मित्रांनो, नुकतेच निपाणीला जाणे झाले. त्यावेळी प्राचार्य अद्वयानंद गळतगे सरांची आवर्जून भेट घेतली. त्यावेळी नवीन काय लेखन केलेले आहे या विचारणेवर सरांनी ‘प्रज्ञालोक' नियतकालिकामधे प्रकाशित झालेल्या लागोपाठ 4 लेखांची 40 पानी झेरॉक्स मला वाचायला दिली. सुरवात अंक क्रमांक २४२ मध्ये पहिल्या लेखात प्रा. के. वा. आपटे यांनी संचित व प्रारब्ध कर्माचे स्थान, नाश व प्रारब्ध कर्माची फलोन्मुखता? याविषयी पुढील प्रश्न उपस्थित केले होते. त्यातील भाग 4 मधील एक प्रश्न वाचकांना रंजक वाटून त्यावर आपापली मते मांडायला प्रवृत्त करतील असे वाटून त्यातील एक प्रश्न सुटाकरून सादर केला आहे. त्यांच्या भागातील उरलेली प्रश्नोत्तरे आणि नियतकालिकाच्या अनुक्रमानुसार भाग 1 ते 3 इथे वाचकांच्या उत्सुकतेनुसार यथावकाश सादर केले जातील. ( अवांतर माहिती - 40 पानी झेरॉक्स एका दिवसात टाईप करणे माझ्यासारख्या हळू हळू टंकलेखन करणाऱ्याला गूगलमामांच्या ड्राईव्हवर चाळीस पानी टंकलेखन किरकोळ चुका वगळता चुटकी सरशी करून दाखवले. त्या लेखनात त्यांच्या मजकुराला पुरक होईल अशी माहिती फोटो मी नेट वरून शोधून सादर केली आहेत. ) अनेक नव्याने सदस्य जालेल्या मिपाकरांना ह्या गाढ्या विचारकाची ओळख नसेल. त्यांच्या ब्लॉगच्या लिंक 1 व लिंक 2 वरून ती करून घेता येईल. स्वतः प्रखर बुद्धिवादी असून देखील विज्ञान आणि अध्यात्माचा मेळ कसा लावायचा यावर त्यांनी विपुल लेखन केले आहे. भानामती केसेसच्या मुळाशी जाऊन त्या घटना खरेच कोण करते यावर त्यांचे विशेषत्वाने लेखन आहे.
प्रश्न : जगाची निर्मिती म्हणजे विषमतेची निर्मिती हे मान्य करता येईल. पण माणूस ईश्वराच्या हातातील कळसूत्री बाहुली आहे. त्याला स्वत:चे कसलेच इच्छास्वातंत्र्य नाही, हे मान्य करणे मात्र कठिण आहे. मी माझ्या इच्छेनुसार बोलतो, वागतो, कर्म करतो आणि हा माझा स्वत:चा प्रत्यक्ष अनुभव आहे. माझा हा अनुभव खोटा आहे, भ्रम आहे हे मी मान्य करू शकत नाही. मग गीता व क्वाँटम सिद्धांत काही म्हणो. उत्तर : कार्यकारणसंबंध स्थानिक आहे हाही प्रत्येकाचा अनुभव आहे ना ? पण तो अनुभव भ्रम असल्याचे क्वाँटम सिद्धांतातील प्रत्यक्ष वैज्ञानिक प्रयोगाने सिद्ध झाले. कोणत्याही गोष्टीच्या सत्यासत्यतेचा निर्णय, एकादा अनुभव भ्रम आहे की सत्य, याची निश्चिती वैज्ञानिक प्रयोगाशिवाय होऊ शकत नाही. कार्यकारणभावाच्या अनुभवाप्रमाणेच माणसाचा स्वतःला इच्छास्वातंत्र्य असल्याचा अनुभव हा सत्य आहे की भ्रम आहे, याचा निर्णयही वैज्ञानिक प्रयोगानेच होऊ शकतो. हा वैज्ञानिक प्रयोग संमोहनाचा असून तो येथे थोडक्यात देतो. टॉम नावाच्या व्यक्तीवर एका व्यावसायिक हिप्नॉटिस्टने केलेला प्रयोग आहे. हा संमोहनाचा प्रयोग त्याच्यावर करून शेवटी त्याला सूचनेने संमोहनातून बाहेर आणले (जागे केले) पण संमोहनातून बाहेर आणण्यापूर्वी त्याला अशी सूचना केली की, संमोहनातून बाहेर आल्यानंतर त्याला त्याची लॉरा नावाची किशोरी वयाची मुलगी (जी तेथे उपस्थित होती) अदृश्य बनेल. नंतर तो बसलेल्या खुर्चीसमोर टॉमच्या त्या मुलीला उभी करून टॉमला संमोहन अवस्थेतून बाहेर आणले - जागे केले आणि त्याला विचारले की त्याला त्याची मुलगी लॉरा कुठे