Skip to main content

चालू घडामोडी - जानेवारी २०१९

लेखक वामन देशमुख यांनी मंगळवार, 01/01/2019 20:18 या दिवशी प्रकाशित केले.
सर्व मिपा करांना नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा! राम मंदिरासाठी अध्यादेश नाही ! घटनात्मक मार्गाचाच वापर करणार ; पंतप्रधान मोदींनी मांडली भूमिका “राम मंदिराच्या मुद्यावरून मागील काही दिवसांपासून वातावरण चांगले तापले आहे. आरएसएसनेही राम मंदिराचे लवकरात लवकर निर्माण करण्यासाठी अध्यादेश काढण्याची मागणी केली होती. शिवसेनाही यासाठी मागील अनेक दिवसांपासून आग्रही होती. पण भाजप नेमकी याबाबत काय भूमिका घेणार हे स्पष्ट नव्हते. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राम मंदिरासाठी अध्यादेश काढणार नसून, घटनात्मक मार्गानेच राम मंदिराची उभारणी केली जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे. एका वृत्तवाहिनीने मोदींनी अशी भूमिका मांडल्याचा दावा केला आहे.” मोदींच्या भूमिकेचे स्वागतच आहे, तथापि, राममंदिरासाठी न्यायालयाचा मार्ग धरणे हे घटनात्मक आहे, आणि त्यासाठी अध्यादेश काढणे, हे घटनात्मक नाही, असे आहे का? संघाने राममंदिरासाठी अध्यादेशाची मागणी करणे आणि सरकारने मात्र न्यायालयीन मार्गाचा आग्रह धरणे ही मे २०१९ च्या लोकसभेची तयारी म्हणावी का? नोटः यासाठी अध्यादेश काढावा असं माझं मत नाही, न्यायालयात जे काही चाललंय ते चालू द्यावं.

वाचने 227966
प्रतिक्रिया 616

प्रतिक्रिया

In reply to by बाप्पू

आश्चर्य वाटले, पर्रीकर केंद्रीय समरक्षण खात्यातून राज्यात परत गेले , त्यात ते गँभीर आजारी आहेत, असे असताना , त्या भेटीबाबत राजकीय कमेंट राहुल गांधींनी करायला नको होती .

आज राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची पुण्यतिथी आहे. नेहमीच गांधी विचारांना विरोध करणाऱ्या अखिल भारत हिंदू महासभेने खूप विकृत पद्धतीने महात्मा गांधींची पुण्यतिथी साजरी केली. हिंदू महासभेच्या राष्ट्रीय सरचिटणीस पूजा शकुन पांडे यांनी महात्मा गांधींच्या पुतळयाला गोळी मारुन पुण्यतिथी साजरी केली. आजच्याच दिवशी ३० जानेवारी १९४८ रोजी नथुराम गोडसेने महात्मा गांधींची गोळी झाडून हत्या केली होती. पूजा शकुन पांडे यांनी गोळी मारताच पुतळयामधून रक्त वाहण्यास सुरुवात झाली. हे कृत्य केल्यानंतर पांडे यांनी महासभेच्या सदस्य आणि समर्थकांना मिठाई वाटली. महात्मा गांधींची हत्या करणारा नथुराम गोडसे अखिल भारत हिंदू महसभेशी जोडलेला होता.

In reply to by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)

हिंदूंना बदनाम करायला काँग्रेसवाले कुठल्याही थराला जातील! पण एकंदरीत गंमत वाटली पुतळ्याला गोळी मारून पुण्यतिथी साजरी करायची! :-D नेहरूची कशी साजरी करणार? सिफिलीस झालेला पुतळा कुठून आणायचा? -गा.पै.

In reply to by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)

मोगा खान यामागे वस्तुस्थिती अशी आहे कि लष्कराला मोकळा हात न दिल्यामुळे अतिरेकी मोठ्या संख्येने देशात घुसत होते. आता लष्कराला प्रतिहल्ला करण्याची मोकळीक दिली असल्याने दारुगोळा किती वापरला याची फिकीर न करता लष्कर पाकिस्तानी ठाण्यावर हल्ले करत आहेत शिवाय बऱ्याच ठिकाणी सीमा सीलबंद करण्यात यश मिळाल्याने आत घुसणारे अतिरेकी कमी झाले आहेत.मेहबुबा मुफ्ती यांचे सरकार बरखास्त केल्यावर याला विशेष जोर आला आहे. हि माहिती लष्कराकडून मिळालेली आहे तेंव्हा हि वर्तमानपत्रात येणार नाही अन्यथा मानवी हक्कवाले परत आरडा ओरडा करण्याची शक्यता आहे.

