Skip to main content

विधानसभा निवडणूक 2018 निकाल (मप्र,राजस्थान, छग, मिझोरम, तेलंगणा)

लेखक महासंग्राम यांनी मंगळवार, 11/12/2018 12:16 या दिवशी प्रकाशित केले.
सर्वशक्तिशाली औटघटकेच्या मतदार राजास्नी रामराम, सध्या लोकसभेची सेमीफायनल समजल्या जाणाऱ्या मध्यप्रदेश ,राजस्थान, छत्तीसगढ, मिझोरम, तेलंगणा या राज्यांचे निवडणूक निकाल हाती येत आहेत. सध्यच्या कलानुसार काँग्रेसने मध्यप्रदेश ,राजस्थान, छत्तीसगढ हि ०३ भाजपशासित राज्ये जवळजवळ हिसकावून घेतली जाण्याची शक्यता आहे. बाकी ठिकाणी पण पानिपत झाल्यात जमा आहे.
  • ०३ महत्वाची पूर्ण बहुमत असलेली राज्य निसटून जाण्यामागे कारणं काय असू शकतील ?
  • याचा येणाऱ्या लोकसभा निवडणुकीवर परिणाम होईल का ? कि नेहमी प्रमाणे दुसऱ्याच मुद्द्याद्वारें लोकसभा लढवली जाईल ?
  • या विजयामुळे संजीवनी मिळेलेली काँग्रेस या यशाचा भविष्यात कश्याप्रकारे लाभ घेऊ शकेल ?

वाचने 71337
प्रतिक्रिया 136

प्रतिक्रिया

कुटील डावपेच, आय.टी. सेल, समाज्माध्यमांतून बदनामी.. हे प्रत्येकवेळी यशस्वी होईलच असे नाही. हे सर्व पक्षांनी लक्षात ठेवण्यासारखे आहे. "कॅडरलेस पक्ष, त्यांच्याकडे आहे तरी कोण,भरकटलेला पक्ष?" हे विचारणारे आता आत्मचिंतन करू शकतील. खरे तर इंदिरा/मोदींना वगैरे पर्याय कोण ? असे प्रश्नच निरर्थक असतात. पंतप्रधान हा विद्वत्तापूर्ण, अफाट वाचन असलेला, बोलण्यात वाकब्गार असलेला पाहिजे.. ह्या (उच्च) मध्यम्वर्गाच्या अपेक्षा असतात पण एकंदरित भारतीय मतदार असला विचार करत असेल असे वाटत नाही.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

>>पंतप्रधान हा विद्वत्तापूर्ण, अफाट वाचन असलेला, बोलण्यात वाकब्गार असलेला पाहिजे.. ह्या (उच्च) मध्यम्वर्गाच्या अपेक्षा असतात तुम्हाला शिक्षित मध्यमवर्गाच्या अपेक्षा म्हणायचंय का? अशा अपेक्षा असत्या तर इथे मिपावर मोदीजींना शून्य पाठिंबा मिळाला असता. बोलण्यात वाकबगार (पक्षी रेटून खोटे बोलणारा) याखेरीज तुम्ही दिलेल्या यादीतले "विद्वत्तापूर्ण" आणि "अफाट वाचन असलेला" हे गुण काही मोदींजवळ नाहीत.

In reply to by नितिन थत्ते

नितिन थत्तेसाहेब "विद्वत्तापूर्ण" आणि "अफाट वाचन असलेला" हे गुण काही मोदींजवळ नाहीत. याबाबत आपला काही वैयक्तिक अनुभव की आपल उचलली जीभ आणि लावली टाळ्याला. असो ही लिंक बघा. https://youtu.be/yxNLXTl_BR8

तेजस आठवले, तुमचा इथला प्रतिसाद आवडला. एकंदरीत या विधानसभा निवडणुकींत पप्पू की मोदी हा प्रश्न नव्हताच मुळी. मोदींच्या नावावर धुडगूस घालणाऱ्या भाजप्यांना मतदाराने जमिनीवर आणलंय. जर मध्यप्रदेश, राजस्थान व छत्तीसगडात मोदींनी गुजरातप्रमाणे लक्ष केंद्रित केलं असतं तर तिथल्यासारखा काठावर विजय मिळाला असताही. पण मग मोदींचं मुद्रामूल्य उणावलं असतं. हा धोका पत्करण्याची काहीही गरज नव्हती. तसंही पाहता मतदार लोकसभा व विधानसभा निवडणुकांत फरक करतो. मग विधानसभांचा अपशकून करवून घेण्यापेक्षा थेट लोकसभेसाठी मोर्चेबांधणी केलेली उत्तम ठरावी. हात दाखवून अवलक्षण बघण्यापेक्षा झाकली मूठ सव्वा लाखाची काय वाईट? असा मोदीशहांचा व्यूह दिसतो आहे. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

