✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

दर महा १०% परतावा शक्य आहे का?

य
युयुत्सु यांनी
गुरुवार, 01/17/2019 - 15:51  ·  लेख
लेख
लोक हो केवळ कल्पना यावी यासाठी काल संपलेल्या ४ आठवड्यामध्ये १०% किंवा जास्त परतावा दिलेल्या ३४ कंपन्यांची यादी देत आहे. या कंपन्या निफ्टी५०० मध्ये आहेत (म्हणजे तुलनेने चांगल्या आहेत). सांगायचा मुद्दा १०% किंवा अधिक परतावा मिळवायच्या अनेक संधी उपलब्ध असतात. आपल्याला त्या ओळखता याव्यात यासाठी नियमित अभ्यास लागतो. खालील आकृतीत परताव्यासाठी ३रा कॉलम पहावा. बाकी दूर्लक्ष करावेत. 10pc
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
गुंतवणूक
लेखनप्रकार (Writing Type)
लेख

प्रतिक्रिया द्या
116268 वाचन

💬 प्रतिसाद (247)

प्रतिक्रिया

“To myself I am only a child

सुबोध खरे
Wed, 01/23/2019 - 11:20 नवीन
“To myself I am only a child playing on the beach, while vast oceans of truth lie undiscovered before me” ― Isaac Newton १९९५ साली मी उस्ताद अल्लारखां यांची मुलाखत ऐकली तेंव्हा ते ७६ वर्षाचे होते. त्यांना विचारले कि आप ५० वर्ष से भी ज्यादा समयसे तबला बजा रहे है इसके बारे में आपको कैसे लग रहा है? त्यावर त्यांनी उत्तर दिले कि अभी अभी ताल का कुछ अंदाज आ रहा है! इतक्या मोठ्या माणसांची हि स्थिती तर माझ्यासारखा सामान्य माणूस (१% तरी समजते का हा प्रश्न पडलेली व्यक्ती) काय बोलणार?

त्या पेक्षा आम्ही बरे आम्हाला आमच्या विषयातले पूर्ण ज्ञान आहे

आपण या विषयात सर्वज्ञ आहातच. तेंव्हा मी माझी सर्व विधाने मागे घेऊन आपणा सर्वांची बिनशर्त माफी मागतो. आणि आपण म्हणत असाल तर ट्रेडिंग करून महिना १० % च काय पण महिना १०० % सुद्धा मिळू शकतील असे मान्य करतो. माझ्या पुरता मी हा विषय संपवला आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानव

अच्छा अच्छा !!!!

ज्ञानव
Wed, 01/23/2019 - 11:42 नवीन
म्हणजे तुमच्या विषयातले १% ज्ञान हा विनय होता तर !!! मग ट्रेडिंग आणि गुंतवणुकीला लावलेले १००० रुपायचे बक्षीस आणि शिंपडलेले ज्ञानकण कशात मोजता आपण ? तिथे तर विनय दिसून आला नाही. २०१३ साली आलेल्या ह्या धाग्यावर आणि आजच्या धाग्यावर तुम्ही दिलेल्या प्रतीक्रिया एक छापी आहेत. माझ्या विषयात मी सर्वज्ञ आहेच पण माझा विषय काय आहे हे आधी समजून घ्या हि सविनय विनंती आहे. आपल्याला प्रथे प्रमाणे शतक गाठायचे आहे ना मग हवे तर विषय संपला असे आपण डिक्लेअर करूयात कि!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

अच्छा हि ठसठस आहे का?

सुबोध खरे
Wed, 01/23/2019 - 11:52 नवीन
अच्छा हि ठसठस आहे का? सोन्याचा भाव आज ३२००० आहे आणि २०१३ मध्ये २९६०० होता. किती टक्के परतावा आहे हे कुणी ज्ञानी माणूस सांगेल एक? मी तर १ % वाला आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानव

ठस ठस आहेच

ज्ञानव
Wed, 01/23/2019 - 12:14 नवीन
पण २०१३ ते २०१९ पर्यंत आपल्यात काहीच बदल झाला नाही ह्याची आहे. ३२००० ते २९६०० ह्या दोन आकड्यातला प्रवास तुमच्या बुद्धी पलीकडचा तेव्हाही होता आणि आत्ता आही आहे. दुर्दैवाने १% वाला असण्यातच आनंद मानणारे आणि इतरांनी हि तसेच राहावे हा आग्रह धरणारे तुम्ही बदलला नाहीत ह्याची ठसठस आहे. आपल्याला विषयाचे शून्य ज्ञान आहे असे म्हणून विषय संपवणारे २०१३ सालचे तुम्ही आणि आजही विषय संपलाची ओरड करणारे तुम्ही मुळात विषय सुरु का करता? हे कळत नव्हते पण श्री युयुत्सुच्या कुठल्यातरी जुन्या लेखाची ठस ठस तुम्हाला इथे घेऊन आल्याचे नुकतेच वाचनात आले आणि उलगडा झाला कि तुमचा सर्वत्र संचार केवळ कधी काळी कुणीतरी दिलेली ठस ठस शमवण्या साठीच असतो. अजून १० प्रतिसाद बाकी आहेत (पाच तुम्ही घ्या पाच मी घेतो ) शतकी धागा केल्याचे पुण्य तरी पदरात पाडून घेऊ कारण बाकी तर १०० प्रतीसादाद्तून काही अर्थ म्हणून निघेल असे नाहीच आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

जाऊ द्या हो

सुबोध खरे
Wed, 01/23/2019 - 13:02 नवीन
जाऊ द्या हो तुम्ही एकमेकांची तळी उचलण्यात धन्यता मानता आहात पण त्यात सरळ सरळ लोकांची दिशाभूल होते आहे ते पाहवत नाही म्हणून मी हे प्रतिसाद देतो. मी कधीही कुणाला माझा ग्रुप जॉईन करा म्हणून आवाहन केले नाही (माझा कोणताही ग्रुप नाहीच) किंवा माझ्याकडे सल्ला घ्यायला या म्हणून मिपावर जाहीरातही केलेली नाही. उलट मिपाकरांना माझ्या दवाखान्यात मी फुकट सल्ला दिलेला आहे. शेअर बाजारात मी प्रथम उतरलो ते १९९३ मध्ये तेंव्हा मी घेतलेले pantloons चे समभाग १० रुपयाला(at par) होते ते शेवटी २३०० रुपयाला विकून मला काही लक्ष रुपये मिळाले होते. हि माझी कामगिरी "अपवादात्मक" होती असेही मी लिहिलेले आहे. परंतु गेल्या १२ वर्षात मी चक्रवाढ व्याजाने (CAGR) साधारण १० % करमुक्त उत्पन्न मिळवले आहे. यात डिव्हीडंड मिळवले तर ते ११. ५ % आणि १२ % च्या मध्ये येइल. मी त्यात समाधानी आहे. आणि मी कुणालाही सल्ला देत नाही. परंतु घामाचा पैसा बुडू नये इतकीच प्रामाणिक इच्छा आहे. लोकांनी माझ्यावर वैयक्तिक हल्ला केला त्याचे मला काहीच वाटत नाही. ते त्यांच्या विचारसरणीप्रमाणे वागले. असो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानव

मला वाटते

ज्ञानव
Wed, 01/23/2019 - 20:04 नवीन
लोकं कमालीची हुशार असतात आहेत आणि राहतील. इतरांचे माहित नाही पण मी ग्रुपचे आव्हान केल्यावर आलेली मंडळी उत्तरोत्तर वाढतच गेली (आज अर्थक्षेत्रचे ९ ग्रुप आहेत. ) आणि मला त्यातून झालेला आर्थिक फायदा आहेच. पण श्याम भागवत (उत्तम विश्लेषक), विक्रम चीटगोपकर (हेवा वाटतो ह्यांचा इतका टेक्निकल अनालिसिस पक्का आहे.) ह्यांच्या सारख्या अनके व्यक्तीबरोबर संबंध आला. ज्यातले काही विषयातले माहीर होते काही नवीन होते त्यांनी हे मान्य केले अगदी फोन करून मान्य केले कि ह्या ग्रुपमुळे आम्हाला दिशा मिळाली. नवीन मुलांमध्ये तयार झालेले आणि यशस्वी झालेले ह्यांची नावे लिहित बसलो तर प्रतिसाद बराच मोठा होईल. त्यातले बरेच मिपाकर इथे आहेतच. मी कधीही कुणाला माझा ग्रुप जॉईन करा म्हणून आवाहन केले नाही (माझा कोणताही ग्रुप नाहीच) तुम्ही केला नाहीत....तुमची विचारसरणी तशी असेल. तुम्ही काय केलेत आणि काय करता त्याचे गोडवे तुम्हीच काय गाता ? तुम्ही एकमेकांची तळी उचलण्यात धन्यता मानता आहात पण त्यात सरळ सरळ लोकांची दिशाभूल होते आहे ते पाहवत नाही म्हणून मी हे प्रतिसाद देतो. आणि आम्ही / मी इथे दिशाभूल करायला आलो आहे हा सरळ सरळ आरोप करताय तुम्ही ह्यावरून तुमचे संस्कार दिसले मला, कारण विचारसरणी शेवटी त्यावरच अवलंबून असते. आज तीन वर्षे झाली ग्रुपला ज्याचे १००% श्रेय त्यातल्या सभासदांचे आहे. मी केवळ निमित्त ठरलो. आम्ही कायम योग्य दिशा दाखवण्याचाच प्रयत्न करत आलो आहे आणि करत राहू. # संपादक मंडळाने ह्या गंभीर आरोपावर योग्य ती कारवाई करावी हि माझी नम्र विनंती आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

दरमहा १०% परतावा.

सुबोध खरे
Wed, 01/23/2019 - 20:21 नवीन
दरमहा १०% परतावा. 20 Jan 2019 - 9:22 pm | ज्ञानव हे सोदाहरण दिलेत तर चर्चेला उधाण येईल. बरेच पंटर आहेत इथे. हा आपला प्रतिसाद एक साधा सरळ प्रश्न विचारतो आहे. दरमहा १० टक्के परतावा सातत्याने मिळणे शक्य आहे का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानव

https://www.misalpav.com

थॉर माणूस
गुरुवार, 01/24/2019 - 01:33 नवीन
https://www.misalpav.com/comment/1021968#comment-1021968 निदान स्वतःच्या शब्दावर तरी ठाम रहा की हो खरे साहेब? शेवटचा म्हणून परत प्रतिसादांचा ढीग पाडलात. बरं मूळ प्रश्नाचे उत्तर सोयीस्कर रीत्या टाळून पुढे सरकण्याची आणि वर जे मुळात विषयाचा थोडाफार का होईना अभ्यास करून बोलतायत त्यांनाच कमी ठरवण्याची क्षमता मात्र दाद देण्याजोगी आहे. बाकी "सातत्याने १०% दरमहा मिळवून ५ वर्षात कोट्याधीश होता येते असा दावा मिसळपाव वर कुणी आणि कधी केला हे दाखवाल का जरा?" हे दाखवताय ना? आपल्याला मुळ चर्चेचा विषय काय आहे हे माहिती असूनही तो आपल्याला हव्या त्या दिशेने वळवायला असले उपद्व्याप केले जातात. कुणीही कुठेही असा दावा केलेला नसताना उगाच छाती फुगवून बघा मी कशी या भोंदू लोकांची वाट लावतो टाईप प्रतिसादांची रांग लावून काय साधताय कुणास ठाऊक. वर हे कमी म्हणून ते च्यायलेंज आहेच. आता दावा कुणी केलाच नाही तर सिद्ध कसे करणार? म्हणजे तुमचे १००० सुरक्षीत वर जीतं मया करायला मोकळे. :) बरं, आणखी हे नवे मनाचे दावे... आता हे कोण कधी म्हणाले सांगा बरे एकदा? >>>असे असताना मग बाजाराबाबत साडे चार दिवस अभ्यास करून हुशार होता येईल असे म्हणणे अतिशयोक्तीचेच होईल. इथे तर सगळे "स्वतःचा नीट अभ्यास असल्याशिवाय उड्या मारू नका" असेच म्हणताना दिसत आहेत. >>>हे माझे बाजार पाहण्याचे तिसरे आवर्तन आहे. यात माझ्या निवृत्तीनंतर मिळालेला सर्व पैसा मी बाजारात गुंतवलेला आहे. बरं मग? याचा अर्थ आपण अनेक "गुंतवणूकदारांपैकी" एक आहात. समभाग गुंतवणूकदार आणि समभाग व्यापारी या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. इथे गोंधळलात की संपले सगळे. एक गुंतवणूकदार म्हणून आपण वार्षिक १०-१५% परताव्यावरदेखील समाधानी राहू शकतो, पण व्यापारी यात इतका वेळ आणि कष्ट गुंतवतात की त्यांना असा परतावा कमी वाटू शकतो. थोडक्यात, टारगेट्स वेगवेगळे आहेत, म्हणून स्ट्रॅटेजीज आणि अर्थात रीस्क्स आणि रीटर्नस वेगवेगळे असणार. ट्रेडींगचा बेसिक फंडा: Hardest part of being a trader, sticking to your rules. स्वतःच्याच वाक्यांवर अंमल करणे किती अवघड असते याचे उदाहरण आपण बघतोच आहोत, मग बाजारात पैसे पणाला लागलेले असताना हा नियम पाळणे किती अवघड असेल विचार करा. मार्केटस मधे सक्रिय असणे म्हणजे फक्त कुठेतरी मार्केटसंबंधी बातम्या रोज वाचल्या किंवा रोजच्या रोज ग्राफवर नजर ठेवली आणि बेसिक ट्रेंड ग्राफ वाचणे समजले की लोक स्वतःला तज्ञ समजायला लागतात. माझ्या माहितीतले एक व्यक्ती आहेत, पेशाने वकील आहेत पण ट्रेडींग फार गंभीरपणे करतात. म्हणजे उगाच अनुभव मोजून दाखवता यावा म्हणून नव्हे बरं का, अगदी मनापासून करतात. इतके की त्यांनी एक वेगळा फ्लॅट घेतलाय जिथे त्यांचे वकीली आणि ट्रेडींग चे काम शांतपणे करता येईल. तिथे गेलात तर भिंतींवर मोकळी जागा दिसत नाही अक्षरशः. सगळीकडे चार्टस लावलेले असतात. एक रूम वकीलीचे कागदपत्रांनी भरलेली आहे पण उरलेल्या ३ (किचनसुद्धा) फक्त ट्रेडींगशी रीलेटेड मटेरीअल असते. ३ काँप्यूटर्सचा सेटप सतत मार्केटवर लक्ष ठेऊन असतो. गेल्या वर्षी पायथॉन शिकले ते कारण त्यांना ऑटोमेटेड स्क्रिप्ट्स लिहायच्या होत्या ट्रेडींग साठी. आणि तरीही ते स्वत:ला मार्केटचा विद्यार्थी म्हणवतात! एक्स्चेंज मार्केट ही एक अशी जागा आहे जिथे तुम्ही थोडा जरी अतीशहाणपणा करायला गेलात की तुम्हाला उचलून आपटले जाते. मी मी करणारे तर हमखास. पण जो कुणी खरंच जीव ओतून अभ्यास करायला आणि आपला अहं घरी ठेऊन शांत डोक्याने ट्रेड करायला तयार आहे तो पैसे कमावू शकतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

