सुनीलरावांचा एक निवांत, मोकळा वीकांत वाचून आम्हांला - म्हणजे नाटक्या, अस्मादिक आणि बबलु हे मिपाकर - आमचा गेला वीकांत आठवला - अशीच निवांत, मोकळी शनिवारची संध्याकाळ.
"वीकेन्डला काय करतो आहेस?" आठवड्याच्या मध्यावर नाटक्याचा फोन आलेला.
"हापिसात नसलो तर मोकळा असेन; पण शक्यता अंधुक आहे" मी.
"बबलुच्या घरी कॉक् टेल् पार्टी करायचा बेत आहे. बरेच दिवसात आपली भेटही झालेली नाही. ब्याचलर् पार्टी करू ;)" नाटक्या
(सौ. बबलुंची गैरहजेरी सगळ्यांच्याच पथ्यावर पडणारसे दिसते काय, असा विचार करून मी) - "संध्याकाळी हापिसातूनच येतो हवे तर"
"वीकेन्डला हापिस?" नाटक्या
"हल्लीच काही लोकांना हाकलले आहे. तेव्हा म्हटले आपल्याला हाकलायच्या आधी काम उरकावे; (आणि काम केल्याने हाकलले जाणार नाही, अशी आशा प्रज्वलित झाली, तर तिला तेवत ठेवावे)" मी.
"बरे. शनिवारी संध्याकाळी बबलुच्या घरी भेटू" नाटक्या.
शुक्रवार रात्री -
"उद्या येतो आहेस ना?" बबलु.
"होय. काय आणू?" मी.
"नाटक्याशेठ काही कॉक् टेल्स् करणार आहेत. आवश्यक ते सामान ते स्वतः घेऊन यायचेत. तू ऑरेन्ज् ज्यूस् (नारिंगी नव्हे ;) ), डाळिंबाचा ज्यूस् आणि जिन्जरेल् घेऊन येणार आहेस" बबलु.
"बरे" मी.
"खायचे काय? नाटक्या शेठ चटपटीत कोलंबी करणार आहेत" बबलु
"मी फ्राइड् राइस् करेन. सामान तयार ठेव" मी.
शनिवारी संध्याकाळी पोचलो बबलुच्या घरी. नाटक्याशेठ आधीच येऊन बसलो होतो. सगळी तयारी अगदी जय्यत झाली होती.
सुरुवात मार्गारिटाने करायची ठरले. नाटक्याशेठ ने अगदी 'विदिन् नो टाइम्' आकर्षक लाल-गुलाबी मार्गारिटा सादर केली. डाळिंबाच्या ज्यूस् मुळे घोटाच्या शेवटी लागणारी आंबट चव तर लाजवाबच! याची पाककृती लवकरच मिपावर येणार आहे :)
त्यानंतर पुदिन्याच्या पानाचा मोहक स्वाद आणि चुरचुरीत जिन्जरेल् युक्त एक कॉक् टेल् चवीचवीने घोटाघोटाने प्यालो. याचे नाव माझ्या लक्षात नाही.
जोडीला गप्पा चालू होत्याच. नाटक्याने चटपटीत कोलंबी करायला सुरुवात केली. सगळी पूर्वतयारी अगोदरच घरूनच करून आणल्याने फार काही वेळ गेला नाहीच; आणि फ्राइड् राइस् च्या तयारीसाठी बबलुला भाज्या कापायला बसवले गेले ;) विश्व साहित्य संमेलन, त्यातील एच्च. मंगेशकरांचे 'भावसरगम', मनोरंजनाचे कार्यक्रम विरुद्ध साहित्याशी संबंधित कार्यक्रम असे आता शिळे झालेले, पण तरीही चवीचवीने चघळले जाणारे वाद, यांवर चर्चा झाली. नाटक्याने सांगितलेले काही किस्से ऐकून फारच करमणूक झाली. हवा छान सुटल्याने खाणे करण्याआधी मोकळ्या हवेतल्या गप्पा आणि अर्थातच त्यायोगे भूकवृद्धी यासाठी बाल्कनीत खुर्च्या टाकल्या. टीव्हीवर चालू असलेल्या 'मेरे बाप की बीवी मुझे बेटा बोल्ती' सारख्या अतिटुकार गाण्यावरून चालू झालेल्या गप्पा, त्यावरून आठवलेले स्कॉलरशिपच्या परीक्षेत विचारले जाणारे नातेसंबंधांवरील 'ओळखा पाहू' स्वरूपाचे प्रश्न या सगळ्यांत वेळ कसा गेला समजले नाही. भूक लागल्यावर घरात येऊन कोलंबीवर ताव मारणे चालू झाले, आणि त्याच्या जोडीला संत्रे-अननसाचा संयुक्त स्वाद असलेले बहामा ब्रीझ सारखे पिवळेधमक आकर्षक कॉक् टेल्.