मोदींच्या नावावर धुडगूस घालणाऱ्या भाजप्यांना मतदाराने जमिनीवर आणलंय.
हे पटण्यासारखं आहे. ह्या राज्यांच्या प्रचारसभेत मोदी-शहा जोडीने बाकी राज्यांसारखं वातावरण ढवळून काढलं नव्हतं.स्टार प्रचारक म्हणून योगींची प्रमाणाबाहेर ओळख करून देण्यात आली असली तरी योगींच्या भाषणाने काडीचाही फरक पडला नाही. हैदराबादचे नाव बदलून भाग्यनगर करण्याचा मुद्दा अगदीच हास्यास्पद होता. हा मुद्दा अजिबात उपयोगी ठरू शकत नाही ह्याची जाणीव भाजप नेतृत्वाला नक्कीच असणार. पण योगींना थांबवले गेले नाही.तसंपण तेलंगणा मध्ये राव सोडून दुसरे कोणी जिंकण्याची शक्यता नव्हतीच.त्यामुळे योगी फारसा प्रभाव पाडू शकत नाहीत हे चित्र स्पष्ट झाले.पुढचे पंतप्रधान योगी होऊ शकतात अशी बिनबुडाची विचारसरणी असलेल्या लोकांना परस्पर शह गेला. पहिला पक्षी. गोव्यात भाजपने सत्ता मिळवण्यासाठी जो हपापलेपणा केला तो इकडे कुठल्याच राज्यात केला नाही हे बरेच केले(तसं करण्याचा पर्याय नव्हताच म्हणा). मध्य प्रदेश मध्ये फोडाफोडी करून, तडजोडी करून सत्ता स्थापन करण्याचा प्रयत्न अजिबातच झाला नाही.बसपा आणि काँग्रेसला एकत्र यावे लागणार आहे हे स्पष्ट झाल्यावर भाजपने वाट पाहिली असावी. काँग्रेस -मायावती ह्यांमध्ये काय बोलणी झाली हे कळणार नसली तरी कुरबुर चालू होण्याची वाट भाजप नक्कीच पाहत असणार.मायावती कधीही धोका देऊ शकतात हे भाजप आणि काँग्रेस दोघांना माहित आहे. जेव्हा महागठबंधनसाठी वाटाघाटी चालू होतील तेव्हा काँग्रेस आणि इतर घटक पक्षांचे, ह्यात मायावती पण आल्या,कसं फिस्कटेल ह्यासाठी भाजप प्रयत्न करेल.कदाचित त्यांच्या अंतर्गत लाथाळ्या एवढ्या वाढतील की भाजपाला काही करावे लागणार नाही. त्या क्षणाची भाजप वाट बघेल. कर्नाटक निवडणुकीत येड्डियुराप्पा तसेपण भाजपाला डोईजड झाले होते.दुसरीकडे काँग्रेस आणि कुमारस्वामी एकमेकांचे तोंडही बघणार नाही असा प्रचार करत होते. शेवटी भाजपाला सत्तेपासून दूर करण्यासाठी तडजोड झाली आणि एकत्र येऊन बिगर भाजप सरकार स्थापन झाले.त्यानंतर शांतता असली तरी पुढच्या चार महिन्यांत तिकडे काही गडबड झाली तर काँग्रेसचे लक्ष्य विचलित करण्यासाठी ते पुरेसे ठरू शकते.येड्डियुराप्पा सत्ता स्थापनेचा पोकळ दावा करतायत हे भाजपच्या लक्षात आले असूनही त्यांनी तो पोरकटपणा थांबवायचा प्रयत्न केला नाही असे मला वाटते.येड्डियुराप्पा यांचा परस्पर काटा काढला जातोय तर कशाला मध्ये पडा हा हेतू असावा. पक्षी दुसरा. आता तीन राज्यात भक्कम मते मिळवल्यावर काँग्रेसने ह्या वेळेस मतदान यंत्रांवर शंका घेतली नाही(तेलंगणा सोडून). त्यामुळे ह्यानंतर काँग्रेसने कधी परत हा मुद्दा आणलाच तर तो हास्यास्पद ठरेल. -सर्व मते वैयक्तिक.