In reply to by सुबोध खरे

हे कालच्या पर्रीकरांच्या पत्राचं damage control सुरु आहे. आजून ५-६ दिवस तरी असा धुरळा उडणारच आहे.

In reply to by सुबोध खरे

लष्कर तुम्हाला माहिती देते, पेपरात अन आम्हाला माहिती मात्र देणार नाही, अशी कोणती तुमची स्पेशल पोस्ट आहे ?

In reply to by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)

माझे ७० वर्गमित्र लष्करात आहेत. (एक वर्ष पुढे आणि एक वर्ष मागे असे मित्र अधिक १०० -१२५ असतील.) त्यापैकी १७ ब्रिगेडियर या उच्च पदावर आहेत आणि त्त्यातील पाच जण प्रत्यक्ष काश्मीर मध्ये आहेत. आम्ही व्हाट्सअँप ग्रुप वर कायम संपर्कात आहोत. हे वर्गमित्र तुम्हाला किंवा पेपराना का काही सांगतील? जिथे तिथे पचपच केलीच पाहिजे का? सर्जिकल स्ट्राईक झाला तेंव्हा गुरेझ येथे असणाऱ्या डिव्हिजनचा कमांडर (पॅरा स्पेशल फोर्सचा कमांडो) माझ्या वर्ग मैत्रिणीचा नवरा आहे. तो आता नगरोटा येथे कोअर कमांडर आहे लेफ्टनंट जनरल या हुद्द्यावर. काश्मीर मधील युद्धाची थेट जबाबदारी या कोअर वर आहे.( हि माहिती जालावर उपलब्ध आहे. नाव हवं तर शोधून काढा )

In reply to by सुबोध खरे

त्यापैकी १७ ब्रिगेडियर या उच्च पदावर आहेत आणि त्त्यातील पाच जण प्रत्यक्ष काश्मीर मध्ये आहेत. आम्ही व्हाट्सअँप ग्रुप वर कायम संपर्कात आहोत ==)) हे चिंताजनक वाटत आहे. जबाबदार व्यक्तिमत्व असल्याकारणाने, आशा करतो संवेदनशील माहितीचे आदानप्रदान होत नसावे. ===

In reply to by सुबोध खरे

त्यापैकी १७ ब्रिगेडियर या उच्च पदावर आहेत आणि त्त्यातील पाच जण प्रत्यक्ष काश्मीर मध्ये आहेत. आम्ही व्हाट्सअँप ग्रुप वर कायम संपर्कात आहोत ==)) हे चिंताजनक वाटत आहे. जबाबदार व्यक्तिमत्व असल्याकारणाने, आशा करतो संवेदनशील माहितीचे आदानप्रदान होत नसावे. ===

In reply to by विशुमित

बाकीचे बहुसंख्य हे माझ्यासारखे लष्करातून निवृत्त झाले आहेत त्यामुळे कोणती माहिती जालावर टाकायची हे सर्वाना अर्थातच माहिती आहे. व्हाट्सअँप encrypted असले तरीही ते सुरक्षित नाही हे गृहीत धरूनच तेथे विषय चर्चिले जातात.आणि बहुतेक बातम्या या सार्वजनिक झाल्यावरच तेथे येतात. परंतु पत्रकार आणि पत्रकारिता गढूळ झाल्यामुळे ज्या गोष्टी सार्वजनिक झाल्या आहेत त्याना अजिबात प्रसिद्धी दिली जात नाही आणि यामुळेच त्या गोष्टी लोकांना खऱ्या वाटत नाहीत. आणि लष्करी रितीरिवाजाप्रमाणे आमच्यापैकी कोणी त्याचे समर्थन करण्याच्या फंदात पडत नाही. उदा मोगा खान ला नगरोटाचे कोअर कमांडर कोण आहेत ते शोधायला सांगितले जे जालावर उपलब्ध आहे. याव्यतिरिक्त लष्करी रितीरिवाजाप्रमाणे तेथे राजकारण हा विषय अजिबात चर्चिला जात नाही. चिंता नसावी.

