✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

दर महा १०% परतावा शक्य आहे का?

य
युयुत्सु यांनी
गुरुवार, 01/17/2019 - 15:51  ·  लेख
लेख
लोक हो केवळ कल्पना यावी यासाठी काल संपलेल्या ४ आठवड्यामध्ये १०% किंवा जास्त परतावा दिलेल्या ३४ कंपन्यांची यादी देत आहे. या कंपन्या निफ्टी५०० मध्ये आहेत (म्हणजे तुलनेने चांगल्या आहेत). सांगायचा मुद्दा १०% किंवा अधिक परतावा मिळवायच्या अनेक संधी उपलब्ध असतात. आपल्याला त्या ओळखता याव्यात यासाठी नियमित अभ्यास लागतो. खालील आकृतीत परताव्यासाठी ३रा कॉलम पहावा. बाकी दूर्लक्ष करावेत. 10pc
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
गुंतवणूक
लेखनप्रकार (Writing Type)
लेख

प्रतिक्रिया द्या
116268 वाचन

💬 प्रतिसाद (247)

प्रतिक्रिया

कोणीही माणूस आपले बुडालेले

सुबोध खरे
Tue, 01/22/2019 - 10:07 नवीन
कोणीही माणूस आपले बुडालेले समभाग आणि बुडालेला पैसे याची जाहिरात करत नाही हि वस्तुस्थिती मी नम्रपणे लोकांच्या निदर्शनास आणू इच्छितो. खुले आव्हान --

सातत्याने १०% दरमहा मिळवून ५ वर्षात कोट्याधीश झालेला माणूस मला दाखवा आणि १००० रुपये मिळवा

बाकी चालू द्या
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानव

सातत्याने १०% दरमहा मिळवून ५

थॉर माणूस
Wed, 01/23/2019 - 00:37 नवीन
सातत्याने १०% दरमहा मिळवून ५ वर्षात कोट्याधीश होता येते असा दावा मिसळपाव वर कुणी आणि कधी केला हे दाखवाल का जरा? काय राव तेच तेच रडगाणं लावलंय. नसेल जमत तुम्हाला तर नका ना करू ट्रेडींग, कशाला तेच तेच छापताय परत? मुळात शेअर्स किंवा फॉरेक्स किंवा कमॉडीटी... कुठल्याच ट्रेडींगमधे ठराविक परतावा मिळणारच अशी शाश्वती कुणीही देत नाही. फक्त शक्यता आहे इतकेच सगळे सांगतात, वर असले कुठलेही ट्रेडींग करण्याच्या फंदात पडताना सुरूवातीलाच योग्य त्या सुचना/इशारे दिले गेलेले असतात. तरीही कुणी जर हमखास पैसे दुप्पट करण्याचा मार्ग म्हणून पैसे गुंतवायला गेले तर ते बुडण्याचीच खात्री जास्त. तेव्हा तुमचे हजार रुपये तुमच्याकडेच ठेवा, नाहीतर एफडी मधे ठेवा. सेव्हींग्स खात्यापेक्षा जास्त ठरावीक टक्के परताव्याची शाश्वती तेही अभ्यास न करता... सध्या तेच देऊ शकतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

फक्त शक्यता आहे इतकेच सगळे

युयुत्सु
Fri, 03/22/2019 - 12:14 नवीन
फक्त शक्यता आहे इतकेच सगळे सांगतात, वर असले कुठलेही ट्रेडींग करण्याच्या फंदात पडताना सुरूवातीलाच योग्य त्या सुचना/इशारे दिले गेलेले असतात. हे त्यांना "सोईस्करपणे" दिसत नाहीये. मी केलेल्या व्यवहारांचे पुरावे दिले तरी ते मान्य करायचे नाहीत. त्यांना फक्त थयथयाट करता येतो आणि भुंकत बसता येते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: थॉर माणूस

"विकला तर १०% नक्की मिळतील मी

युयुत्सु
Tue, 01/22/2019 - 10:26 नवीन
"विकला तर १०% नक्की मिळतील मी विकणार नाही कारण आत्ता ट्रेंड फोर्मेशन सुरु आहे." हा अजुन महिनाभर घसरेल असे माझे मॉडेल सांगते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानव

ह्याच धर्तीवर असे म्हणावे का की

ज्ञानव
Tue, 01/22/2019 - 10:21 नवीन
कोणीही डॉक्टर आपले मेलेले पेशंट आणि (तरीही) आलेले बक्कळ पैसे ह्याची जाहिरात करत नाही हि वस्तुस्थिती मी नम्रपणे लोकांच्या निदर्शनास आणू इच्छितो.
  • Log in or register to post comments

कोणीही डॉक्टर आपले मेलेले

युयुत्सु
Tue, 01/22/2019 - 10:23 नवीन
कोणीही डॉक्टर आपले मेलेले पेशंट आणि (तरीही) आलेले बक्कळ पैसे ह्याची जाहिरात करत नाही हि वस्तुस्थिती मी नम्रपणे लोकांच्या निदर्शनास आणू इच्छितो. हा हा हा हा हा हा ... यु मेड माय डे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानव

अनवधानाने (का होईना) तुम्ही

सुबोध खरे
Tue, 01/22/2019 - 11:21 नवीन
अनवधानाने (का होईना) तुम्ही माझा मुद्दा सिद्ध केल्याबद्दल धन्यवाद बाकी वैयक्तिक पातळीवर आल्याबद्दल आपले अभिनंदन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानव

अनवधानाने ???