मतिमंद ने 10 दिवसात कर्जमाफी बद्दल पलटी मारली हो !!!!! आता म्हणतोय कर्जमाफी है सोलुशन नाही , फार्मर्स को स्ट्रॉन्ग करना पड़ेगा

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

२७ डिसेंबर पर्यंत म. प्र. च्या मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफी न दिल्यास राजीनामा द्यावा.

In reply to by ट्रम्प

कर्ज माफी केली हो! ती पण 2 तासात. बाकी कर्जमाफी चांगली का वाईट या चर्चेत मला रस नाही. प्रत्यकाचे वेगवेगळे ठोकटाळे आहेत. त्यांच्या विचारांचा आदर आहे. https://www.loksatta.com/desh-videsh-news/bhopal-madhya-pradesh-chief-m… ... दिडपट हमीभावाचे कुठवर आलय? काय इन्फॉर्मेशन??

In reply to by विशुमित

बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले , बोले तैसा न चाले त्याची चेंदावी पाऊले. दिडपट हमीभावाचे कुठवर आलय? ते चितपट झाले की.

माझा प्रतिसाद कदाचित धाग्याशी डायरेक्ट्ली संबंधित नसेल असं वाटतं, पण मग् मी विचार करतो , बरेचसे इतर आणि इतरांकडून आलेले प्रतिसादही तितकेच धाग्याशी डायरेक्ट्ली संबंधित नाही वाटत. असो... "उत्तरेकडील" राज्यापैकी कुंतला राज्यात, खरी ओळख लपवून जेव्हा युवराज अमरेंद्र बाहुबली यांचा दौरा चालू असतो, तेव्हा ओळख लपवण्याकरिता "मतिमंद" झालेला "बाहुबलीच्या, गळ्यात" सुंदरी देवसेना "आपल्या पसंतीची माला घालते", तेव्हा "मूलतः भ्याड पण बोलबच्चन", असलेल्या कुमार वर्माच्या गळी , देवसेनेची चॉईस काय शेवटपर्यंत उतरत नाही.

तीन राज्यात भाजपचा पराभव झाल्यास शेअर मार्केटमध्ये मोठी घसरण होणार असा अंदाज होता. पण झाले उलटेच , सेन्सेक्स काल सुमारे ७०० अंकांनी वर गेला तर आताही सुमारे ३०० अंकानी वर आहे. भाजपच्या पराभवाचे गुंतवणूकदारांनी स्वागत केले की काय ?

In reply to by मराठी कथालेखक

निकालाच्या दिवशी सकाळी मार्केट चांगली डुबकी मारेल अशी परिस्थिती होती. तीनही राज्ये काँग्रेसने क्लीन स्वीप मारली असे वाटत होते. निफ्टी 200 पॉईंट खाली होता. पण जसे दुपारपर्यंत चित्र स्पष्ट होत गेले तेव्हा तो पुन्हा रिकव्हर झाला. तरीही संध्याकाळपर्यंत काही कळत नव्हते. संध्याकाळी चित्र स्पष्ट झाले. 1. भाजपचा पराभव झाला असला तरी काँग्रेसला मध्यप्रदेश आणि राजस्थान मध्ये निर्णायक सत्ता मिळालेली नाही 2. दोनही राज्यांमध्ये भाजपाचा व्होट शेअर बऱ्यापैकी शाबूत आहे, आणि लोकसभा निवडणुकीत जेव्हा संघ आणि परिवारातील अन्य संघटना देखील पूर्ण शक्तीनिशी उतरतील तेव्हा चित्र बरेच वेगळे असेल. 3. सध्याच्या परिस्थितीत भाजपला किमान 50 जागांचा फटका बसेल असे चित्र परवा सकाळी होते. पण चित्र स्पष्ट झाल्यावर हो धोका साधारण 25-30 जागांपर्यंत खाली आला आहे असे चित्र होते. या सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणून मार्केट वर गेले

हा असा पराभव महाराष्ट्रात झाला म्हणजे २०१४ चे शल्य थोडे कमी व्हायला मदत होईल, काही धुरंधरांना मिपावरील. आतपर्यंत रुतुन बसलेल्या काट्याची जखम चिघळुन भळभळायला लागलेली दिसतेय काही प्रतिसादांवरुन.... आता कदाचित राजस्थानमधले पाटीदार जास्त चवताळुन नाही उठले म्हणजे मिळवली. माझा प्लान, जानेवारी २०१९- निघणार्‍या शेतकरी मोर्च्यात सामील होणे फेब्रुवारी २०१९- मराठा आरक्षण मोर्च्यात सामील होणे मार्च २०१९ - संविधान रक्षा दलित मोर्च्यात सामील होणे एप्रिल २०१९ - एससी, एसटी,एसटी, ओबीसी यांच्या आरक्षणाच्या टक्केवारीत कपात केल्याच्या, कोणाचे १५लाख जमा न झाल्याबद्द्ल, नोटबंदी बद्दल, जीएसटी लादल्याबद्दल, टॅक्स ब्रॅकेट न वाढवल्याबद्द्ल, पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राईक केल्याबद्दल्,प्रकाश आंबेडकरांवर नक्षली आरोप लावल्याबद्द्ल, झालच तर निवडणुक पुर्वी आचारसंहिता न पाळल्याबद्दल मोर्चा काढायचा.