In reply to by सुबोध खरे

राम मंदिराबद्दल विचारले की बोलायचे काँग्रेस मोडता घालते , बाकी कायद्यासाठी मुसलमान मोडता घालतात , असे रिजन द्यायचे सैन्याचे आकडे का कमी , तर ते मानवाधिकारवाले ओरडतात , असे बोलायचे. बाकी इतिहासातील राजवटीना विरोधक नसायचे का ?

In reply to by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)

Fact Check: Modi govt killed more terrorists than that of Manmohan Singh म्हणुनच ह्यांच्या लाडक्या भ्रष्ट व राष्ट्रविरोधी कॉंग्रेसच्या पीद्दी लोकांनी पाकिस्तानात जाउन मोदीविरुद्ध मदत मागत होते !!

In reply to by डँबिस००७

मानले बुवा तुमच्या शोधपत्रिकारितेला... ज्ञानात भर...!! आभारी आहे

भिकाऱ्या चा कसला आलाय डैमेज कन्ट्रोल !!! पूर्वी राष्ट्रपिताच्या च्या नावाने , नंतर आज्जी च्या नावाने आणि त्या नंतर बापाच्या नावाने मतांची भिक मागितली !!!! आता राजकारणाच्या बाजारात बहिणीला सत्ताप्राप्ती साठी उतरवले !!! सत्ता हस्तगत करण्यासाठी नातिगोती वापरून जनतेला भावनिक ब्लैकमेल करणाऱ्या ख़ानावळ ने पर्रिकरांच्या गंभीर अजाराचा उपयोग केला तर त्यात आश्चर्य कसले ? मी तर म्हणेन रागाच्या रक्तात सगळ्या कुटुंबा चा हरामीपणा उतरलेला आहे !!! इथुन पुढे अजुन याची निर्लज्जपणाची काय ! काय !! रुपे पहावी लागतील कोणास ठावूक ?

In reply to by महेश हतोळकर

अजुन एक गांधी पैदा न करून तमाम भारतीय जनतेवर उपकारच केले आहेत !!! वड्रा कुटुंबा पुढे नतमस्तक होणे भारतीय लोकांना ज्यास्त दिवस जमणार नाही आणि रागा निपुत्रिक राहण्याची शक्यता त्यामुळे अजुन पाच दहा वर्षात काँग्रेस चा अस्त होण्याची शक्यता वाटते .

In reply to by ट्रम्प

वैयक्तिक टिप्पणी निदान मी तरी टाळेन. "गांधी" घराणं संपलं म्हणून त्यांचे समर्थक संपणार नाहीत. राहूल गांधीला घोड्यावर बसवायची घाई यांना आहे, राहूल गांधीला नाही. त्यामुळे उद्या हेच लोकं दुसरं कोणत तरी बुजगावणं उभ करतीलच. आपल्या हातात फक्त स्वतःची व जमल्यास इतरांची बुद्धी शाबूत ठेवणे आणि असले प्रकार उघड करणे एवढेच आहे.

In reply to by महेश हतोळकर

आपल्या देशात "गांधी" नावाची चलती आहे. उद्या एखाद्या दगडाला गांधी नावाचा शेंदुर फासून त्याला निवडणुकीला जनते समोर उभे करतील. विशेष म्हणजे तो दगडसुद्धा निवडून येण्याची जास्त शक्यता आहे. काय करणार नथुरामपेक्षा लोकांना गांधीच अधिक प्रिय आहे. ... सुशिक्षित लोकांचं वगळे मत असू शकते.

In reply to by महेश हतोळकर

पण पर्रिकरांच्या गंभीर आजारा तुन राजकीय फायदा शोधणाऱ्या रागा वर वैयक्तिक टिप्पणी केल्या शिवाय चैन पडणार नव्हती हो !!!