ज्ञानव
Tue, 01/22/2019 - 11:54 नवीन
अजिबात नाही कारण मान सांगावा जनात आणि अपमान ठेवावा मनात हि सर्वश्रुत म्हण सर्वानाच लागू आहे आणि तुम्ही काही तरी जगावेगळे सत्य जगासमोर आणताय अशी परिस्थिती हि नाही त्यामुळे मी पामर कोण कुठले मुद्दे सिद्ध करणार. मी फक्त जे सर्वश्रुत आहे ते सर्वांनाच लागू आहे हे सिद्ध केले. शेअर मार्केट विषयी तुमचे प्रेम मी वैयक्तिक रीत्या जाणतोच. आणि अअत्यंत महत्त्वाचे म्हणजे, जसे तुम्ही आर्थिक जगतातील व्यवसाईकसुद्धा कसे खोटारडेपणा करतात आणि प्रलोभने दाखवून फसवू शकतात ते उद्धृत केलेत अगदी तसेच मी डॉक्टर ह्या प्रोफेशनबद्दल म्हंटलेआहे. त्यामुळे ते तुम्ही वैयक्तिक घेण्याचे कारणच नाही. मिपाद्वारे किंवा अर्थक्षेत्राद्वारे तुमची माझी जुजबी का होईना ओळख आहे. पण शेअर मार्केटबद्दल मला नितांत प्रेम आहे आणि कदाचित तितकेच तुम्हालादेखील तुमच्या पेशाबद्दल असेलच. ह्या पार्श्वभूमीवर शेअर मार्केटवर किंवा त्या प्रोफेशनवर कुणी काही लिहिले कि तुमचे प्रतिसाद एककल्ली असतात असा माझा तरी अनुभव आहे. पण मी ते वैयक्तिक कधीच घेत नसलो तरी माझ्या व्यवसायाबद्दल कुणीही एकच बाजू दाखवून बोलेल तर मला बोलावेसे वाटते आणि जशी समोरच्याची भाषा तसे उत्तर द्यावे हे हि नावडीने का होईना पण करावे लागते. चांगले वाईट लोक दोन्ही पेशात आहेत आणि तुम्ही डॉक्टर असल्याने तुम्हाला तुमच्या पेशातील वाईट प्रथा माहिती असतीलच त्यावर तुम्हीच लिहिणे सांगणे शोभून दिसते मी जर त्या विषयावर लिहायला घेतले तर तो माझा मूर्खपणा होईल कारण मला त्या पेशाची अजिबातच माहिती नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

मूळ गृहीतक चूक असले तर त्याचा

सुबोध खरे
Tue, 01/22/2019 - 12:31 नवीन
मूळ गृहीतक चूक असले तर त्याचा निष्कर्ष चूक येतो. मी कोणत्याही अर्थ व्यवसायिकाबद्दल टिप्पणी केलेलीच नाही तर

कोणीही माणूस

आपले बुडालेले समभाग आणि बुडालेला पैसे याची जाहिरात करत नाही हे माझे मूळ वाक्य आहे ते सामान्य माणसाबद्दल आहे.आपला मूर्खपणा कोणीही जगजाहीर करत नाही हे सत्य आहे. श्री युयुत्सु यांनी मांडलेले सातत्याने १०% दरमहा मिळवणे शक्य आहे हे गृहीतक चूकच नव्हे तर फसवणूक करणारे आहे. त्यामुळे सामान्य माणसे अर्थ बाजारापासून लांबच जाण्याची शक्यता आहे यासाठी मी परत परत सांगतो आहे कि हे जवळ जवळ अशक्य आहे. या धाग्यावर कोणताही अर्थ व्यावसायिक आपली जाहिरात करत नव्हता किंवा त्यांचा यात सहभाग नव्हता( आपण सोडून दुसरा असल्यास मला माहिती नाही)(युयुत्सु हे माझ्या माहितीप्रमाणे अर्थ व्यावसायिक नाहीत). राहिली गोष्ट -- मी लोकांना आवर्जून सांगत आलो आहे कि

टिप्स

वर अवलंबून बाजारात अजिबात उतरू नका किंवा त्यावर विसंबून आपली गुंतवणूक कधीही करू नका. चांगला अर्थ सल्लागार गाठा आणि त्याच्या सल्ल्याने आपले घामाचे पैसे गुंतवणूक करा. अचाट आणि अफाट नफा हा गुन्हेगारी आणि मादक द्रव्य सोडून कुठेही मिळणार नाही. चांगला अर्थ सल्लागार आपल्याला साधारण १२-१५ % वार्षिक नफा सातत्याने वर्षानुवर्षे मिळवून देऊ शकतो. फुकट मिळणार सल्ला हा अंतिमतः महागात पडेल. मुळात माझा प्रतिसाद हा अर्थ सल्लागार या व्यवसायाबद्दल नव्हताच. आपण तो स्वतः वर ओढवून का घेतला आणि वैद्यकीय व्यवसायाबद्दल टिप्पणी का केली याचे कारण समजले नाही. कोणीही डॉक्टर आपले मेलेले पेशंट आणि (तरीही) आलेले बक्कळ पैसे ह्याची जाहिरात करत नाही हि वस्तुस्थिती आहेच ती नाकारण्यात हशील नाही. असो बाकी माझाच प्रतिसाद शेवटचा असला पाहिजे असा माझा आग्रह मुळीच नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानव

मला वाटते

ज्ञानव
Tue, 01/22/2019 - 12:49 नवीन
श्री युयुत्सु यांनी मांडलेले सातत्याने १०% दरमहा मिळवणे शक्य आहे हे गृहीतक चूकच नव्हे तर फसवणूक करणारे आहे हे अजून सिद्धच झाले नाहीये. एखादी गोष्ट सिद्ध होण्याआधीच ती चूक आहे हि शुद्ध फसवणूक आहे असे म्हणणे हीच सामान्य जनतेची दिशाभूल आहे. वैद्यकीय क्षेत्रात देखील अल्प विष हे औषध मानतात असे ऐकून माहित आहे (कित्येक डॉक्टरांनी ते मला माझ्या नकळत पाजले पण असेल ) म्हणून औषधात विष असतेच असे गृहीतक तयार करण्याचा मला अधिकार मिळत नाही. कारण खरच त्यात विष असते का ? मला त्याबद्दल माहितीच नाही. असो. काही शेपट्या सरळ होतच नाहीत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

काही शेपट्या सरळ होतच नाहीत.

सुबोध खरे
Tue, 01/22/2019 - 19:44 नवीन
काही शेपट्या सरळ होतच नाहीत. अगदी पूर्णपणे मान्य. औषधात विष असतेच असे गृहीतक बरोबर आहे. आपण ज्याला जीवन म्हणतो ते पाणी सुद्धा अति प्रमाणात घेतले तर मृत्यू ओढवू शकतो. माझे १००० रुपयाचे आव्हान आहेच बाकी चालू द्या
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानव

बरं आता, १० महिने झाले, दरमहा

श्री
गुरुवार, 10/31/2019 - 10:49 नवीन
बरं आता, १० महिने झाले, दरमहा १०% परतावा मिळालेले शेअर्सची यादी येउद्यात...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानव

येस येस मलाही त्यांची माहिती हवीय.

जॉनविक्क
गुरुवार, 10/31/2019 - 14:58 नवीन
कृपया लवकर द्यावी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्री

प्रतिसाद आवडला

डाम्बिस बोका
Fri, 03/01/2019 - 09:32 नवीन
चांगला अर्थ सल्लागार आपल्याला साधारण १२-१५ % वार्षिक नफा सातत्याने वर्षानुवर्षे मिळवून देऊ शकतो. -- पूर्णपणे सहमत, थोडा स्वतःचा वेळ आणी ह्या विषयात जर आवड असेल तर नक्की सुरवात माझा वैयक्तिक अनुभव सांगतो की स्वतः abhays करून १०-२५ % वार्षिक परतावा शक्य आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

ज्ञानव जबरी टोला हाणलाय डॉक्टरना.

