आयुष्मान भारत – सध्या तरी स्वप्नवत्

अभिजित - १'s picture
अभिजित - १ in काथ्याकूट
10 Sep 2018 - 10:20 pm
गाभा: 

हि स्कीम म्हणजे इतर काही नसून वेगवेगळ्या इन्शुरन्स कंपनीची तुंबडी भरण्या चा प्रकार आहे. शेतकरी पीक विमा काढतो. पैसे भरतो. बहुतेक वेळा त्याला भरपाई मागितल्या वर काही मिळत नाही. तो अडाणी असतो. काही करू शकत नाही. त्याची तितकी ताकद नसते. तेच इथे होणार आहे. फक्त त्याचे इन्शुरन्स चे पैसे देशातील जनता भरत राहणार. आत्ता चा हप्ता अंदाजे दहा हजार कोटी रु. तो हि पुढे वाढतच जाईल.
आहे ते सुधारू शकत नाही. मग मोट्ठी नावे देऊन नवीन काहीतरी करायचं. जनतेचा खिसा कापायचा. हेच आहे मोदींचे अर्थ शास्त्र !!

https://www.loksatta.com/vishesh-news/dr-amol-annadate-article-about-ayu...

आयुष्मान भारत – सध्या तरी स्वप्नवत्
आयुष्मान योजनेच्या निमित्ताने आरोग्याची चर्चा राजकीय व राष्ट्रीय पटलावर आली हे चांगले झाले.
डॉ. अमोल अन्नदाते | September 6, 2018 04:43 am

या योजनेंतर्गत देशातील १० हजार कुटुंब व अंदाजे ५० कोटी जनतेला विम्याचे छत्र देण्याचे प्रयोजन आहे. त्यातही नेमके १३५४ आजार या योजनेत समाविष्ट करण्यात आले आहेत.
या योजनेसाठी नवी दीड लाख ‘वेलनेस सेंटर’ स्थापन करण्याचा सरकारचा मानस आहे. त्यातील पहिल्या वेलनेस सेंटरचे उद्घाटनही झाले आहे. पण मुळात देशात असंख्य प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्रे, उपजिल्हा रुग्णालये ओस पडलेली असताना केवळ योजनेसाठी म्हणून नव्या केंद्रांची मुळीच गरज नाही. आहे त्या आरोग्य केंद्रांचा त्यासाठी चांगला उपयोग होऊ शकतो.
या योजनेतील जाहीर झालेले काही दर हे खासगी क्षेत्राला मान्य नाहीत.
‘आयुष्मान भारत’साठी ५० कोटी लाभार्थीची संगणकीकृत नोंदणी व सॉफ्टवेअरच्या माध्यमातून योजना राबवणे हे तांत्रिकदृष्टय़ाही मोठे आव्हान असणार आहे.
मुळात ही योजना अमेरिकेतील ‘ओबामाकेअर’ या योजनेच्या धर्तीवर मोदी-केअर म्हणून बेतली गेली आहे किंवा तसे भासवले जाते आहे. अमेरिकेसारख्या संसर्गजन्य आजार कमी असलेल्या व चांगले राहणीमान, उच्च साक्षरता व शिस्त असलेल्या देशातही ‘ओबामाकेअर’ अपयशी ठरले. आपण तर अमेरिकेच्या दहापट लोकसंख्या असलेल्या देशात, त्यांच्या एकशतांश पशांमध्ये देशाला आरोग्य विम्याचे छत्र द्यायला निघालो आहोत. तसेच देश आर्थिक हलाखीतून जात असताना सर्वसामान्यांच्या करातून खर्च होणाऱ्या १०,००० कोटींतून प्रत्येक रुपयाचा परतावा मिळतो की नाही याकडे बारीक लक्ष ठेवावे लागणार आहे.
देशपातळीवर विमा कंपनी, थर्ड पार्टी, सरकारी व खासगी रुग्णालये व योजना राबवणारी शासकीय यंत्रणा – हे या योजनेचे चार खांब असतील. या सर्वाना रुग्णहितासाठी कार्यरत ठेवणे व ‘आपल्या करातून भरलेल्या प्रत्येक रुपयासाठी चांगले आरोग्य’ या एका ध्येयात सगळ्यांना बांधणे शक्य झाले तर तो एक चमत्कार ठरणार आहे.

