Skip to main content

अनन्तयात्री

लेखक अनन्त्_यात्री यांनी रविवार, 23/12/2018 18:56 या दिवशी प्रकाशित केले.
अनाम नक्षत्रातील तारा झळाळताना गगनी अनाहताच्या झंकाराची दुमदुम आली कानी इंद्रियगोचर विभिन्न अनुभव एकवटोनी गेले स्थूल सूक्ष्म जड चेतन यातील भेदही गळून पडले सुदूर बघता बघता अवचित क्षितिज बिंदूवत उरले अडले पाऊल कुंपण तोडून अनन्तयात्री झाले
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 2507
प्रतिक्रिया 6

प्रतिक्रिया

आशयगर्भ कविता अतिशय आवडली. इतक सहज लिहीलय की वाटतय किती सोपे आहे सगळे, पैजारबुवा,

वा!!