पितृ"पक्षी"
माझा कावळा अजब
जीवखड्याशी खेळतो
इहलोकीच्या अंगणी
परलोक धुंडाळतो
माझा कावळा गणिती
तेरा आकडे मोजतो
आठ नख्यांच्या अष्टकी
पंचप्राण मिळवितो
माझा कावळा तत्वज्ञ
गुह्य विश्वाचे जाणतो
जे जे पिंडी ते ब्रह्मांडी
पिंड फोडून सांगतो
पैलतीरी कोकताना
हळवा का होसी काऊ
जीवखड्याची रे माझ्या
आज नको वाट पाहू
लेखनविषय:
याद्या
6664
प्रतिक्रिया
21
काव्यरस
मिसळपाव
जबरदस्त
+१
In reply to जबरदस्त by प्रचेतस
सुर्रेख!! केवळ अप्रतिम लिहिले
रुपके अधिक नीट समजून घेणे आवडेल
प्लस वण!
In reply to रुपके अधिक नीट समजून घेणे आवडेल by माहितगार
जबरदस्त!
जे
प्रतिसाद
मस्त कविता!
तुमचे चित्रसाद आवडतात. :) ्
In reply to मस्त कविता! by अथांग आकाश
@ अथांग आकाश
@ खिलजि
In reply to @ अथांग आकाश by खिलजि
ह्यात पांडू आहे! =))
In reply to @ खिलजि by अथांग आकाश
@ प्राची अश्विनी आणि अत्रुप्त आत्मा
In reply to ह्यात पांडू आहे! =)) by अत्रुप्त आत्मा
छान
अथांग आकाश, सिरुसेरी
सुरेख!
धन्यवाद,
In reply to सुरेख! by प्राची अश्विनी
छान.
काव्य आवडले....
प्रा.डाॅ. दिलीप, मुवि