प्रतिक्रिया

अभिजित - १'s picture

11 Sep 2018 - 1:35 pm | अभिजित - १

डॉ सुबोध खरे. जरा तुमच्या कडून काही ज्ञानामृत इकडे मिळेल काय ? तुमचे म्हणणे काय आहे या scam / scheme विषयी ? कि नमोंचे सगळेच गोड हेच तुमचे धोरण आहे ?
खरे तर तुम्ही इथे अधिकार वाणीने बोलायला पाहिजे. पण तुम्ही तर इथून पळ काढत आहात असं दिसतेय. कि हे डॉ अमोल अन्नदाते मूर्ख आहेत ? नमोरुग्ण आहेत ?

गब्रिएल's picture

11 Sep 2018 - 2:42 pm | गब्रिएल

हायला, सोताच्या धाग्याचा टिआरपी वाढ्वायचा क्शीण आनि इनोदी परयत्न ? लका लका लका, इक्त बी ड्येस्पर्‍येट व्हवू ने. ही ही ही

सुबोध खरे's picture

14 Sep 2018 - 12:23 pm | सुबोध खरे

डॉ सुबोध खरे. जरा तुमच्या कडून काही ज्ञानामृत इकडे मिळेल काय ? तुमचे म्हणणे काय आहे या scam / scheme विषयी ? कि नमोंचे सगळेच गोड हेच तुमचे धोरण आहे ?
खरे तर तुम्ही इथे अधिकार वाणीने बोलायला पाहिजे. पण तुम्ही तर इथून पळ काढत आहात असं दिसतेय. कि हे डॉ अमोल अन्नदाते मूर्ख आहेत ? नमोरुग्ण आहेत ?

आपण कोण उपटसूंभ?

मी आपल्याला का उत्तर द्यावे आणि कि नमोंचे सगळेच गोड हेच तुमचे धोरण आहे ? असे आपण मला उर्मटपणे विचारावे अशी आपली काय लायकी आहे?

तुम्ही तर इथून पळ काढत आहात.

मुळात तुमचा धागा मी आज चुकून उघडला. म्हणजे मी येथे येण्याच्या अगोदरच आपण पळ काढला म्हणून अहवाल देऊन मोकळे?

डॉ अमोल अन्नदाते मूर्ख आहेत ? नमोरुग्ण आहेत ?

हा प्रश्न तुम्ही त्यांनाच विचारला तर बरं होईल. ते काळे कि गोरे आहेत ते मी पाहिलेले नाही कि मी त्याना भेटलेलो नाही.

केवळ एखादा विषय वैद्यक शास्त्राशी संबंधित आहे म्हणून तुम्ही मला जालावर जाब विचारावा अशी आपली काय लायकी आहे?

मी काही आपल्याकडे कर्ज मागायला आलेलो नाही किंवा मी आपल्याकडे नोकरी करत नाही.

तात्पर्य- मी आपणाला जबाबदेही नाही. आणि इतक्या उर्मटपणे आपण कोणत्या अधिकाराने विचारत आहात?

अभिजित - १'s picture

15 Sep 2018 - 7:22 pm | अभिजित - १

सगळी दुनिया सांगतेय कि नोटबंदी फेल गेली. तरी तुम्ही तिचे ठासून समर्थन करत असता. तो तुमचा अभ्यासाचा विषय नसताना. हा तर तुमचाच विषय आहे. इथे पण करा कि समर्थन. अधिकारवाणीने !!

सुबोध खरे's picture

15 Sep 2018 - 8:03 pm | सुबोध खरे

मी काय करावे आणि करू नये हे सांगणारे तुम्ही कोण टीकोजीराव?

तुम्ही माझ्या खिजगणतीतहि नाही.