मी शेवट्चा प्रतिसाद

सुबोध खरे
गुरुवार, 01/24/2019 - 09:46 नवीन
मी शेवट्चा प्रतिसाद म्हटल्यावरही माझ्या वर चिखलफेक चालूच ठेवली होती यामुळे नाईलाजास्तव मला त्याचे खंडन करावे लागले. हि चिखलफेक केवळ माझ्या पदवी वर अनुभवावर आणि व्यवसायावरच असे नव्हे तर एकंदर माझ्या वयावर आणि व्यक्तीमत्त्वावर होती. मी एक साधा मुद्दा पुढे केला की महिना ८- १० % परतावा हा सातत्याने जवळ जवळ अशक्य आहे आणि त्याला लागणारे साधे गणिती सूत्रही दाखवून दिले.त्याचे खंडन न करता केवळ चिखलफेक करून माझीच बरोबर पण कुणी मला सल्ला मागायला येऊ नका असेच पालुपद चालू ठेवले आहे. मी मिपाकरांच्या वतीने एक साधी योजना त्यांच्या पुढे ठेवतो. मी (किंवा कुणीही) दरमहा त्यांना १ हजार रुपये असे तीन वर्षे (एकंदर) ३६ हजार रुपये देतो. तीन वर्षात ८ % परताव्याच्या चक्रवाढ व्याजाच्या सूत्राप्रमाणे https://www.thecalculatorsite.com/finance/calculators/compoundinterestcalculator.php हे पैसे २ लाख १८ हजार होतात. यापैकी १ लाख १८ हजार रुपये त्यांनी घेऊन मला १ लाख रुपये परत करावे. एक लाख रुपये परताव्यासाठी हा दर साधारण ४.८ % महिना (किंवा ५९ % वर्षाला) एवढाच येतो. जरी परतावा कमी किंवा जास्त आला तरी मला त्यांनी फक्त १ लाख रुपयेच द्यावे आणि जरी मुदलात खोट आली तरी त्यांनी मला १ लाख रुपये परत करायचे. माझ्या पैशावर त्यांना माझ्यापेक्षा जास्त पैसे कमावण्याची संधी आहे. कुणाची तयारी असेल तर मी स्टॅम्प पेपरवर करार करण्यास तयार आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: थॉर माणूस

कुणाची तयारी असेल तर मी

युयुत्सु
गुरुवार, 01/24/2019 - 10:03 नवीन
कुणाची तयारी असेल तर मी स्टॅम्प पेपरवर करार करण्यास तयार आहे. जे करायला मला कायद्याने परवानगी नाही अशा कोणत्याही ट्रॅपमध्ये मला अडकायची इच्छा नाही कारण असे स्टॅम्प पेपर कोर्टात किती टिकतात याबद्दल मला शंका आहे ( नुकत्याच एका केस मध्ये वडिल आणि मुलगा यांच्यातला करार कोर्टाने रद्दबातल ठरवला).
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

हा हा हा

सुबोध खरे
गुरुवार, 01/24/2019 - 10:13 नवीन
हा हा हा यु मेड माय डे पैसे माझे आणि शेपूट तुम्ही घातली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: युयुत्सु

१. बेकायदेशीर किंवा शंकास्पद

युयुत्सु
गुरुवार, 01/24/2019 - 10:20 नवीन
१. बेकायदेशीर किंवा शंकास्पद व्यवहारापासून स्वत:ला दूर ठेवणे याला "शेपूट घालणे" म्हणायचे असेल तर स्वत:च्या "कोडगेपणाला" (नाईलाजाने मला हा शब्द वापरावा लागत आहे) अवश्य कुरवाळा. २. देवदयेने मला इतरांकडुन पैसे घेउन काहीही सिद्ध करायची गरज नाही कारण वयाच्या ४० व्या वर्षी निवृत्त होऊन सर्व आर्थिक जबाबदार्‍या व्यवस्थित पार पाडून मी स्वत:च्या टर्म्सवर आयुष्य जगत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

मग इथे कशाला मी ८ % दरमहा

सुबोध खरे
गुरुवार, 01/24/2019 - 10:26 नवीन
मग इथे कशाला मी ८ % दरमहा कमावतो आहे म्हणून आपलीच टिमकी वाजवताय? मूळ धागा

फॉरेक्स चा

होता त्यात शेअर बाजारात ८ ते १० % दरमहा कमावता येईल म्हणून शेखी मिरवली. त्यानंतर हा धागा काढला आता कायद्याच्या आड शेपूट घालताय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: युयुत्सु

तुमची एकंदर भाषा बघता तुमचा

युयुत्सु
गुरुवार, 01/24/2019 - 10:36 नवीन
तुमची एकंदर भाषा बघता तुमचा मानसिक तोल सुटत चालला आहे हे निश्चित. शुद्ध मराठीत लिहीलेले आपल्याला वाचता येत नसले तर ही कोणती विकृती समजायची याचा शोध डिएसेम मध्ये घ्यायला हवा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