अटीतटीची लढत .. मला वाटतय.. विजयाचे शिल्पकार कमलनाथ आणि अशोक गेहेलोत आहेत.. राहूल गान्धी , ज्योतिरादित्य किन्वा सचिन पायलट नाहीत. मध्य प्रदेश https://www.loksatta.com/desh-videsh-news/madhya-pradesh-assembly-elect… https://www.indiatoday.in/elections/story/the-curse-of-4-337-on-shivraj… https://www.financialexpress.com/india-news/how-a-small-difference-of-0… राजस्थान https://timesofindia.indiatimes.com/india/bjp-loses-vote-share-big-time…

इथेच कोणीतरी म्हणाले होते ' रागा आता परिपक्व झाला आहे ' त्यावेळी आश्चर्य वाटले होते की जर मिपाकर नमो ला फेकू म्हणतात तर रागा ला मतिमंद ऐवजी परिपक्व कस म्हणता येईल ? राफेल वरुन देशात गोंधळ माजवणाऱ्या कॉ च्या महामहिम रागा मतिमंद चे विमान जमिनीवर उतरवण्याचे काम सुप्रीम कोर्टातील रंजन गोगई यांच्या खंडपीठाने केले आहे . हा निकाल तीन राज्यातील निवडणुकीच्या निकाला अगोदर आला असता तर कदाचित चित्र वेगळे दिसले असते . मध्यप्रदेश मधील 10 दिवसात शेतकऱ्यांच्या कर्जमाफी आश्वासन वरुन निकालाच्या दुसऱ्या दिवशी घुमजाव करणाऱ्या रागाच्या आरोपा मधील हवा सुप्रीम कोर्टाने काढून टाकली . विशेष म्हणजे देशभर गोंधळ करणाऱ्या काँ ने घोटाळा झालाय याची खत्री नसल्याने सुप्रीम कोर्टात एकहि याचिका टाकून न्याय मागितला नव्हता . निकालात काढलेल्या 5 ही याचिका इतर उठवळ लोकांच्या होत्या . इथुन पुढे सुशिक्षित , हुशार व जाती च्या पलीकडे विचार करणारे मतदार कितपत रागाच्या वेडेपणा च्या नादी लागतील शंका च आहे .

इथेच कोणीतरी म्हणाले होते की रागा आता परिपक्व झाला आहे !!!! तर त्या रागा चा परिपक्व पणा पुन्हा एकदा जनते समोर उघडा पडला आहे व ते काम रंजन गोगई यांच्या खंडपीठा ने केले आहे . राफेल वरुन देशात अविश्वासाचे वातावरण तयार करणाऱ्या रागाला आणि न्यायालयीन चौकशी ची मागणी करणाऱ्या पाच याचिका सुप्रीम कोर्ट ने फेटाळून लावल्या आणि विशेष म्हणजे त्या पाच मधील एकही याचिका काँग्रेस ची नव्हती . राफेल मध्ये घोटाळा झाला होता तर कोर्टात याचिका न टाकता लोकांना मूर्ख बनवीणे रागा ला सोपे वाटले असावे . पण त्यामुळे रागाचा बालिशपणा अजुन जास्त स्पष्ट झाला आहे व मला नाही वाटत इथुन पुढे कोणीही सुशिक्षित मतदार आंधळ्या डोळ्यांनी / कानानी रागच्या कॉ ला मत देईल . शेवटी काय आधीच मर्कट त्यात मद्य पिला !!!

In reply to by ट्रम्प

>>>पाच याचिका सुप्रीम कोर्ट ने फेटाळून लावल्या यावरून तुम्हाला काय वाटतं? याचिका न दाखल करण्याचा निर्णय शहाणपणाचा होता कि बालिशपणाचा? काँग्रेसची मागणी चौकशी समिती नेमण्याची आहे ना? म्हणजे निदान म्हणत तरी तसेच होते. कोर्टाने याचिका फेटाळून लावताना काय लिहीले आहे? कुठलाही घोळ झालेलाच नाही असा काही निर्वाळा दिला आहे का?