जळजळ फार होत असेल तर इनो नाही तर तुमच्या डॉक्टरांना विचारून डायजिन घ्या.

कंजूस's picture

11 Sep 2018 - 2:20 pm | कंजूस

>>कि नमोंचे सगळेच गोड हेच तुमचे धोरण आहे ?
खरे तर तुम्ही इथे अधिकार वाणीने बोलायला पाहिजे. पण तुम्ही तर इथून पळ काढत आहात असं दिसतेय. >>

???

कैच्या कै आरोप?
सरकारी योजनेचा डेटाबेस कुणाकडे? असतो?

@अभिजित -१ तुम्हीच का नाही माहिती अधिकारात माहिती मागवत?

अभिजित - १'s picture

11 Sep 2018 - 5:18 pm | अभिजित - १

जशी नोटबंदी फेल गेली. बुलेट ट्रेन फेल जाणार. तसेच याचे पण होणार हे सांगायला कोणा तज्ज्ञाची गरज नाही. पण भक्तांचे एक मस्त असते. कुठे काही चुकीचे चाललंय सांगितले कि लगेच सांगतात - तुम्हीच RTI का फाईल करत नाही ? तुम्हीच का PMO कडे तक्रार करत नाही ?

तेजस आठवले's picture

11 Sep 2018 - 3:49 pm | तेजस आठवले

डॉ खरे यांना ओढून आणण्याचे प्रयोजन समजले नाही.पण त्यांनी पळ काढला असे तुम्ही म्हणू शकता.

हि स्कीम म्हणजे इतर काही नसून वेगवेगळ्या इन्शुरन्स कंपनीची तुंबडी भरण्या चा प्रकार आहे. शेतकरी पीक विमा काढतो. पैसे भरतो. बहुतेक वेळा त्याला भरपाई मागितल्या वर काही मिळत नाही. तो अडाणी असतो. काही करू शकत नाही. त्याची तितकी ताकद नसते.

अधोरेखित वाक्ये मस्त आहेत.

अभिजित - १'s picture

11 Sep 2018 - 5:13 pm | अभिजित - १

डॉ खरे यांना ओढून आणण्याचे प्रयोजन - कारण ते स्वतः डॉ आहेत. हिरानंदानी सारखे मोठे हॉस्पिटल ते सांभाळत होते.
अधोरेखित वाक्ये मस्त आहेत. - मस्त वगैरे नसून एक दुर्दैवी वस्तुस्थिती आहे. मुंबई / पुणे / ठाणे याच्या बाहेरचा कोणीतरी मिपाकर हे confirm करेलच.

ट्रम्प's picture

12 Sep 2018 - 5:10 pm | ट्रम्प

बरेच दिवस झाले मोगा , मंगु चें दर्शन झाले नाही हो !!!!
काय करत असतील ही मंडळी देवास ठाऊक .

सरकारी योजनेवरचे काम करणारे अधिकारीही थेट उत्तर देऊ शकत नाहीत , तो अधिकार प्रवक्ता,सचिव, मंत्री यांना असतो॥
शिवाय कालच कोर्टाने सांगितले की प्रत्येक बाबतीत पंतप्रधान/राष्ट्रपतीस थेट पत्र लिहिण्याची प्रवृत्ती वाढली आहे.

अभिजित-१ यांचं एक बरं आहे. ध्रुव राठी किंवा विनोद दुआचे व्हिडीओ बघायचे, काँग्रेसच्या चेपू पेजवर आलेले किंवा पप्पूने सांगितलेले मेसेज बघायचे आणि धागा काढायचा. आपण आपला अभ्यास करावा, संशोधन करावं असं त्यांना वाटत नाही. आपण जरी संशोधन करून दिलं तरी पुढे त्यांचे प्रतिसाद स्वैरच असतात. आता बघा ना डॉ. खरे यांना का बोलावलं याच उत्तर त्यांनी "कारण ते स्वतः डॉ आहेत. हिरानंदानी सारखे मोठे हॉस्पिटल ते सांभाळत होते" असं दिलंय. डॉ. काय करत होते ते आणि हा धागा याचा काय संबंध आहे हे मात्र ते सांगू शकणार नाहीत. मग पुढे म्हणतात "मस्त वगैरे नसून एक दुर्दैवी वस्तुस्थिती आहे. मुंबई / पुणे / ठाणे याच्या बाहेरचा कोणीतरी मिपाकर हे confirm करेलच." एकीकडे वस्तुस्थिती आहे म्हणायचं, त्याचा काही पुरावा द्यायचा नाही आणि कोणीतरी मिपाकर कन्फर्म करेल म्हणायचं. आहे की नाही गम्मत!

