Skip to main content

चालू घडामोडी - जानेवारी २०१९

लेखक वामन देशमुख यांनी मंगळवार, 01/01/2019 20:18 या दिवशी प्रकाशित केले.
सर्व मिपा करांना नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा! राम मंदिरासाठी अध्यादेश नाही ! घटनात्मक मार्गाचाच वापर करणार ; पंतप्रधान मोदींनी मांडली भूमिका “राम मंदिराच्या मुद्यावरून मागील काही दिवसांपासून वातावरण चांगले तापले आहे. आरएसएसनेही राम मंदिराचे लवकरात लवकर निर्माण करण्यासाठी अध्यादेश काढण्याची मागणी केली होती. शिवसेनाही यासाठी मागील अनेक दिवसांपासून आग्रही होती. पण भाजप नेमकी याबाबत काय भूमिका घेणार हे स्पष्ट नव्हते. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राम मंदिरासाठी अध्यादेश काढणार नसून, घटनात्मक मार्गानेच राम मंदिराची उभारणी केली जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे. एका वृत्तवाहिनीने मोदींनी अशी भूमिका मांडल्याचा दावा केला आहे.” मोदींच्या भूमिकेचे स्वागतच आहे, तथापि, राममंदिरासाठी न्यायालयाचा मार्ग धरणे हे घटनात्मक आहे, आणि त्यासाठी अध्यादेश काढणे, हे घटनात्मक नाही, असे आहे का? संघाने राममंदिरासाठी अध्यादेशाची मागणी करणे आणि सरकारने मात्र न्यायालयीन मार्गाचा आग्रह धरणे ही मे २०१९ च्या लोकसभेची तयारी म्हणावी का? नोटः यासाठी अध्यादेश काढावा असं माझं मत नाही, न्यायालयात जे काही चाललंय ते चालू द्यावं.

वाचने 227978
प्रतिक्रिया 616

प्रतिक्रिया

In reply to by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)

वाटलंच ही अक्कल दुसऱ्याची आहे. पण तो बेअक्कल आहे हेही समजू नये? ढकलतांना त्यात सत्य किती तेवढं तरी तपासायला हवं होतं. पण तुमच्या कडून अजून काय अपेक्षा करणार? एकदा सर्वोच्च न्यायालयाचा निकाल वाचून पहा. त्यात सर्व डिटेलवार दिलंय. मग हे असं कुठल्यातरी भंपक माणसाचं ढकल पत्र पाठववसं वाटणार नाही

In reply to by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)

अजून कळत नाही की हा AAला 30000 कोटी हा आकडा आला कुठुन. आत्तापर्यत जे वाचण्यात आले आहे त्यानुसार सुमारे ७५ते १०० कंपन्या ऑफसेट पार्टनर्स आहेत त्यात AA मधे पुढील ३ ते ५ वर्षात जास्तीत जास्त ८५0 कोटिंची गुंतवणूक अपेक्षीत आहे. या सगळ्यामुळे रागा खोटे बोलतात असेच वाटते.

In reply to by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)

हे राज कुलकर्णी फारसा अभ्यास करत नाहीत असं दिसतंय. HAL आणि दासूमध्ये राफेलसाठी कधीच करार झालेला नव्हता. उगाच काहीतरी तारखा टाकल्या आणि थोडेफार jargons वापरले म्हणजे अभ्यासपूर्ण प्रतिसाद नसतो. एक प्रश्न कोणीच विचारत नाहीये. जर देशाला लढाऊ विमानांची एवढी गरज होती आणि हिंदुस्थान एरॉनॉटिक्स सुखोई तसेच इतर लढाऊ विमाने तयार करत होती तर मग हिंदुस्थान एरॉनॉटिक्सला निदान २-४ स्कॉड्रन सुखोई तयार करायचे काम काँग्रेसने का दिले नाही? १९९८ च्या आधी आणि २००४ नंतर काँग्रेसकडे भरपूर वेळ होता. आता हिंदुस्थान एरॉनॉटिक्सची एवढी चिंता वाटतीये मग तेव्हाच पुढच्या १०-१५ वर्षांची सोय करून ठेवली असती तर? एवढे महिने आरडाओरडा करून नंतर रागावर संसदेमध्ये माझ्याकडे पुरावे नाहीत पण मला मोदींनी घोटाळा केला असं वाटतंय असे म्हणण्याची वेळ आली यातच शहाण्याने कोण किती पाण्यात आहे हे समजायला पाहिजे.

In reply to by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)

एक महत्वाची माहिती तुम्ही लिहायच विसरुन गेलात. एप्रिल 2015 पर्यंत डाससू आनी हाल मधिल वाटाघाटी सुरुच होत्या. करार जर यूपीए च्या काळात झाला असेल, तर तो या वाटाघाटीन्शिवाय झाला की काय?