In reply to by ट्रम्प

साहेब गांधी कुटुंबात सामील होण्यासाठी काही जैविक माता अथवा पिता गांधी घराण्यातलेच पाहिजेत असा काही दंडक नाही. राजमाता किंवा युवराज किंवा आता त्यांच्या भगिनी यांना जे मान्य असेल ते वारसदार होणार. नेहरूंची कन्या फिरोझ घांदी नावाच्या माणसाबरोबर लग्न करून गांधी झाल्या. सोनिया मैनो राजीव गांधींबरोबर लग्न करून गांधी झाल्या. पण प्रियांका गांधी मात्र रॉबर्ट वद्रा बरोबर लग्न करून गांधीच राहिल्या. आहे का नाही गम्मत? त्यात या कुटुंबातील काही लेकरांच्या आणि कुटुंबाबाहेरील इतर काही लोकांच्या चेहऱ्यात इतके साम्य आहे, पण तरी सगळं चालतं. उद्या मिराया किंवा रेहान वद्रा हे गांधी म्हणून पुढे आले तरी आपण सहज स्वीकारू. काय? मला वाटत नाही काँग्रेस अस्त होईल. सध्या तर असं वाटतंय की राहुल गांधी तर एक पपेट आहे. बाकी सूत्रसंचालक दुसरेच कोणीतरी आहेत. जरी रागा पंप्र झालाच तरी त्याला म्यानेज करता येईल कारण त्याच्याकडे स्वतःचे असे काही विचार/ निर्णयक्षमता नाहीये. जरी हरले तरी खापर रागा वर फोडून आपल्याला नामानिराळे राहता येईल असा प्लॅन असावा.

बक्कीचा डाव गडगडला. एकदिनी सामन्यात न्यूझीलंडविरुद्ध फलंदाजी करतांना सर्वबाद ९२. जरा कुठे चेंडू वळू लागला की बक्कीच्या फलंदाजांची भंबेरी उडते. कधीकधी शंका येते की बक्की पैशाच्या जोरावर विदेशातही आपल्याला हव्या तशा खेळपट्ट्या बनवून घेते की काय! -गा.पै.

नोटाबंदीमुळे देश बेजार, तरुण बेरोजगार; ४५ वर्षातील सर्वात दयनीय स्थिती राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण कार्यालयाचा अहवाल...!! === नोटाबंदीमुळे अनेक लोकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत, त्या पार्श्वभूमीवर हा अहवाल जारी करणे महत्त्वाचे होते. त्यात सरकारच्या नोटाबंदीच्या निर्णयाचे जे परिणाम झाले, त्यातील प्रतिकूल बाबींचा समावेश असल्याने हा अहवाल रोखून धरण्यात आल्याचे सांगण्यात येत होते. दरम्यान, सरकारने यावरुन सारवासारव केली होती. या सदस्यांनी आमच्याकडे कधीही त्यांचे आक्षेप व्यक्तच केले नाहीत, अशी भूमिका सांख्यिकी व कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने घेतली होती. === खरे खोटे (नमो)देवच जाणे! === नोकरी गेलेले अजून काही निवांत बसले नसतीलच. कुठे ना कुठेतरी काम शोधलच असणार. नाहीतर वडापावची गाडीचा लास्ट ऑप्शन त्यांच्या कडे आहेच. === https://www.loksatta.com/desh-videsh-news/unemployment-rate-at-four-dec…

In reply to by विशुमित

नोटाबंदीमुळे देश बेजार, तरुण बेरोजगार; ४५ वर्षातील सर्वात दयनीय स्थिती राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण कार्यालयाचा अहवाल...!! गेल्या ६५-७० वर्षांत काँग्रेसच्या काळात देशात सतत दयनीय स्थितीच होती !! ह्या काळात तरुण बेरोजगारच होते , शेतकरी आत्महत्या करत होते , काही नेते भ्रष्ट्राचार करत होते तर काही नेते मुसलमान समाजाला हिंदुं विरुद्ध प्रेरीत करत होते. याच दरम्यान हिंदु लोकांना अतिरेकी ठरवुन त्या मोठ्या लोकसंख्येचे आंतरराष्टीय न भरुन येणारे नुकसान करत होते.

