एकदा वाचण्यात आलं होतं की तुमचा आवडता मद्याचा प्याला तुमच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल थोडेफार सांगू शकतो... आणि मला एक जुना किस्सा आठवला.
मित्राला खोकला झाला म्हणून त्याला घेऊन एकदा ब्रँडी आणायला वाईनशॉप मध्ये गेलो होतो. काउंटरवर ब्रँडी मागतांना, खुद्द गांधींनी केली नसती एवढी याची चुळबुळ चाललेली. बाटली घेऊन पैसे चुकते केल्यावर चेहऱ्यावर जमेल तितकी अजीजी आणून "हमे नशा नही करना है, दवा के लिये ले रहे है" असा डायलॉग जेव्हा त्याने दुकानदाराला मारला, तेव्हा मी मात्र स्वतःच्या कपाळावर हात मारून घेतला.
तस्मात...ब्रँडी हे जरा पापभिरू लोकांचं मद्य असावं. इतरांसारखी ही सहसा कधी कुठल्या ग्लासात विसावत नाही. हिचे मोजमाप झाकणानं नाहीतर चमच्यानं. फारच वाटलं तर कधीतरी प्रवासात असताना हिप-फ्लास्क मधून घोटभर. औषधी गुण असल्यामुळे दारू न पिण्याऱ्यांच्या कपाटात सुद्धा हिला कुठेतरी कोपऱ्यात जागा मिळते. नातवाला खोकला झाला की पूर्वी आजीच्या बटव्यातून कुठलीतरी औषधं निघायची पण ब्रँडीचा उगम हा मात्र आजोबांच्या कपाटातून व्हायचा. पावसाळ्यात शाळेमधून भिजून घरी आलो की कधीतरी एक दोन झाकणं ब्रँडी मिळायची. शरीरभर हळूहळू पसरत जाणारी ती ऊब मस्त वाटायची. अर्थात मद्याचे हे बाळकडू मला ब्रॅंडीमधूनच मिळाले. खरं तर बाळ-कडू असं म्हणणं म्हणजे ब्रॅंडीवर अन्यायच, कारण मुळात वाईन पासून उगम पावलेली ब्रँडी (म्हणजेच बर्न्ट वाईन) ही चवीला निश्चितच मधुर असते.
सर्व वारुणींमधे सगळ्यात मोठी (?) बहीण म्हणजे वाईन (? कारण वाईन मोठी का बिअर हा एक वादाचा मुद्दा आहे). वाईनप्रेमी सहसा गोष्टीवेल्हाळ असतात असा समज आहे. घोळवून घोळवून किस्से सांगणे, गॉसिपिंग करणेआणि त्याच प्रकारे ग्लासमध्ये घोळवून घोळवून वाईन (रक्तवर्णी) पिणे हे या लोकांचे ठळक वैशिष्ट्य. यामधूनच कदाचित Grapevine (अफवा पसरवणे) हा शब्दप्रयोग रूढ झाला असावा.
हिची सक्खी धाकटी बहीण (म्हणजेच व्हाईट वाईन) हिच्यासारखीच, पण जरा श्रीमंत घरात दिलेली (गोरी आणि स्टायलिश असल्यामुळे असेल कदाचित). गॉसिपिंग करण्याची आवड असली तरी अंदाज एकदम हटके. घोळवून एखादा किस्सा सांगण्यापेक्षा हलकेच एखादी पुडी सोडून त्यावर सुरु झालेला वादविवाद आणि त्याबरोबर हातातल्या वाईनचा आस्वाद यांना प्रिय.
जिन आणि वोडका या दोन्ही श्वेतवर्णी बहिणींना छानछोकी आणि नवे नवे मेकअप फार प्रिय. या बहिणी क्वचितच कुठे एकट्या जात असाव्यात. कॉकटेल् पार्टीज, मौजमजा आणि गर्दी मध्ये या जास्त रमतात.