उपेक्षित
Tue, 01/22/2019 - 11:30 नवीन
ज्ञानव जबरी टोला हाणलाय डॉक्टरना. यांचे म्हणजे स्वतः दुसर्यावर कितीही चिखलफेक करायची आणि त्याचे शिंतोडे स्वतः वर उडाले कि थयथय करायची.
  • Log in or register to post comments

आपला प्रतिसाद स्कोअर

सुबोध खरे
Tue, 01/22/2019 - 12:32 नवीन
आपला प्रतिसाद स्कोअर सेटलिंगचा असावा असे वाटते त्यामुळे मी त्यावर कोणताही प्रतिसाद देऊ इच्छित नाही बाकी चालू द्या
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उपेक्षित

खरे कसले स्कोअरसेटलिंग ?

उपेक्षित
Tue, 01/22/2019 - 20:27 नवीन
खरे कसले स्कोअरसेटलिंग ? अहो तुमच्या बाबत आदरच आहे पण उगाच सगळ्या बाबत माझेच खरे आणि मलाच तेवढे कळते हे गेले कित्येक दिवस बघत होतो आत्ता अगदी राहवलेच नाही म्हणून बोललो. असो बाकी तुमचे चालुदे...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

@ युयुत्सु,

अनिंद्य
Tue, 01/22/2019 - 12:01 नवीन
@ युयुत्सु, अल्पकालीन गुंतवणूक / टेकनिकल अनॅलिसिस मला फारसे समजत नाही पण तुम्ही आकर्षक विचार मांडला आहे. तुमच्या अभ्यासात एशियन पेंट, ब्रिटानिया, लार्सन आणि हिंद झिंक सारखे शेयर असल्यास त्याबद्दल समजून घ्यायला आवडेल.
  • Log in or register to post comments

तुमच्या अभ्यासात एशियन पेंट,

युयुत्सु
Tue, 01/22/2019 - 12:40 नवीन
तुमच्या अभ्यासात एशियन पेंट, ब्रिटानिया, लार्सन आणि हिंद झिंक सारखे शेयर असल्यास त्याबद्दल समजून घ्यायला आवडेल. दुपारी बघून सांगतो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनिंद्य

लोकहो,

युयुत्सु
Tue, 01/22/2019 - 13:14 नवीन
लोकहो, माझ्या आईवडीलांना (दोघेही आता हयात नाहीत) अत्यंत उत्तम आर्थिकदृष्टी होती. मी अजुनही ब-याच आर्थिक बाबींमध्ये त्यांनी कसा विचार केला असता, याला महत्त्व देतो. ते दोघेही मला म्हणायचे की आपल्यालापेक्षा हूषार माणसे काय विचार करतात, यावर बारीक लक्ष ठेवायचे. हे सांगण्याचे कारण असे की माझ्यापेक्षा निश्चितपणे कैकपटीने हूशार अशी एक व्यक्ती ( आय० आय० टी० मद्रासची गोल्डमेडॅलिस्ट) मला योगायोगाने नेट्वर भेटली (नाव आत्ता आठवत नाही, पण शोधले की सापडेल). हा मनुष्य सगळे सोडून ट्रेडींगमध्ये घुसला. त्याने सेबीची असंख्य सर्टीफिकेशन मिळवलेली आहेत. त्याचा एक सेमीनार व्हिडीओ बघत असताना त्याने केलेले एक विधान मला आश्चर्यचकीत करून गेले. तो म्हणाला, In stock market 100% profit( return?) in a year is very common. हे कॅमेरासमोर बोललेले वाक्य मला गदागदा हलवून गेले. माझ्यापेक्षा हूशार व्यक्ती जेव्हा हे विधान जाहिरपणे करते तेव्हा त्यात तथ्य असले पाहिजे, या आईवडिलांच्या शिकवणुकीनुसार मी त्यावर विचार करायला सुरुवात केली. ही २०१६-१७ची गोष्ट आहे. तेव्हा मी पूर्वी म्हटल्याप्रमाणे नुकतीच ट्रेडींग करायला सुरुवात केली होती. पण तेव्हा मी घेतलेले ट्रेडींग विषयक निर्णय एक-दोन अपवाद वगळत अचूक ठरले, इतकेच नव्हे तर IndiaBulls Ventures मध्ये मी १००%पेक्षा अधिक नफा सुरुवातीलाच मिळाल्याने, हे वास्तव मी बर्‍यापैकी अनुभवले आहे असे म्हणायला हरकत. IndiaBulls Ventures मध्ये अजूनही hold केले असते तर कुठे पोचलो असतो, या कल्पनेने अजुनही गुद्गुल्या होतात. माझे ट्रेडींग मॉडॆल यानंतर सतत evolve होत आहे. मार्केट कसे काम करते, याच्या सतत अभ्यासाने आत्मविश्वास दृढ आहे.
  • Log in or register to post comments

मनः पूर्वक अभिनंदन.

ज्ञानव
Tue, 01/22/2019 - 13:26 नवीन
तुम्ही योग्य मार्गावर आहात. मार्केट हा साईड बिझनेस किंवा छंद नाही. जे छंद म्हणून मार्केटकडे येतात ते अनेकवेळा मार खातात आणि मग आपल्याला सगळे कळते ह्या थाटात मतांची पत्रके वाटत फिरताना दिसतात. ह्या व्यवसायाची खोली आणि त्याचे पदर ह्याचा आवाका प्रचंड मोठा आहे. पण आपल्यातलेच काही जण जेव्हा बालिशपणे फसवणूक फसवणूक म्हणत किंचाळत फिरतात तेव्हा वाईट वाटते. तुमचा शीर्षकातला प्रश्न (मला तो प्रश्नच वाटला गृहीतक नव्हे बाकी तुम्ही खुलासा करालच ) चर्चेला घेता येईल. जर तुम्ही अर्थक्षेत्र ह्या ग्रुप वर नसाल तर मला व्य.नि. करा मी सामील करून घेतो. तिथे मारू गप्पा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: युयुत्सु