In reply to by विशुमित

सत्यम प्रॉब्लेम मध्ये आली तर नोकऱ्या गेल्याच ना? Unregulated किंवा गैर धंदे असतील तर एक तर त्यांनी रेग्युलर व्हावे नाहीतर ते बंद पडणे अपेक्षितच होते. लोकांनी कर चुकवायचे धंदे का करावेत याचं तुमच्याकडे काही स्पष्टीकरण आहे का? असे धंदे बंद पडले तर तिथे काम करणाऱ्या लोकांची नोकरी जाणार हे होणारच होते. पण म्हणून त्यांना दुसरी नोकरी मिळूच शकत नाही अशी परिस्थिती आहे का? नोकऱ्या नाहीत असं नाहीये पण ती नोकरी मिळवण्यासाठी जे स्किल लागतं ते नसणाऱ्या लोकांची कमतरता आहे. CSO च्या म्हणण्याप्रमाणे जून २०१८ पर्यंतच्या १० महिन्या १.२ कोटी नोकऱ्या मिळाल्या. ऑटो सेक्टरच्या वाढीशी संबंधित बातमी भारताबाहेरील वर्तमानपत्राचे हे मत वाचा. आम्हाला तरी असं वाटायचं की नोकरी मिळवणे वा धंदा करणे हे आपले काम आहे. अजूनही नोकरी मिळवण्यासाठी जे स्किल लागतं ते मिळवायचं आणि प्रयत्न करायचा हे मी अजूनपर्यंत करतोय. इतके वर्ष फक्त जॉब मार्केट मध्ये रिलेव्हन्ट राहण्यासाठी प्रयत्न चालू आहेत. पण यात असेल हरी तर देईल खाटल्यावरी असं कधी वाटलं नाही. वर्षानुवर्षे सैन्यात, पोलीस दलात जागा आहेत पण योग्य उमेदवार नाहीत अशी परिस्थिती आहे. लोक नाक्यावर गुंडागर्दी करतील पण हे जॉब घेणार नाहीत कारण शिस्त पाळावी लागेल. यात कोणते सरकार आहे हे बाजूला ठेवा, पण परिस्थिती हीच आहे का नाही ते सांगा.

In reply to by ट्रेड मार्क

वर्षानुवर्षे सैन्यात, पोलीस दलात जागा आहेत पण योग्य उमेदवार नाहीत अशी परिस्थिती आहे. लोक नाक्यावर गुंडागर्दी करतील पण हे जॉब घेणार नाहीत कारण शिस्त पाळावी लागेल. ==)) सैन्यात पोलीस दलात उपलब्द जागांची काही अभ्यासू आकडेवारी मिळेल का? भर्तिची 3-4 वर्षातील अवस्था आपल्याला माहित आहे का? सुशिक्षित बेरोजगार गुंडागर्दी करतात याचा किती मोठा सैंपल सेट तुम्ही अभ्यासासाठी निवडला होता?

मोगा खानच्या लाडक्या पक्षाचा हरयाणाच्या जींद ईथल्या पोट निवडणुकीत लाजीरवाणी हार झालेली आहे !! राहुल गांधीच्या खास मर्जीतले सुरझांवाला यांना कॉंग्रेसने जींद मधुन ह्या पोट निवडणुकीसाठी उतरवलेल होत !! भाजपाने ह्या ठिकणी निवडणुक कधीही जिंकलेली नव्हती !! २०१९ च्या निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर भाजपाला चांगला संकेत आहे अस मानल जात आहे !!

In reply to by डँबिस००७

कॉंग्रेसला जींद मधली पोट निवडणुकीतली हार जिव्हरी लागली आणि हरयाणात दंगल सुरु केली आहे ! पोलिसांनी लाठीचार्ज करुन कॉंग्रेसी दंगलखोरांना पळवुन लावले आहे !!

Bad loans: Madam, don't send us to court, companies tell SBI काही वेळेपर्यंत, सरकारदरबारी वशिले लावून बँकांकडून आपल्याला हवी तशी कर्जे घेणे, ती बदमाशी करत टाळत राहणे आणि सर्वात शेवटी त्यांना एनपिए बनवून ती परत करण्यापासून मुक्त होऊन मजेत राहणे. हे भ्रष्टचक्र सतत चालू होते. चोरीसाठी सरकारचा हातभार तर लागत नाहीच, उलट सरकारने नवीनच अंमलात आलेल्या बँकरप्सी कोडनुसार, बँकांना कर्जबुडव्यांवर कारवाई करणे भाग पडत आहे. या कायद्यानुसार बँकेने कर्जबुडव्याचे नाव National Company Law Tribunal (NCLT) कडे दिले की कडक कारवाई सुरू होऊन कर्जबुडव्यांचा कंपनीवरचा हक्क नाहीसा होतो. त्यामुळे, पैसे अचानक पुढे येऊ लागले आहेत आणि (पूर्वी अजिबात शक्य नसलेली) कर्जे व्याजासकट परत करणे चालू झाले आहे. पूर्वी (सरकारच्या वरदहस्तामुळे) बँकेवर डोळे वटारणारे आता हात जोडत, व्याजासह कर्ज परत करतो पण, "आमचे नाव NCLT कडे पाठवू नका" अशी विनंती करू लागले आहेत.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