मूळ फॉरेक्स च्या धाग्यात

सुबोध खरे
गुरुवार, 01/24/2019 - 12:32 नवीन
मूळ फॉरेक्स च्या धाग्यात तुम्हीच शेखी मिरवली होती ना? मग प्रश्नचिन्ह टाकून सारवा सारवी करायला हा धागा टाकला. परखड सत्य कटू असतंच मिरच्या झोंबल्या का? उगी उगी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: युयुत्सु

श्री. युयुत्सू तुम्ही आव्हान

ज्ञानव
गुरुवार, 01/24/2019 - 18:37 नवीन
निट वाचलेत का ? त्यात चक्रवाढ पद्धतीने पैसे हवेत. म्हणजे ३६००० हजाराचे लाखो रुपये तुम्ही करून द्या असे लाडिक आव्हान तुम्हाला करण्यात आले आहे. मूळ आणि संदर्भीय धाग्यात मला कुठे हि चक्रवाढ हा शब्द दिसला नाही अनवधानाने सुटला असेल तर दाखवून द्या. तुमचा दावा नव्हताच पण काहीजणांच्या दिव्य दृष्टीला त्यात दावा दिसला नव्हे दिसला च . पण असो तो तुमचा वाद आहे. मला ह्यातल्या चक्रवाढ ह्या शब्दामागची मानसिकता शंकास्पद वाटते आहे. चक्रवाढ गृहीत धरले होते कि आपसूक होतेच मनात बघा चेक करा मग आव्हानाचा विचार करा. कारण इतराना सावध राहा म्हणून सल्ला देताना दरमहा १०% मिळत असतील तर हे वाचूनच तोंडाला पाणी सुटले आहे. (फसगत होण्याची सुरुवात अशीच होते पण ती सामान्य लोकांची.) त्यामुळे इतरांना सावध व्हा सांगायचे आणि स्वतः चक्रवाढ व्याजाचे भांडे घेऊन पुढे पुढे करायचे हे खरे कारण असल्याचा बोध होतोय. म्हणजे मार्केटमध्ये लुटून घेणारे शेकड्याने असतात आणि आपण ते शोधत फिरत असतो असा आरोप करताना स्वतः मात्र चक्रवाढ वाढीने मला कमावून दाखवा बुवा ! तुम्हाला जमणारच नाही बघा! माझे (फुटकळ हजार रुपयाचे ) आव्हान आहे असे म्हणून येनकेन प्रकारे तुमच्या गळ्यात पडायचे आणि अगदी नाही घेतले तर शेपूट घातली म्हणायचं. बरे ३६००० रुपये तुम्हाला देऊन समजा तुम्ही लाखो कमावून सुद्धा दिले तरी तुम्हाला दान धर्मात हजारच देणार हं ! आणि जर का नाही कमावून दिलेत तर फुल्ल ढोल ताशे बजावून तुमची बदनामी पण करणार. रिस्क - रिवार्ड जमतंय का बघा हो त्या आधी....लोक CAGR ची टिमकी वाजवतात हल्ली. आपणच सावध राहायची वेळ आली आहे. सर्व संदर्भीय दुवे धागे वाचून रचलेले / केलेलं आकांडतांडव पाहून इतकेच कळले कि खरोखरच खऱ्याची दुनिया नाही रे बाबा ! त्यामुळे आम्ही दिशाभूल करायला आलो आहे कि अन्य कुणी ते समस्तानी लक्षात घ्यावे हि विनंती. आणि मी एक मिपाकर असल्याने माझ्यावतीने कुणीही कुणापुढेही कुठलीही योजना ठेऊ नये.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: युयुत्सु

>>>मी एक साधा मुद्दा पुढे

थॉर माणूस
गुरुवार, 01/24/2019 - 23:56 नवीन
>>>मी एक साधा मुद्दा पुढे केला की महिना ८- १० % परतावा हा सातत्याने जवळ जवळ अशक्य आहे का पुढे केला म्हणे? कुणी दावा केला होता का की सातत्याने ८-१०% परतावा सहज शक्य आहे? अजूनही नुसतेच आरोप करताय, तिसर्‍यांदा विचारतोय तुम्हाला... ज्या १००० रुपये मिळवा योजनेची गर्जना केली होतीत ती कुठल्या प्रतिसादातल्या दाव्याच्या आधारावर? चक्रवाढ दराने परतव्याचा दावा कुठल्या व्यक्तीने केला? सलग ५ वर्षे दरमहा १०% मिळवण्याचा दावा कुणी केला? साडेचार दिवसात तज्ञ होण्याचा दावा कुणी केला? निदान लिंक्स तरी द्या म्हणजे त्या व्यक्तीला झापू आपण, हवे तर सगळे मिळून संपादकांना अशा सदस्यावर कारवाई करायला लावू. नुसत्या नवनव्या योजना तोंडावर फेकल्याने स्वतःचे समाधान करता येते... बघा कुणीच कसे पुढे आले नाही वगैरे म्हणून. प्रत्यक्षात माहिती असलेले लोक असल्या स्टंट्सवर हसून पुढे जात असतात कारण दावा केलाच नाही तर सिद्ध काय करणार? :) इतके प्रतिसाद येऊन गेले तरी तुम्हाला ट्रेडींग आणि इन्वेस्टमेंट मधला फरक कळेना. प्रतिसादात नसलेले दावे तुम्हाला दिसतात पण प्रतिसादात असलेली माहिती तुम्हाला उमगेना. वर मुळात कुणीच न केलेल्या दाव्यांवर कसले कसले च्यायलेंज देत फिरताय. काय चालवलंय राव. चला अजून एक उदाहरण देतो... या महिन्यात मी काही शेअर्समधे १००० रुपये लावले आणि ट्रेड करून १०० चा फायदा झाला, मागच्या महिन्यात मी काही शेअर्समधे २००० लावले होते आणि ट्रेडींग करून १९० चा फायदा कमावला, त्या आधी एका महिन्यात १००० च्या शेअर्स ट्रेडींग मधे ९० चा फायदा कमावला. आता मला सांगा मी हे ३ महीने ८-१०% परतावा मिळवला की नाही? ट्रेडींग हे असे चालते. ते चक्रवाढ वगैरे प्रकार करायला आपण १००० रुपये मार्केटमधे ठेऊन त्याकडे नुसते बघत बसून ८-१०% ने वाढत नाहीत किंवा आलेले व्याज त्याच रेटने परतावा द्यायला जादूने त्याच शेअर्सच्या जुन्या किमतीवर जाऊन बसत नाही. असल्या अपेक्षांना गुंतवणूक म्हणतात ज्यासाठी लाँग टर्म ट्रेडींग किंवा फंड्स वगैरे आहेत, जे अर्थातच इतके मोठे रीटर्न्स देत नाहीत (आणि सिंपल इंटरेस्टवर चालतात). गुंतवणूकीचे गणित ट्रेडींगला लावणारे म्हणूनच ट्रेडींगमधे फारसे तगत नाहीत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