ज्ञानव,

युयुत्सु
Tue, 01/22/2019 - 14:43 नवीन
ज्ञानव, यात गमतीचा पण महत्त्वाचा भाग असा आहे की मी विचारलेल्या प्रश्नाला समांतर असा प्रश्न असा आहे - मला एव्हरेस्ट गाठता येईल का? मग दिशाभूल करण्यात हूशार असलेली लोकं सांगतात की - अजिबात शक्य नाही. तुला मरायचे असेल तर एव्हरेस्टवर कशाला जातोस? किती लोक मरतात ते ठाऊक नाही का? किती लोक मोहिम मधेच सोडून देतात, याबाबत कधी कोण कुणाला सांगतं? पण या दीडशहाण्या लोकांना हे कळत नाही, एव्हरेस्ट गाठण्याचे स्वप्न बघणार्‍यांना खच्ची किंवा परावृत्त करण्यापेक्षा वास्तवाची जाणीव करून द्यावी आणि निर्णय त्या व्यक्तीवर सोपवावे आणि एखादी व्यक्ती जिद्दीने प्रयत्न करत असेल तर शक्य तर त्याचे उद्दीष्ट पूर्ण कसे होईल याचे मार्गदर्शन करावे. मग असे लक्षात येते की एव्हरेस्ट गाठु पहाणार्‍या काही व्यक्ती गेला बाजार घरातून बाहेर पडून घराबाहेरची टेकडी सरावाने काबीज करतात, तर काही जण नियमित सिंहगडासारखा किल्ला चढु लागतात. काही ट्रेकींगची आवड जोपासतात. काहींना फक्त एव्हरेस्ट बेस कँपपर्यंत जाणे जमते आणि तेव्हढे समाधान पण खूप असते. सांगायचे तात्पर्य असे की एव्हरेस्ट गाठायचे स्वप्न बघणार्‍यांना अनेक सेकंडरी बेनिफीट मिळु शकतात, हे ज्या दीडशहाण्यांना नाकारायचे असते, त्यांची सावली देखिल मी अंगावर कधी घेत नाही. तुमच्या ग्रुपमध्ये यायला मला आनंदच होईल...
  • Log in or register to post comments

ऊत्तम विवेचन

ज्ञानव
Tue, 01/22/2019 - 16:21 नवीन
मुळात १०% परतावा शक्य आहे का? असा साधासरळ प्रश्न आहे पण तो प्रश्न नसून स्किम असल्यागत फसवणूकीचा हाकारा देणं निर्बुद्धपणाचेच आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: युयुत्सु

हे त्यांना कळले असते, तर काय

युयुत्सु
Tue, 01/22/2019 - 17:13 नवीन
हे त्यांना कळले असते, तर काय पाहिजे होते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानव

डॉक्टर खर्‍यांशी पूर्ण सहमत.

अनुप ढेरे
Tue, 01/22/2019 - 14:56 नवीन
डॉक्टर खर्‍यांशी पूर्ण सहमत. दरमहा १०% परतावा वगैरे दावे दिशाभुल करणारे आहेत. काउंटरप्रोडक्टिव आहेत. वैयक्तिक पातळीवर उतरुन केलेली टीका वाचुन करमणुक झाली. ==== मिपा व्यवस्थापनास, शेअर रेकमेंडेशन असलेले प्रतिसाद उडवुन टाकावेत ही विनंती.
  • Log in or register to post comments

पुन्हा एकदा... लाँग टर्म

थॉर माणूस
Wed, 01/23/2019 - 00:50 नवीन
पुन्हा एकदा... लाँग टर्म दरमहा १०% शक्य आहे असा दावा या धाग्यात कुठे आहे दाखवाल का? त्यांनी एक प्रोफाईल केस स्टडी म्हणून घेतला आहे, एका महिन्याचा सँपल वापरून त्यात १०% परतावा दाखवला आहे. थोडक्यात, असे वेगवेगळे स्टॉक फोलिओज वेगवेगळ्या महिन्यात ८-१०% परतावा आणू शकतील. जर एखाद्याची मार्केटवरची मांड पक्की असेल तर त्याला वर्षातले किमान काही महिने हे टार्गेट गाठता येऊ शकेल. अर्थात, असा परतावा मिळवणे अशक्य नाही इतकेच फार फार तर म्हणता येईल. अशा मार्केट्स मधे रामबाण वगैरे काहीही नसतो. वन साईज फिट्स ऑल हा न्याय वापरून झटपट पैसे डब्बल करण्याच्या नादात लोक डोळे झाकून इतरांचे प्रोफाईल फॉलो करायला जातात आणि आडवे होतात. त्याची एंट्री, आपली एंट्री किंवा त्याच्या फोलिओची डायवर्सिटी आणि आपण उचललेले त्यातले मोजके शेअर्स्/टीप्स हे सगळे सोयीस्कर रीत्या विसरून मार्केट ला शिव्या घालून मोकळे होतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनुप ढेरे

धाग्याचं टायटल पुन्हा वाचा.

अनुप ढेरे
Wed, 01/23/2019 - 10:59 नवीन
धाग्याचं टायटल पुन्हा वाचा. दरमहा १०% याचा अर्थ काय होतो?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: थॉर माणूस

दरमहा १०% परतावा शक्य आहे का ?

ज्ञानव
Wed, 01/23/2019 - 11:12 नवीन
दरमहा १०% परतावा शक्य आहे का ? शेवटचे प्रश्नचिन्ह तुम्ही वाचले का ? व्याकरणात त्याला अनन्य साधारण महत्त्व आहे पण भक्तांना घाईच फार असते. एखादी गोष्ट शक्य आहे का असा प्रश्न पडणे आणि त्यावर उहापोह होणे अवास्तव/अनैसर्गिक/फसवणूक दर्शवणारे आहे का ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनुप ढेरे

यु मेड माय डे टुडे टु! हा हा

युयुत्सु
Wed, 01/23/2019 - 11:25 नवीन
यु मेड माय डे टुडे टु! हा हा हा हा हा हा...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानव

सांगायचा मुद्दा १०% किंवा

अनुप ढेरे
Wed, 01/23/2019 - 11:52 नवीन
सांगायचा मुद्दा १०% किंवा अधिक परतावा मिळवायच्या अनेक संधी उपलब्ध असतात. आपल्याला त्या ओळखता याव्यात यासाठी नियमित अभ्यास लागतो.
हे धाग्यातुन उध्रुत आहे. धाग्याचं टायटल आणि धाग्याचा कंटेंट यातुन दरमहा १०% टक्के परतावा मिळतो असा दावा आहे. हा दावा बोगस असण्याची शक्यता प्रचंड आहे. असो, चालु द्या तुमचं!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानव

संधी उपलब्ध असण्याचा

ज्ञानव
Wed, 01/23/2019 - 12:00 नवीन
दावा केला आहे. मिळतातच असा दावा कुठे हि केलेला नाही. त्यांनी एक मॉडेल दिलय ते चूक किंवा बरोबर ठरवण्यासाठी मागील डेटा चाळून पहावा लागेल किंवा पुढील अख्खे वर्ष मॉक ट्रेड करून पहावा लागेल तेव्हा निष्कर्ष आणि दावे करणे योग्य ठरेल. ह्यात फसगत होऊ नये म्हणूनच प्रश्नचिन्ह आहे. राईट ब्रदर्सना जसे उडू शकतो का आपण ? हा प्रश्न पडला आणि त्यावर कष्ट घेऊन हो आपण उडू शकतो हा दावा ते करू शकले असते पण एकदा सिध्द झाल्यावर कसला दावा आणि कसले काय? तर मुद्दा असा कि एखादी घटना घडू शकते का ? हे बीज त्यांनी रोवले आहे ज्याला जसे जमेल तसे संशोधन त्याने करावे आणि आपले निरीक्षण नोंदवावे हे अपेक्षित आहे. त्यातून प्रबोधनच घडेल. पण महाराष्ट्राबाहेरून आलेली मंडळी येन केन प्रकारे पैसा कमावून गेली आम्ही अजून फालतू काथ्याकुट करण्यात धन्यता मानतो ह्याचे अतीव दुःख होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनुप ढेरे

उलट असल्या अशक्यप्राय

अनुप ढेरे
Wed, 01/23/2019 - 12:15 नवीन
उलट असल्या अशक्यप्राय दाव्यांना भुलुन लोक मार्केटात उतरतात. एकदा हात पोळले की पुन्हा कधीही मार्केटात येत नाहीत. म्हणुन असले फसवे दावे अतिशय कांऊटरप्रोडक्टिव आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानव

असा दावा नाहीच आहे पण.....

ज्ञानव
Wed, 01/23/2019 - 12:22 नवीन
एक प्रश्न आहे. अजून ठरायचे आहे. एखादा शक्य करून दाखवणारा उदयाला येऊ शकतो किंवा आला असेल पण तुमच्या आमच्या दृष्टीक्षेपात आला नसेल. जगात काहीच अशक्य नाही कारण शक्य होण्याची योग्य वेळ यावी लागते. तुमच्या लहानपणी तुम्हाला संगणक किंवा खिशात ठेऊन फिरता येण्या जोगा फोन हि अशक्यप्राय वाटले असेल पण म्हणून एखाद्याने साधा प्रश्न विचारू नये का ? तुम्ही आहात का शेअर मार्केटमध्ये ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनुप ढेरे

जगात काहीच अशक्य नाही कारण

अनुप ढेरे
Wed, 01/23/2019 - 16:07 नवीन
जगात काहीच अशक्य नाही कारण शक्य होण्याची योग्य वेळ यावी लागते
हे अत्यंत बावळपणाचं विधान आहे. उद्या स्पाँडिलायटिस असलेल्या माणसाला एव्हरेस्ट वर जाणं शक्य आहे सांगाल. या असल्या दाव्यावर भुलुन जर तो गेला एव्हरेस्ट सर करायला तर काय होईल त्याचं?
तुम्ही आहात का शेअर मार्केटमध्ये ?
हो, म्हणुनच असले दावे फोल आहेत हे समजतं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानव

तुम्ही सगळेच अर्धवट

ज्ञानव
Wed, 01/23/2019 - 16:43 नवीन
वाचता का ? योग्य वेळ आलीतर हा अर्धा भाग तुम्ही वाचला नाहीत कि सोयीस्कर पणे काणाडोळा केलात कि आणखी काही....? नवा प्रश्न : तुम्ही १००% आहात का शेअर मार्केटमध्ये ? https://www.swissinfo.ch/eng/ankylosing-spondylitis_-journey-is-destination-for-mountaineering-plans-of-as-sufferer/43385106
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनुप ढेरे

नवा प्रश्न : तुम्ही १००% आहात

अनुप ढेरे
Wed, 01/23/2019 - 17:14 नवीन
नवा प्रश्न : तुम्ही १००% आहात का शेअर मार्केटमध्ये ?
नाही, शेअर ट्रेडिंग माझा पूर्णवेळ व्यवसाय नाही. ==== तुम्ही नेहेमिच मुर्खासरखे आर्ग्युमेंट करता का? अशक्य/आउटलायर गोष्टींची उदाहरणं देउन लोकांना भुलवणं हे नवीन नाही. अ‍ॅमवे टाइप झालं हे तर. एक शंका येऊ राहिल्ये. तुमची अ‍ॅडव्हायझरी वगैरे आहे का? तुम्ही इथे गिर्‍हाईकं गोळा करायला आलेले वाटता. तसलेच लोक असले दावे करून बकरे पकडत असतात. मला तुमच्या सारख्या लोकांच्या नादी लागायचं नाही. पण इथे हास्यस्पद आणि धोकादायक दाव्यांबद्दल खर्‍यांनी लोकांना जी वॉरनिगं दिली, प्रामाणिकपणे दिली, त्यावरुन त्यांच्यावर तुम्ही लोक गँगअप करताना दिसलात म्हणुन प्रतिसाद दिले. === मि.पा. प्रशासनास, फोरम्सवर शेअर-सल्ले देणे यावर सेबीचे नियम कडक आहेत. या धाग्यावर असे सल्ले दिले गेले आहेत. असे सल्ले सेबी रजिस्टर्ड सल्लागारालाच देण्याची परवानगी आहे. === या धाग्यावरुन राम राम!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानव

राम राम ....सांभाळून जा.

ज्ञानव
Wed, 01/23/2019 - 17:25 नवीन
तुम्ही नेहेमिच मुर्खासरखे आर्ग्युमेंट करता का? हो तुमच्यासारखे मूर्ख दिसले कि पेटून उठतो. स्वतः १००% मार्केट मध्ये नसताना मुक्ताफळे उधळणारे मला अजिबात आवडत नाहीत आणि मी सेबी रजिस्टर्र्ड आहे. तरीही मी कुठलाच सल्ला दिला नाही. उलट वैयक्तिक शेअर्सबद्दल इथे चर्चा नको असेच म्हंटले आहे. जरा अभ्यास वाढवा बुवा! सगळा धागा आणि त्यातले प्रतिसाद व्याकरणासहित संपूर्ण वाचा आणि मग बोंबला. गेलात का ??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनुप ढेरे