तर मोदींनी प्रधानमंत्री फसल बिमा योजना नावाची एक योजना काढली. आता पूर्वापार सगळ्या सरकारी योजना जश्या नेहरू व गांधी या नावाने असायच्या तसेच मोदींना ही योजना नरेंद्र मोदी फसल बिमा योजना अश्या नावाने काढता आली असती, पण त्यांनी तसं केलं नाही. तर आता या योजनेचा तपशील इथे बघा.

पुढील मुद्दा - आयुष्मान भारत

या योजनेसाठी नवी दीड लाख ‘वेलनेस सेंटर’ स्थापन करण्याचा सरकारचा मानस आहे. योजनेसाठी म्हणून नव्या केंद्रांची मुळीच गरज नाही. आहे त्या आरोग्य केंद्रांचा त्यासाठी चांगला उपयोग होऊ शकतो.

सगळी नवी सेंटर्स नाहीयेत - setting up or converting some 150,000 sub-centres in the country into so-called “health & wellness” centres. जी आहेत आणि ज्यांना बदलता येणार आहे ती बदलणार आहेत. जिथे नाहीयेत तिथे नवीन टाकणार. यात काही अडचण वाटतेय का तुम्हाला? असेल तर काय आहे ते सांगा नाहीतर उपाय सुचवा. (कृपया डॉ. अन्नदात्यांना उपाय विचारा असले सल्ले देऊ नयेत, इथे धागा तुम्ही काढलाय, उत्तर पण तुम्हीच द्या).

या योजनेतील जाहीर झालेले काही दर हे खासगी क्षेत्राला मान्य नाहीत.

याचा अर्थ दर कमी आहेत असा आहे ना? तुम्ही कधी कंपनीच्या ग्रुप हेल्थ इन्शुरन्स स्कीम मध्ये भाग घेतला आहे का हो? असेल तर जरा त्याचा अभ्यास करा, नसेल तर ज्याने भाग घेतला आहे त्याला विचारा. ही स्कीम नोकरी करणाऱ्यांसाठी का फायदेशीर असते? तर आपली कंपनी विमा कंपनीबरोबर घासाघीस करून प्रीमियम कमी करून घेते. तसेच जास्त आजार किंवा पूर्वीचे आजार पण समाविष्ट करून घेते. यात विमा कंपनीचा काय फायदा? तर मोठ्या संख्येने ग्राहक मिळतात. हेच तत्व जर सरकारने वापरले तर काय प्रॉब्लेम आहे? तुम्ही अमेरिकेचं उदाहरण दिलंय म्हणून तिथलेच सांगतो. आपली कंपनी जो विमा बेनिफिट्सच्या अंतर्गत देते त्यात जर महिना $४०० प्रीमियम पडत असेल तर तेच कव्हरेज मी बाहेरून विमा घेतला तर $१००० च्या आसपास पडतं.