जी व्यक्ती खालील दोन विधाने

युयुत्सु
Wed, 01/23/2019 - 10:10 नवीन
जी व्यक्ती खालील दोन विधाने करते - १. "शेअर बाजारात मी गेली २४ वर्षे आहे आणि त्यात गेली १२ वर्षे मी रोज त्यात सक्रिय आहे." - तरी सुद्धा नकारात्मक म्हणजे बहुधा अयशस्वी. आणी समजा यशस्वी असुन असे बोलत आहेत तर दिशाभूल करायचा उद्देश हा नक्की २. "मी एवढेच म्हणेन कि मला MBBS आणि MD ला १२ नंतर साडे आठ वर्षे लागली आणि त्यानंतर माझा त्याच विषयात २८ वर्षाचा अनुभव तेच तरी आज मला त्या विषयात १ % तरी समजते का हा प्रश्नच आहे." म्ह० डॉकटर म्हणून यांना किती गांभिर्याने घ्यायचे हा प्रश्न उरतो. याउलट मला माझा आय० आय० टी० मधला डॉक्टर मित्र आठवतो. त्याने मला homeostasis च्या तत्त्वामधून आख्खे मेडीसीन कसे derive करता येते, हे समजावल्यावर माझी विचार करायची पद्धत आमुलाग्र बदलून गेली होती. त्याशिवाय त्याने मला हृदयाचे ठोके कसे ऐकायचे हे शिकवले. त्यामुळे माझा उत्साह इतका वाढला की मी तेव्हा missing heartbeat, mitral murmur चे निदान करू शकलो होतो. आता राहिला मुद्दा यांनी नुकत्याच होमिओपथीवर केलेल्या शेरेबाजीचा. मी त्या धाग्यावर अनेक "सर्जरी" देखिल प्लासिबो असल्याचा पुरावा देण्यासाठी एका सर्जनच्या पुस्तकाचा संदर्भ दिला. तिथे यांनी काही अवाक्षर काढल्याचे आठवत नाही. काढले असल्यास माझ्या नजरेतून निसटल्याबद्दल क्षमस्व! असो. काही माणसांना सावध करणे आणि दिशाभूल करणे यातला फरक कळत नाही..एम्पॉवर करणे दूरची गोष्ट.
  • Log in or register to post comments

डॉकटर म्हणून यांना किती

सुबोध खरे
Wed, 01/23/2019 - 10:38 नवीन
डॉकटर म्हणून यांना किती गांभिर्याने घ्यायचे हा प्रश्न उरतो. जाऊ द्या हो तुमचे "महानगरे "किडकी प्रजा" निर्माण करत आहेत" हे विधान सप्रमाण खोडून काढल्यापासून तुम्ही बिथरला आहात आणि अशी वैयक्तिक शेरेबाजी करता आहात त्याला अर्थात डॉ जगन्नाथ दीक्षित यांनी There has been unfortunate and erroneous use of terms such as “ किडकी प्रजा” “किडकी बीज “ हा प्रतिसाद दिल्याने हा सूर्य हा जयद्रथ झाला म्हणून काही बोलता आले नाही. अतिशयोक्ती केल्यामुळे चांगल्या लेखाचा विपरीत अर्थ निघतो याचे ते उत्तम उदाहरण आहे. बाकी तुमच्या प्राणायामाच्या लेखातही अनेक अतिशयोक्त विधाने होती त्याकडेही मी दुर्लक्षच करायचे ठरवले आहे.( उगाच स्कोअर सेटलिंग चा आरोप नको) आता हि तसेच करत आहात. टोकाचा मतभेद असणे आणि ते व्यक्त करणे हि ठीक आहे पण आपल्या सारख्या विद्वान आणि उच्च शिक्षित व्यक्तीकडून अशी विधाने आणि वैयक्तिक शेरेबाजी आली नसती तर बरे झाले असते एवढेच वाटते. आपल्याला शुभेच्छा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: युयुत्सु

माझे ते विधान " सप्रमाण

युयुत्सु
Wed, 01/23/2019 - 10:48 नवीन
माझे ते विधान " सप्रमाण खोडून काढले" असे तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही तुमच्या भ्रमाला अवश्य कुरवाळा.
  • Log in or register to post comments

"महानगरे "किडकी प्रजा"

सुबोध खरे
Wed, 01/23/2019 - 10:52 नवीन
"महानगरे "किडकी प्रजा" निर्माण करत आहेत" आजही तुमचं तेच मत कायम असेल तर आपल्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा
  • Log in or register to post comments

तुमच्या प्राणायामाच्या

युयुत्सु
Wed, 01/23/2019 - 10:57 नवीन
तुमच्या प्राणायामाच्या लेखातही अनेक अतिशयोक्त विधाने होती त्याकडेही मी दुर्लक्षच करायचे ठरवले आहे. तुम्हाला कुणी अडवले आहे/होते?
  • Log in or register to post comments

सती जायचे अन कुले भाजले

युयुत्सु
Wed, 01/23/2019 - 12:59 नवीन
सती जायचे अन कुले भाजले म्हणून परत फिरायचे मार्केटमध्ये आपटलेल्याना ही म्हण चपखल लागु पडते. तुम्ही योग्य ती सर्व काळजी घेतली असेल तर नंतर भाजलं म्हणुन आरडा-ओरडा करण्याला अर्थ नसतो. मागील वर्षी मार्केट खाली आले, ते आवश्यकच होते. तुमची निवड चांगली असेल तर ती परत प्रवेश करायची संधी असते. मुळात दीर्घकाळासाठी गुंतवणुक असेल तर त्यासाठी योग्य तो वेळ द्यायलाच हवा. दरम्यानचे चढउतार हे ignore करता यायला हवेत. "हा माझा शेवटचा प्रतिसाद" म्हणून आरोळी ठोकल्यावर लोक परत परत येत राहतात हे अस्थिर मनाचे निदर्शक आहे. अशी माणसे मार्केट मध्ये यशस्वी कशी होणार.
  • Log in or register to post comments

अशी माणसे मार्केट मध्ये

सुबोध खरे
Wed, 01/23/2019 - 13:04 नवीन
अशी माणसे मार्केट मध्ये यशस्वी कशी होणार. वर उत्तर दिले आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: युयुत्सु