व्यवस्थित अभ्यास आणि स्थिर मन

सुबोध खरे
Wed, 01/23/2019 - 12:50 नवीन
व्यवस्थित अभ्यास आणि स्थिर मन असले तर महिन्याला ८%-१०% शेअर्स मध्ये फार कठीण नाही , असा माझा अनुभव आहे. हे मूळ विधान फॉरेक्स ट्रेडिंग या धाग्यात असून तेथून हा प्रश्नचिन्ह असलेला धागा काढला गेला आहे. प्रश्नचिन्ह नंतर का आले याची कारणे तज्ज्ञांनी शोधावी. https://www.misalpav.com/comment/reply/43897/1021069 यात प्रश्न चिन्ह नसून हे विधान आहे. तेंव्हा

घाई कुणाला

आहे आणि

भक्त कोण

आहेत ते तज्ज्ञांनी ठरवावे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानव

त्यांनी त्यांचा अनुभव सांगितला आहे

ज्ञानव
Wed, 01/23/2019 - 13:08 नवीन
अनुभव सांगणे आणि छाती ठोक दावा करणे ह्यातला फरक कळेना मग बोलणेच खुंटले. तसेच माझ्याकडे सल्ला मागायला येऊ नये म्हंटले आहे कि तरीही एखादा गेला तर तो निर्बुद्धच म्हणावा. आणि तद्न्य करताहेत हं शहानिशा त्यांना कुणाच्या हुकमाची गरज नाही. मूळ धाग्याला प्रश्न चिन्ह केव्हा आले ह्यासाठी बराच रिसर्च झालाय, ह्याचा अर्थ विश्लेषणाचा गुण आहे फक्त तो कुठे वापरावा ह्याबद्दल योग्य गुरूची गरज आहे. सहावी क च्या वर्गातली मुले जशी भांडतात तसे भांडतोय का आपण ??? (तीन प्रश्न चिन्ह आहेत विधान अथवा दावा नाही.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

अशी कोलांटी मारण्याची वेळ का

सुबोध खरे
Wed, 01/23/2019 - 13:22 नवीन
अशी कोलांटी मारण्याची वेळ का यावी?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानव

सन फार्मा

ज्ञानव
Wed, 01/23/2019 - 13:17 नवीन
तीन ट्रेडिंग सेशनमध्ये १५% चालला आहे. अर्थक्षेत्रावरच्यांना आम्ही किती घेतले आहेत ते माहित आहेच. पण वस्तुस्थिती बऱ्याच जणांना पचत नाही. ह्यचा अर्थ स्थिर मन आणि व्यवस्थित अभ्यास असेल तर १५% पण पडणाऱ्या शेअर्स मधून मिळूच शकतात असा माझा दावा आहे. माझ्या प्रकुतीबाहेर जाऊन बरीच टोलामारी झाली इथे. त्याचा आनंद जर कुणाला होत असेल तर त्यातूनही मी काहीतरी कमावलेच म्हणायचे. बऱ्याच दिवसांनी इथे आलो होतो पण पुन्हा २०१३ सारखाच अनुभव यावा हे काही चांगले चित्र नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

काहीतरी गल्लत होतेय का ?

मराठी कथालेखक
Tue, 01/22/2019 - 15:58 नवीन
तुम्ही दिलेल्या तक्त्यात PRAJIND OP = 148 CL = 153.95 या महिन्याच्या सुरुवातीच्या आणि शेवटच्या किमती आहेत असे वाटते. मग (153.95-148)*100/148 = 4.02 % असे येते. मग हे दरमहा १०% पेक्षा जास्त कसे ? इथे CHG चे नेमके सूत्र आणि अर्थ काय आहे हे स्पष्ट होत नाही. बाकी दरमहा १०% परताव्याबाबत - या बाबत मी फार विश्वासाने काही सांगू शकणार नाही. पण कोणताही एक शेअर वर्षानुवर्षे दरमहा १०% परतावा देवू शकेल असे वाटत नाही. मात्र दरमहा १०% परतावा देणारा पोर्टफोलिओ कदाचित बांधता येवू शकेल पण त्याकरिता खूप जास्त अभ्यास (सांख्यिकी, कंपन्यांबद्दलची माहिती) करुन तो सतत अद्ययावत ठेवावा लागेल. भारतात राकेश झुणझुणवाला हे नाव खूप मोठे आहे. त्यांचे मॉडेल नेमके काय आहे माहित नाही. पण सामान्य कुवतीच्या गुंतवणूकदारांना दरमहा १०% नाही तरी दरवर्षी १५-२०% परतावा देणारा पोर्टफोलियो बांधता येणे अशक्य नाही. अर्थात त्याकरिता द्यावा लागणारा वेळ, चिकाटी आणि स्वतःच्या इतर जबाबदार्‍या , लागणारी तरलता , जोखीम घेण्याची क्षमता (ही वय, खर्च , उत्पन्नाचे स्थिर स्त्रोत ई वर अवलंबून असते) याचा विचार करता स्वतःची सगळीच गुंतवणू़ थेट शेअर्समध्ये करु नये हे शहाणपणाचे. लिक्विड/डेट फंड, सोने, जमीन ई इतर गुंतवणूकही काही प्रमाणात करत रहावी. यातही लिक्विड फंड उत्तम.
  • Log in or register to post comments