In reply to by थॉर माणूस

चौकशी समिती ची मागणी करण्यासाठी संसद आहे ना ? गेली चार वर्ष सगळे भत्ते घेवून वारंवार संसद बंद पाडली तसेच इथुन पुढे ही करायचे . विधानसभा निवडणुकीत , मीडिया वर राफेल चा विषय वर चर्चा करुन देशाची लक्तरे आणि संरक्षण गोपिनीयता चव्हाटयावर मांडणे निव्वळ बालिशपणा च आहे .

In reply to by ट्रम्प

>>देशाची लक्तरे आणि संरक्षण गोपिनीयता* चव्हाटयावर मांडणे निव्वळ बालिशपणा अय्या !! आम्ही बोफोर्सबाबत कध्धी कध्धी काही बोललो नाही *राफेलच्या स्पेसिफिक्शन्स बाबत किंवा योग्यायोग्यतेबाबत विरोधीपक्षांनी काहीही आक्षेप घेतलेले नाहीत (बोफोर्स केसमध्ये इव्हन फ्रेंच सोफ्मा तोफा कशा अधिक योग्य आहेत, बोफोर्सच्या तोफा किती किमीपर्यंत मारा करतात, फ्रेंच तोफा किती किमी मारा करतात वगैरे चर्चाही तेव्हाच्या विरोधकांनी केली होती). विरोधकांनी आक्शेप घेतले आहेत ते त्याची किंमत वाढवणे, १२६ विमानांऐवजी ३६च विमाने घेणे आणि ती सर्व रेडी टु फ्लाय स्थितीत घेणे (पक्षी- आधीप्रमाणे टेक्नॉलॉजी ट्रान्सफर करार न करता ) आणि रिलायन्सला पार्टनर करून घेणे याबाबतीत आहेत. या आक्षेपांचा संबंध संरक्षणविषयक गोपनीयतेशी लावणे हाच बालिशपणा आहे.

In reply to by नितिन थत्ते

माननीय कोर्टाच्या निर्णयाने 3 राज्यातील पराभव झाकण्यासाठी प्रोपोगंड़ा चालू झाला आहे. सुशिक्षीत मतदारानी याला भुलु नये.

In reply to by विशुमित

किती लोकांनी न्यायालयाचा एकमुखी दिलेला संपूर्ण निकाल वाचला आहे? हवेत वाय बार काढताना पाहून करमणूक मात्र होते आहे.

In reply to by सुबोध खरे

अगदी रास्त. सुशिक्षित लोकांनी कोर्टाच्या निकलचा नीट अभ्यास करुनच निर्णय घ्यावा. प्रोप्पोगंडि भुल्थपना बळी पडू नये.

In reply to by विशुमित

कोर्टाच्या निकालाची प्रत वाचली आहे. केंद्राने सुप्रीम कोर्टात दिलेल्या माहितीच्या आधारे निर्णय देण्यात आला. केंद्राच्या दाव्यानुसार कॅगच्या अहवालाची लोकलेखा समितीत चर्चा झाली होती. पण हा दावा चुकीचा आहे. सुप्रीम कोर्टापासून वस्तूस्थिती लपवण्यात आली- इति शरद पवार .... कोणाकडे ह्या विधानाला खोडायाला आणखी विस्तृत माहिती असेल तर स्वागत आहे. (कृपया पवार प्रेमी म्हणून कोणि शिक्के मारु नका. जाहिर अपमान केला जाईल.)

In reply to by विशुमित

' जाहिर अपमान केला जाईल ' ची रॉयल्टी सदाशिव / नारायण पेठ मध्ये भरली का ? नाही म्हणजे त्यांच्या कड़े पेटेंट आहे म्हटलं = ) = )

In reply to by विशुमित

प्रोप्पोगंडि भुल्थपना बळी पडू नये. आपण हा ३९ पानी निकाल वाचला आहे का? तो वाचला असेल तर असे विधान आपण करणार नाही.

In reply to by सुबोध खरे

कोर्टाचा निकाल नाही वाचला. शोधण्याचा प्रयत्न केला. असेल तुमच्या कडे लिंक तर कृपया द्या. पण त्याचे वेगवेगळं विश्लेषण वाचली त्यावर मी माझ मत बनवले की हा प्रोपोगंड़ा बनवला जातोय. मत बदलू ही शकते.

In reply to by सुबोध खरे

दुर्दैवाने लोक स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी सर्वोच्च न्यायालय विकले गेले आहे असाही खोटा प्रचार करताना आढळतात. सद्य स्थतीत सरन्यायाधीश श्री रंजन गोगोई यांचे पिताश्री काँग्रेस पक्षाचे आसाम राज्याचे मुख्यमंत्री होते आणि तिसरे न्यायाधीश श्री के एम जोसेफ यांची सर्वोच्च न्यायालयावरील बढती विद्यमान सरकारने तांत्रिक कारणासाठी सहा महिने लांबवली होती (त्यांनी उत्तराखंडचे सरकार बरखास्त करुन राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाला स्थगिती दिली होती म्हणून सरकारने असे केले असा विरोधकांचा आरोप आहे). असे दोन न्यायमूर्ती सरकारच्या विरोधात असतानासुद्धा या रिट याचिका एकमुखाने फेटाळल्या गेल्या आहेत. श्री राहुल गांधी यांनी कोणतेही पुरावे न देता प्रचार सभांमध्ये रफाल घोटाळ्याबद्दल भ्रष्टाचाराचे वाटेल ते आरोप केले त्याच्या समर्थनासाठी न्यायालयात कोणतेही पुरावे दिले नाहीत आणि आता त्याचे सर्वोच्च न्यायालयात खंडन झाले असताना परत तांत्रिक मुद्द्यावर आम्हीच बरोबर आहोत आणि आता संयुक्त संसदीय समिती नेमा असे म्हणणे हि बेशरम पणाची हद्द झाली. जाता जाता -- आजपर्यंत नेमलेल्या संयुक्त संसदीय समितीच्या अहवालातून ठोस काही निघाले आहे असे मी तरी पाहिलेले ऐकलेले किंवा वाचलेले नाही. माझे मत बदलण्यास आनंद वाटेल.

In reply to by ट्रम्प

राफेल मध्ये घोटाळा झाला होता तर कोर्टात याचिका न टाकता लोकांना मूर्ख बनवीणे रागा ला सोपे वाटले असावे . पण त्यामुळे रागाचा बालिशपणा अजुन जास्त स्पष्ट झाला आहे व मला नाही वाटत इथुन पुढे कोणीही सुशिक्षित मतदार आंधळ्या डोळ्यांनी / कानानी रागच्या कॉ ला मत देईल . ==)) रागा तर उलट खुपच पुढचा निघला. त्याने कोर्टात याचिका न टाकता 'जय विरु' ला निवडणुकीत जखडून ठेवले. .... बाकी सुशिक्षित लोकाना राजकारण खुप कमी समजते, असे माझे मत आहे. विरोधी मताचा आदर आहे.

In reply to by विशुमित

रागा तर उलट खुपच पुढचा निघला. त्याने कोर्टात याचिका न टाकता 'जय विरु' ला निवडणुकीत जखडून ठेवले. शिकले सवरलेल्ये मतदारबी लोकान्ला शेंड्या लावनार्‍या न्येत्यांचं कवतिक करतात म्हंजे बगा! मंग अडानी लोक येडे बनायला रांग लावून बसू र्‍हायले तर तेन्ला काय दोश देनार ? (कपालावर हात) लोकांच्या आवडनिवडीपरमाने त्येंची औकात आसते आणि लोक्शाही लोकं त्येंच्याच आवडिपरमाने सर्कार निवडतात, ह्ये कायबी खोटं नाय बगा. (कपाल बडवनारी स्माय्ली)

त्याला मोठं करण्यात एका येडचापाने ढोर मेहनत घेतली होती, आता बोंबला त्याच्या नावाने.

In reply to by मार्मिक गोडसे

जरा तोंड सांभाळून !!!! वैयक्तिक टिका नकोय , नीट शब्द वापरा . तो पप्पू किंवा फेकू आपल्या कमेंट्स वाचायला येणार नाही पण इथ मिपावर खालच्या पातळीवर उतरायची गरज नाही .

जनहित याचिकांच्या दुरुपयोगाच्या विरोधात सरन्यायाधीशांनी काही कडक ताशेरे नुकतेच ओढले होतेत. पहिली अशी ताशेरे ओढलेली याचिका प्रशांत भूषण यांचीच होती. दुरुपयोग करणार्‍यांच्या विरुद्ध काय कारवाई सुप्रीम कोर्ट करेल त्याबद्दल काही वाचनात आलेले नाही. ते व्हायला हवे असे आता वाटायला लागले आहे.