@ खरे डॉक

उपेक्षित
Wed, 01/23/2019 - 13:03 नवीन
@ खरे डॉक शेवटचा प्रतिसाद देतोय तुम्हाला रादर द्यावा लागतोय. सर्वात प्रथम १ गोष्ट क्लियर करतो मी स्वतः ट्रेडिंग मध्ये नाहीये आणि पुढच्या निदान ५ वर्षात तरी नसेन कारण त्यासाठी लागणारा वेळ, अभ्यास आणि संयम माझ्याकडे सध्याला नाहीये. राहता राहिला तुमच्यावर टीका करण्याचा तर डॉक मला वाटते तुम्ही तितके परिपक्व अक्की आहात कि टीका सुद्धा खिलाडूपणे घ्यावी कारण इथे जरी मी तुमच्यावर टीका केली असली तरी तुमच्या बर्याच लेखांचा मी चाहता आहे आणि त्याबाबत तुमचा नक्की आदराच आहे. पण तोच आदर तुमच्याकडून इतरांना का मिळत नाही ? कधी विचारा स्वतः ला, इथे ट्रेडिंग मधील अनुभवी लोक काही गोष्टी मांडताना दिसत आहेत त्यांना निदान त्यांचे म्हणणे तरी मांडूद्या ? कारण तुम्ही जसे तुमच्या क्षेत्रात यशस्वी आहात तसे बाकीचे हि आहेत कि हो, मग त्यांना त्यांचा आदर मिळालाच पाहिजे न ? so तुमचा एक हितचिंतक म्हणून तुम्हाला एक कळकळीची इनंती करतो कि दुसर्याच्या ज्ञानाचा आणि कार्याचा आदर ठेवा तरच तुम्हालाही आदर मिळेल. आणि ते बालिशपणे स्कोर सेटलिंग वगैरे परत विचारपण नका करू आपल्याला त्याची गरज नाही जे असेल ते त्वांडावर बोलून मोकळा होणार्यातला हाये म्या.
  • Log in or register to post comments

शेअर मार्केट .. एक असा जुगार

खिलजि
Wed, 01/23/2019 - 17:17 नवीन
शेअर मार्केट .. एक असा जुगार जो तुम्ही बिनदिक्कतपणे अगदी तुमच्या घरातल्यासमोरही खेळू शकता आणि त्यात कंगाल झालात तरी फारफार तर एक दोन शिव्या पडतील पण तुमच्या घरातलेच काही लोक इतरांना सांगत सुटतील कि आमचा हा कि नई शेअर मार्केट मध्ये पैसे गुंतवतो .. तर अश्या शेअर मार्केटचा भाव खरा वधारला तो हर्षद मेहेताच्या कारामतीमुळे . त्या वल्लीने शेअर मार्केट खऱ्या अर्थाने घराघरात पोहोचवलं .. मी हि त्याला अपवाद नव्हतो .. माझी सुरुवात मी २००८ साली केली . आजही त्या मध्ये उभा आहे आणि खेळतो आहे .. लाखाचे बारा हजार झालेले आहेत . माझे मलाच माहित आहेत किती टाकलेले आणि आता उरलेले आहेत ते . मूळ गुंतवलेली रक्कम , या इथे आत , खोल आत लपवून ठेवण्यात आलेली आहे .. ती जर कधी मी बाहेर काढली तर मला काही नाही होणार पण माझी बायको आणि बाबा जवळजवळ तीनचार महिने तरी व्यवस्थित झोपू शकणार नाहीत , किंबहुना तो आकडा ऐकला तर त्यांची झोपच उडेल .. आता इथे धागा आलाच आहे तर त्यापैकी दोन किस्से सांगतो .. फार मजेशीर आहेत .. १) मी शेअर मार्केट चालू केले २००८ साली .. डिमॅट वगैरे सर्व उघडले . आता घ्यायचं काय ? बोहनी काय करायची ? सर्व धुंडाळून मग मला एक नाव आवडलं " वीर एनर्जी " .. आहाहा काय नाव सालं , नावातच दम आहे , हेच घ्यायचं " मनातल्या मनात बोललो आणि घेऊन टाकले ५००० शेअर्स . एक शेअर मला वाटत त्यावेळेला ३ रुपयाने पडला असेल .. काही महिन्यांनी मी माझ्या साहेबाला हि गोष्ट सांगितली . मी सांगितले कि अमुक शेअर्स घेतले आहेत .. त्यांनी मला विचारलं कुठल्या ग्रेडमध्ये खेळतो .. प्रश्न डोक्यावरून गेला .. मी निरुत्तर होतो . मग त्यांनी मला सांगितलं कि तू आता सध्या कुठलीही रिस्क घेऊ नकोस . अवर्गात गुंतवणूक करत राहा आणि दीर्घकालीन कर . परतावा अवश्य मिळेल .. आज्ञा लगेच अमलात आणली आणि तिथेच माझी पुरेपूर लागली हे मला आता काही महिन्यांपूर्वी कळले .. काय दुर्दैवविलास बघा .. जो शेअर त्याच नाव गाव मला अगदी मनापासून आवडलं होत आणि माझा पहिला शेअर म्हणून मी कधीही विसरणार नव्हतो तो शेअर आज जर माझ्याकडे असता तर अन्दाजे मी २.५ करोड रुपयांचा धनी असतो .. असो ..होत कधी कधी असे २) माझा मित्रपरिवार एकदम मोठा आहे . त्यात काही लोक असेही आहेत कि जे आज आपण पडद्यावरही बघतो तर काही नामचीन हिरेव्यापारी .. अर्थात बालपणीचे सवंगडी असल्याने , कधीकधी अवांतर गप्पाही रंगतात . अश्याच एका मित्राला मी काही वर्षांपूर्वी भेटलो . नक्की वर्ष आठवत नाही पण बहुतेक सलमान खानचा " वाँटेड " का " दबंग दोघांपैकी एक आला होता . त्याला मी सांगितलं कि बाबा रे मी शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करत आहे .. तुला काय वाटत ? तो म्हणाला त्याला काहीही इंटरेस्ट नाही त्यामध्ये .. मी पुन्हा पुन्हा तेच विषय उगाळत राहिलो मग वैतागून त्याने विचारलं कि तू खरंच पैसे लावणार असशील तर सांग मी एक टीप देतो . मी लगेच हो म्हणालो. तो म्हणाला कि मी जेव्हा नबोलें तेव्हा तू त्यामधून बाहेर पडायचं . मी होकार दर्शविला . मग त्याने मला सांगितलं कि सलमानचा दबंग हिट झालाय आणि आता पुढील येणारा वांटेडही चालेल बहुधा .. चालला तर तुझी चांदी आहे आणि नाहीतरी भरपूर मिळेल पण मी सांगेन तेव्हा कुठलाही मोह ना बाळगता बाहेर पड . झालं त्याने नाव सांगितलं " श्री अष्टविनायक सिनेव्हिजन " . त्यावेळेला ५० रुपयाने तो शेअर होता .. चिंधीगिरी केली , फक्त २०० शेअर घेतले .. शेअर घेतल्यावर नेहेमी बघणे आले . दिवाळीपर्यंत तो तसूभरही हलला नाही . मी माझ्या साहेबाला सांगून ठेवले होते पण त्यानेही त्याकडे दुर्लक्ष केल्याने मी २०० च घेतले होते . दिवाळीनंतर तो घोडा जब्बरदस्त पळत होता .. इतका पळाला कि विचारू नका .. ५० चे काही दिवसातच सरळ १७५ आणि नंतर स्प्लित काय झाला, बोनस शेअर काय दिले आणि अजून काय काय . पण चिंधीगिरी केल्यामुळे फारसा काही फायदा झाला नाही तरी झाला . नाही म्हंटले तरी ५०००० निघाले . माझ्या मित्राने अगदी निष्ठेने मला फोन करून ते त्वरित विकण्यास सांगितले आणि मी विकले . उत्सुकतेखातीर त्याने मला माझी त्यामधील गुंतवणूक विचारली आणि उत्तर ऐकून जी काही बडबड केली ती विचारू नका .. असो हे झाले दोन किस्से .. फक्त दोन .. अजूनही बरेच घडलेले आहेत .. टंकाळा आलेला आहे त्यामुळे क्षमस्व
  • Log in or register to post comments