खेलनेवाले कभी हारतें है तो कभी जितते है...लेकीन खिलानेवाले का घर

टर्मीनेटर
Tue, 01/22/2019 - 16:02 नवीन
हा धागा आणि त्यावरचे सर्व प्रतिसाद वाचल्यावर असे लक्षात आले कि धागालेखक युयुत्सु यांचा मुद्दा आणि त्याच्या विरोधात असलेला डॉक्टर खरे साहेबांचा मुद्दा आणि दोन्हीच्या मागचे विचार मला पटले आहेत. थोडी विचित्र गोष्ट आहे खरी, पण तरीसुद्धा :) >>>शेअर बाजारात पैसे मिळवता येतात. पण ते शिस्तबद्ध कार्यक्रम असेल तरच मिळवता येतात. अंदाजपंजे किंवा ऐकीव माहितीवर आधारित केलेला व्यवहार आतबट्ट्याचा असतो हे लक्षात ठेवावे. >>> सहमत. हि गोष्ट नजरेआड करून शेअर्स कडे 'एक फायदेशीर ठरू शकणारा गुंतवणुकीचा पर्याय' ह्या दृष्टीने न बघता इंट्राडे ट्रेडिंग, F&O, पुट-कॉल च्या नादी लागल्यास लाखाचे बारा हजार व्हायला वेळ लागत नाहीत हा स्वानुभव आहे. आणि खरे साहेबांनी लिहिल्याप्रमाणे सातत्यपूर्ण परतावा मिळेलच ह्याची कुठलीही खात्री देता येत नाही. अभ्यास आणि शिस्तबद्ध कार्यक्रमाच्या बरोबरीने नशिबाची साथही आवश्यक आहे. त्याच्या जीवावर तेजी असो कि मंदी कमावणारे कमावतात तर बहुतांश लोकं गमावतात! तसेच वरती भंकस बाबांनी प्रतिसादात लिहिल्याप्रमाणे >>>ब्रोकरेज हाउसेस चोर कंपन्या असतात. ह्यांच्या बोळ्याने दूध पिणारा हमखास तोंड पोळून घेतो >>> हे देखील खरे आहे कारण,
खेलनेवाले कभी हारतें है तो कभी जितते है...लेकीन खिलानेवाले का घर हमेशा भरा रेहतां है!
शहेनशाह चित्रपटात जुगारी हॉटेल चालवणाऱ्या 'मुख्तारसिंग'च्या तोंडीचा हा डायलॉग शेअर ट्रेडिंगच्या बाबतीतही तंतोतंत लागू होतो. तुम्हाला फायदा होवो कि नुकसान हा भाग अलाहिदा, ब्रोकर्सना खरेदी/विक्रीच्या व्यवहारांवर त्यांचे कमिशन हे मिळतेच मिळते. २००९ साली एका कुमुहुर्तावर शेअर ट्रेडिंग करण्यास सुरुवात केली होती, आणि वर्षभरात चांगलेच हात पोळून घेतल्यावर त्याकडे आजतागायत पाठ फिरवली आहे.पण मध्यंतरी एक रोचक माहिती मिळाली आहे, त्या मॉडेल प्रमाणे वागून ह्यावर्षी पुनरागमन करायचा विचारही घोळतोय डोक्यात.
  • Log in or register to post comments

इथे CHG चे नेमके सूत्र आणि

युयुत्सु
Tue, 01/22/2019 - 16:07 नवीन
इथे CHG चे नेमके सूत्र आणि अर्थ काय आहे हे स्पष्ट होत नाही. मी इतर रकाने बघु नये असे म्हटले ते म्हणून्च... :) तो ओपन १६ जानेवारीच्या आठवड्याचा आहे.
  • Log in or register to post comments

.. कळाले..धन्यवाद

मराठी कथालेखक
Tue, 01/22/2019 - 17:43 नवीन
.. कळाले..धन्यवाद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: युयुत्सु

संपत्तीची निर्मिती आणि आपण भारतीय

युयुत्सु
Wed, 01/23/2019 - 06:53 नवीन
संपत्तीची निर्मिती आणि आपण भारतीय ज्यांना स्टॉक मार्केटबद्दल भीति किंवा तिटकारा आहे त्यांनी Why Wall Street Matters By WILLIAM D. COHAN हे पुस्तक अवश्य मिळवुन वाचावे. सहज गंमत म्हणून स्टॉक मार्केटचा इतिहास आणि आपला इतिहास एका काल रेषेवर मांडायचा प्रयत्न केला तेव्हा काय दिसते हे पुढे सिले आहे . ही मांडणी अत्यंत जुजबी कल्पना येण्यासाठी केली आहे. पण त्यामुळे असे लक्षात येते जग जेव्हा नव्या आर्थिक कल्पना स्वीका्रून संपत्तीची निर्मिती करत होते, तेव्हा आपण परकीयांशी आणि स्वकीयांशी लढत होतो. या देशात कोणत्याही नव्या कल्पना निर्माण होत नव्हत्या. आजही फार काही होत आहे असे मला वाटत नाही (हे माझे वैयक्तिक मत आहे). आजही नव्या कल्पना आणी त्यातून मिळणारे संदेश आपण कसे झिडकारतो, हे वर्षभरापूर्वी माझ्या अधिजनुकशास्त्रावरच्या पोस्टवर झालेल्या चिखलफेकीतून स्पष्ट झालेच आहे. तेव्हा दिशाभुल करणार्‍या विद्वानांना वेळीच ओळखा... - १६०२ - जगातील १ल्या ॲमस्टरडॅम स्टॉक मार्केटची स्थापना 1659: Shivaji captures Satara from Sultanate of Bijapur, leads revolt against the Mughal empire 1661: Mumbai transferred from Portugal to Britain 1668: British government transfers Mumbai to British East India Company 1674: Shivaji declares himself King of the Marathas (see Maratha empire) 1680: Shivaji dies 1720: Bajirao I becomes Peshwa (Prime Minister) १७०२ - पॅरीस स्टॉक एक्स्चेंज ची स्थापना 1740: Death of Bajirao I 1756: Marathas capture the town of Attock (now in north-west Pakistan). Maratha empire reaches its largest extent. 14 January 1761: Maratha defeat at Third Battle of Panipat. 1775–1782: First Anglo-Maratha War १७९० - फिलाडेल्फिया स्टॉक एक्स्चेंज ची स्थापना १८०१ - लंडन स्टॉक एक्स्चेंज ची स्थापना 1803–1805: Second Anglo-Maratha War १८०८ - मिलान स्टॉक एक्स्चेंज ची स्थापना १८१८ - न्युयॉर्क स्टॉक एक्स्चेंज ची स्थापना 1817–1818: Third Anglo-Maratha War 3 June 1818: Peshwa Bajirao II surrenders to the British 1827 11 April Jyotirao Phule is born (to 1890) १८३१ - माद्रिद स्टॉक एक्स्चेंज ची स्थापना 1853 16 April The first railway is established between Bombay and Thane. 1857 10 May Indian Rebellion of १८५७ 1856 Lokmanya Tilak was born 1859 18 April Death of Tatya Tope १८६१ टोरोंटॊ स्टॉक एक्स्चेंज ची स्थापना 1869 Mahatma Gandhi was born १८७२ ऑस्ट्रेलियन स्टॉक एक्स्चेंज ची स्थापना १८७५ बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज ची स्थापना
  • Log in or register to post comments