"मार्टिनी !!! शेकन, नॉट स्टर्र्ड... " हा सुप्रसिद्ध डायलॉग आपल्या जेम्स बॉण्डचा. त्यामुळेच बॉण्डने ग्लॅमर मिळवून दिलेली (जिन)मार्टिनी पिणारे जरा जास्तच शो-ऑफ करणारे असतात असा समज होऊ शकतो (आणि ते खरेही आहे). प्रत्येक बॉन्डपटात "बॉण्ड गर्ल" बदलते, तेच कशाला खुद्द बॉण्डही काही वर्षात बदलतो. पण मार्टिनी... ती वर्षानुवर्षे आहे तशीच आहे. म्हणूनच ही कॅटेगरी गर्दीत असूनही आपल्याच गुर्मीत राहणारी अशी आहे.
"रममाण" होणे म्हणजे काय याचा खरा प्रत्यय मला हिमालयात "रम" पितानाच आला. दिवसभराचा हाडं खिळखिळी करणारा प्रवास आणि रात्री तीच खिळखिळी झालेली हाडं गोठवून टाकणारी थंडी, यावर हा एकच "रमबाण" उपाय आहे. कधी सोड्यात, तो नसेल तर थोडं पाणी घालून नाहीतर नुसतीच कोरी रम बेदम झालेल्या गात्रांवर हळुवार फुंकर घालते आणि हळूहळू थोपटत झोपवते. रमचा आस्वाद घ्यायला आजूबाजूला गर्दी लागत नाही. एखादा जिवाभावाचा मित्र असला तर उत्तमच पण नसेल तरीही खुद्द रमदेखील उत्तम सोबत करू शकते.
म्हणूनच कदाचित लष्कराचीही सगळ्यात आवडती, रांगडी अशी रमच. रम प्यावी मर्दांनीच.
व्हिस्की ही सगळ्या बहिणींमध्ये जरा अबोल आणि जास्त "म्यॅच्युअर्ड". हिला फार गर्दीही झेपत नाही आणि अगदी एकटेपणाही. अस्सल व्हिस्कीप्रेमी दोन पेग व्हिस्कीबरोबर दोन-तीन तास कुठल्याही विषयावर पण तर्कशुद्ध काथ्याकूट करत सहज घालवतील (मधून मधून डोळे मिटून किंवा "व्वा!!!" एवढंच म्हणून हातातल्या व्हिस्की बद्दल कृतज्ञता व्यक्त करायला विसरणार नाहीत). पिताना अधाशीपणा आणि त्यानंतर येणारा वाचाळपणा हे दोन्ही दुर्गुण यांच्यामध्ये नसतात. यांचा अगदी सहज ओळखू येणारा दुर्गुण एकच. अस्सल व्हिस्कीप्रेमी आणि त्यांचा हा दुर्गुण हुडकून काढायचा असेल तर एखाद्याला तो पीत असताना व्हिस्कीबद्दलच एखादा बाळबोध प्रश्न विचारा. तुम्हाला उत्तराऐवजी नुसता एखादा तुच्छतेचा कटाक्ष मिळाला तर तो अस्सल समजावा.
पण जशी गवयांची घराणी असतात तशी व्हिस्किचीही असतात बरं. हिची खरी मुख्य घराणी दोन. एक म्हणजे आद्य असं स्कॉचचं आणि दुसरं स्कॉचव्यतिरिक्त इतर सर्व.
जसा स्कॉटलंड मध्ये जन्माला आलेली स्कॉच व्हिस्की आणि सर्वच बाबतीत अतिशय काटेकोर असलेले गोरे इंग्लिश साहेब यांचा परस्परसंबंध आपल्याला सहज दिसू शकतो तसाच अघळपघळ अमेरिकन्स आणि तिथे जन्माला आलेल्या बरबर्न, टेनेसी किंवा राई व्हिस्की यांच्यातही दिसतो. अमेरिकन व्हिस्की कोक किंवा कॉकटेल काहीही खपवून घेईल पण स्कॉच व्हिस्कीचं सोवळं फार कडक. साधा बर्फाचा खडा जाऊ देत, पाण्याचा थेंबही कधी कधी वर्ज्य असतो.