खर म्हणजे या बदलाचे पक्षीय मतभेद बाजूला ठेवून कौतु6 केले गेले पाहिजे कारण बुड़ावलेल्या कर्ज मधील पैसा आपण सर्व सामान्य गरीब लोकांचाच होता . कौतुक करण्या इतपत औदार्य मिपावरिल पुराणमतवादी मध्ये नाही का ?

जागतीक भ्रष्टाचाराच्या Index मध्ये भारताने चांगली प्रगती केलेली आहे ! गेल्या वर्षी ८१ व्या रँकवर असलेला भारत ह्यावर्षी ७८ व्या क्रमांकावर चढलेला आहे ! चीन ह्या बाबतीत भारताच्या बर्याच मागील क्रमांकावर आहे ! पाकीस्तान तर फारच मागे राहीलेला आहे ! ६५ वर्षांच्या कॉंग्रेसच्या भ्रष्ट कारभारानंतर जागतीक स्तरावर भारताची एक भ्रष्ट देश म्हणुन ओळख झालेली होती ! गेल्या १० वर्षांत तर भारताची वर्णी फ्रॅजाईल ५ देशात लागलेली होती !! बर्याच प्रयत्नामुळे भारताने आपली जागा ह्या फ्रॅजाईल ५ देशाच्या ग्रुप मधुन बाहेर पडुन भ्रष्टाचार मुक्त ते कडे चाललेली आहे

In reply to by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)

जे जे फेकट ते ते सर्व पौष्टिक... जास्त बोलायच काम नाही.

कुंभ मेलापर शशी थरुर चा ट्विट : गंगाको स्वच्छ रखना है और पाप भी धोने है !! रा गा सारख्या भ्रष्ट कॉंग्रेसच्या नेत्यांनी व त्यांच्या भ्रष्ट चेल्यांनी कुंभ मेलाच्या नावाने गंगा नदीत आंघोळ करुन पवित्र गंगा नदीला अस्वच्छ करु नये असा संदेश दिला !!

In reply to by ट्रम्प

तात्या तुमच्या सारखा बिन्लाजी माणुस मी आयुष्यात पाहिला नाही. वरुन म्हणायचं झाप्तोय. सुधरा जरा.

In reply to by विशुमित

स्वतःच टेम्पर शाबूत ठेवून दुसऱ्या नां डिस्टर्ब करण्याचा तुमचा निर्लज्जपणा शिकतोय हळूहळू !!!!! नकारात्मक विचार ठासुन भरलेले असलेले झापा झापिच करु शकतात , सबुरी नी घ्या !!!!!

In reply to by ट्रम्प

आयुष्यात चांगल्या गोष्टी शिका. त्यात जी गोष्ट तुमच्यात ठासुन भरली आहे ती पुन्हा माझ्याकडुन शिकण्यात काय हासील?? === जिथे जिथे माझ्या प्रतिसादाखाली विशिष्ट लबेले लावण्याचा प्रयत्न कराल, तुम्हाला असाच प्रसाद मिळणार. === बहुत श्रध्दा और सबुरी रखी..!! अब मुश्किल है.

In reply to by ट्रम्प

निर्लज्जपणे काही ही खपवून घेण्या इतपत तुमच्या इतका संयम माझ्या मधे नाही आहे, हे मला कबूल आहे. === बाकी तुमची मर्जी...!!