अपेक्षेप्रमाणे मध्यप्रदेश आणि राजस्थान मध्ये अनुक्रमे कमलनाथ आणि गेहलोत यांची निवड झाली, काँग्रेस कितीही नवीन रक्ताला वाव देणार असं म्हणत असली तरीही या वेळेस सुद्धा रागांनी सेफ गेम खेळत जेष्ठ नेत्यांना संधी दिली. या पायलट आणि सिंधिया यांचं नेमकं कुठे चुकलं ? त्यांचं वय कमी म्हणून कि भविष्यात ते काँग्रेस नेतृत्वाला आव्हान ठरू शकतात म्हणून त्यांचा पत्ता कट केला ते कळत नाही. काँग्रेसचा पूर्वेतिहास पाहता दुसरं कारण मला जास्त योग्य वाटतं.

केंद्राने जे शपथपत्र सादर केले त्याला सत्य माणुन सुप्रीम कोर्टाने हस्तक्षेप करणे आणि सीबीआय चौकशीची गरज नाही असे म्हटले आहे. ''केंद्र सरकार शपथपत्रावर सांगत आहे की किंमती आणि व्यवहाराबाबत महालेखापालांना (कॅग) माहिती आहे आणि त्यांचा अहवाल संसदेच्या लोकलेखा समितीला (पीएसी) दिलेला आहे'' काल एका पत्रकार परिषदेत खर्गे यांनी स्वतः सांगितलं की असा कोणताही अहवाल कॅगनं पीएसीला दिलेलाच नाही. दिला असता तर पीएसीचे अध्यक्ष म्हणून खर्गे यांच्याकडेच आला असता. आत्ता बोला. ही निव्वळ धुळफेक आहे. तेव्हा, फेकू हटाव देश बचाव. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

प्राडॉ, सर्वोच्च न्यायालयाची खरंच दिशाभूल झाली असेल तर त्यावर न्यायालयाचा अवमान म्हणून दाद मागण्य़ाची सोयही आहे. परंतु तशी काही दाद मागितली गेली नाहीये. एकंदरीत पप्पूपक्षास न्यायालयाच्या आडून वार करायची हौस दिसते आहे. संदर्भ : https://www.facebook.com/%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%8A-%E0%A4%A4%E0%A5%8B… आ.न., -गा.पै.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

बिरुटे सर तुम्ही ते ३९ पानी निकालपत्र संपूर्ण वाचले असेलच. का तुम्हाला समजलंय तुमच्या अंतर्ज्ञानाने( चमडी बाबा सारखं)

In reply to by सुबोध खरे

>>> तुम्ही ते ३९ पानी निकालपत्र संपूर्ण वाचले असेलच. वाचलं नै, चाळलं. कोर्टाची भाषा शब्दाहुकुम कळावा इतका मी तरबेज नाही. उगाच हे वाचलं का ते वाचलं का, उगा गप्पा करु नयेत. धन्यवाद. आपण सर्वोच्च न्यायालयाचा निकालाचा योग्य शब्दशः मराठी अनुवाद करुन टाकल्यास उत्तम चर्चा करता येईलच. बाकी, राफेल प्रकरणात सरकारने पीएसी, कॅग यांच्याशी संबंधित माहिती न्यायालयात दिलेली नाही. सरकारने निकालपत्रात दुरुस्तीसाठी अर्ज केला आहे. एखाद्या व्यवहारात देयके अदा केल्यानंतर अर्थात व्यवहार पूर्ण झाल्यानंतर कॅगमार्फत तपासणी केल्या जाते. ''PAC ने कॅग चा अहवाल बघितल्याचा खोटा दावा केला प्रकरणी सरकारी अधिवक्त्यांना समन्स बजावण्याची तयारी लोकलेखा समिती (PAC) चे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी केली होती .. त्याला घाबरून आता कोर्टात शपथपत्र दाखल करताना आमच्याकडून टायपिंग मिस्टेक झाल्याचा दावा सरकारकडून करण्यात येत आहे. मात्र शेकडो वकील, कारकून व तज्ज्ञांची फौज असलेल्या सरकार पक्षाकडून अशी चूक होऊच कशी शकते हा प्रश्न आता विचारल्या जात आहे. विशेष म्हणजे कोर्टात चुकीचे किंवा खोटे शपथपत्र दाखल करणे हा कायद्याने दंडनीय गुन्हा आहे'' बातमी लिंक >>>> का तुम्हाला समजलंय तुमच्या अंतर्ज्ञानाने( चमडी बाबा सारखं) डॉक्टर अंकल पर्सनल नै होने का. फेकू सरकार हटाव देश बचाव....! -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

वस्तुस्थिती काही वेगळीच आहे. टायपिंग मिस्टेक झाल्याचा उल्लेख कुठे आहे ते दाखवाल काय? https://www.ndtv.com/india-news/centre-requests-supreme-court-to-correc…

In reply to by सुबोध खरे

सर्वोच्च न्यायालयाची विश्लेषण करण्यात चूक झालेली असून "तुम्ही चुकलात" असे न्यायालयाला सांगण्याची "एक पद्धत" असते.संसदेसारखे अवमानकारक भाषेत सांगता येत नाही. त्यानुसार सरकारने MISREPRESENTATION BY COURT असे म्हटले आहे.

In reply to by सुबोध खरे

क्लिन चिटचा आनंद एवढ्यात संपला काय ? चला केंद्रसरकारला सर्वोच्च न्यायालयात आपलं काही तरी मत मांडायचं आहे, इतकंच मान्य करु सध्या.
फेकू सरकार हटाव, देश बचाव
-दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

कधी कधी अचंबित आणि हताश करणारे असतात. राफेलच्या बाबतीत सर्वोच्च न्यायालयाचा निकाल अशा प्रकारचा आहे असे म्हणावे लागेल. हि विमाने देशासाठी अत्यावश्यक आहेत आणि त्यातील व्यवहारांची चौकशी करण्याची गरज नाही असा निर्णय देणे म्हणजे या व्यवहारातील विवादास्पद गोष्टींची सुनावणी करण्यास नकार देणे. तोच प्रकार न्यायालयाने केला आहे. आणि हा प्रकार विद्यमान सरकारच्या बाबतीत पुनःपुन्हा होतोय. काँग्रेस न्यायालयीन लढाई लांबविणे, जामिनावर सुटका करून घेऊन वर्षानुवर्षे मुक्त राहणे, जगण्याचे सर्व व्यवहार करणे अशा गोष्टी करीत असत. भाजप त्या पुढे गेला आहे. न्यायालयीन कारवाईलाच नकार देण्याचा प्रकार चालू झाला आहे. स्मृती इराणी प्रकरणामध्ये त्या मंत्री असल्यामुळे अशा केसेसमध्ये त्यांना गुंतवून ठेवता येणार नाही म्हणून तो खटला निकाली काढला. चांगले चालले आहे. महाराष्ट्रात तर काय देवेंद्र धुलाई केंद्रावर महिन्याभरातच शुभ्र चिठ्ठी मिळते.

In reply to by सर टोबी

तुम्ही ते ३९ पानी निकालपत्र संपूर्ण वाचले असेलच. मग या व्यवहारातील विवादास्पद गोष्टींची सुनावणी करण्यास नकार देणे.हे कुठच्या पानावर आहे ते जरा सांगता काय? कारण मी ते निकालपत्र संपूर्ण वाचले आहे आणि त्यात न्यायालयाने स्पष्टपणे विश्लेषण केलेले आहे कि जी निवड प्रक्रिया आवश्यक होती ती व्यवस्थितपणे केलेली आहे आणि त्यात कोणताही गैरव्यवहार झाला आहे असे म्हणता येत नाही. किमतीबद्दल विस्तृत विवेचन बंद लखोट्यात न्यायालयाला दिलेले होते ते उघड करण्याची गरज नाही असेही न्यायालयाने म्हटलेले आहे. पण "आपण एकदा एक शब्द उच्चारला कि तो काहीही झाले तरी परत घेणार नाही" असेच ठरवलेल्या लोकांना समजावणे अशक्य आहे

In reply to by सर टोबी

काँग्रेसने न्यायालयीन लढाई टाळण्याचे प्रयत्न केले नाहीत? अशोक चव्हाणांचे नाव कशाच्या आधारावर आदर्शमधून वगळले? २जी प्रकरणी न्यायालयाला हस्तक्षेप करून तपास करण्याचे आदेश का द्यावे लागले? फार तर असे म्हणता येईल की न्यायालयाला भाजपा ची बाजू अधिक legitimate वाटते.. ते का ते ज्याचे त्याने ठरवावे

सामना मध्ये वाचलं . दिल्लीत बोलत आहेत. भाजप चे नवीन कार्यालय अपशकुनी आहे म्हणून. २००० कोटी रु ( हो दोन हजार कोटी रु च ) पाण्यात ??

In reply to by अभिजित - १

आपण सामना सैनिक आहात तर! मग बरोबरच आहे. विरोध आणि वितंडवाद स्वाभाविक आहे. संजयवाणी,उद्धवकरणी दैनिक तो कसा!तयाचा सकल सैनिकांवर ठसा!!

बिहार मध्येही जागा वाटप भाजपाला दुःखदायक आहे महाराष्ट्रात इलेक्शने कधी आहेत ?