२००३ ला मला मारुतीचे आयपीओ मधे १२५ रुपयांनी ३५० शेअर मिळाले होते

बबन ताम्बे
Wed, 01/23/2019 - 18:28 नवीन
मी २०० रुपये भाव झाल्यावर खूप फायदा झाला असे वाटून त्वरीत विकुन टाकले. आता बोला :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खिलजि

मला काय वाटते की या धाग्यावर

मृत्युन्जय
Wed, 01/23/2019 - 18:14 नवीन
मला काय वाटते की या धाग्यावर सगळ्यांना एकच गोष्ट म्हणायची आहे. पण नक्की कोण काय म्हणाले याबद्दल प्रचंड गोंधळ होउन मूळ मुद्दा मागेच पडला आहे. युयुत्सु काकांनी त्यांची शेयर ओळखण्याची पद्धत उलगडुन सांगितली तर आवडेल (आधीच सांगितली असेल आणि धाग्याच्या गदारोळात ती हरवली असेल तर उत्तमच.
  • Log in or register to post comments

100 झाले, हल्ली सत्कार

उपेक्षित
Wed, 01/23/2019 - 19:18 नवीन
100 झाले, हल्ली सत्कार बित्कार करत नाय वाटत कोणी, जुने मिपा राहिले नाय आता :)
  • Log in or register to post comments

मलै एक समजुन नाही -हायलं .......

दीपक११७७
Wed, 01/23/2019 - 23:23 नवीन
हे सांगण्याचे कारण असे की माझ्यापेक्षा निश्चितपणे कैकपटीने हूशार अशी एक व्यक्ती ( आय० आय० टी० मद्रासची गोल्डमेडॅलिस्ट) मला योगायोगाने नेट्वर भेटली ....................त्याने केलेले एक विधान मला आश्चर्यचकीत करून गेले. तो म्हणाला, In stock market 100% profit( return?) in a year is very common.
मलै एक समजुन नाही -हायलं ....... जर एवढ गोल्ड मेडलिस्ट ने सांगल्यावर, मिपा वर १०% परतावा मिळतो का? असे विचारण्यात काय पाईंट आहे. १०% च माझ माॅडेल विकण्यात का वेळ घालावा?
  • Log in or register to post comments

छान

Blackcat (verified= न पडताळणी केलेला)
गुरुवार, 01/24/2019 - 02:34 नवीन
शेअर मार्केट वर फक्त 3 लोकच पैसे मिळवू शकतात 1.ब्रोकर 2. फी घेऊन टिपा देणारे 3. या विषयावर पुस्तक , सॉफ्टवेअर , क्लास इ इ विद्या विकणारे उरलेले सर्व ओम फट स्वाहा.
  • Log in or register to post comments

https://www.misalpav.com/node/18537

Blackcat (verified= न पडताळणी केलेला)
गुरुवार, 01/24/2019 - 02:37 नवीन
https://www.misalpav.com/node/18537
  • Log in or register to post comments

हे पूर्वी केले होते

Blackcat (verified= न पडताळणी केलेला)
गुरुवार, 01/24/2019 - 02:39 नवीन
https://www.maayboli.com/node/30579 पण फारसे जमले नाही
  • Log in or register to post comments

या बातमीतले भाकीत जर खरे ठरले

युयुत्सु
गुरुवार, 01/24/2019 - 08:50 नवीन
या बातमीतले भाकीत जर खरे ठरले तर महिन्याला १०% देऊ शकणार्‍या अनेक संधी उपलब्ध होऊ शकतात, असा मला तरी दृढ विश्वास आहे. मॅक्रो फॅक्टर्सचा अन्वयार्थ लावायची कुवत सगळ्यांच्यामध्ये नसते (१% मध्ये तर अजिबात नसते), हे आपणच समजुन घ्यायला हवे.
  • Log in or register to post comments

लोकहॊ

युयुत्सु
गुरुवार, 01/24/2019 - 09:10 नवीन
लोकहॊ ९ जानेवारीला माझ्या मॉडेलने सुचवलेला ईन्फ़ो एज इंडीया घेतला. तो आता साडेपाच टक्के वर आहे आणि येत्या काही दिवसात मला १०% मिळतील याची खात्री आहे.
  • Log in or register to post comments

युयुत्सु काकांनी त्यांची शेयर ओळखण्याची पद्धत उलगडुन सांगितली तर

rain6100
गुरुवार, 01/24/2019 - 10:18 नवीन
थोडं समजावून सांगता का .. हे मॉडेल कसे काम करते आणि आपण सांगितलेले सॉफ्टवेअर कसा असे करायचा .आणि शेअर कसे ओळखायचे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: युयुत्सु

माझ्या शेअर निवडायच्या मॉडेल

युयुत्सु
गुरुवार, 01/24/2019 - 10:30 नवीन
माझ्या शेअर निवडायच्या मॉडेल विषयी मी थोडी कल्पना यावी इतके (https://www.misalpav.com/comment/1021594#comment-1021594) वर लिहीले आहे. तपशील देऊ शकत नाही कारण बेंजामिन ग्राहमच्या प्रसिद्ध पुस्तकात ज्या स्ट्रॅटेजिज खुल्या होतात त्या काम करायच्या लवकरच थांबतात असे म्हटले आहे. सॉफ्टवेअर बद्दल वर लिहीले आहेच (https://www.misalpav.com/comment/1021462#comment-1021462)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: rain6100

छान

Blackcat (verified= न पडताळणी केलेला)
गुरुवार, 01/24/2019 - 17:40 नवीन
बेंजामिन ग्राहमच्या प्रसिद्ध पुस्तकात ज्या स्ट्रॅटेजिज खुल्या होतात त्या काम करायच्या लवकरच थांबतात हे त्याने खुले केले तरी त्याचे पुस्तक चाललेच ना ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: युयुत्सु

आज हा १७९० पर्यंत गेला होता.