ऊत्तम विवेचन

ज्ञानव
Wed, 01/23/2019 - 07:56 नवीन
२०१९ - १८७५ = १४४ वर्ष वाहत्या गंगेत अनेक अमराठी माणसे प्रवाह पतित झाली आणि काही वारली - काही तरली पण मराठीतलीच काही मंडळी निर्बुध्द, निरर्थक चर्चेच्या काथ्याकूटातून आपल्याला मिरवण्यात धन्यता मानत राहिली. पण आजची तरूण पिढी लाजवाब हुशार आहे माझ्याच समुहात विक्रम चिटगोपकर, पुष्कर कुळकर्णी, सौरभ आठवले ......किती तरी नावे मी ईथे देऊ शकतो जे अत्यंत हुशार आहेत आणि त्यांनी भलत्या विद्वानांच्या नादी न लागता यशस्वी रित्या सातत्याने ट्रेडिंग सुरू ठेवले आहे. १०% परतावा हा संशोधनाचा विषय म्हणून आला आहे त्यावर चर्चा होण्या ऐवजी काही वेगळेच जावईशोध लावणारे आणि साप साप म्हणून भूई थोपटणार्यांनी ह्या भूईवर येऊच नये कारण स्टाॅक ट्रेडिंग सोडा कुठलेही ट्रेडिंग हे येरा गबाळ्याचे काम नाही त्यासाठी बुद्धी स्थिर लागते. धागा काय जातीचा आहे आणि आपण विणतो. काय आहे हेच जर कळत नसेल तर....... असो. मला सन फार्माने १०% ह्या महीन्यात दिले. पुढच्या महीन्यात ईथेच ईतर कुणी १०% दिले तर तेही ऊद्धृत करेनच. वर्षभर हा धागा खेचून मग ठरवू धाग्यातल्या प्रश्नाचे ऊत्तर !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: युयुत्सु

अवांतर प्रतिसाद

चांदणे संदीप
Wed, 01/23/2019 - 07:57 नवीन
अवांतर प्रतिसाद: अगदी अशाच प्रकारची, प्रत्येक शतकातली, विविध विषयावर, जग आणि आपण(भारतीय) यांसंदर्भात, विस्तृत माहिती मिळवावी याबाबत कित्येक दिवस, महिने, वर्ष प्रयत्न सुरू आहे पण आमची झुकझुकगाडी प्लॅटफॉर्म सोडीना. असो. अर्थकारणाशी संबधित ही माहिती रोचक आहे. तुमची ही मांडणी पाहून पुन्हा एकदा हॉर्न दिला आमच्या गार्डने. या मांडणीबद्दल धन्यवाद. :) आता तुमचे चालूद्या. वाचतोय. ;) Sandy
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: युयुत्सु

माझ्या वर अनेक लोकांनी टीका

सुबोध खरे
Wed, 01/23/2019 - 09:45 नवीन
माझ्या वर अनेक लोकांनी टीका केली चिखलफेक केली दूषणे दिली आहेत ती बाजूला ठेवून मी एकच सांगू इच्छितो कि शेअर बाजारात मी गेली २४ वर्षे आहे आणि त्यात गेली १२ वर्षे मी रोज त्यात सक्रिय आहे. यात ५ वर्षाचे एक आवर्तन (सायकल) गृहीत धरल्यास हे माझे बाजार पाहण्याचे तिसरे आवर्तन आहे. यात माझ्या निवृत्तीनंतर मिळालेला सर्व पैसा मी बाजारात गुंतवलेला आहे. या १२ वर्षात ट्रेडिंगमध्ये "अफाट नफा" मिळवून श्रीमंत होण्याचे स्वप्न पाहिलेले किंवा घर बसल्या व्यापार करून बसून खातात येईल असे स्वप्न पाहिलेले असंख्य लोक पाहिलेले आहेत आणि पाहतो आहे. परतावा तर सोडाच पण मूळ भांडवल गमावलेले आणि निराश होऊन बाजारातून बाहेर पडलेले अनेक लोक यात आहेत. ट्रेडिंग हा अतिशय जोखमीचा रस्ता आहे त्यापेक्षा गुंतवणूकदार (इन्व्हेस्टर) हा जास्त खात्रीचा भाग आहे. १०० % + परताव्याच्या मृगजळाच्या मागे लागून अनेक लोक बुडण्याची शक्यताच जास्त आहे. अभ्यास अभ्यास म्हणून जेवढा आवाज केला जात आहे त्याबद्दल मी एवढेच म्हणेन कि मला MBBS आणि MD ला १२ नंतर साडे आठ वर्षे लागली आणि त्यानंतर माझा त्याच विषयात २८ वर्षाचा अनुभव तेच तरी आज मला त्या विषयात १ % तरी समजते का हा प्रश्नच आहे. हीच स्थिती अभियांत्रिकी किंवा वकिली किंवा इतर कोणत्याही व्यवसायाबाबत म्हणावी लागेल. असे असताना मग बाजाराबाबत साडे चार दिवस अभ्यास करून हुशार होता येईल असे म्हणणे अतिशयोक्तीचेच होईल. हा माझा येथील शेवटचा प्रतिसाद. ज्यांना ट्रेडिंग मध्ये सातत्याने १० % दरमहा नफा मिळवता येईल असे वाटते आहे त्यांना माझ्या कडून शुभेच्छा.
  • Log in or register to post comments

विसंगती आहे.

ज्ञानव
Wed, 01/23/2019 - 10:38 नवीन
अनेक वर्ष स्वतःच्याच विषयातले शिक्षण आणि अनुभव घेऊन १% तरी समजते का हा प्रश्न पडलेली व्यक्ती शेअर मार्केटवर अधिकार वाणीने काय चूक आणि काय बरोबर हे सांगते तेव्हा त्या व्यक्तीच्या मानसिक गोंधळाची / कोलाहलाची किंवा कुठल्यातरी पोटशुळाची कल्पना येते. आपल्या विषयातले (ज्यावर उदरनिर्वाह अवलंबून आहे.) १% कळत नसताना इतरांना ब्रम्हज्ञान सांगत सुटायचे त्या पेक्षा आम्ही बरे आम्हाला आमच्या विषयातले पूर्ण ज्ञान आहे त्यामुळे योग्यायोग्य निर्णय आमच्यापुरते आम्ही घेऊच शकतो. १९८८ पासून मार्केटमध्ये आजही फुल टाईम ट्रेडरच आहे (कोट्याधीश हि आहे.) ह्या विषयातील सर्व खाचा खोचा जवळून पहिले आहे तरीही मला अज्ञात अशा कुठल्याही विषयावर /विषयाच्या धाग्यावर साधी उपस्थिती हि मी लावत नाही किंवा लावलेली नाही. इथे लोकं आपलाच हेका चालवून घेतानासुद्धा साधे विश्लेषण का करीत नाहीत कि आपले वय, हुद्दा, अनुभव लक्षात घेऊन जे आपल्यला समजत नाही त्यावर अवाक्षर हि न बोलता काही माहिती मिळत असेल तर तेव्हढी घ्यावी काही प्रश्न पडत असतील तर विचारावेत आणि स्वतः बरोबर इतर सर्वांना (त्यात धागाकर्ता आणि प्रतिसाद देणारेपण आले.) प्रबोधन करावे आणि सबका साथ सबका विकास हे तत्व अवलंबावे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • ›
  • »

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा