"सगळी तयारी झाली आहे डॉक्टर, हे सिटीचे रिपोर्ट्स आणि त्यानुसार पेशंटच्या डोक्यावर मार्क पण केला आहे" डॉक्टर विनय ख्यातनाम सर्जन डॉक्टर डिसुझाना सांगत होते .
स्ट्रेचरवरती झोपवलेल्या पेशंटच्या आजूबाजूला वेगवेगळी मशिन्स ठेवलेली होती त्यातून येणारे बिप्स वातावरणात अजून थोडा ताण निर्माण करत होते.
"हम्म, ट्युमर क्रिटिकल ठिकाणी आहे, जराशी चूक पेशंटला कायमचा अधू करू शकते! अत्यंत काळजीपूर्वक आपल्याला हे ऑपरेशन करायचं आहे, लेट्स स्टार्ट" रिपोर्ट्स पुन्हा एकदा पाहात डिसुझा म्हणाले.
.
.
.
मार्क केलेल्या जागी कवटीला ड्रिल मारायचे काम संपले होते, ब्रेन टिश्यूजकडे प्रश्नार्थक चेहऱ्याने पाहत डिसुझा म्हणाले, "रिपोर्ट्सच्या जागेवर ट्युमर दिसत नाहीये"
तेवढ्यात घामाघूम झालेला वॉर्डबॉय धावतच आला! "डॉक्टर स्ट्रेचरची अदलाबदल झालीये...."
प्रतिक्रिया
25 Feb 2019 - 12:24 pm | श्वेता२४
1
25 Feb 2019 - 12:26 pm | कुमार१
+१
25 Feb 2019 - 12:32 pm | यशोधरा
डेंजर!!
25 Feb 2019 - 12:41 pm | माझीही शॅम्पेन
+१
25 Feb 2019 - 1:09 pm | तुषार काळभोर
पेशंटचं
25 Feb 2019 - 1:47 pm | प्रमोद देर्देकर
+१
25 Feb 2019 - 1:59 pm | विनिता००२
बापरे :(
काय हा हलगर्जीपणा !
+१
25 Feb 2019 - 3:16 pm | विशुमित
बाबौ...!!
25 Feb 2019 - 4:36 pm | एमी
अरे बापरे :-O
25 Feb 2019 - 4:37 pm | एमी
बादवे लोकं +१ का करायलेत इथे??
25 Feb 2019 - 6:18 pm | ज्योति अळवणी
बापरे
अवघडच आहे
26 Feb 2019 - 6:30 pm | नावातकायआहे
दुसऱ्या पेशंटला काय झाले होते ते जाणण्यास उत्सुक !
26 Feb 2019 - 6:31 pm | नावातकायआहे
ट्युमर नाही तर?
26 Feb 2019 - 7:52 pm | मराठी कथालेखक
छान :)
27 Feb 2019 - 4:30 am | स्पार्टाकस
याला म्हणतात गोट्या शब्दशः कपाळात!
:)
27 Feb 2019 - 11:50 pm | थॉर माणूस
या आयडीवरसुद्धा ऑपरेशन झाले म्हणे... का? नाही म्हणजे ठरवून केलंय की असाच पेशंट बदलल्याने चुकून झालंय?
1 Mar 2019 - 10:07 am | एमी
हा आयडी का उडाला म्हणे?
मिपावरच्या one of the very few most sensible आयडीपैकी एक होता हा.
3 Mar 2019 - 12:34 am | Thandgaar PIYUSH
Ekach no. Gudh katha vatali .
3 Mar 2019 - 1:38 pm | वाघमारेरोहिनी
लै भारी.
+१