Skip to main content
मित्रांनो,
नुकतेच निपाणीला जाणे झाले. त्यावेळी प्राचार्य अद्वयानंद गळतगे सरांची आवर्जून भेट घेतली. त्यावेळी नवीन काय लेखन केलेले आहे या विचारणेवर सरांनी ‘प्रज्ञालोक' नियतकालिकामधे प्रकाशित झालेल्या लागोपाठ 4 लेखांची 40 पानी झेरॉक्स मला वाचायला दिली. सुरवात अंक क्रमांक २४२ मध्ये पहिल्या लेखात प्रा. के. वा. आपटे यांनी संचित व प्रारब्ध कर्माचे स्थान, नाश व प्रारब्ध कर्माची फलोन्मुखता? याविषयी पुढील प्रश्न उपस्थित केले होते.