ओबामाकेअर -

मुळात अमेरिकेत आरोग्यव्यवस्थाच गंडलेली आहे. तुम्हाला माहित नसेल तर सांगतो, जरी मी महिना $४०० प्रीमियम भरत असेन आणि गेला वर्षभर मी डॉक्टरकडे गेलोच नसेन तरी पण मी नुसत्या सर्दीसाठी डॉक्टरकडे गेलो तर मला $२३-३५ कोपे भरायला लागतो. वर डॉक्टर व्हिजिटचे जवळपास $२५०-३०० लावतात त्यातले मला २०% भरायला लागतात. वर नुसत्या सर्दीसाठी गेलो तरी डॉक्टर २-४ टेस्ट तर सहज करतो, त्यातले २०% किंवा जर कव्हर नसेल तर सगळे भरायला लागतात. आणि सगळं झाल्यावर डॉक्टर म्हणतो, नुसती सर्दीच तर आहे, होईल ४ दिवसात बरी, काही औषधाची गरज नाही. वाटल्या OTC मिळणारे औषध लिहून देतो ते द्या. म्हणजे प्रकरण किती महागडं आहे बघा. सर्वसामान्य अमेरिकन माणसाचे उत्पन्न $४५-५०००० डॉलर्स च्या आसपास असते. त्याला एवढा खर्च परवडणार आहे का? या विचाराने ओबामाकेअर आणली होती, ती का अयशस्वी झाली याची कारणमीमांसा इथे बघा.

तर माझं म्हणणं आहे, आयुष्मान भारत किंवा इतर कुठलीही योजना का चांगली नाही असं मुद्देसूदपणे मांडा बघू. काय काय गॅप्स दिसतात त्यावर काय करता येईल असं लिहून दाखवा बरं.

टवाळ कार्टा's picture

12 Sep 2018 - 1:00 pm | टवाळ कार्टा

उत्तम, आता तुमच्यावर भक्त असा स्टिकर लावतील लेखक

अथांग आकाश's picture

12 Sep 2018 - 2:38 pm | अथांग आकाश

आरोप नाही पण एक अंदाज, प्रोपगंडा चा भाग म्हणून असे फडतूस thread काढण्याचा मोबदलाही मिळत असेल कदाचित! तेव्हा सुजाण वाचकांनी प्रतिवाद न करता अनुल्लेखाने मारणे योग्य ठरावे. कारण लेखक बिनबुडाचे विषय घेऊन तावातावाने मैदानात उतरतात पण मुद्देसूद प्रतिसादांना तसेच मुद्देसूद उत्तर मात्र देत नाहीत.

.

अभ्या..'s picture

12 Sep 2018 - 4:35 pm | अभ्या..

आरोप नाही पण दुसरा अंदाज, प्रपोगंड्यासाठी अशा फडतूस धाग्यांना मिळणार्‍या मोबदल्यापेक्षा मुद्देसूद समर्थन करत असणार्‍या धाग्यांना जास्त मोबदला मिळत असावा. त्यासाठी नवनवीन आयडी घेऊन येणार्‍यांसाठी पर आयडी इन्सेन्टीव्ह मिळत असावा. नवनवीन भरती झालेल्यासाठी अ‍ॅग्रेसिव्ह कॅम्पेनिंगचे मार्क्स असावेत, त्यांच्यातही अगदी गळेकापू स्पर्धा असावी, कधी कधी तर असेही वाटते की पर प्रतिसाद, पर वर्ड, अप्रेझलचे चान्सेस असावेत. त्यांना कामाला लावणारे कार्पोरेटस असावेत. त्यांनासुध्दा आपल्या तालावर नाचवणारे टायकून्स असावेत.
चान्स है भई अच्छा....बस पर्सेंटेज लगा दो और अपने मिसळपाव को भी दे दो जरा. पाच दस पर्सेन्टमे दस सालमें मालामाल हो जायेंगे.

तुमचा अंदाज खराही असू शकतो! Nothing is impossible. पण असले धागे फडतूस असतात यावर तरी एकमत आहे एवढंही पुरेसं आहे.

.

कधी कधी तर असेही वाटते की पर प्रतिसाद, पर वर्ड, अप्रेझलचे चान्सेस असावेत.

