"सगळी तयारी झाली आहे डॉक्टर, हे सिटीचे रिपोर्ट्स आणि त्यानुसार पेशंटच्या डोक्यावर मार्क पण केला आहे" डॉक्टर विनय ख्यातनाम सर्जन डॉक्टर डिसुझाना सांगत होते .
स्ट्रेचरवरती झोपवलेल्या पेशंटच्या आजूबाजूला वेगवेगळी मशिन्स ठेवलेली होती त्यातून येणारे बिप्स वातावरणात अजून थोडा ताण निर्माण करत होते.
"हम्म, ट्युमर क्रिटिकल ठिकाणी आहे, जराशी चूक पेशंटला कायमचा अधू करू शकते! अत्यंत काळजीपूर्वक आपल्याला हे ऑपरेशन करायचं आहे, लेट्स स्टार्ट" रिपोर्ट्स पुन्हा एकदा पाहात डिसुझा म्हणाले.
.
.
.
मार्क केलेल्या जागी कवटीला ड्रिल मारायचे काम संपले होते, ब्रेन टिश्यूजकडे प्रश्नार्थक चेहऱ्याने पाहत डिसुझा म्हणाले, "रिपोर्ट्सच्या जागेवर ट्युमर दिसत नाहीये"
तेवढ्यात घामाघूम झालेला वॉर्डबॉय धावतच आला! "डॉक्टर स्ट्रेचरची अदलाबदल झालीये...."
वाचन संख्या
6441
प्रतिक्रिया
19
मिसळपाव
प्रतिक्रिया
डेंजर
+१
+१
+१
औघडे!
+१
बापरे :(
+1
अरे बापरे :-O
बादवे लोकं +१ का करायलेत इथे?
बापरे अवघडच आहे
दुसऱ्या पेशंटला काय झाले होते
ट्युमर नाही तर?
In reply to दुसऱ्या पेशंटला काय झाले होते by नावातकायआहे
छान :)
कपाळात !!
या आयडीवरसुद्धा ऑपरेशन झाले
हा आयडी का उडाला म्हणे?
In reply to या आयडीवरसुद्धा ऑपरेशन झाले by थॉर माणूस
Gudh katha
लै भारी. +१