दिसते का ? टॉमने खोलीत सभोवार व समोरच्या आपल्या मुलीच्या शरीरात आरपार दृष्टी गेल्याप्रमाणे आपली नजर फिरवली व तो म्हणाला, 'नाही'. हिप्नॉटिस्टने पुन्हा खात्री करून घेण्यास सांगितले व टॉम आपल्या मुलीच्या जास्तच खिदळणाच्या हास्याचा आवाज जणू कानावर पडला नसल्याप्रमाणे पुन्हा म्हणाला, 'नाही'. नंतर हिप्नॉटिस्टने आपल्या खिशातील घड्याळ गुपचुपपणे काढून लॉराच्या पाठीला ते कोणालाही दिसणार नाही अशा रीतीने दाबून धरले व ती वस्तू कोणती हे ओळखण्यास सांगितले. टॉम पुढे वाकून व लॉराच्या जणू पोटात पाहिल्याप्रमाणे पाहून म्हणाला की ती वस्तू घड्याळ आहे. हिप्नॉटिस्टने ‘बरोबर' म्हणून मान हलवली व त्यावर काय लिहिले आहे हे वाचून सांगशील काय, असे विचारले. टॉमने नज़र बारिक करून व प्रयत्नपूर्वक वाचून त्यावर लिहिलेला मजकूर व त्या घड्याळाच्या मालकाचे नाव सांगितले. नंतर हिप्नॉटिस्टने खोलीत जमलेल्या सर्व प्रेक्षकांना ती वस्तू घड्याळ असल्याचे हात उघडून दाखवले व त्यावरील मजकूर व त्याच्या मालकाचे नाव टॉमने बरोबर वाचले असल्याचे सर्वांनी खात्री करून घ्यावी म्हणून प्रेक्षकांमधून ते घड्याळ फिरविले. (The Holographic Universe (1991) Michael Talbot p.141) येथे टॉमच्या दृष्टीला त्याच्या लॉरा या मुलीचे शरीरच म्हणजे भौतिक सत्यच (physical reality) नाहीसे झाले आहे ! ही गोष्ट तो तिच्या पोटातून तिच्या पाठीला दाबून धरलेले घड्याळ (तिच्या शरीरातून आरपार) पाहू शकला यावरून सिद्ध होते. तेही संमोहनातून बाहेर आल्यानंतर, जागेपणी ! संमोहनात दिलेल्या सूचनेमुळे संमोहन अवस्थेतून बाहेर आलेल्या, म्हणजे जागे झालेल्या माणसाचे भौतिक जग (येथे लॉराचे शरीर) सत्य असूनही असत्य (भ्रम) ठरू शकते, ही गोष्ट या प्रयोगातून सिद्ध होते. त्याचप्रमाणे अस्तित्वात नसलेली वस्तूही (उदा. साप) संमोहनातील सूचनेमुळे प्रत्यक्ष दिसू शकते ! (हा प्रयोग प्रस्तुत लेखकाच्या माहितीतील एका हिप्लॉटिस्टने सार्वजनिकरित्या केला आहे.) हा संमोहनाचा प्रभाव म्हणजे मानसिक अज्ञानाचाच प्रभाव असून ईश्वराची द्वंद्व स्वरूपातील सृष्टीनिर्मिती म्हणजे ईश्वराचा एक मानसिक अज्ञाननिर्मितीचा मुलभूत वैश्विक संमोहन प्रयोगच आहे ! ही गोष्ट श्रीकृष्णाने गीतेत पुढीलप्रमाणे सांगितली आहे. 'इच्छाद्वेषसमुत्थेन द्वंद्वमोहेनभारत । सर्व भूतानि संमोहं सर्गे यान्ति परंतप ।।' (गीता ८.२७) म्हणजे हे अर्जुना जगदुत्पत्तीच्या वेळी (सर्गे) इच्छाद्वेषरूपी भ्रामक द्वंद्वाच्या निर्मितीतून सर्व प्राणी संमोहाला (अज्ञानाला) प्राप्त होतात. त्यामुळे सर्व (मनुष्य) प्राणी हृदयस्थ ईश्वरच सर्व कर्मे करीत असताना ते असत्य (खोटे) समजतात व मीच कर्म करतो ही जाणीव, जी असत्य आहे (अज्ञान आहे) तेच सत्य (ज्ञान) समजतात ! अर्थात् तुम्ही संमोहनाचा हा वैज्ञानिक प्रयोग अनुभवाच्या विरुद्ध आहे म्हणून न मानू शकता. पण त्यामुळे वस्तुस्थितीत काही फरक पडत नाही; जसे एखाद्याने सूर्यच आकाशातून (पृथ्वीभोवती) फिरतो हा माझा प्रत्यक्ष अनुभव आहे, असे म्हटल्याने वस्तुस्थितीत काही फरक पडत नाही ! मात्र ‘मम माया दुरत्यया ।' (माझी माया जबरदस्त आहे) हे श्रीकृष्णाचे म्हणणेच त्यातून तुम्ही सिद्ध करता !
वाचने
18703
प्रतिक्रिया
41
मिसळपाव
प्रतिक्रिया
कर्मसिद्धांत एकखाद्याला पटला
काही समजत नाही
In reply to कर्मसिद्धांत एकखाद्याला पटला by कंजूस
काही समजत नाही
In reply to कर्मसिद्धांत एकखाद्याला पटला by कंजूस
काही समजत नाही
In reply to कर्मसिद्धांत एकखाद्याला पटला by कंजूस
तीन वेळा तेच तेच
In reply to काही समजत नाही by शशिकांत ओक
डॉ विद्याधर ओक यांचे
पुनर्जन्म संकल्पनेवर
In reply to डॉ विद्याधर ओक यांचे by प्रकाश घाटपांडे
https://www.misalpav.com/node
In reply to पुनर्जन्म संकल्पनेवर by शशिकांत ओक
डॉ ओक हे वैद्यकीय उच्चविद्या
In reply to डॉ विद्याधर ओक यांचे by प्रकाश घाटपांडे
हा तो कार्यक्रम https://www
In reply to डॉ ओक हे वैद्यकीय उच्चविद्या by सुबोध खरे
व्हिडीओ पाहीला..
In reply to हा तो कार्यक्रम https://www by प्रकाश घाटपांडे
त्यातील पुनर्जन्म झालेली
In reply to व्हिडीओ पाहीला.. by सतिश गावडे
सडेतोड आणि लख्ख शास्त्रीय
स्क्यूज् मी.....
In reply to सडेतोड आणि लख्ख शास्त्रीय by गवि
तुम्ही फार शंकिष्ट आहात.
In reply to स्क्यूज् मी..... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
तुम्ही मराल.
In reply to स्क्यूज् मी..... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
तसं तर मॉर्फिनचा डोस जास्त
In reply to तुम्ही मराल. by गामा पैलवान
गाडी आरपार जायची तर
In reply to तसं तर मॉर्फिनचा डोस जास्त by सुबोध खरे
गाडी आरपार ?
In reply to तसं तर मॉर्फिनचा डोस जास्त by सुबोध खरे
LOL
In reply to स्क्यूज् मी..... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मायकेल टॅलबोट
आणिबाणीच्या काळात बहुतेक
:))
In reply to आणिबाणीच्या काळात बहुतेक by कंजूस
२४ तासांच्या आत ५०० च्या वर क्लिक्स?
२४ तासांच्या आत ५०० च्या वर क्लिक्स?
पाठीवर दाबुन धरलेल्या
पाठीवर दाबुन धरलेल्या
In reply to पाठीवर दाबुन धरलेल्या by नेत्रेश
ओक साहेब परत आले वाटतं
वेल्शमधला जादुगार डाइनमो (
देह व आत्मा
माझ्या मते खिशात ( स्वत:च्या
दंडवत घ्यावा
In reply to माझ्या मते खिशात ( स्वत:च्या by कंजूस
मठात स्वस्थ बसून ऐषआराम
In reply to माझ्या मते खिशात ( स्वत:च्या by कंजूस
हा हा हा
In reply to माझ्या मते खिशात ( स्वत:च्या by कंजूस
लेखातील एका प्रश्नावर चर्चा रंगली आहे
एक दगड पायरी बनून सतत तुडवला
In reply to लेखातील एका प्रश्नावर चर्चा रंगली आहे by शशिकांत ओक
अरे वा मस्तच! दगड हा देखील एक
In reply to एक दगड पायरी बनून सतत तुडवला by सतिश गावडे
चुकीचा प्रश्न
In reply to लेखातील एका प्रश्नावर चर्चा रंगली आहे by शशिकांत ओक
Fooled by Randomness व Black
In reply to चुकीचा प्रश्न by रविकिरण फडके
असं धरून चालू की पूर्वकर्माने
वैज्ञानिक लोकांना कोणतीही