:)))

बादवे... बुलेट ट्रेनचं माहित नाही,पण ठाण्यात मेट्रोचे काम मात्र सुरु होणार आहे. रस्त्ये नसलेल्या ठाण्यात मेट्रो पाहायला मिळणार हा चमत्कारच नाही का ? :)))
तुम्हाला म्हणुन सांगतो... कुठं बोलु नका बरं ! रस्त्ये बनवण्यासारखे काम मिळायला भाग्य लागतं भाग्य ! डिझानर रस्ते बनवणारे कलाकार तुम्हाला जगात शोधुन सापणार नाहीत ते तुम्हाला आपल्या देशात सापडतील. हल्लीच पेव्हर ब्लॉकचा पुल पडुन ट्रेन बंद झाल्या होत्या... आठवा आठवा जरा ! आहे कि नाही पेव्हर ब्लॉक महात्म मोठे ? ;)

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- MahaGanapatim | Ft.Agaadh - Priyanka Barve | Sarang Kulkarni

ट्रम्प's picture

16 Sep 2018 - 4:11 pm | ट्रम्प

धागलेखका शिवाय गांधी घराण्याच्या गुलामगिरी ची मानसिकता असणारे कोणीही इथे फिरकले नाही हे विशेष , त्यामुळे हा धागा चौकात उघडा पडलेला दिसतोय .

तुम्हाला काय माहिती हवी, काय धोके आहेत हे स्पष्टपणे विचारा.

ट्रम्प's picture

12 Sep 2018 - 5:04 pm | ट्रम्प

60 /65 वर्ष मान खाली वाकवून " आवो हमें लुटो !! हमारी गरिबी का मजाक बनाईए !!!! " या रक्तात भिनलेल्या प्रवृत्ती मूळे मोदींच्या प्रत्येक निर्णयामध्ये दोष शोधत बसण्यात काय हशील आहे का ?

अजून किमान 10 वर्ष तरी मोदींनीं घेतलेल्या आर्थिक निर्णयांवर उलट सुलट चर्चा करायची आमची तरी ईच्छा नाही .

पंधरा वर्षा नंतर मोदींच्या कामगिरीचे मूल्यमापन करू , त्या वेळी भाजपा ची राजवट काँग्रेस सारखी लुटारू , अल्पसंख्याकधार्जिनी , वाटली तर वेळप्रसंगी त्यांना घरी बसवू.

पण सध्या मोदींविरोधाच्या वातावरण निर्मिती ला हातभार लावणार नाही , उलट वातावरण निर्मिती हाणून पाडू !
जय हिंद !!!!
जय महाराष्ट्र !!!!
हुश्श !!!!!!!!!!!

SHASHANKPARAB's picture

17 Sep 2018 - 2:18 pm | SHASHANKPARAB

मोदिन्च्या राज्यात काही चांगल झाल नसेल कदाचित, पण आधी तोंडात मूग धरून बसणार्‍या अडाणी जनतेलाही आता सरकारला केलेल्या कामाचा जाब विचारवासा वाटतोय, करातून आलेल्या पैशाचा हिशोब मागण्याची अक्कल आलीय नि पाच वर्षांत किती कामे केली याचा हिशोबही हिरीरीने मागितला जातोय. ही मोदिन्चि एक मोठी उपलब्धि आहे.

अभिजित - १'s picture

17 Sep 2018 - 5:54 pm | अभिजित - १

म्हणजे काय ? योग्य मराठी शब्द काय याला ? कि हळूहळू हिंदी करण करत जायचंय !!

ट्रम्प's picture

17 Sep 2018 - 6:41 pm | ट्रम्प

मोदींची उपलब्धी म्हणजे !!
' म्हणजे मोदींचे हे एक यश आहे '
यव्हढं कळत न्हाय व्हय ?

SHASHANKPARAB's picture

17 Sep 2018 - 11:05 pm | SHASHANKPARAB

तसे बहुतेक मराठी शब्द माहीत आहेत, कधी कधी वेळ नसल्यामुळे जो शब्द सुचेल तो लिहितो. असो पुढच्यावेळी इन्सुरन्सला मराठीत विमा म्हणतात नि दुसऱ्यांना शिकवण्याच्या आधी स्वतःचा पोपट तर होत नाही ना? हे पाहायचं तेव्हढं लक्षात असू द्या भाऊ... तुमच्या शुद्धलेखनाला शुभेच्छा.