आतापर्यंत मिपावर फोटो पाहूनच लाळ गळायला लावणारी चटपटीत कोलंबी खरोखरच किती चवदार, चटपटीत लागते, हे मी लिहिल्याने समजायचे नाही; ते करूनच पहायला हवे.
प्रसन्न हवा आणि कोलंबीने चाळवली गेलेली भूक मग रंगीबेरंगी फ्राइड् राइस् शिवाय भागणे शक्यच नव्हते. अस्नादिकांनी पटापट फ्राइड् राइस् शिजवला. बबलु आणि नाटक्याशेठने काही तक्रार केली नाही, म्हणजे तो ठीकच झाला असावा, असे समजून तो हादडला. जोडीला एक लालभडक रंगाचे, गुलाबाच्या स्वादाचे आणि डॉक्टरकाका देतात त्या लाल कफ् सिरप् ची आठवण करून देणार्या स्वादाची छटा असलेले एक कॉक् टेल् होते. जेवणानंतर मोर्चा पुन्हा बाल्कनीत वळवला. तेथे द. मा. मिरासदारांच्या लेखनावर चर्चा (व्यंकूची शिकवणी), शंकर पाटल्यांच्या लेखनावर चर्चा (धिंड), नाटक्याच्या नव्या नोकरीच्या वेळचे भारतातील अनुभव, अस्मादिकांचे आतापर्यंतचे रंगमंचावरचे प्रयोग, त्याबाबतच्या रंजक आठवणी अशा विविधांगी गप्पा झाल्या. शेवटी गप्पा आणि पोट दोन्ही इतके जड झाले होते की ठरवलेली आणखी दोन कॉक् टेल्स् आता आज नको, पुढे कधीतरी पाहू, असे ठरवून निरोप घेतला. आता अशाच आणखी एका निवांत, मोकळ्या वीकांताची वाट पाहणे आले ;)

वाचने
8625
प्रतिक्रिया
31
मिसळपाव
प्रतिक्रिया
खल्लास.
हेही भारी
+१,
In reply to हेही भारी by सहज
+२
In reply to +१, by छोटा डॉन
आईल्ला!
जबरा
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
वा!
In reply to जबरा by नंदन
तुम्हीच
In reply to वा! by पिवळा डांबिस
+१
In reply to तुम्हीच by भाग्यश्री
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
पिडाकाका...
In reply to वा! by पिवळा डांबिस
मस्तच! शेवट
कोणाच्या
In reply to मस्तच! शेवट by विसोबा खेचर
लै भारी !
मी या मेनू पासून फक्त
खल्लास!
ज ब ह र्या.....
एकूण...
मस्त ..
In reply to एकूण... by बबलु
रंपाट..
वा!!!!!
झक्कास..
झक्कास..
मस्त..
साकिया...
मी मद्यप्रेमी नसलो तरीही वाचायला आवडेलच
In reply to साकिया... by नाटक्या
त्याचं काय आहे..
In reply to मी मद्यप्रेमी नसलो तरीही वाचायला आवडेलच by चतुरंग
सगळेच तळीराम
In reply to साकिया... by नाटक्या
काय सांगता??
In reply to सगळेच तळीराम by बेसनलाडू
अट्टाकट्टा हा शब्द छान वाटतो
In reply to काय सांगता?? by नाटक्या
चला म्हणजे
In reply to अट्टाकट्टा हा शब्द छान वाटतो by बेसनलाडू
ज ह ब ह र्या!