गँगस्टर रवी पुजारीला पकडुन भारतात आणल गेल. आफ्रिकेतील सेनेगल नावाच्या देशा बुर्कीना पासो ईथुन त्याला अटक केली गेली !! गेले दोन दशक हा डॉंन पोलिसांच्या हातात येत नव्हता ! रवी पुजारी भारत सरकारच्या हातात आल्याने त्याच्याशी संपर्कात असणारे नेते आता भुमिगत व्हायच्या तयारीत आहे असे विश्वसनीय स्त्रोताकडुन समजले आहे. गेल्या ४ १/२ वर्षांत ह्या सरकार ने ईतके केलेले आहे जे गेले ६५ वर्षे ईतर सरकारांना जमले नाही !

In reply to by डँबिस००७

सध्यातरी आफ्रिकेतील सेनेगल इथे अटक केल्याचीच बातमी आहे, भारतात आणल्याची बातमी कोणतेही माध्यम सध्यातरी दाखवत नाही.

In reply to by प्रसाद_१९८२

सूत्रानूसार रवीपुजारीला आफ्रिकेत फाशी पण देण्यात आली आहे. आता फक्त त्याची बोडीच येणार भारतात. पोस्टमर्टम झाल्या नंतर. वेळ लागतो ना!!

नांबी नारायण यांना पद्म भुषण पुरस्कार !! ईज्रोचे प्रतिभाशाली शास्रज्ञ नांबी नारायण ज्यांना देशद्रोहाच्या खोट्या केसमध्ये UDLF (केरळ मधील मुस्लिम कम्युनिस्ट पक्ष ) ने गुंतवले होते. त्यावेळेला संजिव भट्ट हाच पोलिस अधिकारी होता. उच्च कोर्टाने नांबी नारायण बरोबर ईतर शास्रज्ञांना निर्दोष घोषित केले . नांबी नारायण हे त्यावेळेला क्रायोजेनिक ईंजिनवर काम करत होते ! अमेरिकेने त्यावेळेला ईज्रोला म्हणजे भारताला क्रायोजेनिक ईंजिन द्यायला नकार दिला होता. क्रायोजेनिक ईंजिन हा मोठ्या रॉकेट साठी महत्वाचा भाग असल्याने ईज्रोने क्रायोजेनिक ईंजिन स्वतः विकसीत करायच ठरवल होत ! ईज्रोने क्रायोजेनिक ईंजिन स्वतः विकसीत करण विकसीत देशांना पचण शक्य नव्हत म्हणुन UDLF (केरळ मधील मुस्लिम कम्युनिस्ट पक्ष ) सारख्या देशद्रोही पक्षाच्या साथीने क्रायोजेनिक ईंजिन विकास करणार्या टिमला टारगेट केल गेल !! त्यावेळची क्रायोजेनिक ईंजिन विकास करणारी टिम फोडली गेली पण तरी सुद्धा ईज्रोने क्रायोजेनिक ईंजिनचा विकास केलाच. पण UDLF (केरळ मधील मुस्लिम कम्युनिस्ट पक्ष ) व त्याच्या संजीव भट्ट सारख्या साथीदारांना काहीही झाल नाही !

In reply to by डँबिस००७

गुजरातमधील निलंबित माजी आयपीएस अधिकारी संजीव भट्ट याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. तसेच सुप्रिम कोर्टाने भट्नट यांची पुनर्विचार याचिका फेटाळली आहे

In reply to by डँबिस००७

क्रायोजेनिक केसमधे R B Sreekumar हा केंद्राचा अधिकारी होता. भट्ट नव्हे. पण हा भट्ट व श्रीकुमार यांनी नेहमीच मोदींविरूध्द गुजराथमधे एकत्रीत काम केलंय. त्यामुळे गोंधळ उडणे शक्य आहे.

अण्णानीं आंदोलन सुरु करताच रा कॉ चे प्रवक्ते मालिक यांनी अण्णानां भाजप चा एजंट ची पदवी देवून टाकली !!! खवळलेल्या अण्णानीं बदनामी चा खटला दाखल करण्याची सुरवात करताच दादानीं पक्षाच्या वतीने माफी मागून वादावर पडदा टाकला . रा कॉ चे प्रवक्ते अस असंबद्ध बड़बड़ करून पक्षाला अडचणीत आणत आहेत ? बर झाले दादानीं वेळीच डैमेज कंट्रोल केला नाहीतर पक्षा पुढील अडचणीत अजुन वाढ झाली असती . रा कॉ च्या प्रवक्त्या नां देव सुबुद्धि देवो !!!!