अभिजित - १'s picture

18 Sep 2018 - 5:19 pm | अभिजित - १

इंग्रजी शब्द परवडले. ते बाहेरचे आहेत हे स्पष्ट समजत असते. लेखक , वाचक दोघांना. हे असले हिंदी शब्द "मराठीच" म्हणून वापरणे हे खरं धोकादायक आहे. हे डोक्यावर बसतात. मग खऱ्या मराठी शब्दा ची लोकांना लाज वाटू लागते. उदा. - संपन्न . हा शब्द मराठीत पूर्वी पासून आहेच. श्रीमंत या अर्थाने. पण हल्ली सर्व लग्ने संपन्न होत असतात. लग्न साजरे होत आहे म्हणायची लाज वाटु लागली आहे मराठी लोकांना. खेद वाटतो कि , या बाबतीत मराठी लोक पुढे आहेत. आपल्या च गोष्टीला लाथाडुन परक्याला डोक्यावर घेण्यात.
जाऊ दे सोडून द्या. जे तुम्हाला योग्य वाटेल ते करत जा.

https://maharashtratimes.indiatimes.com/india-news/prime-minister-narend...
आयुष्मान भारत' हे 'मोदी केअर' नाही तर दरिद्री नारायणाची सेवा आहे. या योजनेमुळे गरिबांनाही श्रीमंतांसारखे उपचार मिळतील,' असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्यक्त केला.

https://www.loksatta.com/desh-videsh-news/pm-narendra-modi-launch-worlds...
या योजनेअंतर्गत देशातील १० कोटींपेक्षा जास्त कुटुंबांना म्हणजेच जवळ जवळ ५० कोटींपेक्षा जास्त लोकांना मोफत आरोग्य विमा मिळणार आहे.
यामध्ये महाराष्ट्रानेही सहभाग दर्शविला असून राज्यातील २०११च्या जनगणनेमधील सामाजिक आणि आर्थिक उत्पन्नांच्या नोंदीवरून सुमारे ८४ लाख कुटुंबांची निवड केली आहे. पहिल्या टप्प्यामध्ये राज्य सरकार आणि पालिकेच्या अखत्यारीतील वैद्यकीय महाविद्यालये आणि रुग्णालयांचा यामध्ये समावेश केला जाणार असून पुढील टप्प्यांमध्ये खासगी रुग्णालयेदेखील सहभागी होतील. या योजनेसाठीची आर्थिक तरतूद केंद्राकडून ६० टक्के तर ४० टक्के राज्याकडून केली जाणार आहे.
--------------------------------------------------------
लोकांनी कधी ना कधी खाजगी हॉस्पिटल चा अनुभव नक्कीच घेतला असेल. प्रत्यक्ष / अप्रत्यक्ष रित्या. प्रत्येकाने आपले डोके चालवुन विचार करा. हे शक्य आहे का ? माझी तर ह ह पु वा !!!
फेकूगिरी करायला काही लिमिट ?

विशुमित's picture

23 Sep 2018 - 5:49 pm | विशुमित

मला तर फक्त योजनेचे नामकरण वाटते.
हे सगळं आधी पासून आहेच.
थोडे दिवसांनी डाॅक्टरांचे, आरक्षण पाहिजे म्हणून मुक मोर्चे पाहिला मिळू नये म्हणजे मिळवली.
अभेंद्र शेठ "एक डाॅक्टर लाख डाॅक्टर " अशा आशयाचे स्टिकर, पोस्टर, टी शर्ट, झेंडे यासाठी चांगली opportunity आहे..!!