नागपूर | मराठी माणसाला अटकेपार झेंडा लावण्याची परंपरा आहे, त्यामुळं देशाच्या पंतप्रधानपदी लवकरच मराठी माणूस बसेल, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. ते नागपूरमध्ये जागतिक मराठी संमेलनात बोलत होते. मराठी माणूस ज्या शहरात जातो, तिथे आपली छाप उमटवतो, असं देखील देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. मुख्यमंत्र्यांची मुलाखत आशुतोष शेवाळकर आणि रामदास फुटाणे यांनी घेतली. मराठी ही जगातील एक प्राचीन भाषा असून ज्ञान आणि अमृताचा ठेवा मराठीनं जगाला दिलां, असं त्यांनी म्हटलं आहे. दरम्यान, जागतिक मराठी संमेलनाचं उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, माजी मंत्री सुशिलकुमार शिंदे उपस्थित होते. https://www.thodkyaat.com/man-from-maharashtra-will-pm-of-india-says-by…

In reply to by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)

मुख्यमंत्री असे म्हणाले... More than one Maharashtrians would become PM by 2050 (२०५० पर्यंत एकापेक्षा जास्त मराठी व्यक्ती पंतप्रधान होतील): CM Devendra Fadnavis तुमच्या दुव्याच्या लेखकाचे, 'इंग्लिश' आणि/किंवा 'पत्रकारितेशी निष्ठा' फारच कच्ची आहे. उगाच टुक्कात स्त्रोतातून, शब्द फिरवणार्‍या, बातम्या उचलल्या की, असे तोंडावर पडायला होते. =)) =)) =)) हा "गडकरी/फडणवीस पंतप्रधान होऊ इच्छितात" या फुस्कुलीचा दुसरा फुसका बार आहे. ते समजण्याची बुद्धी बहुसंख्यांकडे आहे, काहींकडे नाही, इतकेच ! =)) अवांतर : दुवा (लिंक) दिली म्हणजे तो सबळ पुरावा होत नाही, त्या पुराव्यात दम असायला हवा.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

२०५० म्हणजे लवकरच ना ? मला तरी सावरकरांची आठवण झाली , 50 वर्षे तुमचे शासन तरी टिकेल का म्हटलेले ना ? म्हणून मला 2050 अन 'लवकरच' ह्यात फार फरक करायची गरज वाटली नाही . विश्वास महत्वाचा! असो , तुमच्या विचार स्वातंत्र्याबद्दल आदर आहे .

In reply to by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)

मुद्दा बदलून (पक्षी: गोलपोस्ट बदलून) पळून जायचा अयशस्वी प्रयत्न... नेहमीसारखाच ! मुद्दा असा होता की, मुख्यमंत्र्यांचे म्हणणे विकृत करणारा दुवा देऊन कळत-नकळत (बहुदा कळतच) कॉन्प्सिरसी थियरीचे गुर्‍हाळ मांडणार्‍यांच्या कळपात सामील झालात आणि तोंडावर आपटलात (तेही नेहमीप्रमाणेच). =)) =)) =)) सुधारणेची शक्यता दिसत नसल्याने, वाढदिवसाच्या शुभेच्छा ! ;) :)

रागा नी लोकसभेत कबुल केले की आता त्यांच्याकडे कोणताही पुरावा नाही. पण खात्री आहे की मोदींनी गडबड केली आहे.

In reply to by जानु

राहुल गांधी हा एक बेअक्कल व डोक्यावर पडलेला, बिनडोक मनुष्य आहे. -- अनिल अंबानींच्या कंपनीला जे काम दिले ते काम 'हल' कडे का दिले नाही. -- संरक्षणमंत्री निर्मला सितारमन यांनी संसदेत दिलेल्या त्यांच्या दिड तासाच्या भाषणात राफेलचे काम एचएएल कडे का दिले नाही व सध्या एचएएलक्डे किती काम आहे ह्याची व्यवस्थित माहिती दिली. तरीही संरक्षणमंत्र्यांचे भाषण संपल्यावर ह्या बिनडोक राहुल गांधीने पुन्हा तोच प्रश्न पुन्हा त्यांना विचारला कि अनिल अंबानींच्या कंपनीला जे काम दिले ते काम हल कडे का दिले नाही. --

In reply to by प्रसाद_१९८२

लोकसभेतील कामकाजाचे कित्तेक महत्वाचे तास त्या करंटया रागा मुळे वाया गेलेत , त्याची लाज / जाणीव काँग्रेस ला आणि त्या रागा ला ( मूर्ख , दुबळ्या , बेअक्कल , मतिमंद , ) नाही .

http://www.jantakareporter.com/india/huge-relief-to-rahul-gandhi-sonia-… The Congress on Friday said that the clarification by the CBDT had exonerated Young Indian in the National Herald case from any tax liability. Speaking to reporters in Delhi, Congress Rajya Sabha MPs, Vivek Tankha and Ahmed Patel, said that the the clarification issued by the Income Tax department on 31 December 2018 had vindicated the Congress party’s stand. Tankha said, “We welcome the latest circular of the Central Board of Direct Taxes, Department of Revenue, Ministry of Finance Government of India, Circular No. 10 of 2018, dated 31st December 2018… This vindicates our position that there never was an issue about issuance of such shares as a taxable event as it was being projected by way of harassment. We thank the CBDT for this clarification.” Terming it a ‘big development,’ Tankha said that the clarification by the CBDT showed that the Congress Party and its leaders had no intention to indulge in tax evasion. The CBDT in its circular (see below) clarified that the provisions of Section 56(2)(vii)(a) of the Income Tax Act, 1961 was not applicable in cases of receipt of shares by a specified company as a result of fresh issuance of shares by the said company.

In reply to by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)

छान. सुंदर. नाचा आता ! तुम्हाला त्यातलं काय कळलं? केवळ एका कलमात सूट दिली आहे. नाचून झालं असेल तर नीट समजून घ्या. आणि मागे पार्श्वभाग उघडा पडतो आहे त्याची काळजी घ्या

In reply to by सुबोध खरे

म्हणून तर तुमच्या सिग्नेचरमध्ये pectinate line चे चित्र ठेवता ना ?

In reply to by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)

तुम्हाला त्यात काय कळलं ते सांगा अगोदर. मग बाकीचं पाहू.

In reply to by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)

pectinate line हि लाईन बाहेरून दिसत नाही तर गुदद्वाराच्या आतल्या भागात असते. एवढे मूलभूत शरीररचनाशास्त्र तुम्हाला येत नाही तर उगाच इंग्रजी शब्द वापरण्याचा हव्यास कशाला? आणि कमरेच्या खाली जायची गरज का वाटते? इतकी जळजळ बरी नव्हे.

In reply to by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)

आनंदाने उड्या मारण्याच्या नादात तोंडावर आपटले. https://www.pgurus.com/a-covert-operation-in-cbdt-to-save-sonia-and-rah…

In reply to by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)

आता कमरेच सोडुन नाचाल ईतका आनंद होईल तुम्हला i-t-dept-slaps-rs-100-crore-tax-notice-on-rahul-sonia-over-ajl-income Read more at: https://m.timesofindia.com/india/i-t-dept-slaps-rs-100-crore-tax-notice…

In reply to by डँबिस००७

सुडाचं राजकारण खेळतात म्हणून आरडाओरडा होईलच. असं कसं राजमाता आणि राजपुत्राला फाईन करू शकतात? देश ही तर त्यांचीच जहागिरी आहे.

In reply to by डँबिस००७

काहीतरी निर्णय होईलच ,कर भरावा किंवा न भरावा याबाबत, पण आमचे उमेदवार भरपूर टेक्स भरतात की , तुमचे झोला उठाकेवाले किती टेक्स भरतात ?

In reply to by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)

=)) =)) =)) ही तुमची राजमाता, युवराज आणि त्यांचा सेवक चिद्दूने अर्थमंत्रालयातील जुन्या ओळखीचे भ्रष्ट बाबू पकडून मारलेली कोलांटी उडी फसली आहे आणि ते सगळे (आणि तुमच्यासारखे भांगडा करणारेही) तोंडावर पडले आहेत. खालचा दुवा आणि प्रतिसाद वाचा... १. दुवा : https://www.pgurus.com/a-covert-operation-in-cbdt-to-save-sonia-and-rah… २. प्रतिसाद : https://www.misalpav.com/comment/1020467#comment-1020467

नवी दिल्ली: बँकिंग क्षेत्र तसेच, राजकीय वर्तुळात 'भूकंप' घडवणाऱ्या पंजाब नॅशनल बँकेतील ११ हजार ४०० कोटी रुपयांच्या गैरव्यवहारांचा सूत्रधार असलेल्या नीरव मोदीने उलट्या बोंबा मारायला सुरुवात केली आहे. 'मी चुकीचं काहीच केलं नाही, त्यामुळे मी भारतात परतणार नाही,' असं मोदीनं म्हटलं आहे.

लोकसभा निवडणूकांमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी व मित्रपक्षांनी एकत्र लढण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातील ४८ जागांपैकी ४० जागांबाबत एकमत झाले आहे. राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी याबाबत माहिती दिली. आगामी लोकसभा निवडणूकांमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी हे मित्रपक्ष एकत्र लढणार असून जागावाटप चर्चेत आतापर्यंत ४० जागांबाबत एकमत झाले आहे. असे प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्ट केले आहे. अद्याप आठ जागांवर निर्णय बाकी असून चर्चेद्वारे त्यावरही लवकरच तोडगा निघेल असं त्यांनी म्हटलंय.

"सरकारने अनिल अंबानीच्या रिलायन्सला ३०००० कोटी दिले" असे राहुल म्हणतो. अनिल अंबानीच्या कोणत्य बँकेच्या खात्यात टाकले? अरोपात बिलकुल तथ्य नाही असे आमचे मत. एकतर सरकार(कोणत्याही पक्षाचे असो) उद्योगपतींना/व्यापार्याना असे पैसे कधीच देत नाही. उलट उद्योगपती/व्यापारी खरे तर सरकारला पैसे देत असतात. लाच्/किकबॅक वगैरे कुठलेतरी कंत्राट हवे असेल तर. "अंबानीने सरकारला कंत्राट मिळवण्यासाठी पैसे दिले" असा आरोप असता तर एकवेळ त्यात अर्थ होता.

In reply to by प्रसाद_१९८२

मला व्यक्तीशः रागाच्या शील रक्षक शरीर रक्षकांचं भयंकर कौतुक वाटतं. मला वाटतं यांना इंग्लीश आणि हिंदी भाषा कळत नसणार.

In reply to by दादा कोंडके

त्यास्नी विंग्लिशहिन्दीबिंदी भाषा आनी इतर कायबी कळन्याची आडर नाय. डोस्कं (आसलंच तर) वापरनंबी लईच मोठ्ठा गुन्ना असतोय बगा सायेब. =)) =)) =)) रागाला जे कायबाय लिहून दिलेलं असतं ते त्यो बेचारा ब्वोलतो (त्येचात्बी घोळ करून जन्तेचं मणोरंजण कर्तो त्ये येगळं). मग रागाच्या 'शलील लक्षकांनी' आपल्या माल्कापेक्षा जादा ग्य्रेट आसल्याचं दावलं तर त्येंची वाट नाय लागनार का? रागाच्ये ईनोद आणि त्येच्यावरून भाडेकरू लेखकांनी लिहिलेले कायबाय, डोळे आणि कान बंद करून तश्शेच्या तश्श्ये रिपीट करायची आडर हाये 'शलील लक्षकांन्ना' (या इनोदात जर्रा चूक झाली तर मग नाकबी बंद व्हईल आशी जंक्शन आडर आसतिया आसं म्हंत्यात). मंग काय कर्नार ब्येचारे. लई लई ब्येक्कार हालत हाये बेच्यार्‍यांची. =)) =)) =))

मला जेटलींचे म्हणने समजले नाही. राहुल गांधींच्या मते राफेल चा ऑफसेट 30 ते 50 % येईल तो बहुतांश राफेलच्या पार्ट बाबत असेल, जेटली बोलले , असेच काही नाही , मग इतका ऑफसेट भारतात घालून त्यांना गोळ्या बिस्किटे किंवा कौले हवी असतात का ? दुसर्या कोणत्या क्षेत्रात ते इतकी गुंतवणूक करणार ?

In reply to by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)

मला जेटलींचे म्हणने समजले नाही. तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी समजत नाहीत तरीही त्या नाक खुपसलंच पाहिजे हा अट्टाहास कशाला? मी तुम्हाला वरती provisions of Section 56(2)(vii)(a) of the Income Tax Act, 1961 मधील एका कलमात सूट दिली आहे असं लिहिलं आहे ते कुठलं ते अगोदर समजून घ्या. उगाच व्हॉट्स ऍप ची घाण इकडे कशाला आणताय? जिकडे तिकडे नुसती पचपच

In reply to by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)

राहुल गांधींच्या मते राफेल चा ऑफसेट 30 ते 50 % येईल तो बहुतांश राफेलच्या पार्ट बाबत असेल ३६ राफेल विमाने "फ्लाय अवे" कंडिशन मध्ये भारताला देण्यात येणार आहेत. याचा अर्थ तर सगळं काम फ्रांस मधेच होणार आहे आणि संपूर्णपणे तयार विमान भारताला देण्यात येणार आहे. ऑफसेट मधली एक कंडिशन अशी आहे की ऑफसेट पार्टनर्स डील झाल्यापासून ३ वर्षांनंतर फायनलाईझ करण्यात येतील. म्हणजे ऑक्टोबर २०१९ पर्यंत हे पार्टनर्स फायनल करायचे आहेत. राफेलची पहिली बॅच सप्टेंबर २०१९ मध्ये भारतात दाखल होणार आहे. मग रिलायन्स कसे काय भारताला देण्यात येणाऱ्या राफेलचे पार्टस बनवेल? भविष्यात पाकिस्तानने राफेलबरोबर करार केला आणि त्यांना देण्यात येणाऱ्या विमानाचे पार्टस रिलायन्सने बनवले तर तुम्हाला किंवा रागाला काय प्रॉब्लेम असेल? पुढचा मुद्दा म्हणजे राफेलचे एकूण डील ५८००० करोडचे आहे त्यात ५०% ऑफसेट म्हणले तरी २९००० करोड होतात. यात जवळपास ७५ ऑफसेट पार्टनर्स आहेत. मग रिलायन्सला ३०००० करोडचे ऑफसेट कॉन्ट्रॅक्ट कुठून देणार? बाकीचे काय काँट्रीब्युशन काढून १००० करोड रिलायन्सला देणार का? रिलायन्सला फक्त ३% चे काँट्रॅक्टस मिळणार आहेत. म्हणजे २९००० करोडचे ३% म्हणजेच फार तर ८७० कोटींचे काम मिळेल ते पण ऑक्टोबर २०१९ नंतर. मला जेटलींचे म्हणने समजले नाही. बदाम खाल्ल्याने बुद्धी वाढते म्हणतात!

In reply to by ट्रेड मार्क

भारताचा ऑफासेट द्यायला पाकिस्तानच्या विमानाचे पार्ट भारतात बनवायला द्यायचे! मग पाकिस्तानला ऑफसेट द्यायला नेपालकडून ऑर्डर घेणार की काय ? त्यापेक्षा तुझा ऑफसेट ठेव अन डिस्काउंट मागायचा !

In reply to by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)

बदाम फार महाग आहेत का हो? परवडत नाहीत का? नसेल तर तसं सांगा आपण काहीतरी उपाय शोधू. भारताचा ऑफासेट द्यायला पाकिस्तानच्या विमानाचे पार्ट भारतात बनवायला द्यायचे! तुम्हाला भारताच्या पेक्षा पाकिस्तानची जास्त चिंता दिसतेय.

In reply to by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)

मग पाकिस्तानला ऑफसेट द्यायला नेपालकडून ऑर्डर घेणार की काय ? रा गा चा चेला शोभतोस ! ट्रंप ह्याला बदाम खाउन काहीही फरक पडणार नाहिय! आडात नाही मग पोहर्यात कोठुन येणार ?

In reply to by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)

काहीही म्हणा, राहुल गांधी हा एकच गाढव नाही आहे भारतात! पाकिस्तानी विमानाना जर पार्ट पुरवायचे कंट्रात दिले तर ऐन युद्धात खाका वर करता येतील की आणि वर बोलता येईल की तुम्ही आणि दसॉल्ट बघून घ्या

In reply to by भंकस बाबा

माझ्या मते बोफोर्स आणि राफेल दोन्ही वायफळ खर्च आहेत, 3 दिवसात आरमी करून देणारी स्वयंसेवी फौज असताना , हे खर्च इनाकारणच वाढवून ठेवलेत.

In reply to by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)

न्हाय न्हाय. त्येची काय गरज नाय. आपल्याकडं पाकिस्तान्यांच्ये पाय धरून आमाला निवडून आना आसं म्हणनार्‍या बेईमान्यांची आख्खी फौज हाय की.

MT: केरळ वादाचे पडसाद पिंपरी-चिंचवडमध्ये http://maharashtratimes.indiatimes.com/pune-news/repulcations-of-sabrim… via @mataonline: http://app.mtmobile.in विशेष म्हणजे मार्क्सवादी पक्षाचे जिल्हाध्यक्ष अजित अभ्यंकर आहेत . मार्क्सवादी पक्षात हिंदू धर्माचेच अतिशहाणे का असतात ? हे एक न उलगड़लेले कोड़े आहे .

In reply to by ट्रम्प

मार्क्सवादी पक्षात हिंदू धर्माचेच अतिशहाणे का असतात ? केवळ मार्क्सवादी नव्हे तर हिंदू सेक्युलर सगळीकडेच अशी गडबड करताना दिसतात. एका तरी मुसलमानाला तुम्ही इस्लामविषयी वाईट बोलताना बघितलं आहे का? किंवा किरिस्ताव माणसाला ख्रिश्चन धर्माविषयी वाईट बोलताना बघितलं आहे का? पण आपले हिंदूच नुसते इतर धर्मांना चांगले म्हणत नाहीत तर त्याबरोबरच हिंदू धर्माला नावे पण ठेवतात. मला याचंच आश्चर्य वाटतंय की एवढं असूनही हिंदू धर्म कसा टिकून आहे. दुर्दैवाची गोष्ट ही आहे की बहुतेक हिंदूंना आपल्याला असलेला धोका कळतंच नाही. लव्ह जिहाद अस्तित्वातच नाही,काही ठराविक मंदिरांमध्ये स्त्रियांना प्रवेश नाही याबद्दल इतर धर्मियांनी उठलेले रान, हिंदू सणांना सतत केला जाणारा विरोध त्याचबरोबर इतर धर्मांतील प्रथा परंपरांचा उदोउदो हे कसं लोकांच्या लक्षात येत नाही? हे एक न उलगड़लेले कोड़े आहे याला आपले शिक्षण जबाबदार आहे. महाराष्ट्रातील किती मुलांना येथील हिंदू राजांची नावे क्रमवार सांगता येतील? हेच इतर सर्व राज्यांमधील मुलांना लागू आहे. मुघल राजांची नावे मात्र क्रमवार पाठ असतात, औरंगझेब टोप्या शिवून उदरनिर्वाह करायचा हे कौतुकाने शिकवतात त्याच बरोबर संभाजी कसा कवीच्या मागे लागलेला आणि बाजीराव पेशवा कसा बाईलवेडा होता हे सांगतात. तरुण पिढीला कदाचित सम्राट अशोक, पृथ्वीराज चौहान, चोला साम्राज्य वगैरे राजांबद्दल माहितीही नसेल. त्यामुळे सेक्युलॅरिझम म्हणजे नुसते इतर धर्मांना आणि त्यांना त्यांच्या प्रथांचा आदर राखणे न राहता हिंदू धर्माचा अनादर करणे म्हणजे सेक्युलॅरिझम अशी व्याख्या रूढ झाली आहे. आपल्या नवीन पिढीच्या लक्षात हे लवकर आले नाही तर पुढील काही दशके अवघड आहेत. हिंदू मुलींना प्लॅन करून जाळ्यात ओढायचे प्रकार भरपूर आहेत. इंग्लंड मध्ये सेक्युलॅरिझममुळे काय झालं हे जरा मुस्लिम ग्रूमिंग गँग्स म्हणून गुगलून बघा. अश्याच गँग्स भारतातही ऍक्टिव्ह आहेत, फक्त बातम्यात येत नाहीत. सेक्युलॅरिझमचा मुखवटा सांभाळता सांभाळता जर्मनीसारख्या सुरक्षित समजल्या जाणाऱ्या देशात तेथील स्थानिक मुलींनाच सामूहिक अत्याचारांना बळी पडावे लागले. युरोपातील बहुतेक देशांची हीच परिस्थिती आहे. तेथील स्थानिक लोकसंख्या वाढीचा दर आणि स्थलांतरित मुस्लिम लोकसंख्या वाढीचा दर बघता संपूर्ण युरोप येत्या २-३ दशकात मुस्लिम अधिपत्याखाली येईल. हीच परिस्थिती थोड्याफार फरकाने अमेरिका आणि कॅनडाची आहे. आफ्रिका तर बहुसंख्य मुस्लिम झालीच आहे. शबरीमालामध्ये प्रवेशासाठी बुरखाधारी महिला प्रोटेस्ट करतात हे हास्यास्पद नाही का? ती तृप्ती देसाई शनी शिंगणापूरमध्ये मात्र जोरात होती पण हाजी अली मध्ये जायचं म्हणल्यावर शेपूट घालून बसली. आपल्या हिंदू सेल्युलर लोकांना हे दिसत नाही किंवा दिसूनही समजत नाही किंवा समजूनही उमजत नाही हेच दुर्दैव आहे. लिंक १ लिंक २ लिंक ३ United Kingdom's Daughters

In reply to by ट्रेड मार्क

हाजी अलीत स्त्रिया जातात , फक्त स्त्री पुरुष रांगा अलग असतात. महाराष्ट्रातील किती मुलांना येथील हिंदू राजांची नावे क्रमवार सांगता येतील? येतील की , महाराष्ट्रात मराठा पेशवे ह्यांचा इतिहास माहीत असतो, तसे सर्व प्रांतात त्या त्या हिंदू घराण्यांचा इतिहास शिकवलाजातो, गाव पातळीवर संस्थानिकांचा इतिहासही त्या त्या गावात माहीत असतो. संभाजी महाराज बाईलवेडे होते , हे शासकीय अभ्यासक्रमात आम्हाला तरी शिकवले नव्हते , शाळेबाहेरील जीवनातही तसे कुणी शिकवले नाही.

In reply to by ट्रेड मार्क

हाजी अलीत स्त्रिया जातात , फक्त स्त्री पुरुष रांगा अलग असतात. महाराष्ट्रातील किती मुलांना येथील हिंदू राजांची नावे क्रमवार सांगता येतील? येतील की , महाराष्ट्रात मराठा पेशवे ह्यांचा इतिहास माहीत असतो, तसे सर्व प्रांतात त्या त्या हिंदू घराण्यांचा इतिहास शिकवलाजातो, गाव पातळीवर संस्थानिकांचा इतिहासही त्या त्या गावात माहीत असतो. संभाजी महाराज बाईलवेडे होते , हे शासकीय अभ्यासक्रमात आम्हाला तरी शिकवले नव्हते , शाळेबाहेरील जीवनातही तसे कुणी शिकवले नाही.

Special court declares Vijay Mallya a 'fugitive economic offender' Prevention of Money Laundering Act अन्वये स्थापन झालेल्या कोर्टात ऑगस्ट २०१८मध्ये पास झालेल्या Fugitive Economic Offenders Act खाली विजय मल्ल्याला "आर्थिक गुन्हेगारी करून पळून गेलेला गुन्हेगार (Fugitive Economic Offender)" जाहीर केले गेले आहे. यामुळे, मल्ल्याच्या संपत्तीवर टाच आणण्याचा मार्ग सोपा झाला आहे. याव्यतिरिक्त, आर्थिक गुन्हेगारी करून पळून गेलेल्या अजून २० गुन्हेगारांवर "रेड कॉर्नर" नोटीस जाहीर करण्याबात इंटरपोलशी बोलणे सुरू झाले आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशात राजकीय समीकरणे बदलणार आहेत. उत्तर प्रदेशात ‘बुआ- भतिजा’ जोडी म्हणजे अखिलेख यादव आणि मायावती एकत्र येणार आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीत आघाडी करण्याविषयी समाजवादी पार्टी आणि बहुजन समाज पार्टीमध्ये एकमत झाले आहे. समाजवादी पार्टीच्या नेत्याने शनिवारी ही माहिती दिली.

In reply to by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)

उत्तर प्रदेशात ‘बुआ- भतिजा’ जोडी त्या पुढची बातमी तुम्ही वगळलेली दिसते !! ह्या जोडीने कॉंग्रेस नावाच्या तुमच्या लाडक्या पक्षाला दोन सिटा देउन कॉंग्रेसला त्याची जागा दाखवलेली आहे !!

In reply to by डँबिस००७

तुमच्या भाजपणेही कुठेतरी 5 जागा सोडून दिल्या म्हणे की , काँग्रेसची कुठेही युती झाली की तुमचे लोक लगेच व्हाट्सअप्पवर नाचत येत होते - शेर अकेला लडता है ! हल्ली शेरोवाले मेसेजेस दिसत नाहीत.

In reply to by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशात राजकीय समीकरणे बदलणार आहेत. अश्या गमज्या काय बुआ भतिजा च्या जोडगोळी च्या आशे वर केल्या होत्या !! अरेरे बराच त्रास होतोय का ? बर्नॉल हाताशी ठेवा !! तुमच्या युवराजा सकट मॉं साहेबांना लवकरच कोर्टाच बोलवण येणार आहे पण तत्पुर्वी भाजपा त्या दोघांचे धिंडवडे काढणार !!

In reply to by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)

महागठबंधन नै तुमच्या लाडक्या पक्षाचा महा पोपट केलेला आहे ! पुर्वी दोन कॉंग्रेसच्या पारंपारीक सिटा कॉंग्रेस साठी सोडणार होते तेवढ्या दोन सिटा सुद्धा सोडल्या नाहीत !!

In reply to by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)

हि युती झालीच तर युपीए मधे सपा, बसपा कदाचीत राष्ट्रवादी काँग्रेसपेक्षा जास्त पॉवरफुल होतील... आमच्या पवार साहेबांचं पंप्र होण्याचे चान्सेस तसेही क्षीण होते... आता तर अजुनच पंचाईत :(

In reply to by अर्धवटराव

कलकत्त्याला स्टेजवर असलेल्या सगळ्या वक्त्यांनी केलेल्या भाषणात मा.पवार यांचे कोणीच कसे नाव घेतले नाही की साधा उल्लेखही केला नाही. आणी मग हे महाशय स्वतःला पंप्रचा उमेदवार कसे समजतात.

In reply to by इरसाल

वाईल्ड कार्ड एन्ट्री ची गाजरे खात असतील. बाकी देवेगौडा साहेब कसे पंतप्रधान झाले तसे काही तरी होईल अशी अपेक्षा असावी कदाचित.

In reply to by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)

कोलकाता मिटिंगमधील एका नेत्याची इतर नेत्यांबद्दलची मते... :)

‘आर्थिकदृष्ट्या जर तुम्हाला झेपत नसेल तर शिकू नका, नोकरी करा’ असं वक्तव्य महाराष्ट्राचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी केले आहे. अमरावतीमध्ये आयोजित एका महाविद्यालयीन कार्यक्रमात बोलताना तावडे यांनी हे वक्तव्य केले आहे. ‘गरीब विद्यार्थ्यांना सरकार मोफत उच्च शिक्षण देणार का?’ असा प्रश्न एका पत्रकारितेचं शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्य़ाने विचारला असता ‘शिक्षण घेणं झेपत नसेल तर सोडून दे आणि नोकरी कर’ असं उत्तर विनोद तावडे यांनी दिलं. विनोद तावडे यांनी ज्यावेळी ही प्रतिक्रिया दिली त्यावेळी एका विद्यार्थाने हे सर्व मोबाईल रेकॉर्डींग केले. तावडे यांच्या हे लक्षात आल्यानंतर मोबाईलमध्ये रेकॉर्डींग करणाऱ्या विद्यार्थ्यांना अटक करा आणि त्यांचे मोबाईल काढून घ्या’ असे आदेशही दिला. त्यांच्या आदेशानंतर विद्यार्थ्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि त्याच्या मोबाईलमधले रेकॉर्डींग डिलीट केल्याचा दावा काही वेबसाईटने केला आहे.

A covert operation in CBDT to save Sonia and Rahul from Income Tax case in National Herald collapses लोकशाहीत सरकार बदलले तरी, बाबूशाही आणि अनेक संवैधानिक/असंवैधानिक संस्थांमधील अधिकारी बदलत नाहीत... त्यातले पहिल्या १० अधिकार्‍यांपैकी अनेकजण (अ) मागील सरकारातील भ्रष्ट नेत्यांच्या हातात हात घालून किंवा (आ) त्यांच्या गुलामीत/जबरदस्तीने किंवा (इ) भ्रष्ट नेत्यांच्या छत्राखाली लपून, केलेल्या कुकर्मात सामील झालेले असतात. दुकाने बंद झालेले असे अधिकारी जुन्या नेत्यांना छुपी मदत करणे जास्त सोईचे समजतात, कारण, (अ) जुना नेता बुडाला तर त्या प्रकरणाशी संबंध असलेला अधिकारीही बुडण्याची शक्यता असते आणि (आ) पुढच्या निवडणूकीत जर जुना नेता परत निवडून आला तर आपले जुने दुकान परत जोमाने चालू होण्याची शक्यता भ्रष्ट अधिकार्‍याला खुणवत असतेच. सरकारी कार्यालयांतूनच, सरकारी खटल्यांना असा सुरुंग लावण्याचा, हा पहिलाच प्रयत्न नाही. यावरून, असे बरेच अधिकारी आहेत असेच दिसते आहे.

*पंतप्रधान उज्ज्वला योजना निष्फळ* महिलांच्या आरोग्याची निगा राखणे आणि त्यांच्या सक्षमीकरणाच्या उद्देशाने केंद्र सरकारने पंतप्रधान उज्ज्वला योजना जाहीर केली. या योजनेअंतर्गत देशभरात सहा कोटी मोफत घरगुती गॅसजोडणीचे उद्दिष्ट नुकतेच पूर्ण करण्यात आले. ठाणे जिल्ह्यातही दारिद्र्य रेषेखालील ३१ हजार १७ लाभार्थींना गॅसजोडणी देण्यात आली होती. मात्र या कुटुंबांना योजनेतील दुसरा सिलिंडर खरेदी करणे परवडत नसल्याने तब्बल ७९ टक्के म्हणजेच २४ हजार ५०३ कुटुंबांनी योजनेकडे पाठ फिरवल्याची धक्कादायक माहिती हाती आली आहे. केवळ ठाणे जिल्ह्यात नव्हे तर राज्यातील उर्वरीत भागांतही हीच परिस्थिती असल्याची माहिती सूत्रांनी दिली. https://maharashtratimes.indiatimes.com/thane-kokan-news/thane/poor-in-…

In reply to by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)

योजना निष्फळ कशाला? सर्व गॅस जोडणी धारकांना फुकट गॅस पुरवू म्हणून काँग्रेसने जाहीर करून टाकावे म्हणजे निवडणूक जिंकता येईल. होईल गरिबाचं चांगभलं होऊ द्या खर्च सरकार आहे घरचं जाता जाता -- केरोसिन फुकट मिळत होतं काय?

राजकीय सभा, रॅली आणि आंदोलनाची साक्ष असलेल्या दिल्लीतील रामलीला मैदानावर भाजपा कार्यकर्त्यांची गर्दी पाहायला मिळत आहे. आगामी काही दिवसांसाठी रामलीला मैदान भगवा गड आणि दिल्ली भाजपाचे कँप ऑफिस राहणार आहे. आज रविवारपासून पुढील ३ आठवड्यापर्यंत रामलीला मैदानावर भाजपाने मोठे कार्यक्रम आयोजित केले आहेत. आज रविवारपासून भाजपाने दलित समाजाला आकर्षित करण्यााठी ‘भीम महासंगम’ कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमांतर्गत एकाच भांड्यात ५००० किलो खिचडी तयार केली जाणार आहे. या मार्फत सामजिक समानतेचा संदेश देण्याचा भाजपाचा प्रयत्न असणार आहे. ही खिचडी प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर तयार करणार आहेत. या खिचडीसाठी तीन लाख अनुसूचित जातींमधील लोकांच्या घरुन तांदूळ आणि डाळ आणली आहे. थोड्याच वेळात या रॅलीला सुरुवात होणार आहे. या रॅलीद्वारे भाजप एकाच वेळी सर्वात जास्त खिचडी शिजवण्याचा विश्वविक्रम करणार आहे. सध्या ९१८ किलो तांदळाच्या खिचडीचा रेकॉर्ड प्रसिद्ध शेफ संजीव कपूर यांच्या नावावर आहे. भाजपा आता हा रेकॉर्ड मोडण्याच्या तयारीत आहे.

*ममता बॅनर्जी देशाच्या पहिल्या बंगाली पंतप्रधान होतील, भाजपा प्रदेशाध्यक्ष* पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी शनिवारी आपला वाढदिवस साजरा केला. देशभरातून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. मात्र, भाजपाचे पश्चिम बंगाल प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांनी ममता बॅनर्जींना अशा शुभेच्छा दिल्या आहेत की, त्यामुळे भाजपा अडचणीत येऊ शकते. ममता बॅनर्जी देशाच्या पहिल्या बंगाली पंतप्रधान होऊ शकतात, अशी शक्यता वर्तवत घोष यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. https://www.loksatta.com/desh-videsh-news/if-a-bengali-became-pm-mamata… ----------------------------- कुणाला मराठी पंतप्रधान हवा , कुणाला बंगाली , हे सगळे बोलणारे भाजपाचेच लोक !

In reply to by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)

अजुन सुधा प्रत्येक राज्या ला आपल्यावर अन्याय होतो असेच वाटते आणि ते थोडीफार खर पण आहे . म्हणून pm कोणत्या राज्यातलं आहे हे महाराष्ट्र सोडून बाकी राज्यांना महत्वाचं प्रश्न वाटतो . महाराष्ट्र नेहमीच खूप भोळा राहिला आणि हरला.

In reply to by Rajesh188

मराठी माणसाची विचारसरणी अशी कोत्या मनोवृत्तीची कधीच नव्हती. म्हणून १९६७ साली स.का. पाटिल ह्या मराठी ताकदवान काँग्रेस नेत्याचा पराभव ३७ वर्‍शाचा 'परप्रांतिय' जॉर्ज फर्नांडिस करू शकले. १९८४/८९ मध्ये मराठीवर प्रभुत्व असणारे नरसिंह राव रामटेक मधून निवडून येऊ शकले ते प्रांतिकतेपेक्षा वैचारिकतेला महत्व देणार्या माणसामुळे. गेल्या २० वर्षात परिस्थिती बदलली.'आपला माणूस/ आपली जात' ह्या 'अभिमानाच्या' गोष्टी झाल्याने महाराष्ट्र ईतर राज्यांसारखेच एक झाले.

राम मंदिर हा प्रश्न मला तर वाटतं इंग्रज गेल्यानंतर निर्माण झाला अगोदर नव्हता माझ्या माहिती प्रमाणे . पण बाबरी मशीद किती तरी शे वर्षा पासून मंदिराच्या जागेवर आहे ( बहुसंख्य हिंदू जे महाराष्ट्र सहित उत्तर आणि पश्चिम राज्यातील.साऊथ la काही देणंघेणं नाही ,() पण देशात असंख्य अतिशय गंभीर प्रश्न असताना राम मंदिर च का आठवलं हा पहिला प्रश्न . गरीबी जी पाचवीलाच पुजलीय,काश्मीर ( हा पण जाणूनबुजून latkavlela प्रश्न ,) अशिक्षित पना राज्याराज्यांत खूप गंभीर आर्थिक विषमता आणि हे सर्व प्रश्न देशाचं अखंडत्व संकटात आणि शकतात . तरी राम मनिर हाच प्रश्न पुढे केला जातो हा निर्णय कोर्टावर सोपवून नेते मंडळी देश समोर जे गंभीर प्रश्न आहेत ते सोडवत नाहीत . आणि कोर्ट ते पण भारतीय मानसिकतेचा ते पण मंदिर मशित वादावर निर्णय न देता आपण पण नेत्यांपेक्षा कमी नाही हेच दाखवून देत आहे . आशा ह्या आपल्या भारत देशाला देव च ( आसेल तर ( वाचवू शकतो . नाहीतर भविष्य पुढील पिढ्यांच ज्यांनी भारतात जन्म घेतला आहे ते . खूप अंधारमय आहे

भाजपाच्या जाहीरनामा कमिटीत नारायण राणेंचा समावेश. भाजपाला दुसरी तिसरी फळी तयार झाली.

In reply to by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)

शिवसेना आमचा नैसर्गिक मित्र आहे असे पुर्वी भाजपावाले म्हणायचे. 'समविचारी' का काय म्हणतात ते. नारायण राणेंचा पक्ष नैसर्गिक मित्र की कृत्रिम ?