अनन्तयात्री
अनाम नक्षत्रातील तारा
झळाळताना गगनी
अनाहताच्या झंकाराची
दुमदुम आली कानी
इंद्रियगोचर विभिन्न अनुभव
एकवटोनी गेले
स्थूल सूक्ष्म जड चेतन यातील
भेदही गळून पडले
सुदूर बघता बघता अवचित
क्षितिज बिंदूवत उरले
अडले पाऊल कुंपण तोडून
अनन्तयात्री झाले
सुरेख
जबरदस्त!
वा!!
पैजारबुवा, संदीप, यशोधरा
अत्यंत उत्कृष्ट रचना !!
शार्दुल_