युयुत्सु
गुरुवार, 01/24/2019 - 14:58 नवीन
आज हा १७९० पर्यंत गेला होता. म्हणजे ८.५% मिळाले असते. दुपारी झोपायला नको होते. :) पण अजुन वेळ गेली नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: युयुत्सु

कमोडिटीमध्ये कुणी नाही का ?

Blackcat (verified= न पडताळणी केलेला)
गुरुवार, 01/24/2019 - 12:57 नवीन
कमोडिटीमध्ये कुणी नाही का ?
  • Log in or register to post comments

तुम्ही कुंडलीही बघता ना

Blackcat (verified= न पडताळणी केलेला)
गुरुवार, 01/24/2019 - 13:42 नवीन
कुंडली बघून कोणता शेअर वर जाईल , कोणता खाली , हे समजते का ?
  • Log in or register to post comments

हे काय आहे?

Blackcat (verified= न पडताळणी केलेला)
गुरुवार, 01/24/2019 - 13:55 नवीन
https://www.stockmaniacs.net/services/trading-system/trend-blaster/
  • Log in or register to post comments

हे काय आहे?

युयुत्सु
गुरुवार, 01/24/2019 - 14:50 नवीन
अमिब्रोकर हे असेच लोकप्रिय सॉफ्टवेअर आहे. ते वापरून अल्गोट्रेडींग करता येते. ही एक अशी तयार अल्गोट्रेडींग आहे, असे वाटते. मी माझे स्वत:चे अल्गो तयार केले आहेत. पण ते सुपरवाईज्ड आहेत. स्वयंचालित नाहीत. पण माझ्यासाठी ते पुरेसे आहेत. मी कुंडली बघायचो. आता बंद केले आहे. कुंडलीचा मी ट्रेडींगसाठी वापर करत नाही ( माझ्याकडच्या सॉफ्टवेअरमध्ये अमावस्या आणि पौर्णिमा आलेखावर मांडता येतात).
  • Log in or register to post comments

मी माझे स्वत:चे अल्गो तयार केले आहेत

rain6100
गुरुवार, 01/24/2019 - 15:12 नवीन
हे अल्गो कसे तयार करतात अमी याची माहिती कुठे भेटेल .कृपया थोडी माहिती द्या
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: युयुत्सु

एक मार्ग

शब्दानुज
गुरुवार, 01/24/2019 - 23:33 नवीन
आज दुध का दुध पानी का पानी करण्याचा एक उपाय माझ्याकडे आहे. हे अॅप प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे. (माझा आणि या अॅपचा दुराव्ययानेही संबंध नाही) यात आपल्याला वर्चुअर ट्रेडींग करता येते. म्हणजेच ख-या नावाचे शेअर ख-या किंमतीत खोटी खोटी खरेदी करता येतात. शेअरच्या अॅपमधल्या किंमती आणि बाजारातील किंमत यात थोडा फरक असतो. बाकी हे अॅप आपल्याला शेअर बाजारात आपण किती नफा कमवू शकलो असतो हे व्हर्चुअली दाखवतात. युयुत्सु यांना आपला दावा सिद्ध करायचाच असेल तर अॅप डाऊनलोड करुन त्यावरुन शेअरची खरेदी करावी.महिना अखेरीस ते या अॅपमधून त्यांनी निवडलेल्या शेअरचा स्टेटस दाखवू शकतात. यात कुठेच कुणाचेच पैसे खिशातून जाणार नसल्याने कोर्ट वगैरे भानगड नसतील. दुध का दुध पानी का पानी मात्र करता येईल. बाकी हे करायचे की नाही ती युयुत्सु यांची मर्जी. ते त्यांनी करावेच असा आमचा हट्ट वगैरे नाही. पण आपण हे जर केलेत तर पुरावे हातात असल्याने आपल्या दाव्याला पुष्टी मिळेल. असे काहीही न करण्याचा आपणाला पुर्ण अधिकार आहेच. बाकी मिपाकरांनीही हे अॅप वापरून पहायला हरकत नाही. खरोखर पैसे बुडण्यापेक्षा आपला अभ्यास किती हे समजून घेण्यासाठी हे उपयोगी ठरेल. "माझा आणि या अॅपचा दुराव्ययानेही संबंध नाही"
  • Log in or register to post comments

हे ते अॅप

शब्दानुज
गुरुवार, 01/24/2019 - 23:34 नवीन
https://play.google.com/store/apps/details?id=com.alifesoftware.stocktrainer
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शब्दानुज

शब्दानुज,

युयुत्सु
Fri, 01/25/2019 - 08:13 नवीन
शब्दानुज, या ॲपच्या लिंकबद्दल मन:पूर्वक धन्यवाद! ॲप उतरवुन घेतले आहे. "खरे" तर मला या ॲपचा माझ्या अल्गोच्या फाईन ट्युनिंगसाठी खुप उपयोग होईल कारण मी दर वेळेला माझ्या मॉडेल ने सुचवलेले शेअर्स पैसे अडकलेले असल्यास घेऊ शकत नाही. ते इथे मला जमेल असे वाटत आहे. पण या ॲपवर प्राथमिक नजर टाकली असता आपल्याला हवा तो शेअर शोधणे अतिशय जिकीरीचे आहे. पण प्रयत्न करून बघतो. मी आपल्या सूचनेचा खुल्या मनाने विचार करत आहे, हे लक्षात आले असेलच!
  • Log in or register to post comments

उपाय

शब्दानुज
Sat, 01/26/2019 - 16:38 नवीन
आपणास जर मी सुचवलेल्या अॅपमद्दे शेअर शोधण्यास अडचण येत असेल तर या दुस-या अॅपमधून तुम्ही शेअर सर्च करून पाहू शकता. हे काहीसे सपोर्टींग अॅपसारखे आहे पहिल्या अॅपसाठी. https://play.google.com/store/apps/details?id=com.alifesoftware.stockscreener बाकीच्या टेक्नीकल गोष्टी तुम्ही अॅप वापरायला चालू केलेत की कळत जातील. मलाही मूळात शेअर बाजाराची माहिती नसल्याने यात मी फार खोल गेलेलो नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: युयुत्सु

तुमच्या १ल्या~ॲप वर मी सर्व

युयुत्सु
Sat, 01/26/2019 - 17:06 नवीन
तुमच्या १ल्या~ॲप वर मी सर्व आता जमवले आहे . पण तुम्हाला जे हवे त्यासाठी थोडी वाट पहा.
  • Log in or register to post comments

या आणी अशा संकेताचे अर्थ

युयुत्सु
Sat, 01/26/2019 - 19:57 नवीन
या आणी अशा संकेताचे अर्थ ज्यांना लावता येतात तेच मार्केटमध्ये पैसे कमवु शकतात.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • ›
  • »

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा