Sbi क्रेडिट कार्ड वापर

डोके.डी.डी.'s picture
डोके.डी.डी. in तंत्रजगत
2 Jan 2019 - 6:57 pm

सर्व मिपा सदस्यांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.
डिसेंम्बर 2018 मध्ये मी HDFC व sbi या दोन्ही बँकेत माझे बचत खाते आहे . या दोन्ही बँकेत क्रेडिट कार्ड साठी अर्ज दिले होते. त्यातील sbi चे सिम्पली सेव्ह हे क्रेडिट कार्ड मला काल मिळाले. मी क्रेडिट कार्ड पहिल्यांदाच वापरणार आहे तरी नेमके कोठे वापर करावा , कोठे वापरू नये, आणि त्याचा जास्तीत जास्त फायदेशीर वापर कसा करता येईल याविषयी जर आपल्या सूचना आणि अनुभव असतील तर नक्की द्या. धन्यवाद!!!

प्रतिक्रिया

कंजूस's picture

2 Jan 2019 - 7:30 pm | कंजूस

खरंच. क्रेडिट कार्ड कसे वापरावे यावर कुणी लेख लिहावाच.
माहितीचा खजिना इंग्रजी/ हिंदीत आहे. मराठीत असलाच पाहिजे.

उगा काहितरीच's picture

2 Jan 2019 - 8:44 pm | उगा काहितरीच

+१

श्रीरंग_जोशी's picture

2 Jan 2019 - 9:13 pm | श्रीरंग_जोशी

क्रेडिट कार्ड मिळाल्याबदद्दल अन ते वापरायचे ठरवल्याबद्दल डोकेसाहेबांचे अभिनंदन.

याबाबत २००७ साली रेडीफवर प्रकाशित झालेला माझा लेख - Credit cards: 'Remember these important dos'.

याखेरीज मिपावर वेळोवेळी या विषयावर सांगोपांग चर्चा झाल्या आहेत. मला वेळ मिळेल तेव्हा त्या चर्चांचे दुवे शोधून नव्या प्रतिसादांत इथे देईन.

डोके.डी.डी.'s picture

16 Jan 2019 - 3:30 pm | डोके.डी.डी.

थँक्स

सस्नेह's picture

2 Jan 2019 - 9:25 pm | सस्नेह
चौथा कोनाडा's picture

2 Jan 2019 - 9:38 pm | चौथा कोनाडा

क्रेडिट कार्ड कसे वापरावे ? यावर मराठीतील माहितीपुर्ण लेखः

क्रेडिट कार्ड कसे वापरावे ?

मी एखादे वर्ष उपयोगात आणल्या नंतर वापरणे सोडून दिले.
गेली सात आठ वर्षे डेबीट कार्डच वापरत आहे.

अंथरूण पाहून पसरावेत या वर विश्वास !

चौथा कोनाडा's picture

2 Jan 2019 - 9:41 pm | चौथा कोनाडा

क्रेडिट कार्ड वापरताना जरा सांभाळुन... (आमचा खुप वेगळा अनुभव)

https://www.misalpav.com/node/3733

Blackcat's picture

4 Jan 2019 - 7:02 am | Blackcat (not verified)

मी SBI चे कार्ड घेतले , एकच महिना वापरले , पुढच्या महिन्यात त्यांचे पैसेही भरले,
मग लगेच एकसिस ब्यांकचेही मिळाले , आता तेच वापरतो.

क्रेडिट कार्ड वापरु नये. कितीही गाईडलाईन मिळाल्या तरीही.

नेहमी डेबिट कार्ड वापरावे.

क्रेडिट कार्ड कुलूपबंद ठेवून ते एक तातडीने मिळणारे हातउसने पैसे देणाऱ्या मित्रासारखं मानावं. अगदी हॉस्पिटल वगैरे इमर्जन्सीत "आत्ता पैसे भरा" अशी वेळ आल्यासच.

कार्ड लिमिटएवढी शिल्लक इमर्जन्सीसाठी तुम्ही बचतीत वेगळी ठेवत असल्यास आजच ते क्रेडिट कार्ड कॉर्नर टु कॉर्नर कात्रीने कापून (चार तुकडे) नष्ट करा आणि बँकेला लेखी कळवून खातं बंद करा.

धन्यवाद.

Blackcat's picture

4 Jan 2019 - 7:54 am | Blackcat (not verified)

बरोबर . त्यासाठीच घेऊन ठेवले

माझ्याकडे एकदाच २००६ मध्ये एचएसबीसी चे क्रेडिट कार्ड होते. ते मी कधीच वापरले नाही. नंतर ते मरून गेले. त्यानंतर माझ्याकडे क्रेडिट कार्ड नाही. आयुष्यात आतापर्यंत एकदाही क्रेडिट कार्ड वापरलेले नाही. तशीच गरज असल्याशिवाय वापरणारदेखील नाही. अजूनतरी तशी गरज वाटली नाही. बाकी क्रेडिट कार्डावरील कॅशबॅक, रिवार्ड पॉईंट्स, डिसकाऊंट वगैरे याबद्दल कधी आकर्षण वाटले नाही. भरपूर वेळ दवडून पाच-पन्नास रुपये वाचवण्यासाठी लागणारा पेशन्स माझ्यात नाही आणि तशी काही फारशी इच्छाही नाही. खूप शॉपिंग करणार्‍या जमातीतला मी नाही त्यामुळे क्रेडिट कार्ड नसल्याने फारसा फरक पडत नाही. डेबिट कार्ड वापरतो. पैसे असतील तर वापरायचे नाहीतर गुपचूप घरी बसून "लागिरं झालं जी" बघत बसायचं असा माझा विचार असतो.

बाकी बर्‍याच गोष्टी आवश्यक म्हणून ख्याती पावलेल्या असतांना मला गरज नाही म्हणून मी घेत नाही. वॉशिंग मशिन आम्ही पहिल्यांदा जुलै २०१८ मध्ये घेतले. कार अजूनही नाही. व्हॉट्सॅप अजूनही नाही. मायक्रोवेव्ह नाही. किचन ट्रॉलीज नाहीत. ज्या जीमेलसाठी लोकांनी आकाश-पाताळ एक केले होते ते मला विनासायास अर्ध्या मिनिटात सावकाश मिळाले होते. जिओदेखील घेतलेले नाही. डेटाचा हव्यास नाही. माझा दर महिन्याचा डेटा अगदी १-२ जीबी वगैरे वगळता पुढे साचत जातो. बीएसएनएल ची ब्रॉडबँड सेवा माझ्याकडे २००८ पासून आहे आणि दृष्ट लागण्याजोगी आहे. सप्टें २०१८ पर्यंत माझ्याकडे सीआरटी टीव्ही होता. खराब झाला म्हणून दुसरा घेतला. होमथियेटर नाही. झी मराठी बघायला होमथिएटरची गरजच काय? मोबाईलवर एअरटेल उत्कृष्ट इंटरनेट सेवा देते.

मागे मटाच्या संवाद पुरवणीत श्रीपाद ब्रह्मेंचा छान लेख आला होता. सांताला त्यांनी फुकट मागीतल्या होत्या. अर्थात उपहासाने! अमर्याद वेगवान डेटा ही एक मागणी होती. त्यात एक वाक्य होते "सांता, अनलिमिटेड डेटा द्या. पोटावर मारा पण डेटावर मारू नका!!!"

आयुष्यात आतापर्यंत एकदाही क्रेडिट कार्ड वापरलेले नाही, बाकी बर्‍याच गोष्टी आवश्यक म्हणून ख्याती पावलेल्या असतांना मला गरज नाही म्हणून मी घेत नाही.

क्रेडिट कार्ड मला अजुनपण घ्यायची गरज वाटत नाही.

"पैसे असतील तर वापरायचे नाहीतर गुपचूप घरी बसून "लागिरं झालं जी" बघत बसायचं असा माझा विचार असतो."

+१

विजुभाऊ's picture

4 Jan 2019 - 3:39 pm | विजुभाऊ

गविंशी सहमत.
क्रेडीट कार्ड असूच नये.तो एक हनी ट्रॅप आहे.
हॉटेलिंग , मॉल मधली खरेदी किंवा रोजच्या गरजांसाठी तर कधीच वापरू नये. अगदी वेळ पडलीच तर असावे म्हणून ( तेही दवाखाना वगैरे इमर्जन्सी साठी) ठेवावे.
मी असावे म्हणून अ‍ॅमॅक्स कार्ड घेतले होते . मात्र त्यावर दुसर्‍या वर्षी पाच एक हजार रीन्यूएशन चार्ज आपोआप डेबीट आल्यावर त्या किमती इतका शहाणा झालो. कार्ड बंद केले.
आत्ताही एक कार्ड आहे मात्र ते लईफटाईम फ्री आहे. ते कार्ड अती अडचणीच्या वेळेसाठी ठेवले आहे.
त्या कार्डाचा वापर झाला की लग्गेच दुसर्‍या दिवशी पैसे भरून करून टाकतो.
आपली एक मानसीकता असते. पैसे मोजून द्यावे लागले नाहीत की आपल्याला त्याची किम्मत कळत नाही.
मी सर्वप्रथम डेबीट कार्ड बूट खरेदीसाठी वापरले होते. त्यावेळेस डेबीट कार्ड वापरून महाग बूट खरेदी केले.
घरी आल्यावर जाणीव झाली की कॅश पैसे द्यावे लागले असते तर मी इतके महाग बूट घेतले असते का?
क्रेडीट कार्ड हे जीवन वाचवणारे वीष आहे याची जाणीव ठेवून वापरावे

मी सुमारे एक वर्षापासून ICICI credit card वापरते आहे. रोजचा प्रवास असल्याने विशेषतः पेट्रोल साठी मला ते खूपच सोयीस्कर पडते. कॅश बाळगावी लागत नाही. अचानक पेट्रोल संपत आले असे लक्षात आले तर पैशाची गैरसोय होत नाही. मॉलमध्ये गेल्यावर काही गरजेच्या वस्तू घ्यायचेलक्षात आले तर कॅश कमी असली तरी अडचण येत नाही. कार्डाचेबिल आल्यावर न विसरता वेळेत भरले की अजिबात problem येत नाही. मात्र मी लाईट बिल आणि मोबाईल रिचार्ज याशिवाय इतर कोणत्याही इंटरनेट साईटवर ते वापरणे आवर्जून टाळते. सेफ एन सिक्युअर.

हे सर्वकाही डेबिट कार्डाने करता येतंच.

अगदी कॅशबॅक, रिवार्ड पॉईंट्स, डिस्काउंट ऑफर्स सर्वसाहित. अगदी इंटरनॅशनल वापरासहित.

ते एक महिन्याचं उधार तरी हवं कशाला? त्यातून मग एका कोण्या दिवशी, एका क्षणी इझी ईएमआय वगैरे मायावी मृग दिसू लागतात.

नाही. डेबिट कार्ड वर पेट्रोल खरेदी केल्यावर मला सरचार्ज भरावा लागतो. क्रेडिट कार्ड वर सरचार्ज नाही. शिवाय महिन्यात रु. ४००० पेक्षा जास्त पेट्रोल असल्यास ५% सवलत.
मी महाबॅंकेचे डेबिट कार्ड वापरत होते तेव्हा मला कसलाही कॅशबॅकमिळत नव्हता. आयसीआयसीआय कार्डावर महिन्यातून मिनिमम २०० रु. कॅशबॅक मिळतो.
वर्षात मिळून रु ५०००० पेक्षा जास्त खरेदी केलीतर २०० रु. कार्ड फी पण माफ आहे.

१९८९ पासून माझे क्रेडिट कार्ड वापरत आहे परंतु आजतागायत मी त्यावर एक पैसाही व्याज भरले नाही कि एकदाही त्याचे बिल भरण्यात दिरंगाई झालेली नाही.
साहेब,
मी जे क्रेडीट कार्ड घेतो ते मला आजपर्यंत फुकट मिळत आले आहे. गेली २१ वर्षे मी एच डी एफ सी बँकेचे क्रेडीट कार्ड वापरीत आहे ते माझा पगाराचे खाते असल्याने मला फुकट वापरता येते.
क्रेडीट कार्डाची गरज काय?-
१) मी सैन्यात होतो त्यामुळे कुठेही भारतभर फिरताना रात्री बेरात्री रेल्वे ने प्रवास करताना खिशात पैसे बाळगण्यापेक्षा क्रेडीट कार्ड बाळगणे जास्त सोपे आणि सुरक्षित आहे.

२) एखाद्या वेळेस तातडीने पैसे पाहिजे असतील तर आपण कोणत्याही ए टी एम मधून पन्नास हजार रुपये रोख काढू शकता किंवा आपल्या नातेवाईकाला रुग्णालयात भरती करायची पाळी आली तर आयत्यावेळेस आपल्या क्रेडिट लिमिट पर्यंतचे पैसे तेथे भरता येतात. हे आपल्या खात्यात असलेल्या पैशापेक्षा अतिरिक्त रक्कम वापरता येते ( जी डेबिट कार्डावर कधीच मिळणार नाही)

३) भ्रमण करणाऱ्या माणसाला आयत्या वेळेस विमानाचे तिकीट काढता येते. (हा प्रसंग मला मागच्या वर्षी (२०१८)ऍमस्टरडॅम येथे आला तेंव्हा ७८ हजार भरून मी ताबडतोब विमानाची २ तिकीटे काढली.)

४)मी क्रेडीट कार्डावर वीस हजार रुपये भरून माझा टीव्ही घेतला (१९९२ साली ) आणी ते पैसे पुढच्या महिन्यात भरून टाकले. यात मला माझी मुदत ठेव न मोडता दोन पगारान्च्या पैशात टीव्ही विकत घेता आला. मुदत ठेवीचे व्याज १२ टक्क्याने एक महिन्याचे रुपये दोनशे फक्त वाचले आणी मुदत ठेव चालू राहिली. जास्तीत जास्त पन्नास दिवस पर्यंत तुम्हाला क्रेडीट मिळते

५) माझ्या कडे त्याच बँकेचे डेबिट कार्ड पण आहे पण ते वापरले असता माझे ६ ६ रुपये ( व्याज दर ४ टक्क्याने) नुकसान झाले असते. १९९२ साली सहासष्ट रुपयात पुण्यात एक वेळचे हॉटेलिंग होत असे.

६) क्रेडीट कार्डाचे व्याज हे साधारण २.५ ते २.९५ टक्के फक्त पण महिन्याला असते म्हणजेच वर्षाला तीस ते पस्तीस टक्के. त्यामुळे पहिल्याच महिन्यात पैसे भरून टाकणे हे श्रेयस्कर.

७) नंतर बायकोला त्याच बँकेचे क्रेडीट कार्ड ऐड ऑन कार्ड म्हणून घेतले

८) दोन्ही कार्डावर विनिमय केला असता पुढच्या तीस सेकंदात मला भ्रमणध्वनीवर संदेश येतो.

९) दहा हजारापेक्षा जास्त पैशाचा विनिमय दुकानातून केला तर ताबडतोब त्याचा दूरध्वनी येतो. राजावत सराफ ठाणे यांचेकडे सौ ला कानातील दागिना घेतला तेंव्हा कार्ड यंत्रात घातल्याच्या पंधरा सेकंदात मला दूरध्वनी आला कि साहेब आपण दागिन्याच्या दुकानात विनिमय करीत आहात काय? माझ्या होकारानंतर तो विनिमय पूर्ण झाला.गर्दीच्या वेळेस रेल्वे किंवा बाजारातून जाताना पाच आकडी रक्कम खिशात टाकून जाण्यापेक्षा मला क्रेडीट कार्ड बाळगणे जस्त सोयीचे वाटते.

१० ) स्टेट बँक आणी सिटी बँकेचे क्रेडीट कार्डाचे अनुभव अतिशय वाईट आले. काहीही कारण नसताना( मी लिहिलेले नसताना) संदेशाचे (एस एम एस) रुपये दहा फक्त बिल लावले आणी ते बील न भरल्याबद्दल तीनशे रुपये दंड दरमहा लावला. असे बिल जेंव्हा तीन हजार झाले तेंव्हा दोन्ही बँकांना मी न विचारलेल्या सेवांसाठी पैसे लावल्याबद्दल तुमच्यावर अफरातफरीचे आरोप करून वृत्तपत्रात चव्हाट्यावर आणीन अशी धमकी द्यावी लागली. त्याबरोबर ४८ तासात सर्व चार्जेस माफ झाले. मी दोन्ही क्रेडीट कार्ड दोन तुकडे करून त्यांच्या ए टी एम मध्ये टाकून दिली. पुढे बरेच दिवस आमचे कार्ड घ्या फुकट देतो म्हणून ते मागे लागले होते.

असो अजून बरेच फायदे आहेत. पण एवढे पुरे.

माझे आजही मत असे आहे कि क्रेडीट कार्ड हि अतिशय उपयुक्त गोष्ट आहे. फक्त त्याच्या जालात अडकू नका.

हा मी लिहिलेल्या एका लेखात
https://www.misalpav.com/node/26371
मीच दिलेला प्रतिसाद आहे

जो माणूस भावनेच्या आहारी जाऊन खरेदी करतो त्याने क्रेडिट कार्ड वापरू नये हे "एकवेळ" मान्य होईल.

परंतु आपला स्वतःवर ताबा नाही तर क्रेडिट कार्डला दोष देणे हे चूक आहे.

हे म्हणजे हात कापतो म्हणून धारदार सुरीचा वापरच करायचा नाही असे आहे.

साबु's picture

4 Jan 2019 - 7:15 pm | साबु

मी असेच करतो.

डॉ सुहास म्हात्रे's picture

4 Jan 2019 - 7:38 pm | डॉ सुहास म्हात्रे

+१००

क्रेडिट कार्डसारखे महत्वाचे साधन, स्वतः जबाबदारीने न वापरल्यास, त्याचा दोष क्रेडीट कार्डाला देणे योग्य नाही.

अनिरुद्ध.वैद्य's picture

7 Jan 2019 - 7:42 am | अनिरुद्ध.वैद्य

फॅसिलिटी नेमकी कोणत्या कार्डवर मिळते!?

डॉ सुहास म्हात्रे's picture

4 Jan 2019 - 7:35 pm | डॉ सुहास म्हात्रे

क्रेडिट कार्ड हे दुधारी साधन आहे.
(अ) त्याची निवड करताना आणि
(आ) वापरताना सहजसाध्य असलेली हुशारी वापरली, तर त्याचा उपयोग सोईचा व फायदेशीरही ठरेल.
त्या जबाबदारीसंबंधात आपण केलेल्या हेळसांडीचा दोष क्रेडिट कार्डला देणे योग्य नाही.

१. खरोखरच "लाईफटाईम फ्री (रिन्युअलसकट कोणतेही प्रत्यक्ष किंवा छुपे चार्जेस नसलेले)" असलेली क्रेडीट कार्ड्स बहुतेक बँकामध्ये विशिष्ट अकाऊंट्सना मिळतात. असे क्रेडीट कार्ड,
(अ) पैसे खिशात किंवा अकाऊंटमध्ये नसतानाही, खरेदी शक्य असण्याची सोय व
(आ) खरेदीच्या किंमतीवरचे (प्रत्येक बँकेच्या नियमांप्रमाणे ३० ते ६० दिवसांचे) व्याज वाचविण्याची सोय,
असा दुहेरी फायदा मिळविण्याचे उत्तम साधन आहे.

२. क्रेडिट कार्ड,
(अ) आपल्या बँक अकाऊंटबरोबर लिंक करावे आणि
(आ) त्यातून संपूर्ण क्रेडिट कार्ड बिल देय तारखेला ऑटोमॅटिकली वसून केले जावे, हा पर्याय न चुकता स्विकारावा. कितीही मोह झाला तरी, मिनिमम बिल भरणे हा पर्याय स्विकारू नये... तो महागडा पर्याय आहे.
(इ) आणि पैसे वसूल केले जाण्याच्या आधी एक दिवस पुरेसे पैसे आपल्या लिंक्ड अकाऊंटमध्ये असल्याची खात्री करावी... फार मोठी खरेदी केलेली नसल्यास, बहुदा पुरेसे पैसे बहुतेक लोकांच्या खात्यात असतात व चिंतेचे कारण नसते. कारण "लाईफटाईम फ्री" क्रेडीट कार्ड्स वापरणारे सहसा "पे चेक ते पे चेक" जीवन जगत नसतात.

३. क्रेडिट कार्ड अश्याच खरेदीसाठी वापरावे, जिची किंमत आपल्याला क्रेडिट कार्डाच्या वेळेच्या सीमेआधी, आपल्या लिंक्ड अकाऊंटमध्ये तयार ठेवता येईल. तसे शक्य नसल्यास, ती खरेदी तसे शक्य होईल अश्या वेळेपर्यंत, पुढे ढकलावी अथवा टाळावी... थोडक्यात, अंथरूण पाहून पाय पसरावे, आणि क्रेडिट कार्ड फक्त 'आपल्या आवाक्यातल्या काळापर्यंतच' अंथरूण ताणण्यासाठी वापरावे. याबाबतीत, अवास्तव आत्मविश्वास महाग पडू शकतो. मात्र, अवास्तव आत्मविश्वास ही क्रेडिट कार्डची चूक नसते, हे नक्की लक्षात ठेवावे. :)

वरचे तीन साधे, सोपे व सहजसाध्य नियम पाळल्यास, "लाईफटाईम फ्री" क्रेडीट कार्डचे सर्व फायदे मिळतील आणि तोटे टाळले जातील.

तुम्ही आणि डॉ. खरे म्हणतात ते अगदी योग्य आहे.

तसं वापरता येत असेल तर जरुर वापरावं अन्यथा बंद करावं असा माझ्या मूळ विधानात बदल करतो.

हल्ली फक्त ती तीस दिवसांची उधारी सोडता डेबिट आणि क्रेडिट कार्डे सारखीच झाली आहेत हेही लक्षात घ्यावं.

डॉ सुहास म्हात्रे's picture

4 Jan 2019 - 7:55 pm | डॉ सुहास म्हात्रे

तसं वापरता येत असेल तर जरुर वापरावं अन्यथा बंद करावं असा माझ्या मूळ विधानात बदल करतो.

+१००

कारण, क्रेडीट कार्डमुळे होणारे फायदे अथवा तोटे, हे दोन्हीही पुर्णतः वापरकर्त्याच्या निर्णय व कृतींवर अवलंबून असतात.

सुबोध खरे's picture

4 Jan 2019 - 9:21 pm | सुबोध खरे

तीस दिवसांची उधारी सोडता डेबिट आणि क्रेडिट कार्डे सारखीच झाली

नक्कीच नाही

माझ्या खात्यात १००० रुपये असतील( किमान रक्कम --मिनिमम बॅलन्स) तर मला डेबिट कार्ड कदाचित वापरताही येणार नाही ( तुमच्या बँकेने क्रेडिट ची सोय दिली असेल तर गोष्ट वेगळी). याउलट माझ्या खात्यात एक पैसाही नसेल तरी माझ्या खरेदी लिमिट इतके पैसे अर्ध्या रात्री मला उपलब्ध होतात.

आमच्या नातेवाइकांना हृदयरोगासाठी रुग्णालयात भरती करताना एक लाख रुपये भरायचे होते (किमान ५०,००० भरल्यावरच हि प्रक्रिया चालू झाली असती) अशा वेळेस त्यांच्या मुलाने क्रेडिट कार्ड स्वाईप करून हे पैसे भरले. तातडीची गरज लागली असती तर माझे क्रेडिट कार्ड होते( माझे लिमिट ३ लाख आहे).

कोणत्याही सामान्य माणसाच्या खात्यात एक लाख रुपये असेच पडून नसतात,( सुपर सेव्हर सारखा पर्याय असतो ज्यात आपली मुदत ठेव त्याच्याशी जोडलेली असते)
परंतु अनेक बँकाचे डेबिट कार्डावरचे एका व्यवहाराचे लिमिट बरेच कमी असते( फारच क्वचित हे ५०००० च्या वर असते).

मागच्या वर्षी ऍमस्टरडॅम येथे ७८ हजार भरून दोन तिकिटे काढली तेंव्हा डेबिट कार्ड चालले असते का याबद्दल मला शंका आहे.

तातडीच्या मदतीसाठी क्रेडिट कार्डासारखा उत्तम पर्याय नाही

या शिवाय क्रेडिट कार्डावर रोख पैसे काढायची सुद्धा सोय आहे.

नडी अडचणीला आपल्या शहराच्या बाहेर असतानां आपल्या खात्यात पैसे नसले तरी १.५ % चार्जेस भरून दीड लाखापर्यंत रक्कम ( परकीय चलनात सुद्धा) काढण्याची सोय माझ्या कार्डावर आहे.

विदेशात असताना खिशात असलेल्या या कार्डाची उब तुम्हाला नक्कीच मानसिक सुरक्षितता देते.

हे झालं क्रेडिट कार्डाबद्दल.

लाईन ऑफ क्रेडिट चा कोणाला काय अणभव आहे?

डॉ सुहास म्हात्रे's picture

4 Jan 2019 - 8:30 pm | डॉ सुहास म्हात्रे

लाईन ऑफ क्रेडिट (LOC) हा बँक अथवा नॉन्बँकिंग फिनान्शियल कंपन्यांकडून मिळणार्‍या कर्जाचा एक प्रकार आहे.

यामध्ये,

१. सर्वसामान्य कर्जाप्रमाणे, ग्राहकाला कर्जाची संपूर्ण रक्कम दिली जात नाही, तर केवळ एका ठराविक कालखंडासाठी, 'अनेक हप्त्यांत घेणे व अनेक हप्त्यांत परतफेड करणे' शक्य असलेल्या, कर्जाची कमाल सीमा, ठरविली जाते.

२. ग्राहक, कर्जाची ठरलेली सीमा न ओलांडता, आपल्या अकाऊंटमधिल पैश्यांपेक्षा जास्त रक्कम (डेबिट), हवे तितक्या वेळेस वापरू शकतो.

३. त्या अकाऊंटमध्ये आपल्याकडे असलेले पैसे (किंवा व्यवसायाची आवक) जमा करत राहिल्यास कर्जाची रक्कम कमीत कमी ठेवता येते किंवा काही काळासाठी शून्यही करता येते.

४. फक्त शिल्लक रकमेपेक्षा जास्त वापरलेल्या (विथड्रॉ केलेल्या) पैशांना कर्ज समजून त्यावर व्याज लावले जाते.

५. एकदा LOC करार झाल्यावर बँक दर खर्चाचे कारण विचारत नाही. म्हणजे, करारात खास अटी नसल्यास, तो खर्च कसा करायचा याची मुभा ग्राहकाला असते.

६. कराराची मुदत संपल्यावर, ती वाढवून घेता येते (रिन्युअल). मूळ करार व रिन्युअलसाठी प्रोसेसिंग फी असते.

७. सर्वसाधारणपणे, व्यावसायिक व कंपन्यांसाठी आपल्या रोजच्या खर्चांसाठी, हे कर्ज ही एक उत्तम व्यवस्था आहे.
हे कर्ज व्यक्तीगतरित्याही मिळू शकते... मात्र, खर्चावर ताबा नसलेल्या व्यक्तीने या फंदात अजिबात पडू नये.

वरील तपशील, कर्ज देणारी बँक/कंपनीप्रमाणे बदलू शकतात... ते त्यांच्याकडूनच माहित करून घ्यावे.

दादा कोंडके's picture

4 Jan 2019 - 9:24 pm | दादा कोंडके

तुम्ही फिनान्शिअली प्रचंड ऑर्गनाईज्ड असाल तरच क्रेडिट कार्ड घ्या. आत्ता पर्यंत ऑनलाईन घेतलेली एकजरी गोष्ट वापरत नसाल तर क्रेडीट कार्ड घेउ नका. म्हणजे, इम्पल्स बायींग करणार्‍यांनी वापरू नये. मॉल, फ्लाइटची तिकिटं वगैरे महिन्याला वीस-पंचवीस हजाराची (क्रेडीट कार्ड वापरण्यासारखी, घरभाडं वगैरे नव्हे) खरेदी होत असेल तर जरूर वापरा. क्रेडीट कार्डच्या गमती (पाँइंट्स, सूट, एअरपोर्ट लाउंज अ‍ॅक्सेस वैग्रे) माहीत असतील तरच वापरा. क्रेडीट कार्ड वेगवेगळी असतात. तुम्हाला जे उपयोगी असेल तेच वापरा. मी एस्बीआयचं एलिट (५००० रुपये वार्षिक फिस) वापरतो. पण वर्षाला पाचहजारा पेक्षा जास्त फायदा होतो.

प्रवासात, विशेषतः देशाबाहेर प्रवासात आणि दवाखान्यात ऍडमिट वगैरे करण्याची वेळ आल्यास क्रेडिट कार्डाचा आधार वाटतो हे खरे आहे.

एक प्रश्न आहे - कार्डाचे मोठे थकीत बिल मागे ठेवून एखादी व्यक्ती मरण पावल्यास ते बिल माफ होते काय ? त्याबद्दल नियम काय असतात - कुणाला काही कल्पना ?

कापूसकोन्ड्या's picture

6 Jan 2019 - 4:43 pm | कापूसकोन्ड्या

चिंता नको
क्रेडिट कार्ड्चे पैसे ठेवुन एकादा माणूस दगावला तर त्याचा विमा असतो. आणि मॄताच्या मागे असणार्‍या लोकांना असे पैसे भरावे लागत नाही.

अकिलिज's picture

7 Jan 2019 - 9:34 pm | अकिलिज

डेबीट किंवा क्रेडीट कार्ड वापरण्यासाठी कुणा दुसर्‍याच्या हातात द्यायची काहीही गरज नाही. सरळ मशीन आपल्या हातात मागून घ्यावे. स्वतः कार्ड त्यात फिरवावे. वेटरच्या हातात किंवा बिलाच्या डायरीसारख्या दिसणार्‍यात तर मुळीच ठेवू नये.
मला वेटरला पिन नंबर लिहून देणारे महाभाग पाहीले तरी त्यांच्या साक्षरतेची चिड येते. जाऊदे, तो मुद्दा नाहीये.

मराठी_माणूस's picture

16 Jan 2019 - 1:08 pm | मराठी_माणूस

जर क्रेडीट कार्ड वापरले नाही तर क्रेडीट हिस्टरि तयार होणार नाही , मग कर्ज घेताना काही समस्या येते का ?

डोके.डी.डी.'s picture

16 Jan 2019 - 3:35 pm | डोके.डी.डी.

खरंच आपण सर्वांनी दिलेल्या प्रतिक्रिया आणि लिंक वरून खूप माहिती मिळाली. ऑनलाईन शॉपिंग साठी सतत काहींना काही 5 ते 10% सूट आशा ऑफर चालू असतात. तेथे हप्त्यावर पण घेण्याची सोय आहे. त्यामुळे वार्षिक फी तरी नक्कीच निघेल. आणि sbi क्रेडिट कार्ड ची दैनंदिन लिमिट कमी जास्त होत नाही. डेबिट कार्ड सारखी , एकदा कमी केल्यास 6 महिने परत वाढवता येणार नाही असं केयर वाल्याने सांगितले. सर्वांचे खूप आभार

टवाळ कार्टा's picture

16 Jan 2019 - 5:15 pm | टवाळ कार्टा

आर्थिक शिस्त नसेल तर क्रेडिट कार्डाच्या भानगडीत पडू नये ...आणि क्रेडिट कार्ड वाईट असा अपप्रचारसुद्धा करू नये