आज म. टा. मध्ये बातमी ( पहिल्या पानावर ) आहे. कपडे धुवायला पैसे नसल्या मुळे ४० शस्त्रक्रिया रखडल्या !! सायन रुग्णालयात !! ती लिंक मिळत नाही. त्यामुळे दुसरी लिंक देत आहे.
कपडे धुवायला पैसे नाहीत. आणि म्हणे ५० कोटी जनतेला फुकट विमा पुरवणार !!

https://indianexpress.com/article/cities/mumbai/mumbai-sion-hospital-run...
Surgeries in Sion hospital took a hit on Monday, as there was a short supply of linen for patients.
In two departments, urology and general surgery, surgeries were postponed Monday. In the orthopaedic department, where a few elective procedures were delayed, patients already were on a three-month waiting list

जय आयुष्मान भारत. जय मोदी सरकार !!

https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai-news/health-c...

'सर्वांसाठी आरोग्य या अंतर्गत आयुष्मान भारत योजना राज्यातील दुर्गम, आदिवासी भागातील लाखो बांधवांसाठी विकासाची पहाट ठरेल. महाराष्ट्रात या योजनेसोबतच महात्मा फुले जनआरोग्य योजनाही एकत्रित राबविली जाणार असल्याने राज्यातील ९० टक्के लोकसंख्येला आरोग्य विम्याचे कवच मिळणार असल्याचे राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी सांगितले.
---------------------------------------------------------------------
आता भक्त गप्प का आहेत ? लाज वाटते ? खोट्याचे समर्थन करायला ??

अभिजित - १'s picture

26 Sep 2018 - 9:30 pm | अभिजित - १

Doctors clueless about Ayushman Bharat a km away from launch function in Lucknow

https://economictimes.indiatimes.com/news/politics-and-nation/doctors-cl...

LUCKNOW: Just a kilometre away from Indira Gandhi Pratisthan in Lucknow where the PM Jan Arogya Yojana-Ayushman Bharat scheme is launched at a grand function by Uttar Pradesh Governor Ram Naik on Sunday, a doctor handling patients at ‘Critical Care Unit’ of the government-run Ram Manohar Lohia (RML) Combined Hospital draws a blank when asked about the scheme.

मोठ्ठा विनोद !!

अभिजित - १'s picture

24 Oct 2018 - 1:17 pm | अभिजित - १

https://www.loksatta.com/desh-videsh-news/man-with-ayushmaan-bharat-card...

‘आयुष्मान भारत’चा फज्जा ! डॉक्टर म्हणतात, ‘जा मोदींकडून पैसे घेऊन या’
मोठा गाजावाजा करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या महिन्यात आयुष्मान भारत या महत्काकांक्षी योजनेची घोषणा केली, पण या योजनेचा बोजवारा उडताना दिसत आहे. कारण, या योजनेचा लाभ घेण्यासाठी नागरिकांना किती अडचणींचा सामना करावा लागतोय हे उत्तर प्रदेशच्या लखनऊमध्ये समोर आलं आहे. येथील किंग जॉर्ज वैद्यकीय विद्यापीठात शाहजहांपूर येथून उपचारासाठी आलेल्या एका रुग्णाने आणि त्याच्या नातेवाईकांनी आयुष्मान भारत योजनेअंतर्गत मोफत उपचाराची मागणी केली असता, त्याला डॉक्टरांनी जा आधी मोदींकडून पैसे घेऊन या, नंतर मोफत उपचार होतील असं उत्तर दिल्याचं समोर आलं आहे.
रुग्णाचे काका हरिश्चंद्र यांनी डॉक्टरांना आयुष्मान योजनेचे कुटुंबाला मिळालेले कार्ड दाखविले. मात्र, त्यावर डॉक्टर संतापले आणि हे कार्ड घ्या आणि पंतप्रधान मोदींकडे जा, व त्यांच्याकडून पैसे घेऊन या

महेश हतोळकर's picture

24 Oct 2018 - 4:31 pm | महेश हतोळकर

आमच्या हापिसात सायबानं सांगितलं आपापली टेबलं स्वच्च ठेवा. शेजारचा लैच तणतणत व्हता, म्हनला सायबाला पुसायचं फडकं आनून दे म्हणाव मगच फाईली नीट लावतो. बेणं सक्काळी सक्काळी बांबू लागल्यापासनं लैच कावलं हुतं.