वयाने सगळ्यात मोठी पण तरीही सर्वात खेळकर, दिलखुलास आणि बबली अशी बिअर. चीन मधली “मीड” (मधापासून बनवलेली वाईन) ही बिअरपेक्षाही प्राचीन आहे असा दावा मला त्या मीड इतकाच बिनबुडाचा (किंवा बिन-बुडबड्याचा म्हणा हवं तर) वाटतो.
पाणी आणि चहा नंतर जगात सर्वाधिक प्रिय असे पेय म्हणजे बिअर. बिअरचा जसा हा मित्रपरिवार मोठा तसाच बिअर पिणाऱ्यांचाही.
बाटलीबंद बिअर गप्प असते पण एकदा बूच उघडले की बराच वेळ एका लयीत संथपणे पृष्ठभागावर बुडबुडे येत राहतात. बिअर पिणाऱ्यांचाही तसंच. बार काउंटरवर बिअरच्या नळापाशी बसलेला एखादा, बिअरचे दोन-चार घोट घशाखाली घातल्यावर शेजारच्या अनोळखी व्यक्तिबरोबरही तासभर मनमोकळ्या गप्पा मारू शकतो.
बिअरचा हिशोब असतो लिटर मध्ये. झाकण, लहानसहान ग्लास किंवा मिलिलिटरअसली संकुचित मापं आणि तशीच मनोवृत्ति बिअरला आणि बिअर पिणाऱ्यांना अजिबात मानवत नाही.
"अन्न हे पूर्णब्रह्म" हे आपल्या सर्वांना लहानपणापासून ज्ञात आहे. पण सुमेरियन काळात कामगारांना रोजची मजुरी ही "बिअर हे पूर्ण अन्न" म्हणून पुरवली जाई याची किती जणांना कल्पना असेल ?
इतका पुरातन सांस्कृतिक वारसा असलेल्या बिअरला "अपेय" आणि तो जपणाऱ्यांना "दारुडा" म्हणणे म्हणजे शुद्ध कृतघ्नपणाच.
व्यक्ती तितक्या प्रकृती या उक्तीला धरून प्रत्येक प्रकृतीला मानवेल अशी वारुणी नक्कीच आज जगात असेल. उदाहरणच घ्यायची झालीत तर धसमुसळ्या लोकांसाठी टकीला, जेवण झाल्यावर फक्त स्वीट डिश म्हणून पिणाऱ्यांसाठी मालिबू किंवा बडीशेपेऐवजी पास्तिस. नेहमीच्या आहारात लागणारी आणि म्हणूनच घरच्या घरी बनवली जाणारी हिमाचल मधली "लुगडी" किंवा नेपाळ मधली "छांग", तिबेटसारख्या अतिथंड प्रदेशात आधार देणारी आणि तिथल्या लोकांसारखीच उबदार अशी "तोंगबा", युरोपिअन स्टाईलला साजेशी अशी असंख्य लिक्योर्स. जपानी खाद्य-संस्कृतीशी जुळवून घेणारी अतिशय साधी अशी साके आणि अशा कितीतरी.
आपल्याकडे मात्र देवांचे पेय म्हणून समजली जाणारी ही सुरा, असुरासारखी पितात . फक्त "टाईट" होण्यासाठी पिण्याची आपली प्रकृती म्हणूनच पूर्वीपासून वाईट ठरत आली आहे. आपल्या खाद्य-संस्कृतीएवढीच मद्यसंस्कृतीही कधीतरी प्रगल्भ होईल अशी आशा करणे आणि वाट बघणे तेवढेच ते काय सध्या शक्य आहे.
सर्व चित्रे आंतरजालावरून साभार......

वाचने
27353
प्रतिक्रिया
60
मिसळपाव
प्रतिक्रिया
झक्कास
- झक्कास
- कडक
ग्लासातल्या बर्फाच्या खड्यावरून ओघळत जाणाऱया स्काॅचसारखाच ओघवता लेख! - (साकिया) सोकाजी☺️
In reply to झक्कास by सोत्रि
गुरुजींचा प्रतिसाद आला.
