साली जून मध्ये , मिळाले होते. पुस्तक परत करावयाचे असल्यास, मी , पुस्तकातील महत्त्वाचे उतारे , वहीत चक्क लिहुन काढतो. कायाकल्प मधील असे महत्त्वाचे उतारे लिहिलेली आठ पाने आहेत. माझे अक्षर छान आहेच, असे सगळेच म्हणतात. आता ही आठ पाने तुमच्यापावेतो कशी पोहोचवावी, हे कळवावे. व्हाट्सॲप वर पाठवू शकतो. कसे ते तुम्ही ठरवा आणि कळवा.
पेरूमल मुरुगन
हा तमिळनाडूतील समाजजीवनावर पुस्तके लिहितो. तिकडचा भैरप्पा म्हणू शकतो. दोन वाचली आहेत.
कंगनम : स्त्री भृणहत्येमुळे मुली कमी होत (२०:४ प्रमाण)चालल्या आहेत. मुलांची लग्ने होण्यात अडचणी येताहेत. मुलींना लग्नात हुंडा द्यावा लागतो हे मूळ कारण. भारतातील बऱ्याच भागांत हा प्रकार आहे. लग्ने जातीपातींतच होतात.
गुजराती समाजात हुंडा बहुतेक नाही. खर्च अर्धा वाटून घेतात.
शाळेत असताना एक पुस्तक वाचले होते
शाळेत असताना एक पुस्तक वाचले होते " सागरकैद" म्हणुन पण ते आता कुठेच मिळत नाही. लेखकाचे नाव आठवत नाहिये.