Skip to main content

खास पाहिजे असलेल्या पुस्तकांसाठी मदत धागा

लेखक उपेक्षित यांनी रविवार, 07/05/2017 18:09 या दिवशी प्रकाशित केले.
बरेच दिवस झाले हा धागा काढायच्या विचारात होतो पण राहून जात होते, आजच मोदकचा पुस्तकावरचा धागा पाहून परत उचल खाल्ली. तर मंडळी बर्याचदा आपल्याला एखादे पुस्तक अथवा एखाद्या विषयावरचे पुस्तक पाहिजे असते पण ते कसे/ कुठे मिळेल याची माहिती नसते तर या धाग्याचा उद्देश हाच आहे कि तुम्हाला पाहिजे असलेल्या पुस्तकाची इथे तुम्ही चौकशी करू शकता, ते कुठे मिळेल याचे पण इथे इतर सदस्य मार्गदर्शन करतील. काही वेळा पुस्तकाचे नाव माहित असेल तर चटकन मिळून पण जाते पण बर्याचदा आपल्याला एखाद्या विशिष्ठ विषयावरचे पुस्तक पाहिजे असते ज्याचे नाव आपल्याला माहित नसते तर त्यासाठी पण कदाचित इथे मदत होऊ शकते. धागा छोटा आहे पण माझ्या आणि इतर सदस्यांसाठी खूप महत्वाचा आहे.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 17808
प्रतिक्रिया 73

प्रतिक्रिया

In reply to by बाप्पू

पुण्यात लक्ष्मीनारायण चौकात मुकंदनगर च्याबाजुला जालतापचे आॅफीस आहे तिथे निहोंगो श्योहो नावाची जापानी पाठ्यपुस्तकांची series मिळते ती वापरा.

Hermann Hesse- 'Wandering : Notes and sketches' हे पुस्तक किंवा pdf आहे का कोणाकडे? झेरॉक्सही चालेल.