In reply to झक्कास by सोत्रि
धन्यवाद!!!
In reply to गुरुजींचा प्रतिसाद आला. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मद्यगुरु...
In reply to झक्कास by सोत्रि
हा लेख वाचताना ह्याच भावना
In reply to मद्यगुरु... by किल्लेदार
लेख वाचताना
धन्यवाद!!!
In reply to लेख वाचताना by तुषार काळभोर
अप्रतिम लेख. मजा आली वाचताना.
बायप्रॉडक्ट
In reply to अप्रतिम लेख. मजा आली वाचताना. by ज्योति अळवणी
वा ! मस्त लिहीलंय !! वर
....... हीच ईश्वर चरणी प्रार्थना !
In reply to वा ! मस्त लिहीलंय !! वर by उगा काहितरीच
:)

अरे वा मस्त
धन्यवाद!!!
In reply to अरे वा मस्त by मित्रहो
खूपच छान लिहिलंय
:) :) :)
In reply to खूपच छान लिहिलंय by श्वेता२४
बेसिक प्रश्न असा की भारतातच
सद्सदविकेकबुद्धी जागृत ठेवली म्हणजे झालं!
In reply to बेसिक प्रश्न असा की भारतातच by गवि
१) https://www.who.int/gho
In reply to बेसिक प्रश्न असा की भारतातच by गवि
"हॉबी"चुअल
In reply to १) https://www.who.int/gho by सुबोध खरे
नशिले, तरल, ओघवते, जीवाभावाने
भरून पावलो !!!
In reply to नशिले, तरल, ओघवते, जीवाभावाने by डॉ सुहास म्हात्रे
अप्रतिम जमलंय 'माझे मद्यजीवन
धन्यवाद!!!
In reply to अप्रतिम जमलंय 'माझे मद्यजीवन by सरनौबत
जियो..
धन्यवाद!!!
In reply to जियो.. by वरुण मोहिते
सोप्या सहज लेखाला फार गंभीर
इतर कोणाचे तसे नाहीयेत.
In reply to सोप्या सहज लेखाला फार गंभीर by कंजूस
माझा प्रतिसाद मागे घेतो॥
In reply to इतर कोणाचे तसे नाहीयेत. by गवि
जबाबदारीने आणि आस्वाद घेत पिणे
In reply to इतर कोणाचे तसे नाहीयेत. by गवि
मस्तच. लेख आवडला.
धन्यवाद!!!
In reply to मस्तच. लेख आवडला. by पद्मावति
व्व्व्वा
+९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९
In reply to व्व्व्वा by अभ्या..
:) :) :)
In reply to +९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९ by ज्ञानोबाचे पैजार
हिमालयात पोचलात की रमच्या ग्लासात ?
In reply to व्व्व्वा by अभ्या..
हिमालयात पोचलात की रमच्या ग्लासात ?
In reply to व्व्व्वा by अभ्या..
जुन्या आठवणी म्हणजे? आता मिळत
In reply to व्व्व्वा by अभ्या..
प्याला जबरदस्त आहे..
☺️
In reply to प्याला जबरदस्त आहे.. by पिंगू
या प्याल्याच्या निमित्ताने
केशवसुतांनी ....
In reply to या प्याल्याच्या निमित्ताने by अनन्त्_यात्री
वावा!
☺️
In reply to वावा! by अनिरुद्ध.वैद्य
@ किल्लेदार,
☺️
In reply to @ किल्लेदार, by अनिंद्य
व्वा! मदिरेचे वेगवेगळे रंग
☺️
In reply to व्वा! मदिरेचे वेगवेगळे रंग by किसन शिंदे
१ नंबर लेख
☺️
In reply to १ नंबर लेख by रोमन रेन्स
झकास लेख...
☺️
In reply to झकास लेख... by टर्मीनेटर
झक्कास...एकदम झक्कास
प्रयत्न
In reply to झक्कास...एकदम झक्कास by आशुतोष-म्हैसेकर

भारी व्यासंग तुमचा
:)
In reply to भारी व्यासंग तुमचा by निओ